चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी... 4 Apr 2010 - 10:30 am हृदया वरली जखम ओली कधी गोठली कधी वाहिली कधी हुंदका अस्पष्ट जरासा कधी मनातून खोल उसासा कधी नयनातून अवचित गळती खारट मोती गालावरती प्रिय मला परी जखम माझी सदैव राहो ताजी ताजी....! करुणकविता प्रतिक्रिया वा! 4 Apr 2010 - 10:43 am | प्रमोद देव बरेच दिवसांनी आलात गोखलेसाहेब... पण मस्त रचना घेऊन आलात. पण ही जखम कुणी केली? जखम सुगंधी आहे काय? ;) जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला केलेत वार त्याने,तो मोगरा असावा. हे कळ्ले नाही.... 4 Apr 2010 - 10:55 am | डावखुरा प्रिय मला परी जखम माझी सदैव राहो ताजी ताजी....! रचना छानच आहे पण सदैव ताजी का राहो? हे कळ्ले नाही.... "राजे!" छान. पण 7 Apr 2010 - 8:05 am | sur_nair छान. पण शेवटच्या कडव्यातला आशय जरी चांगला असला तरी शब्द जरा वेगळे हवे होते. 'ताजी ताजी' जखम फारसं रुचत नाही. ह्म्म , 7 Apr 2010 - 12:49 pm | पक्या ह्म्म , ताजी च्या ऐवजी ' भळभळणारी ' हा शब्द कसा वाटेल? गोखले साहेब , कविता आवडली. जय महाराष्ट्र , जय मराठी ! प्रिय मला 7 Apr 2010 - 11:54 am | फ्रॅक्चर बंड्या प्रिय मला परी जखम माझी छान आहे कविता.. binarybandya™
प्रतिक्रिया
4 Apr 2010 - 10:43 am | प्रमोद देव
बरेच दिवसांनी आलात गोखलेसाहेब...
पण मस्त रचना घेऊन आलात.
पण ही जखम कुणी केली? जखम सुगंधी आहे काय? ;)
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार त्याने,तो मोगरा असावा.
4 Apr 2010 - 10:55 am | डावखुरा
प्रिय मला परी
जखम माझी
सदैव राहो
ताजी ताजी....!
रचना छानच आहे पण सदैव ताजी का राहो? हे कळ्ले नाही....
"राजे!"
7 Apr 2010 - 8:05 am | sur_nair
छान. पण शेवटच्या कडव्यातला आशय जरी चांगला असला तरी शब्द जरा वेगळे हवे होते. 'ताजी ताजी' जखम फारसं रुचत नाही.
7 Apr 2010 - 12:49 pm | पक्या
ह्म्म , ताजी च्या ऐवजी ' भळभळणारी ' हा शब्द कसा वाटेल?
गोखले साहेब , कविता आवडली.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
7 Apr 2010 - 11:54 am | फ्रॅक्चर बंड्या
प्रिय मला परी
जखम माझी
छान आहे कविता..
binarybandya™