हे रोज कविता करणारे !!!

निल्या१'s picture
निल्या१ in जे न देखे रवी...
28 Apr 2010 - 10:26 am

हे रोज कविता करणारे (प्रेरणा: हे गंधित वारे फिरणारे )

मिपाकरहो, सादर आहे नवे विडंबन "हे रोज कविता करणारे" ! गाणं संदीप खरे सलील कुलकर्णी यांचं असलं तरी विडंबनाचा रोख त्यांच्यावर नसून मराठी ब्लॉगविश्व मिम, मिपा सारख्या उपक्रमांवर घडणा-या घटनांवर आहे !

सदर विडंबन कोणासही उद्देशून नसून करमणूक म्हणून बनवले आहे.

आता विडंबनाचा आस्वाद कसा लुटावा? मागच्या वेळी प्रमाणे व्हिडो बनवला आहे. बघाच एकदा.

हे गाणं फारसं परिचित नाही त्यामुळे आधी मूळ गाणे ऐका

नंतर आमचे विडंबन येथे ऐका

आमचे विडंबन
हे रोज कविता करणारे
जन झरझर पांचट लिहिणारे
अपरिचित सारे पूरवीचे
तरी आता झालेत ओळखीचे
बघ व्यनित कोणी कुजबुजते

कुणाकुणाला खरडवहीतून जोडे मिळतात रे
उमजत नाही तोंड पुन्हा वरकरुन लिहितात रे
हे परस्परांचे कवतिक करणारे, हे प्रतिक्रियांतून तोंडी लागणारे

कुठल्या दिवशी नकळत मी एक कॉंमेट दिधले रे
असूर कंपूचे कसे जोमाने मलाच भिडले रे

हे कॉमेंट जयातें मधु सुधा
कधी मारतात हा डंखसुध्दा
कधी करतील नावे शंख सुद्धा

कुणाकुणाची कंपूमधुनी फिल्डिंग लागतेय रे
उमजत नाही तंगडी कुणाची कोण कधी खेचेल रे

हे पाककृती लिहिणारे, हे वायफळ चर्चा करणारे

घरात जेजे पडून होते जाली कडमडले
कसे पोरींच्या फोटोंनी 'मिपा' झगमगते

स्त्री तरुण असो वा म्हातारी
हर लेखातून मळमळणारी
स्त्रीमुक्तीसाठी तळमळणारी

मीमराठी मिसळपावचे मैत्रिण होतंय रे
समजत नाही बाजू पुरुषांची इथे कोण ऐकतोय रे

हे गाण्याच्या भेंड्या खेळणारे, हे कॉमेंटसाठी नित्य छळणारे

हे रोज कविता करणारे ,जन झरझर पांचट लिहिणारे

~निल्या

हास्यविडंबन

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

28 Apr 2010 - 4:11 pm | विशाल कुलकर्णी

निलेशराव.. एकदम जहबहरा... आवाडलं देवा ! झ्याक हाये की...

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

निल्या१'s picture

28 Apr 2010 - 8:35 pm | निल्या१

विशाल प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहे तुमचा.
(एक नम्र दुरुस्ती. निल्या हे माझ्या आडनावाचे छोटे स्वरुप आहे. मी निलेश नव्हे ! पण काही हरकत नाही)

टारझन's picture

28 Apr 2010 - 8:43 pm | टारझन

हाहाहा ... मस्त रे निल्या१

अवांतर : पहिल्या व्हिडिओ मधे गडबडीत वाचताना "एच" दिसला नाही , त्यामुळे अचानक उचकी लागली , असो :)

- टार्‍या२०

निल्या१'s picture

29 Apr 2010 - 5:35 am | निल्या१

एच्च लय महत्त्वाचा टा-या भौ ! नेमका तोच वगळून
वाचलंत तुम्ही ,वारं भलतीकडेच वळालं असतं ! तेव्हा एच्च महत्त्वाचा !
नुसता मंगेशराव व एच्च मंगेशराव यांच्या अभिव्यक्तित एच्च मुळे किती फरक पडतो !

कवितानागेश's picture

28 Apr 2010 - 5:51 pm | कवितानागेश

'झर झर ' चा अर्थ मला 'शेवटी कळला!

============
माउ

निल्या१'s picture

28 Apr 2010 - 8:37 pm | निल्या१

हाहा ! शेवटची स्लाईड गोड (की खारट :D )व्हावी !
शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद !

