मी प्रमोद काळे. पुण्यात राहतो. पुण्यातल्या महाराष्ट्र कल्चरल सेंटर या सांस्कृतिक संस्थेबरोबर काम करतो. नाट्य लेखन, दिग्दर्शन आणि प्रशिक्षण यात विशेष रस. नुकतेच मी "न येती उत्तरे" नावाचे नाटक लिहून दिग्दर्शित केले. त्याचे आजवर सात-आठ प्रयोगही झाले. हे सर्व घडत असताना आलेले विविध अनुभव कुठेतरी नोंदणे महत्त्वाचे वाटले. म्हणून हा एक प्रयत्न.
नाटकाची संकल्पना अनेक दिवस मनात होती. पण विषय समलैंगिकता असल्याने या विषयाचा अभ्यास, जाणकारी असणे महत्त्वाचे होते. हा विषय आपल्या समाजात मोकळेपणाने चर्चिला, बोलला जात नाही. त्याला सामाजिक कारणे खूप आहेत. पण याचा अर्थ तो आपल्या समाजात नाहीच असा मात्र निश्चितच नाही. पुरेशी माहिती न करून घेता त्याला हात घालणे चुकीचे वाटत होते. मी लहान मुलांसाठी अनेक एकांकिका लिहिल्या आहेत. पण तेव्हासुद्धा गरज पडेल तेव्हा मानसोपचार तज्ज्ञांशी संपर्क साधून, त्यांच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवूनच लेखन केले. आजवर या विषयावर गांभिर्याने लिहिलेली तेंडुलकरांचे "मित्राची गोष्ट", चेतन दातारचे "१, माधवबाग", सचिन कुंडलकरचे "छोट्याशा सुट्टीत" अशी काही नाटके पाहण्यात आली होती. पण नको असलेल्या विषयाकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे किंवा त्याची टिंगल उडवायची अशी साधारण सामाजिक रीत असल्याने या नाटकांतील या विषयाची पुरेशा सुजाणपणे दखल घेतली गेली नाही असे वाटत होते. आपले नाटक अधिक थेट असावे, या विषयासंबंधात जनमानसात असलेले गैरसमज आणि प्रश्न दूर व्हायला त्याने मदत करावी असे वाटत होते. आता यासाठी अभ्यास करणे आलेच. अनोळखी प्रांतात हिंडायचे होते. अनेक पुस्तके, नेटवरील अनेक संकेतस्थळे, काही चित्रपट आणि काही गे मित्रांशी चर्चा अशा अनेक मार्गांनी समज वाढत गेली, आणि शेवटी मनाची तयारी झाल्यावर लिहायला सुरुवात केली.
पहिली दोनेक पाने लिहिली आणि जवळच्या नाटकवाल्या मित्रांना वाचून दाखवली, त्यांना एकूण नाटकाचा विषय, प्रवासही सांगितला. त्यांची मते अत्यंत अनुकूल अशी आली, आणि मग मात्र झपाट्याने सगळ्या दीर्घांकाचा पहिला खर्डा लिहून काढला. मग पुन्हा चर्चा, पुन्हा नवा खर्डा.... यानंतर मात्र प्रत्यक्ष नाटक बसवायला लागायचे आणि तेव्हाच सुचेल तसे आणि योग्य वाटतील असे बदल करत जायचे असे ठरविले.
नाटक लिहायला घेतले, तेव्हापासूनच माझ्याबरोबर गेली काही वर्षे काम करत असलेले मंदार आणि हर्षद हे दोघे अनुक्रमे रणजीत आणि आशुतोष या व्यक्तिरेखांसाठी हवेत असे वाटत होते. पैकी मंदार हा ललितकलाचा नाट्यशास्त्रात एम. ए. केलेला प्रशिक्षिअत आणि उत्तम नट आहे. हर्षदही माझ्याबरोबर गेली दोनेक वर्षे काम करत असलेला माझाच नाट्यविद्यार्त्याच्यात्याने मोठ्या नाटकात आजवर एवढा मोठा रोल केलेला नसला, तरी मला त्याच्याबद्दल खात्री होती. प्रश्न होता त्यांनी हो म्हणण्याचा. शेवटी ते दोघे याच समाजाचे घटक आहेत. "असले" रोल करायला त्यांनी नाही म्हटले तर, त्यांच्या घरच्यांनी काही हरकत घेतली तर, या व्यक्तिरेखा आत्मसात करताना, उभ्या करताना त्यांना काही मानसिक प्रश्नांना तोंड द्यावे लागले तर... अनेक शंका. पण मी विचारले, आणि त्यांनी हो म्हटले. थँक्स हर्षद आणि मंदार. माझ्यावर केवढा विश्वास दाखवलात! कारण मी काही तसा नाववाला नाटकवाला नाही, आणि तरीही.....
