आज साठी खास..

स्पंदना's picture
स्पंदना in जनातलं, मनातलं
8 May 2010 - 10:52 pm


मंडळी नमस्कार,
आज ९ मे; तर आजच्या दिवसाची सुरुवात हिरकणी ला नमन करून करूया.
काय? कोण हिरकणी? अहो काजळणाऱ्या दिशांना न डरणारी ; डोळ्यातल्या पाण्यान हतबल न होता उलट ते पाणी शिंपून मातृत्वाच रोपट जोमान जोपासणारी; तान्हुल्याच्या ओढीन शिवरायांचा आदेश धुडकावून रायगडाचा बुरुज लांघणारी. हो तीच; जिची खुद्द शिवबांनी मोहोरांनी ओटी भरली ती . . हिरकणी.
जिच्या मातृत्वाची गाणी गात आज ही राय गडावर तो बुरुज उभा आहे ती...हिरकणी.
खर तर हा विषय शुची ताईन्चा ; त्यांनी आधीच सुरु केला पण काय झालं कोणास ठाऊक एकदम "आलामंतर कोलामंतर... .छु !" आणि तो लेखच गायब.
मग राहवेना!
तर आज च्या दिनी अश्या सर्व हिरकणींना माझा दंडवत !!
होय!! कुठ संप ; कुठे मोर्चा . कधी रुळावरून घसरलेली रेल्वे, कधी ट्राफिक जॅम या सर्वाला खंबीर पणे तोंड देत , तान्हुल्याच्या ओढीन घरी परतणाऱ्या तुम्ही आम्ही ही आजकालच्या हिरकणीच आहोत!!

तर अशीच एक यतकन्श्चीत हिरकणी आपल्या तान्हुल्याला झोपडीत निजवून" आत्ता लगालगा जाऊन येते" म्हणून निघाली. परतीच्या वाटेवर तिला वावटळीन गाठली.
अहो कुणाचा बुरुज बस वाल्यांचा अकस्मात संप असतो तर कुणाचा मोर्चे धरनेवांल्यान्चा रास्ता रोको असतो. आमच्या नायिकेचा बुरुज आहे निसर्ग. तर सारया हिरकण्यांना ही कविता अर्पण, एका हिरकणी कडून.

वावटळ

आल आल वावटळ
सावरे गरती पदर.
झोम्बाझोम्बी करत ते
तिचा गाव दूर वर.

आल आल वावटळ
म्होर धुळीचा ग लोट
घरी तान्हुला ग तिचा
लावी वाटेला नदर.

येत तान्हुल्याची सय
आला पान्हा झुर मूर
आला पान्हा झुर मूर
मिळे पावलांना सूर.

आली विजेची लकेर
त्याला पावसाचा तळ
एक एक थेंब मोठा
ओल्या लुगड्याचा भार.

आला आला की ग गावं
झाड कारताती नाच
धरी तान्हुला पदर
दोघ आनंदात चूर.

सारया लेकरांना त्यांची आई; आणि साऱ्या आयांना त्यांची लेकर कायम जोडून राहू देत हीच या हिरकणी दिनी देवाकडे प्रार्थना!!!

मांडणीशुभेच्छा

प्रतिक्रिया

शुचि's picture

9 May 2010 - 12:57 am | शुचि

खरच "हिरकणी" ची आठवण या दिनी समयोचित. लेख आवडला.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मीनल's picture

9 May 2010 - 2:15 am | मीनल

कविता आवडली. शब्द , त्यांची योग्य ठेवण फार आवडली.
प्रसंग समोर उभा केला आहे.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/