मि.पा स्पेशल उखाणे
कृपया हलकेच घेणे.
इथे मी व्यक्तिशः कुणालाही ओळखत नाही.
फक्त आय.डींच्या व्यक्तिमत्वा नुसार हे उखाणे लिहिले आहेत.
सौ.मि.पा संपादक.
पंचांगात पंचाग..आहे पंचांग दाते..
*** रावांनी ब्लॉक केले माझे डुप्लिकेट खाते..
सौ.तात्या
दाराबाहेर काढुन ठेवते मी नेहेमी माझे खेटर..
तात्याराव मारतात मला रोज रोज फाट्यावर..
सौ.देवकाका.
कधी हे करतात तर कधी ते करतात..
प्रमोदराव आजकाल चाल हे अस्त्र फेकुन मारतात..
सौ.मिपाकर
घाटामध्ये कोसळते पावसाळ्यात दरड..
***राव करतात मला घरामध्येही खरड..
सौ.टारझन..
तशी मी आहे पूर्वाश्रमीची जेन..
टार्झनरावांनी मला नाव दिले पेन.
-- टारेश घासभरवी उर्फ टारोबा हजबंड.
मि.विक्षिप्त अदिति
छान छान ललना..त्यांच्या छान छान साड्या..अन त्यांचा ढळलेला पदर..
विक्षिप्त अदिति रोज आवर्जुन पाहते..पेप्रातले खादाडी सदर...
सौ. || विकास ||
छान छान बेडरुमचे रोज किरकिरते दार..
विकासरावांच्या नावाभोवती काड्याच फार.
सौ.क्रमशः लेखक
सेहवाग खेळतो छान पण सचिनवरच भिस्त..
*** रावांच्या मेन (MEN :> ) अॅक्टिव्हिटीमध्ये क्रमशःच जास्त..
सौ.विजुभाऊ
नायलॉन पॉलिस्टरच्या जमान्यात कुठे गेली खादी..
विजुभाऊ पसरतात रोज रात्री जपानी गादी..
सौ.छोटा डॉन
सोन्याच्या ताटात चांदीचे चमचे अन चांदीच्या वाट्या..
डॉनराव टाकतात आजकाल रोज पुणेरी पाट्या..
मि.चुचु
निळ्या निळ्या समुद्रात खारे खारे पाणी..
मिपाने बिघडवली चुचु ची वाणी..
सौ.इंद्रराज पवार.
खादाडी सदरातला मेनु..भाकरी आणि पिठले..(नऊवारीतील मल्लिका शेरावत सोबत..)
पिंडावरचे सारे कावळे इंद्रराजरावांच्या डोक्यावर शिटले..
सौ.ओकसाहेब..
युध्दामध्ये सैनिकाला दाखवावे लागते शौर्य आणि धडाडी..
शशिकांतरावांच्या धोतराला सुध्दा भली मोठी नाडी..
सौ.घाडपांडेकाका..
दांडु,टोपी मुळे पोलिस कसा दिसतो हँडसम आणि रुबाबदार..
प्रकाशरावांच्या बोलण्यात हॅहॅहॅ च फार..
------
इतरत्र कधीकाळी लिहिलेले (घेतलेले नव्हे ) उखाणे एकत्रित करुन इथे प्रकाशित करत आहे.
हा सर्व प्रकार हलकेच घेणे.(मि.पा. वर गेल्या दोन दिवसांपासुन बरीच वैचारिक धुमाळी चालु आहे. म्हणुन हे स्पष्टीकरण.)
सौ.स.दा.टाईट.
टुमदार घर,घरासमोर तलाव
सकाळी उठल्यावर ***राव म्हणतात,एक खांबा लाव
गाडीला असतात तीन तीन गियर
*** रावाना लागते रोज विस्की अँड बियर
*** राव आमचे तसे फारच हौशी
विदेशी नाही मिळाली तर घेतात ते देशी.
*** राव नेहेमी कसल्याश्या घाईत असतात..
निघतना तर ठीक असतात,पण आल्यावर टा-ई-ट असतात
***राव फार शूर मी आहे भित्री
ते आल्याची हाळी देतात,गल्लीतील सारी कुत्री..
*** रावांचे आमच्या तत्व फार भारी..
रोज ठेवून येतात ते बारमधे उधारी..
कोल्ड ड्रिंक्स चे प्रकार अनेक..कॉक पेप्सी अँड माजा..
