“ चंद्र हवा मज “ ! ! !

निरन्जन वहालेकर's picture
निरन्जन वहालेकर in जे न देखे रवी...
23 Apr 2010 - 10:36 am

“ चंद्र हवा मज “ ! ! !

“ किती करशी प्रेम मजसी “ ?
प्रश्नं करी मज प्रेयसी.
“ विशाल आकाशा येवढे,
वा त्याहिपेक्षा जास्तच थोडे “
आम्हीहि वदलो लाडेलाडे

“ ई s s श्य ! तुम बडे वो s s हो ! !
प्यार मे मगर सो-सो हो “ !
नाहीतर आतापर्यंत,
घालूनी गवसणी गगनासी,
आणुनिया चंद्रासी,
दिधला असता नजराणा मज
प्रेमळ हट्टा पायी

“ बस ? इतकच ?
येतोच बघ जाऊन आम्ही “
येतो घेऊन चंद्रासी सत्वरी
धरी थोडी सबुरी,
आमच्या प्रेमापायी.

पोहोचलो काही वेळातच,
दौडत दौडत वेडांत,
प्रियतमा विचारी लाडांत
“ कुठे आहे चंद्रमा ”?

टोपी होती शिरावर,
फेकुनीया ती सत्वर,
दाविला चंद्रमा,
जणू पुनवेचा,
तुळतुळीत
!
चमकता ! !
टोपीखाली लपलेला! ! !

निरंजन वहाळेकर

हास्यकविता