'सामन्या'तून 'सामान्यां'कडे...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
6 May 2010 - 9:09 am

एक नवा विक्रम होतोय.
कारण, मास्टरब्लास्टर 'ट्विटर'वर आलाय.
काल सचिनने ट्विटिंग सुरू केले, आणि त्याच्या लाखो 'फॅन्स'मध्ये आनंदाच्या लाटा उसळल्या.
त्याच्या फॉलोअर्सचा क्षणाक्षणाला वाढत जाणारा आकडा न्याहाळणे, हेदेखील कालचे मोठ्ठे 'सुख' होते.
संध्याकाळपर्यंतच्या जेमतेम १८ तासांत सचिनच्या चाहत्यांची झुंबड गर्दी ट्विटरवर उसळली होती. रात्री जवळ्पास एक लाखांचा आकडा ओलांडला...
शिवाजी पार्कच्या मैदानावर, तिथल्या मातीत हुंदडून मोठा झालेल्या सचिनच्या चाहत्यांची एक विशाल सभा ट्विटरवर भरली, आणि प्रत्येकाने आपले मन मोकळे करीत सचिनला शुभेच्छा दिल्या.
एवढी मोठी सभा, पण, कसलाही गोंगाट नाही.
खरंच, 'ट्विटर' हा 'सायलेन्स झोन' आहे... तरीही इथे लाखोंची गर्दी होते, आणि सगळे काही सुरळीत, शिस्तीत, आखीवपणे पार पडते.
सुखवणारे!...
वेलकम सचिन... तुझ्या सामान्यांच्यात येण्यामुळे, असंख्यांच्या भावनांना शब्द फुटतील...

मुक्तकशुभेच्छा

प्रतिक्रिया

सनविवि's picture

6 May 2010 - 2:15 pm | सनविवि

सध्या आकडा १,३३,४९५ आहे, एस. आर. के ३ लाखाच्या आसपास आहे तर शशी थरूर ७.६ लाख, अजून २-३ दिवसात सचिन आरामात थरूरांच्या पुढे जाईल!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 May 2010 - 2:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सचिनचे ट्वीटरवर किती फॉलोअर्स आहेत हा आकडा 'विक्रम' मोजण्यासाठी मला स्वतःला फसवा वाटतो. सचिन एक बॅट्समन म्हणून प्रसिद्ध आहे, मार्मिक टिप्पणी, चांगल्या-चांगल्या लिंक्स देणं, बातम्या देणं इ.इ. यांच्यासाठी नाही (ज्या गोष्टींसाठी ट्वीटरचा वापर होतो).

क्रिकेटच्या देवाला प्रत्यक्ष आयुष्यात आपण देव बनवणं सचिनवर अन्यायकारक वाटतं!

अदिती

Dhananjay Borgaonkar's picture

6 May 2010 - 3:24 pm | Dhananjay Borgaonkar

सचिन हा भारतीयांसाठी काय आहे..अथवा भारतीय लोक त्याला किती मानतात याचं मोजमाप ट्वीटर वर कसे काय बरे होऊ शकेल??

ट्वीटर वर कोणाच्या पुढे गेला काय किंवा नाही गेला काय याने असा काय मोठा फरक पडणारे?

सचिन हा सचिन आहे. अतुलनीय!!!!

सनविवि's picture

6 May 2010 - 3:49 pm | सनविवि

// सचिन एक बॅट्समन म्हणून प्रसिद्ध आहे, मार्मिक टिप्पणी, चांगल्या-चांगल्या लिंक्स देणं, बातम्या देणं इ.इ. यांच्यासाठी नाही (ज्या गोष्टींसाठी ट्वीटरचा वापर होतो). //
हे पटलं. तो मार्मिक टिप्पण्या करण्याची शक्यता कमीच. पण ट्विटर मुळे तो त्याच्या चाहत्यांच्या अजून जवळ आला आहे :)

मेघवेडा's picture

6 May 2010 - 4:01 pm | मेघवेडा

>> क्रिकेटच्या देवाला प्रत्यक्ष आयुष्यात आपण देव बनवणं सचिनवर अन्यायकारक वाटतं!