तर आम्ही तिघांनी रोज जमून बोलायला सुरुवात केली. विषय अवघड होता. थोडीफार ऐकीव माहिती, एवढीच शिदोरी होती. मग रोज चर्चा. गे असणे म्हणजे काय, ते जगणे कसे असेल, आज समाजातील त्यांचे स्थान, जगभरातील गे चळवळी, धर्म आणि समलैगिकता...., गे असण्यातून निर्माण होणारे प्रश्न... कौटुंबिक, व्यक्तिगत आणि सामाजिक प्रश्न.... अनेक..... आम्ही बोलत गेलो. विचार देत घेत गेलो. भांडतही राहिलो. माझ्या त्यांच्या वयात मोठे अंतर असूनही मोकळेपणाने लैंगिक विषयांवर बोलत राहिलो. नाटक त्याच्या विषयामुळे आणि त्या विषयाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे अवघड आहे हे आम्हाला माहीत होते. पण गंभीरपणे हे करायचे आहे हे ठरले होते. माझ्या एका गे मित्राशी माझ्या दोन्ही नटांची गाठ घालून दिली. त्याच्याशी झालेल्या इंटरअॅक्शनमुळे खूपच फायदा झाला. दोघांची, खरे तर तिघांचीही मानसिक तयारी होत होती. मग त्या मित्राने एक प्रश्न विचारला. "या दोघांच्या हालचाली, हावभाव कसे असणार आहेत ?"
हा प्रश्न महत्त्वाचा होता. आजवर हिंदी - मराठी चित्रपटांमध्ये आणि काही मराठी नाटकांमध्येही स्त्रैण, बायकी असणारे पुरूष म्हणजे गे असे चित्र दाखवले जात आहे. तो एक विनोद निर्मितीची वस्तू म्हणून वापरला गेलेला विषय आहे. (अर्थात याला काही सन्माननीय अपवाद आहेतच.) पण सर्व गे असेच असतात हा मात्र गैरसमज आहे. आमच्या नाटकातून हे नक्कीच वगळायचे हे पक्के ठरले. पण मग असे लक्षात आले की काही प्रमाणात असे असते. तेव्हा एकाच्या बाबतीत तरी ही छटा दाखवायला हवी, पण अगदी छटाच, असे ठरले. हे आव्हान होते. थोडा जरी तोल ढळला, तरी नको ते निर्माण होणार होते. मंदारने हे आव्हान किती समर्थपणे पेलले आहे हे समजायला नाटकच पाहायला हवे.
आणखी एका बाबतीतही तोल सांभाळणे अत्यंत आवश्यक होते. विषय असा असल्याने दोन्ही पात्रांच्या समीप दृष्यात खूपच भान ठेवणे गरजेचे होते. शेवटी लैंगिक आकर्षण तर दिसलेच पाहिजे, पण कामुकतेचे दर्शन मात्र टाळायला हवे, हा तो तोल. आम्ही खूप काळजीपूर्वक हे सांभाळले आहे.
नटांची ही कसरत आणि कष्ट सुरू असताना नाटकाच्या नेपथ्य, संगीत आणि प्रकाशयोजना या तांत्रिक अंगांकडे ध्यान देणेही महत्त्वाचे होते. या बाबतीतही मी पुन्हा एकदा नशीबवान ठरलो. नेपथ्याची जबाबदारी सचिन भिलारेने घेतली. हाही ललितकलाचाच विद्यार्थी. स्वतः उत्तम नट आणि चित्रकलेचीही जाण उत्तम. "विहीर" या सध्या चर्चेत असलेल्या चित्रपटाचे नेपथ्य त्याने केले आहे. त्याने केलेले "वर्ख" या नाटकाचे नेपथ्य मी पाहिले होते. प्रश्न पैशांचाही होताच. याच वेळी आमच्या संस्थेच्या "काटकोन त्रिकोण" या महत्त्वाच्या नाटकाची निर्मितीही सुरू होती. आर्थिक तंगी होतीच. त्यामुळे शक्यतो उपलब्ध असलेल्या जुन्याच वस्तूंमधून थोड्याफार खर्चात नेपथ्य उभारणे गरजेचे होते. सचिनने खूप कष्टाने आणि हुशारीने हे काम केले. नाटकात दोन स्थळे आहेत. पहिली सुमारे वीस मिनिटे कॉलेजमधील एक बाजूची जागा, जिथे या दोघांची ओळख होते आणि वाढते हे स्थळ, आणि उरलेले नाटक रणजीत या पात्राचे घर अशी दोन स्थळे. सलग चालणार असलेल्या नाटकात एका ब्लॅक आउटच्या मर्यादित वेळात हा बदल दाखवणे आणि करणे अवघडच होते. पण सचिनने त्याच्या हुशारीने हा प्रश्न सहज सोडवला. आज आमच्या नाटकचे नेपथ्य खूप सुंदर आणि हवे तसे नेमके झाले आहे. या बाबतीत माझे ज्येष्ठ स्नेही, प्रसिद्ध चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन यांनी केलेली मदतही फार मोलाची आहे. रणजीतच्या घरात एक चित्र हवे होते, आणि ते नाटकाच्या विषयाला समर्पक असेच हवे होते. डॉ. पटवर्धनांवरील एका पुस्तकात "बाल्कनी" नावाचे एक चित्र पाहिले, आणि शोध संपला. डॉ. पटवर्धनांना ते चित्र (अर्थात त्याची प्रतिकृती) वापरण्याची परवानगी मागितली, आणि त्यांनी ती फोनवरच ताबडतोब दिली. या चित्राचे नाटकातील काँट्रिब्यूशन किती मोलाचे आहे ते पुढे लक्षात आले. त्याबद्दल पुढे लिहीनच.
