जाऊन जराशी येते, तू सांगून गेलीस होती
मी अजुनी पिसतो पाने, क्षण जाती बघ निसटुनी
जाण्या आधीचा डाव, मी जिंकून नेला होता
हा दोष असे पानांचा, का व्यर्थ रोष माझ्याशी?
दोघात तुझ्या नि माझ्या, तू राजा आणिक राणी
हे भाग्य असे गे माझे, होतसे तुझी गुलामी
आयुष्य असो की पाने, हा डाव घडी दो घडीचा
भोगून घे खेळापुरती, शेवट जाई विखरुनी
सुरेश नायर
http://sites.google.com/site/surmalhar/
प्रतिक्रिया
23 Apr 2010 - 10:46 pm | स्पंदना
दोघात तुझ्या नि माझ्या, तू राजा आणिक राणी
हे भाग्य असे गे माझे, होतसे तुझी गुलामी
आयुष्य असो की पाने, हा डाव घडी दो घडीचा
भोगून घे खेळापुरती, शेवट जाई विखरुनी
शेवटची अर्धी ओळ जरा बघा ना!
काहि तरी वेगळी वाक्यरचना हवी का हो?
बाकि सार छान..
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
23 Apr 2010 - 11:14 pm | sur_nair
खरं तर 'मालकौंस' रागात एक चाल सुचली त्यावर मग हे शब्द सुचले. चालीत हे बरोबर बसते. गुलामीतल्या 'ला' आणि विखरुनीतल्या 'रु' वर थोडी हरकत आहे. कदाचित नुसती वाचताना म्हणून अर्धवट वाटत असेल.
23 Apr 2010 - 10:48 pm | टारझन
नाव वाचुन वाटलं प्रातःसमयीची कविता आहे काय ? =))
कविता छान !!!
असो .. आज जरा टायमिंग चुकलाय , जाऊन येतो जरासा =))
- (प्रातःसमयी) जातेस कडेकडेनी
23 Apr 2010 - 11:23 pm | sur_nair
ती का, कधी, कशासाठी गेली हे वाचकाला कोडे आहे. ज्याने त्याने अर्थ लावावा. बाकी प्रातःसमयीच काही सुचलं नव्हतं पण रात्रभर पत्ते खेळत बसले असतील तर तसे हि असेल, कुणा ठाऊक . हे हे हे
23 Apr 2010 - 11:14 pm | शुचि
>> दोघात तुझ्या नि माझ्या, तू राजा आणिक राणी
हे भाग्य असे गे माझे, होतसे तुझी गुलामी >>
सुंदर!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.
23 Apr 2010 - 11:25 pm | विसोबा खेचर
वा..!