अगदी मनातलं बोललीस अदिती.. मी एक वेडा सचिनभक्त असूनही त्याला दिलेलं देवपण फक्त क्रिकेट आणि क्रिकेटशी निगडित गोष्टींपुरतंच मर्यादित असावं असं मला वाटतं.. उगाच सचिनने 'तेंडुलकर्स' किंवा 'सचिन्स' उघडलंय ना.. म्हणजे ते ग्रेटच असणार असं तिथं जाऊन प्रत्यक्ष चव न घेता म्हणणे चुकीचे आहे.. ('तेंडुलकर्स' मस्तच आहे ;) 'सचिन्स' बद्दल ठाऊक नाही.. गेलो नाही कधी तिथे.. )

नाही, म्हणजे तो ट्विटरवर आलाय हे कळताच मी माझं कित्येक दिवस बंद असलेलं ट्विटरचं अकाऊंट उघडलं खरं.. पण ते "तो क्रिकेट खेळत नसताना दिवसभर काय करत असेल?" हे तुम्हांआम्हांस सर्वांस असलेल्या कुतुहलापोटी. आता तो जाईल तिथं त्याला भरभरून प्रेम मिळतं.. त्याच्यासाठी मैलोनमैल प्रवास करून आजही लोक स्टेडियमवर मॅच पाहण्यास येतात. हे त्याच्यावरील त्याच्या चाहत्यांच्या प्रेमाचं खरं मोजमाप.. आणि त्याला हे प्रेम/भक्ती मिळते ते त्याच्या खेळासाठी आणि ते योग्य आहे.. बाकी ट्विटर, फेसबुक (आज नाहीये.. पण उद्या पोरांच्या आग्रहाखातर कदाचित तिथंही येईल सचिन.!!) ही सगळी प्रमाणं सेकंडरी!!

-- (सचिनभक्त) मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 May 2010 - 5:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सनविवि आणि मेघवेडा, तुमचं दोघांचंही म्हणणं मान्य आहे. पण वर्तमानपत्रातले आकडे पाहून डोक्यात आलेले हे विचार.
शाहरूख आणि शशी थरूरना किती फॉलोअर्स आहेत आणि सचिनला तेवढे जमवायला किती दिवस लागतील हे सचिनच्या थोरवीचं मोजमाप होऊ नये एवढंच!

अदिती

मेघवेडा's picture

6 May 2010 - 5:22 pm | मेघवेडा

तेच तर म्हणतोय मी..

बाकी ट्विटर, फेसबुक ही प्रमाणे सेकंडरी आहेत असं म्हटलं मी..!! :)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

संदीप चित्रे's picture

6 May 2010 - 9:45 pm | संदीप चित्रे

प्रथम सहमती --
>> क्रिकेटच्या देवाला प्रत्यक्ष आयुष्यात आपण देव बनवणं सचिनवर अन्यायकारक वाटतं!
मला तर मुळात त्याला क्रिकेटचा देव करणंच त्याच्यावर अन्याय आहे असं वाटतं. तोही माणूसच आहे हे स्वत:शी एकदा मान्य केलं की तो जास्तच आपला वाटतो :)

असहमती --
>> सचिन एक बॅट्समन म्हणून प्रसिद्ध आहे, मार्मिक टिप्पणी, चांगल्या-चांगल्या लिंक्स देणं, बातम्या देणं इ.इ. यांच्यासाठी नाही
ट्विटर कसं आणि का वापरायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं. दुसरं म्हणजे आपल्याला सचिनच्या व्यक्तिमत्वाची सगळी अंगं अजूनही नक्की कुठे माहिती आहेत? उदा. अमिताभचे हिंदी आणि इंग्रजी चांगले आहे हे सगळ्यांना माहिती होते पण त्याचं ह्या दोन्ही भाषांवर किती कमालीचं प्रभुत्व आहे हे बर्‍याच जणांना अनुक्रमे 'कौन बनेगा करोडपती' आणि त्याचा स्वतःचा ब्लॉग ह्यामुळे समजलं. त्याच्या चाहत्यांना 'बच्चनवेडा'साठी अजून कारणं मिळाली :)

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

इन्द्र्राज पवार's picture

6 May 2010 - 6:09 pm | इन्द्र्राज पवार

एखाद्या कलाकार किंवा खेळाडूच्या गुणवत्तेची मोजपट्टी ही ट्विटर, फेसबुक किंवा एस.एम.एस. वरून चुकुनदेखील करू नये. अशा संदर्भात "आर्या आंबेकर" आणि "अभिलाषा चेल्लम" ही दोन झगझगीत उदाहरणे आपल्याकडे आहेत. निव्वळ एस.एम.एस. नाहीत म्हणून यांचे हमखास प्रथम क्रमांक हुकले अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे. (अंदरकी बात काही वेगळी असेलही.... पण तो उद्देश बाजूला ठेवला तरीही...) केवळ "आकडेवारी" ही फार फसवी असते.

उद्या श्रेया घोषालला ट्विटरवर लता मंगेशकर यांच्या पेक्षा जास्त कौल येतील, म्हणून आम्ही श्रेयाचा उदो उदो सुरु करावा का ?

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"