संगीत. ही जबाबदारी माझ्या या आधी दिग्दर्शित केलेल्या "नेव्हर माइंड" या नाटकाचे संगीत केलेल्या अक्षय कुलकर्णीलाच दिली. का कोण जाणे, पण या काळात त्याच्या डोक्यात पियानोने घर केले होते. मला मात्र संपूर्ण नाटकभर प्रत्येक ब्लॅक आउटला फक्त पियानो मान्य होईना. पियानोचा नाद तुटक असतो. त्याला सलगता नसते. यावर मार्ग सुचवला माझ्या मुलाने. आस्तादने. आस्ताद आज नट म्हणून लोकांना माहीत असला तरी तो बाकायदा शिक्षण घेतलेला चांगला गायकही आहे. त्याने सुचवले की पियानोचा नाद पार्श्वभागी ठेवून आलापी घेतली तर छान वाटेल. अक्षयनेही हे करून पाहायला तयारी दाखवली, आणि आज आमच्या नाटकाचे संगीत खरोखर अत्यंत भावपूरक झाले आहे.
प्रकाशयोजना हेही नाटकाचे महत्त्वाचे अंग आहे. नाटकातून व्यक्त होणारे आणि सतत बदलणारे विविध भाव व्यक्त करायला प्रकाशयोजना महत्त्वाचा हातभार लावत असते. माझा जुना मित्र (हाही ललितकलाचाच!) अपूर्व साठे उत्तम प्रकाशयोजनाकार आहे. या विषयात त्याने गेल्या काही वर्षात पारितोषिकेही मिळवली आहेत.अपूर्व असल्याने नाटकाचे हे महत्त्वाचे अंगही भक्कम झाले आहे.या सर्व बाबी तांत्रिक म्हटल्या जात असल्या तरीही त्यात खूप मोठी क्रिएटिव्हिटी असतेच. ही सगळी जुळवाजुळव सुरू असताना नटांचे काम तर अखंड सुरूच होते. आमच्यातला प्रत्येकजण आपापला अभ्यास, माझी नोकरी, सगळ्यांची इतर अनेक कामे हे सगळे सांभळून पुन्हा नाटकासाठी सर्वस्व देत होता. यात किती आनंद मिळतो हे ते केल्यावरच कळेल! सुमारे दोन महिन्यांच्या या सगळ्या धडपडीनंतर नाटक बसले. खरे तर चांगले भक्कम उभे राहिले. पहिल्या प्रयोगाची तारीख ठरली होती. २६ जानेवारी. आमच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या यंदाच्या नाट्यमहोत्सवात पहिला प्रयोग.
पहिला प्रयोग ही काय चीज असते ते कळायला आधी केलेचि पाहिजे!
पण त्याआधी नाटकाचे कथासूत्र सांगतो : आशुतोष (हर्षद राजपाठक) आणि रणजीत हे दोघे एकाच कॉलेजमध्येस्पणवेगवेगळ्या वर्षांना शिकणारे अनु. २० व २४ वर्षांचे तरूण. हे दोघेही गे आहेत; पण रणजीतने स्वतःचे गे असणे स्वतःपुरते मान्य केले आहे. त्यच्या घरच्या आणि जवळच्या काही माणसांना हे माहीत आहे. आशुतोष मात्र भांबावलेला आहे. त्याला आपले वेगळेपण जाणवलेले आहे, पण त्याला ते स्वतःशीसुद्धा मान्य करणे अवघड जात आहे. त्याच्या मनात स्वतःबद्दल, स्वतःच्या लैंगिकतेबद्दल अनेक प्रश्न आहेत. या सगळ्यामुळे आणि काही अप्रिय अनुभवांमुळे तो मनातून घाबरलेला आहे.
