मानसिक छळ्/हिंसा

पुरणपोळी's picture
पुरणपोळी in जनातलं, मनातलं
13 May 2010 - 10:34 am

काहि काहि लोक दुसर्यांना दुखावण्यात पी एच डी असतात. माझ्या जवळ्च्या ओळखितली ( नातेवाईकच) बाई.. मी फ्लट घेतला आणि ही बघायाला आली ( न बोलावता). दारात पाउल टाकल्या टाकल्या हिचे उद्गार,, " येवढा काहि वाईट नाहि.. बरा आहे. तरी सुदधा ह्या एरियात म्हणजे जरा.." आता हि बाप आणि नवरा पुण्याईमुळे एका विवि़क्षित शहरातल्या
विषेश उपनगरात रहाते. पण येवढा माज? कुठलीहि गोष्ट घेतली आणि हिनि पाहिलि कि हिचा प्रश्न, केव्ढ्याला? किमती वरुन प्रत्येक गोष्टिची किंमत करते.
मी गाडि घेतली तेव्हा हीचा येवढा जळफळाट झाला, मुळ स्वभावाप्रमाणे तीने लगेच रंगावर टिका केली. माझ्या आत्यंतिक आजरपणात मला भेटायला येणे वगेर दूर एक साधा फोन सुध्धा केला नाहि. मला अनेकदा ती इतक लागेल अस बोलली आहे, अक्षरशः रडवल आहे. मला अश्या प्रसन्गि काय बोलवे हेच कळन नाहि.
मला तिला धडा शिकवयचा आहे कि ति पुन्हा कोणालाहि अस मुर्खासारख दुखवताना दहा वेळेला विचार करेल.
तुम्हि अश्या लोकांना कस हन्डल करता?

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

13 May 2010 - 10:43 am | शिल्पा ब

आपणही वेळ पाहून असंच खवचट बोलायचं...कधी कधी नाही पटत...पण तरी बोलावच....मला असंच अनुभव माझ्या रक्तातल्या जवळच्या नातेवाइकाकडून येतो...आजकाल मी फोन करणेच सोडून दिलेय त्यामुळे....असले लोक असतातच...अगदीच नाहि सहन झाल तर आपण संबध कमी करायचे अथवा तोडूनच टाकायचे...काय फरक पड्नार आहे ?

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

टारझन's picture

14 May 2010 - 1:18 pm | टारझन

>>>मला अनेकदा ती इतक लागेल अस बोलली आहे, अक्षरशः रडवल आहे.
आहो ... काय हे ? इकडे रोज येत चला ... कातडी कशी गेंड्यासारखी होईल ... की रोना तो क्या मेहसुस करना भुल जाआँगे =))

>> मला अश्या प्रसन्गि काय बोलवे हेच कळन नाहि.
अशा वेळी इकडचा कुठचाही प्रतिसाद आठवुन फेकुन मारायचा ... ;) मराठी भाषा आहे , काढु तसे अर्थ ऑटोमॅटिक निघतात , नाही निघाले तर किमान समोरचा डोकं खाजवत तरी बसतो :)

>>> मला तिला धडा शिकवयचा आहे कि ति पुन्हा कोणालाहि अस मुर्खासारख दुखवताना दहा वेळेला विचार करेल.
हाहाहा .. इकडे धडे शिकवणारेही आहेत .. आणि कविता शिकवणारेही =)) तुम्ही असा धडा शिकवा , की ती ती विचारही करणार नाही दुखवायचा..

>> तुम्हि अश्या लोकांना कस हन्डल करता?
आम्ही त्याला ऑण द स्पॉट खोडुन काढतो :) एकदा आपली ख्याती पसरली की कोणी धाडस करत नाही, मग हँडल करायची वेळंच येत नाही :)

- मिर्‍या वाटपांडे
टारझन मिर्‍या कंसल्टंसी सर्व्हीसेस.

