मिटींग - मिटींग

Primary tabs

टारझन's picture
टारझन in जनातलं, मनातलं
3 Apr 2010 - 1:25 pm

णमस्कार्स पिपल्स ,

डिस्क्लेमर्स : लेखात टेक्निकल बाबींचा उल्लेख असेल त्याचा खुलासा करण्यात येणार नाही. लेख एंजॉय करुन विसरायचा ! कळ्ळं ?

आज गुरुवार.. उदया गुड फ्रायडे ची सुट्टी .. मोठ्ठा विकांत .. पुण्याला घरी पळण्याचे वेध प्रत्येक मुंबैत जॉब करणार्‍याला लागलेले असतात. लंच नंतर कसला ही काम करायचा मुड नसतो. आणि एका मिटींगचा कॉल येतो. मी एका सॉफ्टवेयर कंपनीत काम करतो जी बँकांसाठी सॉफ्टवेयर सर्व्हिस देते. आणि ऑनसाईट पाठवल्याने मी बँकेच्या आयटी सेंटरात बसतो. मोठ्या सरकारी बँकांत प्रोजेक्ट्स खुप मोठे असतात आणि खुप वेगवेगळे सॉफ्टवेयर व्हेंडर्स , टिम्स आणि डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्व्ह असतात. मिटींग म्हंटलं की मला मोठी मजा वाटते. चला .. ऑफिशियली एखाद तास डोक्याला आराम .. वर गुबगुबीत खुर्च्या, थंड थंड एसीत बसायचं .. फुकाची च्या-बिस्किटं खायची ... विकेंडच्या दिवशी तसा मी उजेडातंच निघण्याचा प्रयत्न करतो.. आणि नेमकं ४च्या ठोक्याला मिटींगला बोलावल्याने जरा नर्व्हसलो होतो.

बरं मिटींगला आमची बिजनेस डेव्हलपमेंटची लोकं, माझा सिनियर हे असल्याने माझ्या सारख्या टेक्निकल रिसोर्सचं काय काम ? असं फाल्तु निष्फळ एक्स्क्युज दिलं आणि मिटींग ला गेलो . मिटींग एका इंटरनेट बँकींग प्रोजेक्टच्या संदर्भात होती. बँकेचा डिजीएम, जीएम, सिस्टिम्स मॅनेजर , इंटरनेट बँकिंग सिस्टिम्स मॅनेजर , एटिएम स्विच मॅनेजर आणि अशी वरच्या लेव्हलची लोकं टेबलाच्या दुसर्‍या साईडला बसली होती.
ब्यँकेचं डिजीएम (हे महा विनोदी पात्र) .. साउथ चा आहे ... पण मराठीही बोलतो. अंध लोकांसाठीच्या बोलुन मार्गदर्शन करणार्‍या एटिएम च्या प्रोजेक्ट साठी त्याच्याबरोबर एकदा मिटींग झाली होती. एका टेक्निकल प्रॉब्लेम मुळे एटिएम बॅलंस बोलत नव्हता, आणि त्याचं खापर स्विच सॉफ्टवेयर व्हेंडर वर फोडावं की एटिएम व्हेंडर वर ? हे कळत नसल्याने .. तो म्हणाला .. तुम्ही त्या एटिएम मधे डाळ ठेवा ... भात ठेवा .. किंवा अजुन काय ठेवा .. मला भुक लागली .. मला जेवण पाहीजे ... (हे उच्चार त्याच्या (किंवा माझ्या) तोंडुन ऐकल्यास ह्या वाक्याची भयानक विनोदी शैली कळु शकेल ) मला डेट सांगा .. आय वाँट प्रोजेक्ट टू बी लाईव्ह .. असो ... तर हे डि.जी.एम साहेब. आता बि.डी. टिमचे लोक फुल्ल बोलबच्चन असतात. बाकी लोक येई पर्यंत मायकल (आमचा बि.डी.) ने त्याला बँकेच्या मायक्रो-फायनांस आणि रुरल बँकिंग चा विषय काढला ... तेवढा एकंच शब्द .. त्यानंतर डि.जी.एम ने कोणालाच काही बोलायची संधी दिली नाही. आणि ते अखंड अर्धा तास त्यावर व्याख्याण देत राहिले .. त्यात अजुन १०-१ वर्षांनी बँका कशा रिलायंस / टाटा / भारती / किंवा इतर मोठ्या उद्योग समुहांना लोण देणार नाहीत .. बँका कशा रोड लेव्हल ला येऊन बिझनेस करणार .. कशा छोट्या खेड्यात पोचणार ? इत्यादी नविन माहिती मला बसल्या जागीच मिळाली. मी माझ्या सिनियर ला एका कागदावर लिहीलं... "साला .. काय टाईमपास चाल्लाय रे ? " ... त्याचा रिप्लाय करुन कागद परत केला.. "काही नविन आहे का हे आपल्याला ? "

