(बस्स नकोस आता...)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
31 Mar 2010 - 4:56 pm

हा दिसला मुक्त हाफव्हॉली आणि लगेच मला "साहित्य सेवा" करण्याचा उमाळा आला.

तुझ्यामागे धावणं
पुरे आजपासून
कारण तू येत नाही समोरासमोर मुळी
यदाकदाचित धर्मकर्मसंयोगाने आलास
तरी माझी गरज नाही तुला
मग माझी धावपळ कशासाठी?
मला इतकं पळवून, डिवचून
दमवून, दमवून
मिळालास तर कसा मिळालास?
किती आणि कसं सांगू
कालपर्यंत हवा होतास जितका
नकोस आता बस्स!!!
झुरळामागे धावणं
थांबलं आजपासून

(बेगॉन वापरा, झुरळं मारा)

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

Dhananjay Borgaonkar's picture

31 Mar 2010 - 5:14 pm | Dhananjay Borgaonkar

लै भारी. ....
=)) =)) =))

परिकथेतील राजकुमार's picture

31 Mar 2010 - 5:37 pm | परिकथेतील राजकुमार

सदर विडंबन निरुपद्रवी आणि गरजेचे की कलंक ???

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

श्रावण मोडक's picture

31 Mar 2010 - 5:48 pm | श्रावण मोडक

हेहेहेहे!!!

प्रियाली's picture

31 Mar 2010 - 5:53 pm | प्रियाली

;)

रेवती's picture

31 Mar 2010 - 6:49 pm | रेवती

शेवटी कुणामागं एवढं धावलीस ते वाचून फिस्सकन् हसू आलं.

रेवती

मुक्तसुनीत's picture

31 Mar 2010 - 7:14 pm | मुक्तसुनीत

तुझ्यामागे धावणं
पुरे आजपासून
कारण तू येत नाही डेव्हलपमेंट मधे मुळी
यदाकदाचित धर्मकर्मसंयोगाने आलास
तरी माझी गरज नाही तुला
मग माझी धावपळ कशासाठी?
मला इतकं पळवून, डिवचून
दमवून, दमवून
मिळालास तर कसा मिळालास? (प्रॉडक्शन मधे ! :-( )
किती आणि कसं सांगू
कालपर्यंत मिळायला हवा होतास जितका
नकोस आता बस्स!!!
बग फिक्स करणं
थांबवलं आजपासून

(युनिट टेस्ट्स लिहा, बग्ज फिक्स करा )

श्रावण मोडक's picture

31 Mar 2010 - 7:25 pm | श्रावण मोडक

झुरळं झाली. बग्ज हवेतच. नाही तर आख्खा आंतरजालाची ऐट गेल्यासारखं वाटलं असतं. :)

चतुरंग's picture

31 Mar 2010 - 9:47 pm | चतुरंग

मुसु फुल्टू सुटेश!! :B

(बग क्रिएटर)चतुरंग

शुचि's picture

31 Mar 2010 - 9:50 pm | शुचि

मुसुं ची कविता खूपच आवडली.

(+१ बग फायंडर) शुचि
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

वाहीदा's picture

1 Apr 2010 - 3:24 pm | वाहीदा

युएटी मध्ये दिसतच नाही कधी हे बग्ज
मुसुशेठ एकदम सिक्सर, the Bug Fixer :-)
कविता एकदम झकास
~ वाहीदा

तिमा's picture

31 Mar 2010 - 7:24 pm | तिमा

एक झुरळ एकदा तुपाच्या डब्याजवळ गेलं
इश्य, 'डालडा' म्हणून परत आलं||

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

चतुरंग's picture

31 Mar 2010 - 9:45 pm | चतुरंग

एकदम 'झुरळाया दाही दिशा' असं झालेलं दिसतंय! ;)
फुल्टू इडंबन! :D

(टर्मिनेटर)चतुरंग

श्रावण मोडक's picture

1 Apr 2010 - 11:49 am | श्रावण मोडक

झुरळाया दाही दिशा हून जाव्दे!!!

निखिलचं शाईपेन's picture

1 Apr 2010 - 9:11 am | निखिलचं शाईपेन

एक नंबर आहे.
-निखिल

अरुंधती's picture

1 Apr 2010 - 3:24 pm | अरुंधती

झुरळलेलं काव्य आवडलं! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

शानबा५१२'s picture

1 Apr 2010 - 5:01 pm | शानबा५१२

विडंबन की काय ते करण्याचा उद्देश काय असतो एखाद्याचा?
की उगीचच लाडात आलाय काय सर्वजण?
प्रॅक्टीकल सोचो ना भाय.........तकलिफ होती है क्या?

*******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****