हा लेख लिहिण्यासाठी प्रवृत्त करणारी चर्चा बरीच जोरात आहे म्हणून आठवली आणि लिहिली.
मागच्या वर्षी आम्ही भारतात गेलो होतो...माझे आई वडील पनवेलात राहत होते...नवऱ्याचे CBD त ....मी पनवेलात गेले होते २ दिवसासाठी...दुसर्या दिवशी दुपारी माझ्या लेकीची शी धुवायला गेल्यावर माझ्या आईला दिसले कि किंचित लालसर आहे...कदाचित रक्त असेल म्हणून ताबडतोब डॉक्टरकडे जावे...मला काही एवढे विशेष आहे असे वाटले नाही पण आईने खूपच जोर केला म्हणून जवळच्याच क्लिनिक मध्ये जिथे बालरोगतद्न्य असते इथे गेलो...गेल्यावर कळले कि त्या इथे येत नाहीत...मग त्यांच्या क्लिनिक मध्ये गेलो...
क्लिनिक मध्ये गेल्यावर थोडा वेळाने बाई आल्या आणि तपासले...विचारले काही वेगळे खाल्ले पिल्ले का? "नाही, पण हे लोक हल्लीच भारतात आले अमेरिकेतून आणि बाळाची पहिलीच visit आहे ", माझी आई...मग मला विचारले तुम्ही बाळाच्या कोण ,"आई"...बरं...बाळाला gastro वाटतोय,admit करावे लागेल...फारसे सिरीयस नाही पण काहीही होऊ शकते...निर्णय तुमचा...मी घाबरले...नवर्याला फोन करून विचारले. आता फोनवर त्याला डॉक्टर admit कर म्हणतेय सांगितल्यावर तो होच म्हणणार...तर admit केले...त्याआधी private रूमचा भाव सांगून general पेक्षा बरे म्हणून रूम घेतली... हाताला सलाईन वगैरे लावले...मग नवरा आला..थोड्या वेळाने इतर लोकांशी बोलले तर कळले कि सगळ्यांना gastro साठीच admit केले आहे....बांर...
दुसर्या दिवशी डॉक्टरीणबाई आल्या आणि मला सांगायला लागल्या कि त्यांची वन्स अमेरिकेत आहे....त्यांना पण कसे अमेरिकेत जायला मिळत होते...पण नवर्याला तिथे operation करायला नाकारले म्हणून नवर्याने इथेच राहायचे ठरवले....नाहीतर कश्या त्या पण आत्ता अमेरिकेत असत्या...वगैरे...मला काही त्यांचा रंग ठीक वाटलं नाही...म्हणून बाळाला बरे वाटल्यावर लगेच discharge घ्यायचे ठरवले...डॉक्टर नाहीच म्हणत होत्या....पण विशेष काही नव्हते आणि gastro पण नव्हता मग कशाला ठेवायचे आणि CBD ओळखीच्या डॉक्टरकडे नेऊया म्हणून discharge घेतला...
बिल आले....अक्षरशः अव्वाच्या सव्वा बिल लावले होते...आम्ही विचारायला गेलो..नवरा नकोच म्हणत होता...पण मी आग्रह केला...डॉक्टरीणबाई काय म्हणाली असेल? " तुम्ही अमेरिकेत राहता...तिथे किती बिल होते मला माहिती आहे...तिथल्यापेक्षा हे कमीच आहे...तुम्हाला काही हे जड नाही."
"आम्ही तुम्हाला द्यायला पैशे कमवीत नाही...तुम्ही इथल्याप्रमाणे बिल लावा." काही charges अव्वाच सव्वा होते ते सांगितले...तर त्या म्हणे कि मी तुम्हाला इतर बिल दाखवते...मी म्हंटल दाखवा...तर आम्ही तिथेच उभे आणि हि बाई खाली मान घालून काहीच बोलेना...म्हंटल हि काही दाखवणार नाही इतर बिल...
शेवटी आम्ही बाहेर आलो...मी नवर्याला म्हंटले हजारभर रुपये कमीच देऊ...उघडपणे ती बाई आपल्याला लुबाडतेय....हा पुळचट....काही नको..सगळे पैसे भर...अमुक तमुक...शेवटी मी वैतागले....पैसे काही मी कमवीत नाही...खड्ड्यात जा...माझ्याकडचे १०० रुपय काही दिले नाही..त्याने काय फरक पडनार...पण माझ्या मनाचे समाधान...