***रावांचे मित्र म्हणती,फुकट बस झाले आता एकदा तरी पाजा..
Dry Day ला *** राव फारच हताशा होतात..
लिंबुपाणी मग ते दारू समजून पितात.
*** राव आहेत स्वभावाणे फार शांत
घराप्रमाणे गतारातही ते पडतात निवांत
२६ जुलैला आली होती मुम्बई मध्ये Hight Tide
**** रावाना सगळे म्हणतात गटारान्चा best Guide
सौ.डॉक्टर
भले मोठे घर त्याला भले मोठे दार
*** रावांच्या इंजेक्शनला मी कंटाळलेय फार..
सौ. ट्राफिक हवालदार
पारले जी,मारी ,क्रॅकजॅक आणि फिफ्टी फिफ्टी
***राव वाजवतात झोपेमध्येही शिट्टी ..
राजाच्या राजवाड्याला शेकडो खिडक्या आणि हजारो दारे
झोपेतही थांबत नाहीत *** रावांचे हातवारे
सौ.क्रिकेटर
गाड्यात गाडी भारी गाडी मित्सुभिषी लांसेर
****रावांच्या अंडरपँटहा Lux आहे स्पॉन्सेर
थोडे फार कळते मला पण क्रिकेट..
रोज रात्री होतात ***राव लेग बिफोर विकेट..
सौ. हेमामालिनी
नाव ऐकायला पहा कसे गोळा झालेत नमुने
धर्मेंद्ररावांचय तोंडात सारखे कुत्ते और कमिने..
सौ.. सलमान खान ..whomsoever it may concern..
भली मोठी इमारत तिचा भलामोठा जीना
सलमानराव घरीदारी फिरतात शर्टविना
सौ. सरकारी अधिकारी
शंभर कौरव आणि पांडव पाच
घरी सुद्धा माझ्याकडून ***राव घेतात लाच
सौ.बॉलिवुड तारका..
प्लास्टिकच्या ताटात , प्लास्टिकचीच केळि,..
*** रावान्चे नाव आता मी घेईन,घटस्फोटाच्या वेळी..
सौ. ललित मोदी
इवल्या इवल्या शिंपल्यामध्ये..छान छान पर्ल..
ललितराव आय.पी.एल कमिनशनर त्यांची मी चिअर गर्ल..
सौ. थरुर
सगळ्यांच्या आरोपांना उत्तरे देते जरुर..
ललित आहे बदमाश तर निष्पाप माझे थरुर..
सौ. टायगर वुड्स
जरा बाई कोठे मी मान वळवुन शिंकले..
टायगरराव तेवढ्यात दुसर्या लफड्यात गुंतले..
General उखाणे
वडाच्या झाडाला लटकतात छान छान वेली
*** रावांना निवडून मी बाई चुकच केली..
मऊ मऊ बिच्हान्यावर् मऊ मऊ उशि
*** रावानचे नाव बाई घेऊ मी कशी?
पावबरोबर लावून खाल्ले अमूल बटर
*** रावांचे नाव घ्यायला अडलेय माझे खेटर
घर बान्धतात रचुन वीट अन वीट
***रावान्चे नाव घेताच मला येते फीट..
सुन्दर किति दिसतात पाहा मोराचि पिसे..
लग्नानन्तर ***राव फार झाले वेडेपिसे..
हिवाळ्यात लागते झाडान्ना पानगळ..
आमच्या घरात *** रावान्ची अडगळ..
ऐश-अभि च्या लग्नाला म्हणे पाहुणे होते फार
***राव रोज खातात घरी माझ्या हातचा मार..
समुद्रावर उसळत होत्या मोठमोठ्या लाटा..
मी आहे गुलाब तर ***राव त्याचा काटा..
रुबाबदार असतात कशी सारी अरबी घोडी..
कुत्री मागे लागली म्हणुन ***रावान्ना झाली पळता भुई थोडी..
काल पिक्चर पाहीला "झुम बराबर झुम" थिल्लर..
मी ५०० ची नोट तर ***राव नाणी चिल्लर..
पोस्टमनचे काम पोहोचविणे पत्र..
***रावान्ना चावले काल गल्लीतले कुत्र..
सासरी येताना बाई मी हमसुन हमसुन रडले..
***राव काल आमचे जिन्यावरुन धडपडुन पडले..
मल्लिका शेरावत नाचते घालुन तोकडे कपडे ...