शिल्पा ब's picture

13 May 2010 - 10:45 am | शिल्पा ब

चुकुन दोनदा बटन दाबले गेल्याने हा प्रतिसाद उडवत आहे.

महेश हतोळकर's picture

13 May 2010 - 10:57 am | महेश हतोळकर

मस्त एन्जॉय करा. मूर्ख असतात असे लोक. पण टाईमपासला बरे असतात.
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/124153.html?1176122484
हे पण वाचा.

शिल्पा ब's picture

13 May 2010 - 11:31 am | शिल्पा ब

वरची लिन्क भारि हो !!!! बहुदा असे लोक म्हातारेच असतात का?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पर्नल नेने मराठे's picture

13 May 2010 - 11:01 am | पर्नल नेने मराठे

असल्या येडपटांना कमीच एन्ट्रटेन करा :D म्हणजे दुख्ख होणार नाही.

चुचु

इन्द्र्राज पवार's picture

13 May 2010 - 12:31 pm | इन्द्र्राज पवार

मानसिक छळ करणार्‍याना हे कसे कळत नसेल की, आपल्या अशा काटेरी बोलाने आजूबाजूला कुणी लहान असेल तर त्याच्या बालमनावर काय विपरीत परिणाम होत असतील!!!

माझ्या वडिलांच्या मृत्युनंतर माझ्या मामाने मला व आईला (आमची पितृघरात होत असलेली अपमानास्पद आबाळ पाहून...) धारवाडहून कोल्हापूरला कायमस्वरूपी आणले. मी त्यावेळी केवळ चार पाच वर्षांचा असेन नसेन पण त्यामुळे मी "मामाच्या गावाला जायचे" अशा आनंदात असणार. इकडे कोल्हापूरला आल्यानंतर प्रथम मामाने त्याच्या स्वत:च्या घरामागील जागेत आमची रहायची सोय केली होती. मामीही प्रेमळ स्वभावाची असल्याने, व तिलाही त्यावेळी साधारणता: माझ्याच वयाचा एक मुलगा असल्याने, माझे तेथे येणे आनंददायकच वाटले होते. दिवस, महिने, वर्षे पुढे सरकू लागले. मी आणि राहुल (माझा मामेभाऊ.... जो माझ्या पेक्षा एक दीड वर्षांनी मोठा असेल...) एकाच शाळेत, नंतर हायस्कूल पर्यंत एकत्रच , मग महाविद्यालयीन जीवनात विषय वेगळे असल्याने थोडे दूर, पण आवार एकच असल्याने, तसेच गाडी देखील एकच असल्याने "वेगळे" पणाची जाणीव होत नव्हती. पण मामीकडील तिची मावशी म्हणवणारी एक बाई (जी पलीकडील गल्लीतच राहत असे...) सतत मामीकडे दुपारच्या वेळेला येऊन माझ्या आईला ऐकू जाईल अशा आवाजात टोमणे मारायची, "कोण करतेय बाई असल्या दिवसात विधवा बहिणीचे..... तुझा नवरा गरीब बिचारा म्हणून सगळे सोसतोय (म्हणजे काय???). आणि त्या इंद्र्याला (नाव घ्यायची पद्धत पण अपमानास्पद.... खुद्द मामीदेखील मला कधी "इंद्र्या" म्हटलेले नाही....) सांगत जा, किती नशीबवान आहेस म्हणून, कि असला मामा अन असली मामी मिळाली त्याला.... ह्येचा बाप रातदिन दारू पीत बसायचा, काय केला असता त्याने या पोराचे ?..... फेकला असता याला उकिरड्यावर, नाहीतर ह्यो बसला असता धारवाडात गाड्या पुसत लोकांच्या...... सख्ख्या पोराचे पण कुणी करत नसेल इतके..." आता इथे "सख्खा" म्हणजे काय, "मावस, चुलत, मामे भाऊ" म्हणजे काय आदी नाती कळण्याचे माझे आणि राहुलचे वय नव्हते पण या बाईने जाणीवपूर्वक राहुलला ज्ञान दिले कि, "इंदर" त्याचा सख्खा भाऊ नाही. ... काय मिळविले त्या बाईने असा मानसिक छळ करून..... कालांतराने मी व आईने अन्यत्र घर घेतले.... व आता तर आमचा स्वत:चा असा फ्लॅट आहे.... व जीवनाची वाटचाल अतिशय आनंदाने चालू आहे.... ती म्हातारीही आता जिवंत नाही. पण जिवंत असेपर्यंत तिने माझ्या आईला व मला "मामाच्या डोक्यावर अकारण बसलेले ओझे" अशाच पद्धतीने पाहिले होते.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

