मी महाराष्ट्राची भाषा
संवादाची दिशा आणि आशा
मी असते तुमच्या मनामनांत
मी असते तुमच्या संवादात
आठवा मला शब्दाशब्दांत
साठवा मला पानापानांत
सदा ठेवा मला जीवंत
पाहू नका माझा अंत
करू नका माझी उपेक्षा
ही माझी एकच अपेक्षा!
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा...
-- तुमचीच लाडकी ,मराठी
प्रतिक्रिया
1 May 2010 - 9:40 am | प्रमोद देव
:)
1 May 2010 - 7:27 pm | शुचि
मस्त
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
1 May 2010 - 7:45 pm | टारझन
शांतरस काही पटला नाही , करुणरस वाटतो. मराठीला एवढी आर्जवे करण्याची तरी नक्कीच गरज नाही ,
शिवाय शेवटाला "-- तुमचीच लाडकी ,मराठी" असे म्हणुन एकदम विरोधाभास दर्शवल्यासारखा वाटतो . कविता पाडणे हल्ली जिलब्या पाडण्याइतकं सोप्प झालेलं आहे.
असो
- आमिष देणार
1 May 2010 - 8:11 pm | बरखा
खुप छान.