मला असेच आलेले ढकल निरोप ... तुम्हांपैकी कित्येकांनी वाचलेही असतील...आणि काहींनी नसतीलही ...
१. आयुष्यात आपण कधी ना कधी
हे प्रश्न स्वतःला विचारलेच पाहिजेत :
आपण कोण आहोत ?
कोठून आलो आहोत ?
कोठे निघलो आहोत ?
आणि जेंव्हा तिठे पोहोचू,
तेंव्हा ...तिथले...
बार उघडे असतील का ...?
२. जो एकटा पितो
तो नरकलोकात जातो
जो दोस्तांबरोबर पितो
तो स्वर्गलोकात जातो
आणि...जो पीतच नाही
तो...तो..."जसलोकात" जातो...!
३. तो फार सज्जन माणूस होता..
त्याने कधी सुपारीच्या खांडाचेही व्यसन केले नाही.
त्याने आयुष्यात कधी खोटा शब्द उच्चारला नाही.
परस्त्रीकडे डोळा वर करूनसुद्धा पाहिले नाही...
तो मरण पावला...तेव्हा
इन्शुरन्स कंपनीने त्याचा क्लेम नाकारला.
...म्हणाले, जो जगलाच नाही...तो मेला कसा ?