स्मृती's picture

13 May 2010 - 12:42 pm | स्मृती

एका कानाने ऐकून दुसरया कानाने सोडून देणे सगळ्यात उत्तम... मनःस्ताप देणे हाच अशा लोकांचा हेतू असतो.. त्यात त्यांना का यशस्वी होऊ द्यायचं आपण?!

मानसिक छळ करणार्‍याना हे कसे कळत नसेल की, आपल्या अशा काटेरी बोलाने आजूबाजूला कुणी लहान असेल तर त्याच्या बालमनावर काय विपरीत परिणाम होत असतील!!!

- हे बरोबर आहे.

चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके

असे काही नमुने माझ्या आस्पास पण होते. ...

पण अनेक अनुभवानन्तर मला हे जाणवले कि असे लोक हे आपल्याला आपण निवड्लेल्या मार्गापासून विचलित करण्याचे कामच करत असतात.

मला असे वाटते कि आपण आपले काम्काज चलु ठेवून फक्त आपल्या "अ‍ॅचिव्हमेन्ट्स" कडे लक्ष द्यावे. मग या अशा लोकान्ची कशी 'जलजल' होते ते एन्जॉय करायला फारच मजा येते.

बहुतेक वेळेला असे लोक त्यान्च्या स्व्तःच्या जीवनात 'लूझर' ठरलेले असतात ...

ज्ञानेश...'s picture

13 May 2010 - 1:34 pm | ज्ञानेश...

मला तिला धडा शिकवयचा आहे कि ति पुन्हा कोणालाहि अस मुर्खासारख दुखवताना दहा वेळेला विचार करेल.

हे करतांना तुम्हीही नकळत त्याच पातळीला जात आहात !
दुर्लक्ष करणे उत्तम.

स्पंदना's picture

13 May 2010 - 2:31 pm | स्पंदना

लेखकाचा अनुभव आणि इन्द्राज दान्चा अनुभव दोन्ही ही सारखेच वाट्तात.
आणि हे ही खर आहे कि विसरु म्हन्टल तरी या गोष्टी विसरता येत नाहीत. मी माझी समजुत घालण्या साठी "देवाला डोळे " एव्हढच म्हणते.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

मी ऋचा's picture

14 May 2010 - 12:06 pm | मी ऋचा

"देवाला डोळे" आवडल!! =D>

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

शुचि's picture

13 May 2010 - 4:24 pm | शुचि

पुरणपोळी , मिपावरच्या एका सद्गृहस्थांनी मला खूप छान सल्ला दिला होता. समाजात "अ‍ॅव्हरेज" बुद्ध्यांक (जो मुळात इतका कमी आहे) का टिकून असतो कारण काही लोकच "अबाव्ह अव्हरेज" असतात बाकीचे सगळे बिलो. त्यामुळे अशा सरसकट लोकांकडून अपेक्षा तरी किती ठेवायच्या? फार नाहीत. त्यांच्याकडे दुर्लक्षच करायचं.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

