(न्हाउन ओले केस घेवून)

मनिष's picture
मनिष in जे न देखे रवी...
23 May 2010 - 11:40 am

हेहे....आमची प्रेरणा पाषाणभेद यांची ही कविता आणि पाचवीला पुजलेली रविवारची कामे आणि त्यात होरपळणार्‍या उल्हसित चित्त्ववृत्ती तथा आमची (हरवलेली) अगाध प्रतिभा! ;)

न्हाउन ओले केस घेवून
सर्दी होईल की तुला
शिंकानी मग बेजार होशील,
त्रास नुसता मला|

जा पटकन टॉवेल घेऊन,
केस सत्वर कोरडे कर
तेल लावून, भांग पाडून
चहा पिऊन घे की कपभर|

घरात झालाय नुसता पसारा,
त्याचे आहे का काही तुला?
सुट्टीची आहेत कामे ढिगभर,
त्रास नुसता मला|

- मनिष शीघ्रक(ड)वी ;)

हास्यकविता

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

23 May 2010 - 11:59 am | मी-सौरभ

-----
सौरभ :)

पाषाणभेद's picture

23 May 2010 - 12:35 pm | पाषाणभेद

:-)

मनिषभाऊ, रविवार पाहून कवितेच्या माध्यमातून तीर बरोब्बर मरलाय बघा. आजचा दिवस वहिनींना मिपावर येवू देवू नका. नाहितर जेवायला आहेच मग हॉटेल.

:-) मस्त आहे प्रतिभा तुमची.

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

टारझन's picture

23 May 2010 - 1:29 pm | टारझन

व्वा !!! मणिष तिनकडवी ... व्वा !!