लहानपणी खूप मजा यायची
त्याच्या मध्ये डोकावताना
मीच स्वताचे पाहुनी बोळके
हसायची रडता रडता
मग मी थोडी झाले मोठी
आरसा परी तोच होता
गणवेशातले रूप वाढते
तोही अलगद निरखत होता
मग मी चढले शिडी नाजुकशी
तारुण्याच्या उंबरठ्यावरी
आणि सर्वांगावर माझ्या
शृंगाराची फिरली नक्षी
आरसा.....
मग माझा सखाच झाला
संवाद तासन तास झडू लागला
नित्य नवा साज बहराचा
अंगांगी माझ्या उमलू लागला
मग ती मोहक वेळ आली
आयुष्याच्या वळणावरती
साद कुणी ती घालून हळवी
मोहविले मज मनी मानसी
आरसा ....
नित्य सख्या स्तव सजता सजता
आरसा कानी सांगतसे
आज चढव हा साज नवा
तोच सख्या मोहवितसे
चालुनी मग ती सप्तपदी
झाले सात जन्माची सोबती
सखा माझा कायमचा
सुख दुख्खा चा बनला साथी
आरसा...
इथेही तो माझी "मुख" राखण करीत होता
संसाराचा फुलता मनोरा
हजार नयनी
हसून तो पाहत होता
मग ती मंगल चाहूल माझ्या
गत्रातुनी दाटुनी आली
या जिवामध्ये नवा पाहुणा
आनंदाने हुंकारती
आरसा ...
पाहुनी तेजाळलेले रूप देखणे
चान्द्रकोरही लाजतसे
गर्भाराचे तेज तोही
माझ्यासह अनुभावातसे
आराश्या साहितच माझा
लेक लहानगा मोठा झाला
लग्नघटिका समीप येता
अराश्याशी तोही हितगुज करता झाला
आरसा...
त्याने मजला आज दाविले
सुनमुख ते गोड लाजरे
नयानाशी जुळता नयन लाजरे
जन्माची मी बांधील झाले
आता ओढ ही निर्वाणीची
त्या गूढ ईशाची लागलीसे
चेहर्यावरही अनुभवाने
जाळे त्याचे वीणालेसे
आरसा ...
तो आता मला दाखवितो
किती पावसाळे मी अनुभवले
जीर्ण माझ्या कातडीचे
शीर्ण झालेले तुकडे .
आता ही संध्या छाया
मृत्यू मजला खुणावितसे
माझ्यासह आरश्याने सती जावे
हीच आखरी आस असे .....
अनुजा(स्वप्नजा )
प्रतिक्रिया
24 Apr 2010 - 4:16 pm | शानबा५१२
मी छोटा असताना आरश्यात बघुन वेडीवाकडी तोंड करत असे......खुप वेळ..........मग एकदा चंपक मधे वाचल की एका कोणत्या तरी देशाचा राजा अस करायचा तेव्हा मला थोड स्वताच्या यड*वे पणाचे कौतुक वाटले.
आपल आरसापुराण वाचुन ते आठवल म्हणून लिहल.
-----------------------------------------------------------------------
I'll never compromise
No F***ing way!
24 Apr 2010 - 4:48 pm | मदनबाण
वा.... :)
ह्र्दयाच्या आरशाला
नेहमी स्वच्छ ठेवावे
प्रतिमा कोणाचीही असो
तिथे आपल्या सखीलाच ठेवावे...
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
24 Apr 2010 - 6:10 pm | पिंगू
कविता वाचून अवधूत गुप्तेच्या गाण्याचे बोल आठवले.....
आरसा आहे तुझा मी, तर मला फोडू नको
चेहरा आहे तुला जर, तर मला सांगून जा
- पिंगू
24 Apr 2010 - 6:27 pm | मीनल
सर्व कविता, आशय अवडला .
मीनल.
http://myurmee.blogspot.com/