***रावान्चे आहे बहुतेक घराबाहेर एक लफडे..
देखणे आणि सुन्दर असते मोराचे पीस..
***राव आमचे , एकदम चारसो बीस..
कर्तव्यनिष्ठ पोलिसाला कसे सारे गुन्ड वचकतात..
*** राव शिन्कले कि गल्लीतली सारी कुत्री दचकतात..
सायकल व्यवस्थित चालते जर नीट धरले हेन्डल..
*** रावान्च्या नावने आज वडाला गुन्डाळुन आले मी बन्डल.
सजुन सवरुन आज मी वडाच्या पुजेला चालले..
अन ऐन वेळेला ***रावान्नी आतुन दार लावले..(इश्श्ययययय..)
लग्नात मी नेसला हिरवागार शालु आणि पायात चान्दिचे जोडे,
*** राव बसताच,रस्त्यातच बसले वरातीतले घोडे..
गावोगावी झालेत आज महात्मा गान्धी पथ..
***रावान्च्या डोक्यावर एक केस सापडेल तर शपथ..
साध्या बसपेक्शा आवडते मला डबलडेकर..
लग्नात घास भरवल्यावर ***रावान्नी दिला ढेकर..
पिंजर्यातला पोपट..खातो मिरची तिखट..
XXXराव आमचे बाई फारच तिरसट..
चौसोपी वाडा, त्यामागे गोठा, गोठ्यात बारा म्हशी..म्हशींमागे लागला सांड..
रावाने झटक्यात लोळावला त्याला..****राव आमचे फारच आडदांड..
चांगला मोठ्ठा वाडा..त्याला भलेमोठ्ठे दार..
***राव रात्री झोपु देत नाहीत मला..घोरतात फार..
आता नवरोबाजीन्चे उखाणे..
केस गळुन गेल्यावर पडले मला टक्कल..
आमची *** म्हणते मला,आता कुठे आलीय तुम्हाला अक्कल..
उडप्याच्या होटेलात मिळतात मेदुवडा आणि इडली डोसा..
महिनाअखेरीस *** साफ करते,माझा सगळा खिसा..
नरीमन पोईन्ट ची रात्री असते शान काही और..
रोज घरी आल्यावर *** करते मला जाम बोर..
चार भागिले दोन,शुन्य राहते बाकि..
काहीहि बिनसले कि*** देते ,माहेरला जाण्याची धमकी..
आवडत नाही मला,लग्नात घेणे आहेर..
उठ कि सुठ ***,ग़ाठते सारखे माहेर..
बन्दुकीतल्या गोळीने टारगेट केले मिस्स...
हातात नारळ देऊन *** रोज म्हणते,मला द्या किस..
पावसाच्या थेम्बाने बनतो मौल्यवान पर्ल..
***साडीत अजुनही दिसते,झकास आयटम गर्ल..
डोंगरावर एक झाड..त्याला एक पेरु..त्याच्या खाली मी अन पारु....
मी हाय जरा बिझी..उगाच मला आता हाका नका मारु....
फार फास्ट चालते.. पुणे मुंबई डेक्कनक्वीन..
XXXX के गोरेपन का राज..सर्फ एक्सेल और रिन..
"शिवाजी,द Boss" बघितला black ने तिकिट काढुन..
*** शी लग्न केले,पक्या,भिकु,सत्याचे दात पाडुन..
------ योगेश जोशी.
प्रतिक्रिया
24 Apr 2010 - 3:10 am | शुचि
>> सजुन सवरुन आज मी वडाच्या पुजेला चालले..
अन ऐन वेळेला ***रावान्नी आतुन दार लावले..(इश्श्ययययय..) >>
=)) =))
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.
24 Apr 2010 - 10:57 am | पिंगू
आता हापिसात गजाली करायला एक विषय मिळाला!!!!!! =)) =))
24 Apr 2010 - 10:59 am | पर्नल नेने मराठे
खोक्यात खोका टिव्हीचा खोका..
मी ह्यांची माउ हे माझा बोका 8|
चुचु
24 Apr 2010 - 1:46 pm | रानी १३
लगे रहो !!! लय म्म्ह्न्न्जि लै भारि!!!!
24 Apr 2010 - 2:19 pm | टारझन
जबरा रे काणडी योग्या !! हसुन हसुन पुरेवाट !! आमच्या नावाने बी उखाणा काढल्याबद्दल आभार :)
बाकी तुच्यासाठी आमच्याकडनं एक आहेर !!
