"जान्हवी"-- पुस्तक परिचय.

टुकुल's picture
टुकुल in जनातलं, मनातलं
12 May 2010 - 6:38 pm

पुस्तकः जान्हवी
लेखकः वि. वा. शिरवाडकर
प्रथम आव्रुती: १९५२
प्रकाशकः कॉन्टिनेन्टल प्रकाशन
किंमतः 50.00

परवा घरी थोडा वेळ मिळाला आणी बर्‍याच दिवसापासुन पडुन राहीलेले "जान्हवी" हातात घेतले. त्याआधी एकदा तीसेक पाने वाचली होती, पण परवा एका दमात पुस्तक वाचुन संपले (संपवावे लागले)

वि. वा. शिरवाडकरांचे माझ्यासाठी पहिलेच पुस्तक आणी प्रथम आव्रुती १९५२ ची, त्यामुळे वाटले कि काहीतरी जुनाट वाचायला मिळेल, पण शेवटचे पान वाचुन पुस्तक ठेवले त्यावेळी डोक सुन्न झाले आणी तो विचार गळुन पडला

हि कथा मुख्यतः तिन व्यक्तीभोवती फिरते. वसुदेव, महंत आणी जान्हवी. लेखक मित्रांबरोबर रणकाली च्या डोंगरदर्‍यात फिरायला जातो आणी डोंगरमाथ्यावर रात्रीच्या मुक्कामाचा बेत ठरतो. त्यावेळी त्यांची भेट वैरागी वसुदेव बरोबर होते आणी त्याच्या तोंडुन कथा उलगडत भुतकाळात जाते. वसुदेव एक क्रांतीकारी असतो आणी देशाच्या स्वातंत्र्यासाठी धडपडत असतो. अश्याच एका कटात ते एका ब्रिटीश अधिकार्‍याची हत्या करतात. ब्रिटीश अधीकार्‍याच्या हत्येमुळे होणार्‍या धरपकडीपासुन वाचण्यासाठी त्याला पळ काढावा लागतो आणी तो रणकाळीच्या डोंगरदर्‍यात येवुन धडकतो. रणकाळीच्या डोंगरमाथ्यावर मंहतांचा मठ असतो आणी तिथेच त्यांचे वास्तव्य असते. मंहत तसे खुप मोठे योगी पुरुष असतात, ध्यानसाधना आणी सामाजीक बाबतीत खुप हुशार असतात. डोंगरमाथ्याखालील गावातील अतीशय गरीब आणी परिस्थितीने गंजलेल्या लोकांची सेवा करणे, त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवणे, रोग्यांची सेवा करणे असा महंताचा दिनक्रम असतो. वसुदेव आणी महंताची गाठभेठ होते, आणी पडत्या फळाची आद्या मानुन तो मठात रहायला जातो.

मठात महंताबरोबर रहायला जान्हवी असते जिचा बालविवाह होवुन ती विधवा झालेली असतो, महंतच तिला एका गुरुसारखे, पित्यासारखे असतात. अशा वातावरणात वसुदेवाचा प्रवेश होतो. महंता बरोबरच्या अतिशय सुंदर अश्या चर्चेमधे त्याचे स्वातंत्र्याबद्दलचे विचारच बदलुन जातात, आणी महंतानी अवलंबलेल मार्ग त्याला योग्य वाटु लागतो, आणी तो त्यांचा शिष्य बनुन त्यांची मार्गप्रणाली अवलंबतो. दिवस जात रहातात, लहान जान्हवी तारुण्यात येते, पण जसा प्रखर दिवा जास्त वेळ तग धरु शकत नाही तसच महंताच होत, त्यांची अधोगती होते कि काय अशी परिस्थीती येते. अशी काय परिस्थिती येते आणी त्यानंतर काय होते हे सांगत बसत नाही त्यासाठी पुस्तकच वाचावे लागेल

मला पुस्तक का आवडले?
पुस्तकाची सुरुवात संथ होते, पण जस जस आपण वाचत जातो तस त्याचा जबरदस्त विळखा नकळत आपल्याला बसायला लागतो आणी मनावर बरेच वार करुन पुस्तक संपते आणी आपण सुटतो. डोक सुन्न होवुन विचार करायला लागते. वसुदेव महंताच्या चर्चा, नैतीक आणी अनैतीक बद्दलची त्यांचे विचार एकदम भन्नाट मांडले आहेत. कथा संपते तेव्हा लेखकांच्या प्रश्नांना जेव्हा वसुदेव उत्तर देतो तो भाग पण सुंदर लिहिला आहे.

अवांतरः मला शंका आहे कि हि कादंबरी काल्पनीक आहे कि सत्यकथा? कुणाला माहीत असल्यास कळवा.

साहित्यिकविचार

प्रतिक्रिया

शुचि's picture

12 May 2010 - 7:04 pm | शुचि

सन्जोपरावांनी पिंजरा च्या परीक्षणात लिहीलेलं वाक्यच इथे उधृत करते - "आसक्ती आणि विरक्ती यांच्यातला संघर्ष निर्मितीक्षम कलाकारांना नेहमीच खुणावत आला आहे"

ही कथा याच धाटणीची वाटते.

परीक्षण फारच सुरेख झालं आहे टुकुल. विशेषतः-
>> पुस्तकाची सुरुवात संथ होते, पण जस जस आपण वाचत जातो तस त्याचा जबरदस्त विळखा नकळत आपल्याला बसायला लागतो आणी मनावर बरेच वार करुन पुस्तक संपते आणी आपण सुटतो. डोक सुन्न होवुन विचार करायला लागते.>>
जबरदस्त ओघवतं वर्णन

पुस्तक वाचायला जरूर आवडेल.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

शुचि's picture

13 May 2010 - 3:28 pm | शुचि

विशेषतः१९५२ च्या पर्श्वभूमीवर "आसक्ती-विरक्ती संघर्षाचा" काय विचार केलेला आहे विवांनी तो वाचायला आवडेल.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

१९५२ सालच्या कादंबरीचा परिचय आवडला. मिळाल्यास वाचली पाहिजे. कादंबरीचे कथानक वाचून फार पूर्वी बघितलेल्या कोणत्यातरी (बहुतेक बंगाली) चित्रपटाची आठवण झाली. आता त्याबद्दल काहीच लक्षात नाही.

चौथा कोनाडा's picture

12 Nov 2021 - 8:42 pm | चौथा कोनाडा

अतिशय उत्तम परिचय.
पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
योग आल्यास नक्की वाचेन जान्हवी.