काही दिवसांनी तिथल्या सरकारी शाळेच्या कुंपणावर याच बाईची जाहिरात वाचली " फुकट तपासणी शिबीर. लहान मुलाची फुकट शारीरिक तपासणी करून घ्या. डॉ. स्वाती लिखिते".
बरोबर आहे...तपासणी फुकट आणि मग काहीतरी सांगून admit करायला सांगायचे. चांगला धंदा आहे.
प्रतिक्रिया
11 May 2010 - 3:40 am | शुचि
ह्म्म ...
>> तुम्हाला काही हे जड नाही. >>
हे कोण ठरवणारे?
प्रत्येकाला जडच असतो खर्च. कारण खर्च हा नेहेमी प्राप्तीपेक्षा जास्तच होतो.
पण तपासणीमधे डॉक्टरांना काहीतरी सापडलं असेल म्हणून अॅडमिट केलं असावं असं मला आपलं वाटतं. त्यांना हयगय करूनही चालत नाही.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
11 May 2010 - 3:47 am | शिल्पा ब
काय माहिती बाई!!! gastro एका दिवसात बरा होतो का? मला अजूनही माहिती नाही :<
http://shilpasview.blogspot.com/ :<
11 May 2010 - 4:01 am | इंटरनेटस्नेही
मनाला चीड आणणारा अनुभव. X(
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
11 May 2010 - 7:12 am | स्पंदना
थोड घट्ट झाल शी ला तरीही ती जागा लाल होते!! किन्वा पुसताना थोडस जोरात पुसल गेल तरी सुद्धा!! गॅस्ट्रो मध्ये पातळ नाही का होत सन्डास ला? बाळ थोडा गरम नाही का लागायचा? तिने सरळ सरळ लुटल तुम्हाला. बर झाल थोड का असेना सुनावलात.
एक उपाय आहे" फॉरेनर म्हणुन सान्गणे नाही. " लोकल पत्ता देणे.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
11 May 2010 - 10:57 am | मस्त कलंदर
हा प्रकार काही नवीन नाही..
एकदा गांवी असताना माझ्या पायाला भोवरी झाली होती.. नेहमीच्या डॉक्टरना दाखवले.. ते म्हणाले, खूप दुखत असेल तर ऑपरेट करून काढून घे. जवळच एका सर्जनने नवीन हॉस्पिटल काढलं होतं... तिथे गेले.. डॉक्टरांनी मी कोण, काय करते ही पण बोलता बोलता विचारपूस केली.. नि मग १५ मिनिटांचे ते छोटे ऑपेरशन.. पण त्याचे १५०० रू नि नंतरच्या ड्रेसिंगचे ७५ रू लावले व नंतर रोज ड्रेसिंग करायला ये म्हणून सांगितले.. मी त्यांना म्हटले, हे बिल तुम्हांला जास्त नाही का वाटत???
"त्यावर तुमच्या मुंबईत डॉक्टरचे नुसते तोंड पाहायलाच ५०० रू मोजायला लागले असते ना? मग इथे दिले तर काय बिघडले?" असे उर्मट उत्तर मिळाले...
तेव्हा तर नाईलाजाने सगळे पैसे भरलेच.. पण मग ड्रेसिंगसाठी माझ्या नेहमीच्याच डॉक्टरांकडे गेले.. त्यांना हा किस्सा सांगितला. नुसत्या ड्रेसिंगचे ७५ रू ऐकल्यावर त्यांनी कपाळावर हात मारला..
जखम पूर्ण बरी होण्याआधीच मी मुंबईला परतले.. इथेही ड्रेसिंगला माझ्या नेहमीच्या डॉक्टरांइतकेच पैसे लागले.. फक्त १० रू.!!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
11 May 2010 - 11:24 am | चिरोटा
मोठ्या शहरांतले बरेचसे डॉक्टर लुबाडणूक करतात असे माझे निरिक्षण आहे."काय करता तुम्ही? कुठे कामाला असता?" वगैरे प्रश्न विचारून आडून पगार किती मिळत असेल ह्याचा अंदाज घ्यायचा.