शिल्पा ब's picture

13 May 2010 - 9:45 pm | शिल्पा ब

अगदी बरोबर...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

वाहीदा's picture

15 May 2010 - 7:50 pm | वाहीदा

Rudyard Kipling ने आपल्या मुलासाठी लिहलेली Inspiring "If" कविता... समाजातिल लोकांच्या बोलण्याला, वागण्याला, अन टोमण्यांना किती अन कसे महत्व द्यावे याचे हे नितांत सुंदर काव्य.
"If"
If you can keep your head when all about you
Are losing theirs and blaming it on you;
If you can trust yourself when all men doubt you,
But make allowance for their doubting too;
If you can wait and not be tired by waiting,
Or, being lied about, don't deal in lies,
Or, being hated, don't give way to hating,
And yet don't look too good, nor talk too wise;

If you can dream - and not make dreams your master;
If you can think - and not make thoughts your aim;
If you can meet with triumph and disaster
And treat those two imposters just the same;
If you can bear to hear the truth you've spoken
Twisted by knaves to make a trap for fools,
Or watch the things you gave your life to broken,
And stoop and build 'em up with wornout tools;

If you can make one heap of all your winnings
And risk it on one turn of pitch-and-toss,
And lose, and start again at your beginnings
And never breath a word about your loss;
If you can force your heart and nerve and sinew
To serve your turn long after they are gone,
And so hold on when there is nothing in you
Except the Will which says to them: "Hold on";

If you can talk with crowds and keep your virtue,
Or walk with kings - nor lose the common touch;
If neither foes nor loving friends can hurt you;
If all men count with you, but none too much;
If you can fill the unforgiving minute
With sixty seconds' worth of distance run -
Yours is the Earth and everything that's in it,
And - which is more - you'll be a Man my son!
--Rudyard Kipling
पुरणपोळी,

माझ्या ताईने मला हे काव्य फारच सुंदर अन सोप्या शब्दात समजाविले होते अन मी रोजच्या जीवनात अजूनही ते काव्य अमंलात आणते . मला माझ्या ताई सारखे, सुंदर प्रकारे त्या कवितेचे विष्लेशण नाही जमणार म्हणून फक्त कविताच देत आहे पण, तुलाही या काव्याचा आयुष्यात नक्कीच उपयोग होईल.
These wise words can be applied even now, almost a hundred years after they were penned.

The insight offered by the poet can be summarized in brief as, remain humble, avoid extremes, and enjoy the joys of life at every opportunity. Rise above the fray and find goodness in even the darkest circumstance! :-)

~ वाहीदा

पुरणपोळी's picture

19 May 2010 - 5:39 pm | पुरणपोळी

मस्त.. अतिशय आशयघन.. जरुर ह्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करेन..

नील_गंधार's picture

13 May 2010 - 3:51 pm | नील_गंधार

मला वाटते कि येथे लोक आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतात.
त्यांना माहित असते कि हा माणुस उलटून वा उर्मटपणे बोलणार नाहि.
एक दोन वेळेला आपण अशा लोकांना तिथेच हडकवले कि हि मंडळी आपल्यापुढे परत असे वागत/बोलत नाहित.
परंतु हा समाजात सर्रास आढळणारा प्रकार आहे. कित्येक वेळेला काही लोकांचा स्वभावच तसा असतो.मनात काहि वाईट नसतेहि परंतु बोलून घाण करतात. अशा प्रकाराला हिंसा म्हणणे जरा चुकीचे वाटते.

नील.

