दि. २६ एप्रिल रोजी श्रेष्ठ संगीतकार शंकर यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने आज संध्याकाळी
पुण्यात माझ्या एका परिचितांच्या घरी एक अनौपचारिक मैफल आयोजित करण्यात आली आहे. शंकर- जयकिशन विषयी थोड्या-बहुत गप्पा,
हौशी एस्.जे फॅन्सचे गायन वा वादन असे काहीसे स्वरूप असेल. अश्या प्रकारची मैफल त्यांच्या घरी
अठ्ठ्याऐंशी सालापासून (शंकरच्या निधनाच्या पुढिल वर्षापासून) होत आहे.
इच्छूकांनी माझ्याशी व्य नि वा मोबाईलवर संपर्क साधावा.
सर्व जुन्या हिंदी गाण्यांच्या व शंकर- जयकिशनच्या फॅन्सना हार्दिक आमंत्रण!
प्रतिक्रिया
24 Apr 2010 - 8:36 am | विसोबा खेचर
क्या बात है दाढेसाहेब, यायला नक्कीच आवडलं असतं!
ही माझ्या मते मोठी गोष्ट आहे!
आपला,
(संगीतप्रेमी) तात्या.
24 Apr 2010 - 8:47 am | डॉ.प्रसाद दाढे
मग याच! ऐन वेळेला कळवतोय म्हणून क्षमा करा पण नक्की तारीख
ठरत नव्हती, परगावच्या काही फॅन्सना शनिवारच जमत होता तर आयर्लंडहून येणार्या एका डॉक्टरसाहेबांना रविवार जमणार होता म्हणून बर्याच चर्चेनंतर आज जमायचे ठरले.
तेव्हढाच तुम्हांलाही जरा चेंज मिळेल