"समाजातले सगळेच घटक फसवे आहेत तर त्याला डॉक्टर तरी कसे अपवाद असतील?" असा युक्तिवाद डॉक्टरांकडून केला जातो. पेशंटच्या मनात भिती निर्माण करायची,त्याला X रे,वगैरे अनेक चाचण्या करायला लावायच्या आणि मग गरज नसतानाही ऑपरेशनची गरज आहे म्हणून सांगायचे.
P = NP
11 May 2010 - 11:58 am | नाना बेरके
तुम्हाला आलेला अनुभव नक्कीच चीड आणणारा आहे. पण त्याची दुसरी बाजू अशीही असू शकते कि, कमी पैशात किंवा फुकट दिल्या जाणार्या गोष्टी / सेवा ह्यांचे मोल रहात नाही. कुठलीही गोष्ट / सेवा फुकट मिळायला लागल्यावर माणसाची ओरबडून घेण्याची नैसर्गिक प्रवृत्ती जागृत होते.
आता हेच उदाहरण पहा ना - काही लोक, एखाद्या प्रसिध्द संकेतस्थळावर आयतेच आलेले वाचक आपल्याला मिळावेत आणि त्यांनी आपला वैयक्तिक ब्लॉग वाचावा, ह्या हेतूने त्या संकेतस्थळाचे सभासदत्व घेऊन फुकटात जाहिरात करत असतात.
चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके
11 May 2010 - 5:38 pm | शोधा म्हन्जे सापडेल
मलाही असाच अनुभव आला होता. २००४ साली मला पाठीचा भयन्कर त्रास चालू झाला. पहिल्यांदा दुर्लक्ष केल. पण मग खुपच दुखायला लागल्यावर एका प्रतिश्ठित "रुग्णालयात" मित्राला घेऊन गेलो. तिथल्या डाक्टरांनी MRI SCAN करायला सांगितला. तो करायला अजुन दोन महिने काढ्ले ( पैशांच्या काळजीने ). मग तो रिपोर्ट घेऊन मित्राला घेऊन परत डॉ़क्टरांकडे गेलो.
तिथे मला पहिलाच प्रश्न विचरला कि घरी निर्णय कोण घेतं ?? मी म्हणलं कि आई, मामा, आजोबा. मग डॉक्टर म्हणाले कि त्यांच्यापैकी कोणाला आण तर बोलता येइल. मी विचरला की मला काही कल्पना द्या तर एक एक शब्द बोलले नाहीत. मग मी आईला घेऊन गेलो तर आईलाच झापायला लागले, की मुलाकडे लक्ष नाही का म्हणून. मग म्हणाले की ह्याला slip disc झाला आहे. लगेच ऑपरेट करावे लागेल. अजुन दोन महिने थांबले तर पॅरॅलिसिस चा अॅटॅक येऊ शकतो. आई घाबरली. फक्त ऑपरेशन चा खर्च ८०,००० (आणी ऑपरेशनच्या वेळेचा आणि नंतरच्या औशधांचा खर्च वेगळा) सांगितला. आणि वर हे ही ऐकवले की तुम्ही रिटायर्ड टीचर असल्याने मी माझी स्वत:ची फी कमी करत आहे. सेकंड ओपिनियन न घेता मी "रुग्णालयात" अॅडमिट झालो. ऑपरेशन थेटर बूक केले. पण माझ्या आकाराची डिस्क उपलब्ध नसल्याने, त्याच डॉक्टरांनी सांगितले की घरीच विश्रांती घ्या. ( हा हा हा )
दरम्यान मी डॉ. शारंगपाणी / हर्डीकर हॉस्पिटल येथे जाऊन आलो. त्यांनी स्लिप डिस्क कन्फर्म केला पण ऑपरेशनची गरज नसल्याचे सांगितले. डॉ. शारंगपाणी ह्यांनी तर ऑपरेशनची कल्पना हाताच्या फटक्यासरशी ऊडवून लावली. मग कुठे माझ्या जीवात जीव आला. मग मी त्या पहिल्या डॉक्टरला ऑपरेशन कॅन्सल करतोय हे सांगण्याचा त्रास सुद्धा घेतला नाही. नंतर आईनी फोन केला तर काही म्हणायला लागल्यावर मी सरळ फोन कट केला.
सध्या त्रास आहे पण योग / मसाज / ध्यान यांनी दुखणं अटोक्यात येतं. पण तेव्हाचे ते ३-४ महिने फार त्रासात गेले.
पीस इज, नॉट व्हेन देअर इज नो व्हायलन्स ,बट् व्हेन फ्लॉवर्स ब्लूम.............
