नाटकवेडी मुले शिरगावची नविन

शनआत्तार's picture
शनआत्तार in जनातलं, मनातलं
4 Apr 2010 - 8:15 pm

नमस्कार,
मी या आधी आमच्या खेडे गावात चालणारी नाट्य चळवळ या बाबत आपणाशी बोललो आहे. आमच्या नाटकातील मुलांची कमाई आपणास मी दाखवणार आहे आज अनेक चित्रपटातून आमच्या शाळेची मुले चमकत आहेत आमच गाव म्हणजे बालकलाकारांच गाव अशी आमच्या गावाची ओळाख पुण्या मुंबई मध्ये झाली आहे. आम्ही दोन वर्षा पुर्वी पुणे व मुंबई येथे आमच्या मुलांची नाटके घेऊन गेलो होतो त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आमच्या शाळेतली मुले आज देवराई, बाधा, असला घो हवा मला, गाभ्रिचा पाऊस, प्रतिसाद एक कप चहा या चित्रपटात अभिनय करून गावाचे व शालेचे नाव मोठे केले आहे.झी पुरस्कारासाठी सचिन मोडकर याला नामांकन मिळाले होते. तर अमान आत्तार याला गाभ्रिचा पाऊस या चित्रपटासाठी चित्रपती व्ही शांताराम पुरस्कार मिलाला आहे. तएच त्याला संक्रुती कला दर्पण चाही बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच या मुलांची नाटके बसवणारे राजेन्द्र चव्हाण याना या वर्षीचा तनवीर पुरस्कार मिळाला आहे. तरी खाली दिलेल्या लिंक ला भेट देऊन आमच्या मुलांचे यश पहा

http://natakvedimule.blogspot.com/

आपली प्रतिक्रिया कळावा

नाट्यप्रकटन

प्रतिक्रिया

अभिषेक पटवर्धन's picture

5 Apr 2010 - 11:25 am | अभिषेक पटवर्धन

तुमचा ब्लॉग वाचला अत्ताच...मस्त पोरं आहेत सगळी!!!! पण मुली दिसल्या नाहीत..की शाळा फक्त मुलांचीच आहे?

शनआत्तार's picture

5 Apr 2010 - 2:25 pm | शनआत्तार

होय मुली पण आहेत त्याची माहीती साठवण्याचे काम सुरू आहे

वाहीदा's picture

5 Apr 2010 - 6:38 pm | वाहीदा

मुली दिसल्यावरच विस्तारात प्रतिसात देऊ [(

तो पर्यंत तुमच्या प्रकल्पात मुलींचे चेहरे बघण्याच्या आतुरतेकडे 8>
~ वाहीदा

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Apr 2010 - 12:25 pm | बिपिन कार्यकर्ते

खूपच छान आणि मनःपुर्वक शुभेच्छा!!!

बिपिन कार्यकर्ते

प्रदीप's picture

5 Apr 2010 - 1:04 pm | प्रदीप

ब्लॉग पाहिला व माहिती आवडली.

आत्तारभाई, आपण स्वतः देखरेख ठेऊन हे यश लहान मुलांच्या डोक्यात जाणार नाही, हे पहात असालच, अशी अपेक्षा करतो.

पुढील वाटचालीस शुभेच्छा.