थोड्या वेळानं जीएम आणि बँकेची इंटरनेट बँकींग टिम ची लोकं आली. .. डिजीएमचं अजुनही रुरल बँकींग तत्वज्ञान वाटप सुरू होतं :) इंटरनेट बँकिंग वाला एक जण मिटींगला बसल्या बसल्या समाधी आवस्थेत गेला. दुसरा लबालबा बोलणारा होता. तो डिजीएम ला कापत म्हणाला ... "शाल वी स्टार्ट ? जीएम ला जास्त वेळ नाही " तेंव्हा कुठे ते प्रवचन थांबलं !
मिटींग ला सुरुवातीलाच बाँब पडला ... "व्हाट इज द स्टेटस नाऊ ? व्हेयर आर वी नाऊ ? " , इति इं.बँकींग वाले.
डि.जी.एम म्हणाला .. "वेल .. दॅट्स व्हाट यु नीड टू टेल मिस्टर रस्तोगी. .. " आणि ख्या ख्या ख्या करुन हसला. आम्ही पण हसलो .. (मी सुरुवाती पासुनंच हसत होतो) मिटींग चं अजुन एक ऑब्जरवेशन असं की लोकं नोटपॅड वगैरे घेऊन येतात.. मला कधीही मिटींग मधे नोट करण्यासारखं सापडलं नाही .. मी आपला समोरच्याची कार्टुन काढतो ... किंवा मग त्या पेजेस वर चॅटिंग करतो ... मेसेज लिहुन वही पास करायची.
असो .. रस्तोगी स्वतःला संभाळत म्हणाले .. "Well , Sify team has completed the online testing with the payment gateway ! Only thing pending is , we need to test "Verified by Visa" and "Mastarcard's 3D secure code " testing . "
डिजीएम, "बर मग ? बॉल कोणाच्या कोर्टात आहे ? "
रस्तोगी . " सर , Sify has told , If we complete the transaction , the browser should delete all cache memory and close the browser automatically , aslo , On the transaction successful receipt page , if we copy the URL and open in another page , it should not open "
मी मधेच बोललो .. "सर , आपण सेशन क्लोज केला की काही युआरएल कॉपींग चा फायदा नाही .. आणि आपण ते ऑलरेडी केलंय ! " इथे मी रस्तोगीचा विनाकारण इश्युज वाढवुन आमच्या कोर्टात बॉल टाकण्याआधीच नेट वर करुन पुन्हा चेंडु उलटा टोलावला होता . महाभारतात .. शकुनीने दुर्योधनाला "पांव बारा ... " हवे असल्यावर नेमके "पांव बारा ... "मिळवल्यावर जसं कौरवांचं तोंड होतं तसं आमच्या सगळ्यांचं तोंड झालं :)
डिजीएम ला टेक्निकल काही कळत नाही .. पण तो नाक खुपसुन काही तरी असा बोलुन जातो ही हसु दाबणं ही मुश्किल होऊन जातं ...
डिजीएम बोलला , "पण सेशन क्लोज केला तर काय होतं ? ती युआरएल कोणी कॉपी केली तर ? "
ह्या वाक्याला सामुहिक फाट्यावर मारण्यात आलं !
नेक्स्ट पॉईंट ..
रस्तोगी , " सर , When the internet transaction is declined , it should show a proper message to card holder , as of now if transaction is successful , same message is shown, but when transaction is declined , only Transaction Failed is coming ... "
डेव्हलपर बोलला , "प्रोजेक्ट सुरु होण्या आधीच एक डॉक्युमेंट शेयर केलंय ज्यात रिस्पाँन्स कोड आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत. ते सिस्टिम मधे लॉग होतात, कार्ड होल्डर ला डिटेल्स देत नाही आपण, कारण एकाच रिस्पॉन्स कोड ची कारणे बरीच असु शकतात. हे सुद्धा आधीच शेयर केलं आहे. " प्रोजेक्ट युएटी फेज मधे बँक वाल्यांनी बेसिक मुर्ख प्रश्न विचारणं नविन नाही. पण हसायला येणं दाबावं कशाला ? आमची खिखिखि चालुच .. सिनियर ला म्हंटलं .. "नक्की ह्योच प्रोजेक्ट पाहातोय ना ? .. त्या शेजारच्याला बघ.. जणु संत ज्ञानेश्वर .. किती एकाग्रतेने समाधीस्थ झाला .. " पुन्हा खिखिखि...