मी पहिल्याने गाडी विकत घेतली तेंव्हा रोज संध्याकाळी तीत बसून फिरायला जात असे. माझ्यासारख्या सामान्य परिस्थितीतल्या माणसाने गाडी घेतली याचे खूप जणांना कौतुक वाटले त्यांनी तसे बोलूनही दाखवले पण एक माणूस होता त्याचा असा जळफळाट झाला म्हणता. तो म्हणे की गाडी का हो घेतलीत त्यापेक्षा एखादा मोठा बंगला घ्यायचात. मी म्हणालो की गाडीत बसून कर्णा वाजवत गावभर फिरता येते . बंगल्याचे तसे नाही. त्यावर त्याने मलाच सुनावले की काय पोरकट आहात हो तुम्ही ? यात कसली गंमत वाटते तुम्हाला? मी ठरवले की आता याला तडकवायचा. मी म्हटले,"तुम्हाला ठाऊक नाही. कर्णा वाजविण्यात गंमत नाही. पण तो वाजवत फिरत असताना लोकांच्या चेहर्‍यावरचे दु:ख पाहण्यात खरी गंमत आहे. " हाच माणूस काही दिवसांनी मला रस्त्यात भेटला आणि म्हणाला,"का हो? आज पायी चाललात? गाडी विकलीत वाटतं." मी त्याच्या खांद्यावर हात टाकून म्हटले," हे पहा दोस्त. रोज या वेळेला तुम्ही बायकोसोबत फिरायला बाहेर पडता. आज ती नाही म्हणून मी असं विचारलं तर नाही ना की तुमची बायको दुसर्‍या कुणाचा हात धरुन पळून गेली म्हणून?" त्यावर तोंडात पायताण मारल्यागत चेहरा करुन म्हणे,"की तसं नाही हो. मला आपलं वाटलं सहज." मी,"लाज वाटत नाही तुम्हाला आसे वाटायला. दुसरा काही तर्कच करता येत नाही का तुम्हाला?गाडी गॅरेजमधे असेल, मित्राला दिली असेल किंवा आज मला पायी चालायची हुक्की आली असेल." त्यावर तो नुसता हॅ हॅ करत निघून गेला. अशी असतात ही विघ्नसंतोषी माणसे. पण आपण त्यांच्याकडे मुळीच लक्ष देऊ नये. आपल्याला जे हवे ते बेधडकपणे करत राहावे. मग कोणाच्या कपाळाची शीर उडो नाहीतर कोणाच्या पोटातली पानथरी ठणको.

'अशा गोष्टी अशा गंमती' या पुस्तकातून. मला वाटतं त्या चॅप्टरचं नाव? बहुधा 'विघ्नसंतोष' असंच नाव आहे. शब्दरचना थोडीफार आगेमागे झाली असेल. बरीच वर्ष झाली ते पुस्तक वाचून.

स्वाती२'s picture

13 May 2010 - 5:22 pm | स्वाती२

=)) =)) =))

शिल्पा ब's picture

13 May 2010 - 9:56 pm | शिल्पा ब

चांगला तडकवल... =)) =)) =)) =)) =)) =)) ....शेवटी आचार्यच ते..

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

योगी९००'s picture

13 May 2010 - 5:05 pm | योगी९००

," हे पहा दोस्त. रोज या वेळेला तुम्ही बायकोसोबत फिरायला बाहेर पडता. आज ती नाही म्हणून मी असं विचारलं तर नाही ना की तुमची बायको दुसर्‍या कुणाचा हात धरुन पळून गेली म्हणून?"
एकदम सडेतोस उत्तर्..आचार्य अत्रे यांना त्रीवार वंदन...

खादाडमाऊ

स्वाती२'s picture

13 May 2010 - 5:41 pm | स्वाती२

काही लोकांना दुसर्‍यांना दुखावण्यातच आनंद मिळतो. अशा लोकांकडे एक तर दुर्लक्ष करावे किंवा अतिशय थंडपणे उत्तरे द्यावीत. एकदा त्यांच्या लक्षात आले की आपल्या बोलण्याचा अपेक्षित परिणाम होत नाही की ते वाटेला जाणे बंद करतात.

अमोल नागपूरकर's picture

13 May 2010 - 6:27 pm | अमोल नागपूरकर

ह्रद्यस्थ ह्या पुस्तकात अलका माण्ड्के ह्यानी पण असे अनुभव वर्णिलेले आहेत. १९९५ च्या सुमारास नीतु माण्डकेनी बाळासाहेब ठाकरेन्वर शस्त्रक्रिया केली होती. त्याकरिता माण्ड्केना किती पैसे मिळले हे विचारुन लोक अलकाना अगदी त्रासून सोडत असत. हे कळल्यावर नीतुजीनी त्याना सान्गितले," हे बघ. तू सरळ सान्गायचे, पैसे मोजायला माणसे ठेवलेली आहेत. मोजून झाले कि तुम्हाला सान्गेन !!!!"