15 May 2010 - 11:42 pm | शिल्पा ब
हे अगदी भयानकच आहे...अश्यावेळी कोणावर विश्वास ठेवावा हेच कळत नाही...पाठीचे आजार साधारणपणे योग केल्याने आटोक्यात येतात....
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
11 May 2010 - 6:10 pm | दत्ता काळे
मोठ्या शहरांतले बरेचसे डॉक्टर लुबाडणूक करतात असे माझे निरिक्षण आहे. - हे विधान फारसे योग्य वाटत नाही. प्रत्येकाला जसा अनुभव येतो त्यानुसार तो आपली मते बनवितो.
उदा. दरम्यान मी डॉ. शारंगपाणी / हर्डीकर हॉस्पिटल येथे जाऊन आलो. त्यांनी स्लिप डिस्क कन्फर्म केला पण ऑपरेशनची गरज नसल्याचे सांगितले. डॉ. शारंगपाणी ह्यांनी तर ऑपरेशनची कल्पना हाताच्या फटक्यासरशी ऊडवून लावली. - असलाही एक अनुभव वर प्रतिसादामध्ये लिहिला आहे. वास्तविक - हे दोन्ही डॉक्टर्स मोठ्या शहरातले आहेत. ह्याउलट 'शिल्पा ब' ला जो अनुभव आला तो पनवेलमध्ये -कि जे मोठे शहर नाही.
म्हणून योग्य डॉ. निवडण्यासाठी त्याची माहिती करुन घेणेच अखेर गरजेचे.
11 May 2010 - 10:41 pm | दिपाली पाटिल
मलाही असाच अनुभव आला...भारतात आल्यानंतर आम्ही सकाळी घराजवळच्या तळ्यावर फिरायला जात तेव्हा झाडूवाले उडवत असलेल्या धुळीमुळे माझ्या नवर्याला सर्दी-खोकला झाला नी उष्णतेमुळे मला अॅसिडीटीचा भरपूर त्रास होत होता, म्हणून आम्ही आमच्या घराजवळच्या डॉक्टरकडे गेलो(या डॉक्टरकडे सासू-सासरे जात असतात आणि बील एकदाच बनवून घेतात...आणि आमची सगळी हीस्ट्री त्या डोक्टरला माहीत आहे) तेव्हा या डॉक्टरने आम्हाला तपासून गोळ्या दिल्या नी म्हणे बील पुढल्या खेपेस द्या...गोळ्यांनी मला तसा फरक पडला तर नाहीच आणि पुढल्या खेपेस नवरा फक्त बील देण्यास गेला तेव्हा जबरदस्ती त्याचे चेकअप करुन त्याला कफाच्या गोळ्या दिल्या आणि तेव्हाचे पैसेसुध्दा घेतले...आणि नेहमीपेक्षा २०० रुपये जास्तसुध्दा घेतले...
वरून डॉक्टरसाहेब जरा तिरसट स्वभावाचे आणि आम्ही येणार १-२ महीन्यांसाठी मग नंतर आई-बाबांना कशाला त्रास म्हणून विचारण्याचीही सोय नाही...
दिपाली :)
11 May 2010 - 10:48 pm | नितिन थत्ते
तुमच्याकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन बाईंनी मोफत तपासणी शिबिराचा प्रकल्प चालवला असेल.
(आठवा आनंद चित्रपटातील रमेश देव)
नितिन थत्ते
11 May 2010 - 11:26 pm | भडकमकर मास्तर
(आठवा आनंद चित्रपटातील रमेश देव)
असित सेनला शिफ्टिंग पेनवर औषध देणारा डॉ.कुलकर्णी....
फक्त फरक इतकाच की तिथे पेशंट आग्रहाने मला काहीतरी ट्रीटमेन्ट द्या अशी मागणी करत असतो...
( आणि फुकट तपासणी शिबीर हे अधिक पेशंट गोळा करण्यासाठीच असतं..)
