.....घडावे असे काही.....
------------------------------
घडावे असे काही सुंदर आणि गोड..
वक्षावरी सुटावे माझ्या वेणींचे पेड..
लागावी चाहुल त्याला.. किणकिणत्या कंकणाने....
हलकेच जाग यावी.. रुणझुणत्या पैंजणाने..
भिनावे त्याच्यात माझे..न उतरणारे वेड..
माळता छानसा मी ..मोगरा केसांतुनि..
पाहावे आरश्यात मजला ..मी पुन:पुन्हा वळुनी..
काढावी त्याने तेव्हा..माझी खट्याळ छेड..
मिठीत मी त्याच्या..हळुवारपणे फुलावे..
गगनासहीत तेव्हा..चांदणेही नुरावे...
खुशीत येऊनि त्याने..माझे पुरवावेत लाड...
बेभान सागराला..मध्येच उधाण यावे..
मजला काही द्यावे..त्याने काही घ्यावे..
पुन:पुन्हा मोडावी..आम्ही एकदुजांची खोड..
ओठांवरी मग यावे..अस्फुटसे हासु..
दवबिंदुपरी जमावे..काठावरी आंसु..
जपावे मजला त्याने..जणु तळहातावरील फोड..
----------योगेश जोशी.
प्रतिक्रिया
18 Apr 2010 - 12:50 pm | बेसनलाडू
मागच्या विश्वामित्राचा मूड पुढे नेणारी आणखी एक सुंदर कविता. आवडली. काही किरकोळ बदल करून गेयसुलभ होईल.
(वाचक)बेसनलाडू
18 Apr 2010 - 2:29 pm | कानडाऊ योगेशु
बदलांचे स्वागतच आहे बे.ला.
(बदलडालू) योगेश.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
19 Apr 2010 - 1:13 pm | राजेश घासकडवी
बेलाशी १००% सहमत
18 Apr 2010 - 7:13 pm | शुचि
>> पुन:पुन्हा मोडावी..आम्ही एकदुजांची खोड.. >>
अप्रतिम !!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.
19 Apr 2010 - 5:53 am | sur_nair
क्या बात है!