पक्या's picture

28 Apr 2010 - 10:02 pm | पक्या

मस्त रे भाऊ, मजा आली बघायला.
प्रत्येक फ्रेम साठी काय चित्रे लावली आहेत ..जबराट.
विडंबनाची श्टाईल आवडली.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

शुचि's picture

29 Apr 2010 - 4:03 am | शुचि

चाल जबरी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

निल्या१'s picture

29 Apr 2010 - 5:38 am | निल्या१

शुचि,
चालीचं श्रेय सलील यांना जायला हवं व कवितेच्या काढलेल्या सालीचं आम्हाला !

निल्या१'s picture

29 Apr 2010 - 5:36 am | निल्या१

पक्या
आवडेश का? धन्यवाद भौ !

II विकास II's picture

28 Apr 2010 - 10:12 pm | II विकास II

अगदी मस्त.
असुर कंपु नाव जाम आवडले.

---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

निल्या१'s picture

29 Apr 2010 - 5:40 am | निल्या१

विकास प्रतिक्रियेबद्दल आभार ! तुम्ही खरडवहित दिलेल्या संदेशाबद्दल धन्यवाद. मला कोणाच्या खरडवहीत खरडता येत नाही वाटतं,

तात्या किंवा नवे मालक इकडे लक्ष देता का?

इंटरनेटस्नेही's picture

29 Apr 2010 - 5:39 am | इंटरनेटस्नेही

असेच म्हणतो.
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

निल्या१'s picture

29 Apr 2010 - 5:41 am | निल्या१

व्हडो पाहिल्याबद्दल धन्यवाद !

निखिल देशपांडे's picture

29 Apr 2010 - 11:13 am | निखिल देशपांडे

निल्या विडंबन नेहमी प्रमाणे झक्कास..
व्हिडो पाहुन परत प्रतिसाद देतोच
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

निल्या१'s picture

29 Apr 2010 - 10:12 pm | निल्या१

निखिल, धन्यवाद. वेळ मिळेल तेव्हा जरूर पहा व्हिडो !

शानबा५१२'s picture

29 Apr 2010 - 5:38 pm | शानबा५१२

खर सांगु तर आवाज आवडला दुसर काही नाही

निल्या१'s picture

29 Apr 2010 - 10:14 pm | निल्या१

शानबा५१२,
खूप आभारी आहे. स्वतःच आवाज वाईट की बरा हे स्वतःला कळणं अवघड असतं त्यामुळे तुमची प्रतिक्रिया विशेष वाटली. धन्यवाद.

काही तरी आवडलं याचाच आम्हाला आनंद !

इंटरनेटस्नेही's picture

3 May 2010 - 1:33 am | इंटरनेटस्नेही

आवाज चांगलाच आहे.. नो डाऊट अबाऊट ईट!
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

अरुंधती's picture

29 Apr 2010 - 6:57 pm | अरुंधती

हा हा हा..... अगदी मस्त जमलंय विडंबन व व्हिडियो! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

निल्या१'s picture

30 Apr 2010 - 10:30 am | निल्या१

अरुंधती,

संप्रूण व्हिडो पाहिल्याबद्दल व प्रतिक्रियेबद्दल आभार !

~
निल्या

स्वाती२'s picture

3 May 2010 - 5:12 am | स्वाती२

कसलं भन्नाट आहे.

व्हिडीओ व आवाज दोन्ही पण मस्त अहे. तु कोणत्या कंपु मध्ये आहेस रे? :D

वेताळ

व्हिडीओ व आवाज दोन्ही पण मस्त अहे. तु कोणत्या कंपु मध्ये आहेस रे? :D

वेताळ

निल्या१'s picture

4 Oct 2010 - 3:42 am | निल्या१

धन्यवाद वेताळ्ळा ! मी सध्या वाचकांच्या कंपूमध्ये आहे.

सुप्रिया's picture

3 May 2010 - 11:46 am | सुप्रिया

मस्तच् !! मजा आली.

इंटरनेटस्नेही's picture

4 Oct 2010 - 2:58 am | इंटरनेटस्नेही

मिपावरील सर्वोत्तम विडंबन! चलचित्र देखील उत्तम! पु.ले.शु.

निल्या१'s picture

4 Oct 2010 - 3:37 am | निल्या१

एवढ्या मोठ्या पावती बद्दल आभारी आहे !