(बस्स्स नकोस आता)

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
31 Mar 2010 - 6:14 pm

आमचं पण रनिंग बिटवीन द विकेट..... ;-)
अर्थात आमची प्रेरणा : इथे आणि इथे आणि इथेही

कवितेमागे धावणं
थांबवलं आजपासुन..
कारण ती सुचतच नाही मूळी
आणि ट ला ट संयोगाने आलीच..
तरी व्याकरणाचा गंध नाही मला
मग एवढी खर्डेघाशी कशाला?
मला इतकं चिडवून, रडवून
(डोक्यावरले केस)
उपटून उपटून
जमलीस तर काय जमलीस?
किती आणि कसं सांगू?
कालपर्यंत होती तितकी, आज
नाहीये आता खाज?
विडंबनांमागे धावणं...
सुरू आजपासून !

'नवइडंबनकार इरसाल खोटे'

हास्यविडंबन

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Mar 2010 - 6:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

चालू द्या, चालू द्या!

अदिती

प्रियाली's picture

31 Mar 2010 - 6:19 pm | प्रियाली

हे माझे मनोगत असल्यासारखे वाटले. ;)

विशाल कुलकर्णी's picture

31 Mar 2010 - 6:31 pm | विशाल कुलकर्णी

प्रेरणा काय अन मनोगत काय.... >:)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

अमोल केळकर's picture

31 Mar 2010 - 6:29 pm | अमोल केळकर

वा मस्त !!
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

रेवती's picture

31 Mar 2010 - 6:56 pm | रेवती

मूळ कवितेपेक्षा विडंबनंच जास्त झालीत.
आजकाल तर आपल्या कवितेवर विडंबन आलं नाही तर, छ्या! आपली कविता जमली नाही राव! असं वाटत असेल.

रेवती

श्रावण मोडक's picture

31 Mar 2010 - 7:04 pm | श्रावण मोडक

या निर्धाराशी प्रामाणिक रहा! ;)

विशाल कुलकर्णी's picture

1 Apr 2010 - 9:37 am | विशाल कुलकर्णी

श्रामो जोपर्यंत मिपावर मेंदूला खाद्य मिळत राहील तोवर हा निर्धार टिकेलच.... अर्थात विडंबनाचा !:-)
राहता राहीली कवितेची खाज... खाजच ती, तिच्यावर कोणाचे नियंत्रण असते का? ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"