जाणते अबोल प्रीत, आर्जवे मनात किती
रंगते सुरेल गीत, स्पर्श बोलतात किती!
मन चंचल फुलपंखी भिरभिरते तुजभवती
स्मरणरंग भरुन तुझे चित्र रेखिते नवती
तेज चांदण्यास नवे, चंद्रही भरात किती!
रुणझुणत्या स्वप्नांचे हिंदोळे झुलवित ये
मंद मदिर समिरासह चैत्रबहर फुलवित ये
संग क्षणांचा भरतो रंग जीवनात किती!
अधरांच्या उंबर्यात नाव तुझे का अडते?
अधिर गूज थरथरत्या पापण्यांत का दडते?
लज्जेचे जलतरंग वाजती सुरात किती!
प्रतिक्रिया
15 May 2010 - 10:33 am | मनीषा
सुरेख कविता !!!
अधरांच्या उंबर्यात नाव तुझे का अडते?
अधिर गूज थरथरत्या पापण्यांत का दडते?
लज्जेचे जलतरंग वाजती सुरात किती!
हे विशेष आवडले...
15 May 2010 - 12:10 pm | प्रभो
लज्जेचे जलतरंग वाजती सुरात किती!
जबरदस्त!!
15 May 2010 - 1:20 pm | राघव
अत्यंत सुरेल कविता! :)
बर्याच दिवसांनी??
राघव
15 May 2010 - 1:58 pm | राजेश घासकडवी
रंगले लयीत गोड, सुमधुर हे काव्य किती
नि:शब्द प्रीतीचे छेडुनी निनाद किती...
15 May 2010 - 4:22 pm | दत्ता काळे
कविता आवडली.
15 May 2010 - 7:33 pm | अनिल हटेला
रुणझुणत्या स्वप्नांचे हिंदोळे झुलवित ये
मंद मदिर समिरासह चैत्रबहर फुलवित ये
संग क्षणांचा भरतो रंग जीवनात किती!
क्या बात है !!
:)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
15 May 2010 - 8:41 pm | मदनबाण
लज्जेचे जलतरंग वाजती सुरात किती >>>
शॉलिट्ट्ट्ट... :)
मदनबाण.....
When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss
16 May 2010 - 7:06 pm | sur_nair
'अधरांच्या उंबरात' हे एकदम ताजे वाटले म्हणून विशेष आवडले