महाराष्ट्र प्रेम

गोगोल's picture
गोगोल in जनातलं, मनातलं
9 May 2010 - 8:25 am

मी खर तर हा लेख जयंत कुलकर्णी यांच्या महाराष्ट्र प्रेमवरील लेखाला प्रतिसाद म्हणून लिहीत होतो. पण प्रतिसाद लिहील्यावर कळले की त्यांनी (किंवा संपादकांनी) लेखच उडवून लावला. म्हणून हा प्रतिसाद येथे टाकत आहे. थोडासा प्रक्षोभाक आहे आणि मला माहीत आहे की यावर खूप हल्ला होणार (आणि कदाचित विडंबनही येणार:), पण ठीक आहे, मला जे वाटते ते मी येथे मांडतो आहे. जर चुक वाटली तर साधक बधक चर्चा करुन मला तुम्हाला काय वाटते ते पटवून द्या.

सर्वप्रथम महाराष्ट्रानी भारताला काय दिले यात स्वातंत्र्यपुर्वीचा काळ समाविष्ट करणे अत्यंत चुकीचे आहे. कारण की आपल्याला अभिप्रेत असलेली भारताची आइडेंटिटी स्वातंत्र्यानंतरच भारताला मिळाली. त्या आधी भारत भारत नव्हता .. जे होते ते निरनिराळे राजे. (बाय द वे, भारताची आपल्याला अभिप्रेत आइडेंटिटी मिळवून देणारा एक गुजरात पुत्र होता).

कुणी काहीही म्हणो, पण स्वातंत्र्यपुर्वीचे राजे महाराजे भारतासाठी भांडत, लढाया करत नव्हते. ते करत होते ते स्वतःच्या राज्यासाठी, स्वतःच्या भल्यासाठी. त्यामुळे ब्रिटीश विरुद्ध अमुक एका राजानी मदत केली नाही असा ओरडा करणे अत्यंत चुकीचे आहे. याकाळातील देशप्रेम, स्वाभिमान इत्यादींच्या व्याख्या भलत्याच काळाला लावुन, त्यानुसार अमुक एक राजा देशद्रोही होता असे जाहीर करणे म्हणजे बौध्धीक दिवाळखोरी होय. इतिहास आहे असा आहे .. टेक इट ओन् इट्स फेस वॅल्यू .. अहो इतकाच जर देशप्रेम होता तर टिपु जेव्हा ब्रिटीशानविरूध्ध लढत होता तेव्हा कुठे होते तुमचे मराठी राजे? मी असा म्हणता नाही आहे की त्यानी टिपु ची साथ न देऊन त्यांनी देशद्रोही पणा केला. पण द्रविड लोक तुमच्याच नियमानुसार असा म्हणू शकतात.

मला असा वाटत की भारताचा जो काही इतिहास भारतात शिकवला जातो तो अत्यंत ओवर रेटेड आहे. भारताचा असा एक इतिहास बाकीच्या जगपासून वेगळा काढून स्वातंत्रा शिकवता येत नाही. पण आपल्याकडे भारतीय स्वातंत्र लढा वेगळा शिकवतात आणि जागतिक युध्ध एक आणि दोन वेगळा शिकवतात. पण दोन्ही एकाचा कालखंडात घडले आणि त्यांची सांगड किती लोक घालतात? आणि अशी सांगड घालायला एनकरेज तरी करतात का? .. नाही, कारण अशी सांगड घातली तर धक्कादायक उत्तर मिळतात. माझ्यामते आपल्याला स्वातंत्र हिंसक मार्गानी तर नाही आणि अयिन्सक मार्गाने तर नाहीच नाही मिळाले.
खरोखर भारताला स्वातंत्र या सो कॉल्ड लढ्यामुळे मिळाले की इंग्लेंड बेचिराख झाल्यामुळे मिळाले? जर चर्चिल दुसरी निवडणूक जिंकला असता तर त्याने हे स्वातंत्र दिले असते का?
पण मग प्रश्न असा येतो की या लढयाचे भारताच्या इतिहासात काहीच योगदान नाही का? आणि असेल तर किती? तर याचे उत्तर असे आहे (अँड विच ब्रिंग्स मी बॅक टू माइ ओरिजिनल पॉइण्ट) की याचे सर्वात मोठे योगदान भारत घडवण्यात आहे. गांधींच्या अहींसेने भले ब्रिटीश लोकांवर ढिम्म परिणाम झालल नसला तरी त्याने सामान्य माणसात एकतेची भावना निर्माण केली.

