प्रेरणा ही कविता. खाली दिलेल्यांसारख्या घटना प्रत्यक्षात घडलेल्या असतानाही आपण असे लोक मुळात स्वामी कसे झाले याचा विचार करत नाही, व नंतर आपणच पुजलेले त्यांचे पाय शेणाचे आहेत हे कळलं की आश्चर्याने चकचकीत होतो. माणसाला देवत्व द्यायचं आणि त्याने माणसासारखं वागलं की अचंबा व्यक्त करायचा... हे नाटक का खेळलं जातं, हे मला नेहेमी पडलेलं कोडं आहे.
टी व्ही वर ब्रेकिंग न्यूज, खबर नाही आली,
भक्ताला बिलकुल अटक नाही झाली.
मूर्खपणा म्हणजे काही, गुन्हा नाही केला.
पोलिसांनी गजाआड त्याला नाही केला!
भरल्या घरची लेक, वांझ होती राहिली.
सगळे उपाय थकले म्हणून स्वामींकडे नेली.
दाराआड नेऊन त्यांनी पूजा तिची केली !
बाहेर बसून भक्ताने स्वामीभक्ती गायली ! ! !
भरल्या घरची लेक मग *पोटुशी राहिली.
भक्ताने तिजोरी मग स्वामींसाठी खोलली!
वासनेच्या घरात घेऊन 'महात्मा' म्हणतात
भक्तांचे मेंदू काय दगडाचे नसतात ???
*पोटुशी = गर्भवती (अर्थ माहीत नसेल, म्हणून सांगितला)
प्रतिक्रिया
22 Apr 2010 - 12:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रसंगानुरूप!
पुन्हा आमच्या ब्रिटीशदादूसची आठवण झाली.
अदिती
22 Apr 2010 - 1:01 pm | टारझन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
नाही नाही ... हे आमचे विडंबणात्मक करुण हास्य आहे =))
- राजु कौव्वाल
टाळ्या वाजवणार्यांसाठी ओपनिंग्ज आहेत. त्वरा करा. सिव्ही पाठवा.
22 Apr 2010 - 2:34 pm | बिपिन कार्यकर्ते
उत्तम कविता... ज्या संदर्भात लिहिली आहे त्या आणि तसल्याच संदर्भापुरती.
बिपिन कार्यकर्ते