मस्त कलंदर's picture

13 May 2010 - 6:56 pm | मस्त कलंदर

एकदा एका ओळखीच्या बाईंनी असेच काही माझ्याबद्दल काहीतरी अतिव्यक्तिगत स्वरूपाचे विधान केल्याचे मला दोन-चार जणांकडून खात्रीलायकरित्या समजले... मी मुद्दाम वेळ काढून त्या बाईंना भेटायला गेले. त्यांनीही चांगलाच पाहुणचार आरंभला.(वर वर त्यांना माझी किती चिंता आहे हे त्या मुद्दाम दाखवत.. पण त्यांचे अंतस्थ विचार वेळोवेळी कळाल्याने त्यांच्या या वरच्या रंगाला मी भुलत नाही) मी असेच सहज गप्पा मारत, "पाहा ना.. एका बाईंनी माझ्याबद्दल असे विधान केले" या वाक्याने सुरू होऊन, असे बोलणारी ती बाई किती हलक्या, वाईट विचारांची, किती खालच्या पातळीवर जातात नै आजकाल लोक.. असे म्हणत म्हणत बरेच काही म्हणून घेतले....त्या बाईंचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. एकतर तु मला असे कसे काय बोलू शकतेस असे म्हणून मीच ते वाक्य म्हटले हे स्वीकारता येण्यासारखे ते विधान नव्हतेच.. नि उलट चेहर्‍यावर हसू आणून मी जे काही म्हणतेय ते निमूटपणे ऐकून घ्यावे लागले..
नंतर मात्र त्यांनी असा प्रकार केला नाही. :)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 May 2010 - 5:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =)) =))

तू म्हणजे हलकटपणाचा कहर आहेस हा मके ... आता कळलं आपलं दोघींचं का जमतं ते! ;-)

अदिती

मस्त कलंदर's picture

15 May 2010 - 2:49 am | मस्त कलंदर

WPTA!!!! =))

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

शिल्पा ब's picture

13 May 2010 - 10:02 pm | शिल्पा ब

माझ्या सासूने लग्नाच्या दुसर्याच दिवशी सांगितले कि " खरं तर दुसरीच पसंत होती पण त्याने तुला आधी बघितले नाहीतर निर्णय बदलला असता..."...बाळ झाल्यावरसुद्धा अगदी सुतकात असल्यासारखा चेहरा करून होती...तीच काय सासरा पण...सतत फोन करून आमच्यात भांडण लावायची...अजूनही प्रयत्न तोच...या बाईने माझ्या घरात आल्यावर माझ्या पर्समधल्या पैशापासून माझ्या आईने दिलेले बाळाचे कपडे, माझे नवीन कपडे, hairpins , लग्न झाल्यावर दोनच दिवसात माझ्या लग्नातल्या चपला..काय वाटेल ते चोरले...कारण या वस्तू परत कोठेही कधीही दिसल्या नाहीत...आणि बाहेरचे कोणी घरात नाही..सतत माझे कपाट उचकत असायची...माझ्या काही दिवसाच्या बाळाला माझ्याबद्दल काय वाटेल ते बोलताना मी ऐकले आहे...मी confront केले माझ्या नवर्यासमोर तर लगेच " मी गम्मत करत होते "....काय बोलणार अश्या लोकांसमोर...