हळु हळु मिटींग मुळ मुद्द्यापासुन दुर जात राहीली ... मी घड्याळाचे काटे चेक करुन कपाळावरच्या आढ्या वाढवत राहिलो.
एक बँक वाला म्हणाला ... आपलं इंटरनेट ट्रँसॅक्शन आज्जिबात सेक्युअर नाही. (मला माझं हसु दाबल्याने एयरप्रेशर दुसरी कडुन तर निघणार नाही ना ? अशी भिती वाटून पुन्हा हसुन घेतलं ..
तो कंटिन्यु करत होता ... "जर कार्ड नंबर आणि पिन नंबर भेटला ... तर कोणीही फ्रॉड करतो .. वि मस्ट डु समथिंग अबाऊट इट "
आयला .. मग तर एटिएम बँकींग पण सेफ नाही .. कार्ड ट्रॅक कॉपी करायला काय अवघड आहे ? आणि पीन नंबरही आहे ... सिनियर ने आणि मी पुन्हा हसुन घेतलं ... आणि पुढची गम्मत ऐकत राहिलो .
"सिंगापोर हॅज कम अप विथ द मँडेट दॅट टू हॅव अ मोबाईल नंबर , आणि मग त्यावर एक एसेमेस वर कोड येतो , जो फक्त सेशन पुरता चालतो ... हे इंटरनेट वाल्यांनी केलं पाहिजे.. " इति बँक वाला .. आता इथे "इंटरनेट बँकिंग आणि स्विच वाले .. " ह्या दोन बँकेच्या टीम्स मधेच भिडली होती. ..
आणि एक मस्त मजा पहायला मिळणार होती. मी कागदावर " पतंग उडवणे सुरू झालं बघ ... " म्हणुन लिहीलं नी सिनियर ला कागद पास केला.
रस्तोगीने पलटवार केला " तसं असेल तर मोबाईल हॅक करुन त्यावरुनही फ्रॉड करता येईल .. मी जर तुमच्या मोबाईल रेंज मधे असेल तर तुमचे इनबॉक्स अ‍ॅक्सेस करु शकतो.. इतकेच काय .. तुमच्या मोबाईल वरुन मेसेज पाठवु शकतो .. "
हा 'जर" "तर" चा गेम मोठा रोचक होत चालला होता. ... खर्‍या प्रोजेक्टचं भजं झालं होतं ..
आणि बँकेच्याच दोन टिमांमधे खडाजंगी सुरू होती.
मी सिनियर ला म्हणालो .. बघ आता ह्याला भुक लागेल .. आणि जेवण कधी देता ? म्हणुन विचारेल .. आणि तेवढ्यात
शेवटी डिजीएम म्हणाले ... "तारिख सांगा ... " ... आम्ही दोघे हसु लागलो ..
आमच्या साईडने कसलाही डिले नव्हता... तसं ही एकंच सॉफ्टवेयर पन्नास जागी विकायचं असतं .. फक्त थोडे कस्टमायझेशन्स असतात... :) त्यामुळे आपण पुर्ण सेफ असतो..
शेवटी ज्याने "इंटरनेट ट्रांझॅक्शन अनसेफ आहे म्हणुन मुद्दा उभा केला होता ... त्यानेच ते कसं सेफ आहे हे स्वतःच पटवुन दिल्याने आमची मौज अजुन वाढली."
शेवटी १५ दिवसांनंतरची डेट फिक्स करुन (त्यातही मास्टरकार्ड व्हिजा चं रेडिनेस चे क्लॉज टाकून मिटींग संपली.. ह्या मिटींगला फक्त मिनरल पाणी मिळाल्याने थोडी निराशा झाली ...
जातांना सिनियर ला डिजीएम ने एक पेपर मागितला .. त्याने चुकून तो आमच्या मुक्ताफळांचाच कागद दिला ...चुक वेळेत लक्षात आल्याने पुन्हा मागुन घेतला आणि पुढचा अनर्थ टळला ...

