हृदया वरली
जखम ओली
कधी गोठली
कधी वाहिली
कधी हुंदका
अस्पष्ट जरासा
कधी मनातून
खोल उसासा
कधी नयनातून
अवचित गळती
खारट मोती
गालावरती
प्रिय मला परी
जखम माझी
सदैव राहो
ताजी ताजी....!
बरेच दिवसांनी आलात गोखलेसाहेब...
पण मस्त रचना घेऊन आलात.
पण ही जखम कुणी केली? जखम सुगंधी आहे काय? ;)
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार त्याने,तो मोगरा असावा.
वा!
हे कळ्ले नाही....
छान. पण
ह्म्म ,
प्रिय मला