आणि आमच्या शेजारच्याच एक बाई ज्या स्वतःच्या नवऱ्यालासुद्धा जेऊ घालत नाही (सत्य आहे.) आणि सगळ्यांशीच ज्यांचे भांडण आहे...(हे सुद्धा सत्य ) त्या माझ्या आईला सारखे सांगत...आज तिला ह्याच्या बरोबर पहिली, त्याच्या बरोबर पहिली...मला माहिती नव्हते..कोणाचा असले बोलताय पण एकदा मी कराटेच्या practice ला जाताना त्या नालायक बाईने माझा पाठलाग केला आणि मी शाळेच्या आवारात पाहिल्यावर म्हणे "अगं मी इथे आमच्या सोनाची डान्सची practice आहे का बघायला आहे होते.."...आणि दुःखाची गोष्ट म्हणजे माझे आई वडील सुद्धा या लोकांवर विश्वास ठेवायचे...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

अमोल नागपूरकर's picture

14 May 2010 - 12:10 pm | अमोल नागपूरकर

.."...आणि दुःखाची गोष्ट म्हणजे माझे आई वडील सुद्धा या लोकांवर विश्वास ठेवायचे..."
ह्या गोष्टीचेच तर सर्वात जास्त दु:ख होते !

इन्द्र्राज पवार's picture

14 May 2010 - 1:09 pm | इन्द्र्राज पवार

"....आणि दुःखाची गोष्ट म्हणजे माझे आई वडील सुद्धा या लोकांवर विश्वास ठेवायचे..."

हे सगळ्यात अनाकलनीय आहे.... आणि तितकेच दु:खदायक.... "आपले" म्हणवणारेच जर असे वागत असतील तर दुसर्‍यांना कसा दोष द्यायचा?
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

पुरणपोळी's picture

14 May 2010 - 11:56 am | पुरणपोळी

प्रतिसादाबद्द्ल सर्वान्चे आभार..
हा लेख लिहिल्यापासुन सदरहु व्यक्तिने पुन्हा एकदा घाव घातला आहे.
मुलाच्या बारशानिमित्त जे सभाग्रुह मी ठरवले आहे त्यावर आणि माझ्या मध्यंतरिच्या वाढ्लेल्या वजनावर टिका करुन.. तेही चारलोकात..
मला आलेले अनुभव सर्वत्रिक आहेत हे पाहुन दिलासा आणि वाईट दोन्हि वाटाले.
अश्या लोकांची काहिच कमतरता नाहि हे पाहुन...
ह्या व्यक्तिला ईकदा मी ड्रेस घेतला (कारण परत्वे) .. तर तीने तो घरात घालासाठी काढला.. आनि ड्रेस चांगला उच्च दर्जाचा होता, सिल्कचा ..काय म्हणाव आता?

jaypal's picture

14 May 2010 - 1:00 pm | jaypal

ह्या व्यक्तिला ईकदा मी ड्रेस घेतला (कारण परत्वे) .. तर तीने तो घरात घालासाठी काढला.. आनि ड्रेस चांगला उच्च दर्जाचा होता, सिल्कचा ..काय म्हणाव आता?
..... याला म्हणतात "गाढवाला गुळाची काय चव" किवा "बंदर के गले मे मोती का हार"
raf

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

परिकथेतील राजकुमार's picture

14 May 2010 - 1:02 pm | परिकथेतील राजकुमार

ह्या व्यक्तिला ईकदा मी ड्रेस घेतला (कारण परत्वे) .. तर तीने तो घरात घालासाठी काढला.. आनि ड्रेस चांगला उच्च दर्जाचा होता, सिल्कचा ..काय म्हणाव आता?

शुद्ध हलकटपणा आहे हा !

