आज अचानक उदास का वाटे
आज अचानक उदास का वाटे
न रमे मन हे दिवसाही अंधार भासे ||धृ||
ईकडे पाहून तिकडे पाहून
वेळ घालवू किती
कसे कोण जाणे
कितीक वेळ माझी जाते
आज अचानक उदास का वाटे ||१||
किती मी चेहर्यांना वाचू
किती अनूभव लेखू
आवाज जवळी नसतांना
साथीचे शब्दही पडत आहे थिटे
आज अचानक उदास का वाटे ||२||
दुर अंतरावरी असता तू
कसा निरोप देवू
येथला निरोपही घेण्या
मन माझे आक्रंदूनी उठे
आज अचानक उदास का वाटे ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०५/०५/२०१०
प्रतिक्रिया
5 May 2010 - 8:34 pm | धमाल मुलगा
:?
काय सायबा?
आल इज वेल ना?
5 May 2010 - 10:22 pm | पाषाणभेद
काय होतेय तेच तर वर सांगितले ना! आज उदास उदास वाटतेय, अगदी पंकज उदास झालाय माझा!
:-)
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
6 May 2010 - 1:19 am | मीनल
मला पहिली २ कडवी आवडली.
`मोबाइल` शब्दा मुळे त्यात भावना असली तरी कविता तिरपी गेल्यासारखी वाटली.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
6 May 2010 - 8:04 am | sur_nair
मीनलतैंशी सहमत
6 May 2010 - 12:51 pm | स्पंदना
टण,टण टण टण,
डीपि डीपि ढीपाण्ग, डीपि डीपि ढीपान्ग!!
वाटल बर?
L)
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
6 May 2010 - 1:02 pm | चिरोटा
उदास का होता पाषाणभाउ? वीकांताला आता फक्त दीड दिवसच उरला आहे!
(मनहर)भेंडी
P = NP
6 May 2010 - 1:08 pm | वाहीदा
हा धागा वाच बरे... मस्त वाटेल तुला ..खरंच
http://www.misalpav.com/node/12208
दुर अंतरावरी असता तू
कसा निरोप देवू
कोणाला निरोप देतो आहेस भाऊ ??
त्याला सांग ना 'तुसी ना जाओ ':-)
~ वाहीदा
6 May 2010 - 2:55 pm | विशाल कुलकर्णी
आयच्यान, कायतरी बिघडलय तुमचं देवा ;-)
पन कव्ता येकदम झ्याक बर्का, आवाडली :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
6 May 2010 - 6:09 pm | शुचि
पाभे आज वाटतय का ठीक? जरा फिरून या झपझप. मस्त वाटेल.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
7 May 2010 - 2:52 am | मीनल
तिस-या कडव्याचा बदल आवडला.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/