बाकी एक-दोन ताजे ताजे सुचलेले
इकडे तिकडे चोहीकडे .. अहो इकडे तिकडे चोहीकडे
मी अलिकडे तर ***राव पलिकडे ...
पोर होईना म्हणुन नाडीशास्त्री टारुनंदांना साकडे
यांनी मला प्रपोज केलं ठिकाण होतं गुलटेकडी
हे नडले टार्याशी , झाली त्यांची मानवाकडी
- (युगप्रवर्तक) सणेश गुढीपाडवी
-
24 Apr 2010 - 8:54 pm | कानडाऊ योगेशु
टारुभाऊ तुम्हाला हसताना पाहुन आम्हीही संतोष पावलो..
बाकी प्रतिसाद नेहेमीप्रमाणेच टारुस्टैल.!
लगे रहो.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
26 Apr 2010 - 4:08 pm | प्रमोद देव
समोरच्या कोनाड्यात उभी व्हिंदमाता
आणि बेंबटेरावांचं नाव घेते माझा नंबर पहिला. :D
बाकी तुमच्यासारखे उखाणे काय कोणीही बनवेल....अगदी आमचा टारूशेठही. ;)
26 Apr 2010 - 6:13 pm | कानडाऊ योगेशु
बाकी तुमच्यासारखे उखाणे काय कोणीही बनवेल....अगदी आमचा टारूशेठही.
नक्कीच.म्हणुन तर ह्या धाग्याला मी काहीच्या बाही उखाणे असे नाव दिले आहे.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
26 Apr 2010 - 10:59 pm | झकासराव
=)) =)) =))
23 Aug 2010 - 11:27 am | राजेश घासकडवी
हे वाचायचं राहूनच गेलं होतं...
माझे काही
चाखून गरमागरम चमचमीत बटाटेवडे
---रावांनी घेतले सैपाकाचे धडे
आयटीच्या बायकोला माहीत नाही सैपाक कशाशी खातात
मग --- रावांनी घेतला चटणीसाठी बत्ता हातात.
पहिल्यांदाच बसताना सरकला चंदनी पाट
मग --- रावांनी सुरू केला नेमाने पूजापाठ
अजून कोणी काही?
23 Aug 2010 - 12:48 pm | सुहास..
हा हा हा !!
*** राव आहेत स्वभावाणे फार शांत
घराप्रमाणे गतारातही ते पडतात निवांत
हा लई आवडला !!
23 Aug 2010 - 1:32 pm | कानडाऊ योगेशु
हे अजुन काही नवीन..
रात्रींमागुन दिवस गेले अन दिवसांमागुन रात्र..
लग्न होऊन झाले वर्ष तरी ***राव अजुन वाचनमात्र..
23 Aug 2010 - 8:10 pm | धमाल मुलगा
ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठोऽऽऽ.............
फु ट लो!
=)) =)) =)) =))
23 Aug 2010 - 11:12 pm | रेवती
खी खी खी!
कसला रे हा उखाणा? हसणे थांबत नाहीये.
23 Aug 2010 - 11:16 pm | मेघवेडा
=)) =))
हा हा हा! लै भारी!!
24 Aug 2010 - 12:20 am | वाटाड्या...
अजुबाजुची मंडळी बावचळुण बघाय लागली ना !!!!
31 Jan 2012 - 9:57 am | सूड
भन्नाट !!
23 Aug 2010 - 1:47 pm | कानडाऊ योगेशु
नेहेमी नेहेमी रात्री ठेवुन मला जागे..
काढत बसतात **राव नुसते एक ओळींचे धागे.
23 Aug 2010 - 11:13 pm | रेवती
धन्य आहे रे बाबा तुझी!
23 Aug 2010 - 8:13 pm | पैसा
हाहाहा हिहिहि हुहुहु हेहेहे होहोहो
30 Jan 2012 - 10:08 pm | बिपिन कार्यकर्ते
=))
30 Jan 2012 - 10:17 pm | जाई.
मस्त
हहपुवा
31 Jan 2012 - 11:01 am | मी-सौरभ
कौलारु घर, घरात माडी..
___रावांच काम असतं थ्रीडी थ्रीडी
31 Jan 2012 - 11:25 am | स्पा
रस्त्यावर कार, आकाशात विमान विहारी
गगन रावांच नाव घेते आठवून किसन मुरारी