_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
27 May 2010 - 12:45 pm | ज्ञानदा कुलकर्णी
शाळेत असताना मी सायकल वरून पडले आणि एका घराच्या compound wall वर आदळले त्याला नीट गिलावा केला नव्हता त्यामुळे डाव्या हाताच्या तर्जनी चे कातडे मांस सोबत उचकटले गेले घराजावालाच्या एका डॉक्टर ना दाखवले म्हणजे ड्रेसिंग वगेरे साठी तर त्या डॉक्टर नी मला plastic surgery करावी लागेल म्हणून सांगितले आणि वर ह्याचा डाग राहणार मुलीच्या जातीला हे योग्य नाही पुढे लग्नाला वगेरे प्रोब्लेम येऊ शकतो म्हणून त्यांनी एका प्रथितयश प्लास्टिक सर्जन साठी चिट्ठी ही दिली पण सेकंद ओपिनियन म्हणून family doctor ना विचारले तर त्यांनी सांगितले कि काही आवश्यकता नाही फक्त महिना भर माझ्या कडे ड्रेसिंग ला ये तेपण एकाड एक दिवस येऊन आणि प्रत्येक ड्रेसिंग चे २० रुपये घ्यायचे फक्त .. त्यामुळे केवळ ४०० रुपयांमध्ये माझे काम झाले ..
27 May 2010 - 12:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
डाव्या हाताच्या तर्जनीवरचा डाग मुलीच्या जातीला चांगला नाही .... =)) =)) =))
अदिती
27 May 2010 - 7:13 pm | डॉ.श्रीराम दिवटे
सर्वांनीच डॉक्टर विरोधी सूर लावल्यामुळे प्रतिक्रिया देणं भाग आहे.
सरसकट सगळ्याच डॉक्टरांना लुटारू किँवा दरोडेखोर म्हणता येणार नाही. परंतु आमच्या व्यवसायातील प्रचंड स्पर्धा, एकाच झटक्यात गुण येण्यासाठी महागड्या अँटीबायोटीक्स चा वापर करावा लागणे, अशा अनेक कारणाने बिलाचा आकडा फुगलेला असतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुठलीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आपल्या फँमिली डॉक्टरचा सल्ला घ्यायलाच हवा. ते तुमचे हितचिँतक असल्याने अव्वाच्या सव्वा भुर्दँड पडणार नाही अशा ठिकाणी ते पाठवतील.
27 May 2010 - 8:12 pm | नरेश_
सरसकट सगळ्याच डॉक्टरांना लुटारू किँवा दरोडेखोर म्हणता येणार नाही. परंतु आमच्या व्यवसायातील प्रचंड स्पर्धा, एकाच झटक्यात गुण येण्यासाठी महागड्या अँटीबायोटीक्स चा वापर करावा लागणे, अशा अनेक कारणाने बिलाचा आकडा फुगलेला असतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुठलीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आपल्या फँमिली डॉक्टरचा सल्ला घ्यायलाच हवा. ते तुमचे हितचिँतक असल्याने अव्वाच्या सव्वा भुर्दँड पडणार नाही अशा ठिकाणी ते पाठवतील १००% सहमत.
महत्वाचे म्हणज सेकंड ओपिनीयन घ्यायला मुळीच संकोचू नये.
आजारांची मोठमोठी नावं ऐकून पॅनिक हो ऊ नये.
दहा दहा तासांचे दररोजचे भारनियमन, वाढती महागाई, कर्मचार्यांचा असहकार या सर्व कटकटींनी व्यापलो असलो तरी कविता पाडून आम्ही कुणाला वेठीस धरत नाही ;)
27 May 2010 - 9:03 pm | कानडाऊ योगेशु
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुठलीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आपल्या फँमिली डॉक्टरचा सल्ला घ्यायलाच हवा.
पण फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आजच्या काळात उरली आहे का?
दिपाली पाटील ह्यांनी वर सांगितलेल्या अनुभवात तर फॅमिली डॉक्टरनेच त्यांना चुना लावलेला आहे.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
27 May 2010 - 9:09 pm | पक्या
सरसकट नसले तरी वर सांगितलेले अनुभव काही खोटे नसावेत, डॉक्टर साहेब. काहीतरी कारणे देऊन सारवासारव केल्यासारखा वाटतोय तुमचा प्रतिसाद. चांगला डॉक्टर भेटायला चांगले योग असावे लागतात असं म्हणतात ते काही खोटे नाही.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
27 May 2010 - 9:46 pm | वेताळ
खरोखर डॉक्टर लोक किती किती वाईट असतात म्हणुन सांगु.
वेळ मिळाला तर पुढे कधी तरी सांगेन, कारण मनात इतका संताप आला आहे कि काही सुचेनासे झाले आहे.
वेताळ