या सार्‍या देशाला एकत्रआणले... भारताचा भारत केला. जेव्हा लोका भारत पाकिस्तान फाळणीबद्दल बोलतात किंवा गांधीना दोष देतात तेव्हा मला खूप मजा वाटते. मला तर इतकी विविधता असलेला प्रदेश, फक्त दोन वेगळ्या ग्रूप्स मध्येच डिवाइड झाला आणि अजुन ग्रूप्स मध्ये कसा काय डिवाइड नाही झाला (फाळणीच्या वेळेला तरी) याचे फार आश्चर्य आणि कौतुक वाटते. (अर्थात सध्याच्या नक्षल कारवाया बघता, हा एकत्रित पणा फक्त एक देखावा आहे असे वाटू लागते) .

मला लिखाणाची सवय नाही. त्यामुळे लेख असंबद्ध झाला असण्याची शक्यता आहे. तुमहला भारताचा अभिमान आहे .. मलाही आहे. फक्त मला अभिमान वाटण्याची कारणे ९९% लोकंपेक्षा खूप वेगळी आहेत.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

ज्ञानेश...'s picture

9 May 2010 - 1:03 pm | ज्ञानेश...

खरोखर भारताला स्वातंत्र या सो कॉल्ड लढ्यामुळे मिळाले की इंग्लेंड बेचिराख झाल्यामुळे मिळाले? जर चर्चिल दुसरी निवडणूक जिंकला असता तर त्याने हे स्वातंत्र दिले असते का?

अवश्य दिले असते.
दुसर्‍या महायुद्धामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले, हा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की भारताचे स्वातंत्र्य तत्वतः इंग्रजांनी १९३५ सालीच मान्य केले होते- वसाहतींना स्वातंत्र्य देण्याचे मान्य करून. दुसर्‍या महायुद्धाला सुरूवात १९३९ साली झाली.
स्वातंत्र्य मिळणार हे तेव्हाच नक्की झाले होते.

सर्वप्रथम महाराष्ट्रानी भारताला काय दिले यात स्वातंत्र्यपुर्वीचा काळ समाविष्ट करणे अत्यंत चुकीचे आहे.
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राने भारताला काहीच दिले नाही का? केंद्र सरकारला महाराष्ट्रातून आणि मुंबईतून सर्वाधिक महसूल जातो, असे ऐकून आहे.
अर्थात 'मुंबई महाराष्ट्राची नाहीच मुळी' असा पुढचा युक्तिवाद असेल, तर बोलायला नकोच.

आनंदयात्री's picture

9 May 2010 - 3:05 pm | आनंदयात्री

>>दुसर्‍या महायुद्धामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले, हा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की भारताचे स्वातंत्र्य तत्वतः इंग्रजांनी १९३५ सालीच मान्य केले होते- वसाहतींना स्वातंत्र्य देण्याचे मान्य करून.

सहमत आहे. ज्ञानेश धन्यवाद त्या वाक्याचे खंडण केल्याबद्दल.
माफ करा गोगोल पण आपले वाक्य मी बेजबाबदार या कॅटेगरीत धरेन, त्या वाक्याने भारताच्या आख्ख्या स्वातंत्र्यलढ्याला कमी लेखले आहे.
अश्या संवेदनशील विषयांवर मी सहसा पुर्ण पुरावा असल्याखेरिज बोलत नाही.
चुक भुल देणे घेणे.