आख्या मिटींग मधे बँकेच्या जीएम ने एकदाही तोंड उघडलं नाही , ढेरीचा आधार घेत त्यावर हात टेकवुन एका हाताने हनुवटीला सपोर्ट देउन जसा आला तसा शेवटपर्यंत बसुन होता. बाकी टिम च्या लोकांना काय चाललंय ते माहितीच नव्हतं !

अजुन एक मिटींग संपली .. आणि टाईमशीट मधे २ तासांची जागा भरण्यासाठी चांगली सोय झाली.

नृत्यविरंगुळा

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

3 Apr 2010 - 1:41 pm | मेघवेडा

टार्‍या इज बॅक .. बस.. आता इतकंच.. प्रतिसाद सावकाश देतो लेख वाचूण!!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

शुचि's picture

4 Apr 2010 - 12:10 am | शुचि

टारगट परत या राव, तुमच्याशिवाय मजा नाही मिपावर : ( .... फक्त लेख नको .... प्रतिक्रिया हव्या :)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I fly when you persue me, But when you shy I woo thee
Explain it to me , can't you,Why I must ever want to want you.

नितिन थत्ते's picture

3 Apr 2010 - 2:07 pm | नितिन थत्ते

तो डीजीएम मिपा वाचत नाही याची खात्री आहे ना टारोबा? नाही, मराठी बोलतो म्हणताय म्हणून विचारलं.

बाकी लेख झकास.

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

इंटरनेटस्नेही's picture

3 Apr 2010 - 3:08 pm | इंटरनेटस्नेही

जबरी! एकदम 'धिन-च्याक' लिहलं आहे!
- इंटरनेट (बँकिंग) प्रेमी!

राजेश घासकडवी's picture

3 Apr 2010 - 3:28 pm | राजेश घासकडवी

मिटींग चं अजुन एक ऑब्जरवेशन असं की लोकं नोटपॅड वगैरे घेऊन येतात.. मला कधीही मिटींग मधे नोट करण्यासारखं सापडलं नाही .. मी आपला समोरच्याची कार्टुन काढतो ...

असं म्हणूनसुद्धा खूपच डिटेलवार नोटा काढल्यात की... आणि कार्टूनंसुद्धा... :-) टेक्निकल काही कळलं नाही तरी भावणा पोचली. मजा वाटली वाचून.

राजेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2010 - 10:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>टेक्निकल काही कळलं नाही तरी भावणा पोचली. मजा वाटली वाचून.
टार्‍या, असेच म्हणतो रे...!

अवांतर : हा प्रतिसाद वाचला का ? :)

-दिलीप बिरुटे

टारझन's picture

4 Apr 2010 - 3:28 am | टारझन

धन्यवाद प्रा.डॉ. जी !
इथं तिकडचा प्रतिसाद देण्याचं प्रयोजन समजलं नाही , पण तरीही प्रतिसाद वाचल्या गेला आताच !

अवांतर : तुम्ही हे वाचा :)

- पा.डा. शुद्धलेखणाचे लोणचे

नंदन's picture

4 Apr 2010 - 3:20 pm | नंदन

>>> इथं तिकडचा प्रतिसाद देण्याचं प्रयोजन समजलं नाही
--- त्याचं प्रयोजन अवांतरात आलं की ;)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

चिरोटा's picture

3 Apr 2010 - 4:42 pm | चिरोटा

मस्त विनोदी मिटिंग. तशा बर्‍याचशा मिटिंगा इनोदीच असतात्.दुपारच्या जेवणानंतर मिटिंग ठेवली तर मात्र पंचाईत होते.
भेंडी
P = NP

मी-सौरभ's picture

3 Apr 2010 - 4:46 pm | मी-सौरभ

ह्या असल्या मीटींग सतत अटेंड करणारे लोक (अधिकारी दर्जाचे ) घरी पण तसंच वागतात म्हणे.......
आणि हो झोपेत पण असच बड्बडत असतात...

आणि अश्या लोकांना प्रमोशन अन जास्त बोनस :(
-----
सौरभ :)

प्रकाश घाटपांडे's picture

3 Apr 2010 - 4:59 pm | प्रकाश घाटपांडे

मी आपला समोरच्याची कार्टुन काढतो ... किंवा मग त्या पेजेस वर चॅटिंग करतो ... मेसेज लिहुन वही पास करायची.
असो .