मी पण एकदा अशीच आमच्या 'पुपे' ला पगडी घेउन दिली होती तर ह्या महाभागाने त्यात कावळ्याची पिल्ले पाळली होती.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

llपुण्याचे पेशवेll's picture

14 May 2010 - 1:10 pm | llपुण्याचे पेशवेll

पर्‍या हलकटा आधी तू काय अपराध केला होतास तो तरी सांग.
या पर्‍याला आधी मी चांगले जरीकाठी उपरणे दिले होते तर या महाभागाने त्याचे तुकडे करून वेगळ्याच वापरासाठी दिले. आता काही नवीन सुविधा निघाल्यामुळे त्याच्याकडे कपडेका सही इस्तमाल होऊ लागला आहे. म्हणजे टि व्ही पुसायला वगैरे.
पण हे पर्‍याने आधी नाही सांगितले.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

परिकथेतील राजकुमार's picture

14 May 2010 - 1:17 pm | परिकथेतील राजकुमार

या पर्‍याला आधी मी चांगले जरीकाठी उपरणे दिले होते तर या महाभागाने त्याचे तुकडे करून वेगळ्याच वापरासाठी दिले.

धडधडीत खोटेपणा आहे हा.
एकतर आधी खादिच्या कापडाला जर (ती पण काळी पडलेली) लावल्याने तीचे उपरणे होत नसते. साले ते उपरणे टार्‍यानी कमरेला गुंडाळलेल्या वल्कलापेक्षा देखील जास्त मळलेले दिसत होते.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

महेश हतोळकर's picture

14 May 2010 - 4:07 pm | महेश हतोळकर

ही आमच्या मिसळपाववरची हलकट जमात. फार फार जीव (च लिहीले आहे. हायलाइट करून बघायला काय झाले?) हो आमचा हिच्यावर.

शिल्पा ब's picture

14 May 2010 - 4:34 pm | शिल्पा ब

इथे पार्कात येणार एक ओळखीच म्हातारं मला हल्लीच "did u put on some weight , it looks like it " म्हणालं होतं....मी त्याच्याकडे त्या क्षणापासून दुर्लक्षच करते...त्याच्या घरच खाल्लं होतं का असं म्हणायला !!! नवर्याला पण सांगितलं त्याच्याशी बोलायचं नाही म्हणून... ह्याची स्वतःची लेक मात्र ४-४ पोरं काढून वाळकी ती वाळकीच !!!!

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

Pain's picture

14 May 2010 - 2:02 pm | Pain

मी पण एकदा अशीच आमच्या 'पुपे' ला पगडी घेउन दिली होती तर ह्या महाभागाने त्यात कावळ्याची पिल्ले पाळली होती.

=)) =)) आवरा

JAGOMOHANPYARE's picture

19 May 2010 - 12:47 pm | JAGOMOHANPYARE

मी पानिपतला असताना तिथला एक डॉक्टर कलिग मला रोज चिडवत होता..'आप दो बच्चोवाली मां से शादी करना...; ( माझी तिशी ओलांडली होती, तरी लग्न झाले नव्हते, तिकडे लोक लग्न फार लवकर करतात.. म्हणून हा चिडवण्याचा विषय झाला होता.)

बरेच दिवस हा प्रकार सुरु होता.

एकदा सगळ्या स्टाफसमोर त्याने पुन्हा ते वाक्य म्हटले... सगळे हसले , मीही हसलो आणि त्याला एकच प्रश्न विचारला,'तुम्हे कितने बच्चे है?'

तोही बिनडोक, बथ्थड.. . सरळ सांगून मोकळा झाला.. मुझे एक बच्चा है..

'तो जब तुम्हे दूसरा बच्चा हो जायेगा तो मुझे फोन करना, तेरी सारी तमन्ना पूरी कर दूंगा..' मी म्हणालो आणि मग ती चेष्टा कायमची बंद पडली... :)

भोचक's picture

19 May 2010 - 5:12 pm | भोचक

आईशप्प्थ. कसलं कडक 'वाजवलत' प्यारे. :)) :-)) अनेकजण आपल्या नादीच लागत नाही. फाटकन बोलून टाकतो, त्यामुळे 'अतिशहाणा' हे बिरूद मिळालंय.

(भोचक)
जाणे अज मी अजर

पुरणपोळी's picture

19 May 2010 - 5:37 pm | पुरणपोळी

:)) फारच छान उत्तर..
बाकि तिकडचे अनुभव जरा लिहा सवडीने