या पेक्षा वेळेचा वेगळा सदुपयोग कुठला?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

रामदास's picture

3 Apr 2010 - 9:50 pm | रामदास

काही जणांना पायातून बूट काढायला सांगणे हा मिटींग संपवायचा सोपा मार्ग आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Apr 2010 - 9:57 pm | बिपिन कार्यकर्ते

(बहुतेक) जरीला का बिढार मधे आहे असे एक कॅरॅक्टर... पापय्या देसाई

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

3 Apr 2010 - 10:02 pm | चतुरंग

म्हणजे मीटिंग संपवण्याचा 'बूट निघाला' असं म्हणता येईल नै?! ;)

(बूट प्रेमी)चतुरंग

सगळेच तांत्रिक डीटेल्स समजले नाहीत पण भावणा पोचल्या! ~X(
ह्या असल्याच मीटिंगबद्दल आम्ही एक काव्य पाडले होते ते आठवले! ;)

चतुरंग

शुचि's picture

3 Apr 2010 - 10:57 pm | शुचि

>>"वेल .. दॅट्स व्हाट यु नीड टू टेल मिस्टर रस्तोगी. .. " आणि ख्या ख्या ख्या करुन हसला>>
>>रस्तोगी स्वतःला संभाळत म्हणाले ....>> =)) =)) =))
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I fly when you persue me, But when you shy I woo thee
Explain it to me , can't you,Why I must ever want to want you.

आनंदयात्री's picture

3 Apr 2010 - 11:37 pm | आनंदयात्री

मस्त रे टारु .. भरपुर हसलो. सगळ्यांनी हे अनुभव कधीना कधी घेतलेच असतील.

विनोदी लेख पाडतो टारु
टारुला दगडं नका मारु

-
आंद्या पारु

प्रशु's picture

3 Apr 2010 - 11:39 pm | प्रशु

आम्ही पण समान कार्यक्षेत्रात असल्याने जुन्या गमती आठवल्या...

देवदत्त's picture

4 Apr 2010 - 12:44 am | देवदत्त

ही ही ही...
मस्त वर्णन :)

आख्या मिटींग मधे बँकेच्या जीएम ने एकदाही तोंड उघडलं नाही , ढेरीचा आधार घेत त्यावर हात टेकवुन एका हाताने हनुवटीला सपोर्ट देउन जसा आला तसा शेवटपर्यंत बसुन होता. बाकी टिम च्या लोकांना काय चाललंय ते माहितीच नव्हतं !
ह्यावरून एक अवतरणातले वाक्य आठवले (Quote हो)
"In every organization, there is one person who knows what's happening. That person should be fired" ;)

बाकी थोडा तांत्रिक मुद्दा: HSBC आणि इतर एक दोन बँकांनी चालू केलेले एक लहान पेजर सारखे यंत्र वापरून देण्यात येणारा अ‍ॅक्सेस कोड , जो दर २-३ मिनिटांनी बदलत असतो, टाकणे ह्याबद्दल काही चर्चा नाही झाली का?

शुचि's picture

4 Apr 2010 - 7:24 am | शुचि

=)) नृत्य , विरंगुळा मधे काय टाकलय???? =))
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I fly when you persue me, But when you shy I woo thee
Explain it to me , can't you,Why I must ever want to want you.

वेताळ's picture

4 Apr 2010 - 10:15 am | वेताळ

मस्तच टारु षेठ,
मिंटिग मुळे बरेच दिवस तुम्ही मिपावर दिसला नाही.भरपुर रॉ मटेरिअल आहे . काहीतरी नवीन येवुदे अजुन. :D
वेताळ

jaypal's picture

4 Apr 2010 - 7:25 pm | jaypal


सभेचा इतिव्रुतांत आवडला
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

टारझन's picture

5 Apr 2010 - 1:51 pm | टारझन

मिटींग ला उपस्थित राहिलेल्यांचे .. आणि उपस्थित राहुन फुकाची च्या -बिस्किटं खाऊन गेलेल्यांचे आभार :)

- ( मिटींग प्रेमी) टारोबा मिटर

संदीप चित्रे's picture

5 Apr 2010 - 8:19 pm | संदीप चित्रे

इंग्लिशमधे एक अगदी समर्पक वाक्य आहे की 'दि ओन्ली थिंग दॅट कम्स आउट ऑफ अ मीटिंग इज पीपल' :)

तुझा लेख आवडला रे टार्‍या !

भडकमकर मास्तर's picture

11 May 2010 - 5:42 pm | भडकमकर मास्तर

अहाहा.. मजा आलीए.

झकास..
_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?