आशुतोष आणि रणजीतची कॉलेजमध्ये भेट होते, आणि त्यांच्यामधील एका नव्या नात्याला सुरुवात होते. रणजीतमुळे आशुतोष स्वतःला मान्य करतो. मोकळा होतो. स्वतःलाच सापडत जातो. त्यांच्यातील नाते अधिकाधिक दृढ होत जाते, आणि तरीही प्रश्न संपतच नाहीत.
जगाला फारशा मान्य नसलेल्या या नात्याचे अणि त्यातून निर्माण झालेल्या विविध वैयक्तिक आणि सामाजिक प्रश्नांचे हे नाटक.
तर झाला पहिला प्रयोग...... कित्येकजण, ज्यांना नाटकाविषयी काहीच माहीत नव्हते, ते जरा बिचकलेले दिसले. विषय हा असा!
पण तरीही तो विषय मांडण्यातली तळमळ, उथळपणाचा संपूर्ण अभाव आणि संतुलित मांडणी यामुळे प्रयोगानंतर कित्येकजण भेटून कौतुक करून गेले. एक महत्त्वाचा अनुभव. आमच्या संस्थेचे सचिव, डॉ. रवीन्द्र दामले हे तालीम पहायला पहायला आले नव्हते. त्यांना विषयाचे अर्थात माहिती होती. वाचन त्यांनी ऐकले होते. समलैगिकतेविषयी त्यांचे आणि माझे विचारही भिन्न आहेत. पण प्रयोगानंतर ते स्वत: स्टेजजवळ आले. त्यांचे डोळे चमकत होते. माझा हात हातात घेऊन म्हणाले,"सुंदर. फारच उत्तम जमले आहे सगळे." संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. कुलकर्णींना तर नाटकाविषयी काहीच माहिती नव्हते. पण तेही इतके भारावून गेले होते, की सुमारे तासभर थिएटर बाहेर मी मोकळा होऊन बाहेर पडेपर्यंत माझे अभिनंदन करायला ते थांबून राहिले. इतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तर चांगल्या येतच होत्या; पण या दोन घरच्या प्रतिक्रिया फार मोलाच्या होत्या.
पुढे मग आणखी प्रयोग. हे लोकांना आवडतय असे वाटत होते. पण पहिल्या काही प्रयोगांना आपले जवळचे लोकच जास्तकरून येतात. आम्ही त्यांना 'सिम्पथॅटिक प्रेक्षक' म्हणतो. ते प्रेमानेच सगळ्या प्रकाराकडे पाहतात. पण त्यातही आमचे कठोर परीक्षण करणारे ( असे लोक हवेतच. नुसते "छान छान" म्हणणारे काय कामाचे!) होतेच. त्यांनी काही गोष्टी सुचवल्या. त्यातल्या योग्य वाटल्या, आवडल्या त्या पुढच्या प्रयोगांमध्ये करायच्या ठरवल्या. असे तीन प्रयोग झाले आणि नाटक आता धरतय असे वाटू लागले तोच...... आमच्या एका नटाला स्वाईन फ्लू झाला!
या रोगाची लार्जर दॅन लाइफ दहशत हल्ली पुण्यात आहे. त्यामुळे आम्ही सगळेच चिंताग्रस्त. काय होणार आता या मुलाचं म्हणून. पण सुदैवाने त्याचा स्वाइन फ्लू खूप लवकर डिटेक्ट झाला, आणि त्यामुळेच तो काही काळातच बरा झाला. अर्थात पुढे पुन्हा ताकद यायला वेळ लागणार होता, पण तो फक्त वेळाचा प्रश्न होता. आणि त्या नटानेही (मी नाव मुद्दम लिहीत नाही.) आणि त्याच्या घरच्यांनीही खूप लवकर उभारी धरली. नाटकाच्या प्रयोगात काही काळ खंड नक्कीच पडला. खरे तर असे नुकतेच 'धरू' लागलेले नाटक दीर्घ कालावधीसाठी बंद ठेवणे घातक मानले जाते. पण आमच्या बाबतीत ते चक्क फायद्याचे ठरले. झाले असे, की आधीचे तीन प्रयोग पाहिलेल्या लोकांनी त्याविषयी इतके बोलून ठेवले होते, की कधी पुढचा प्रयोग होतोय आणि आपण तो पहातोय अशी एक उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे पुन्हा सुमारे दीड महिन्याने प्रयोग सुरू झाले तेव्हा प्रेक्षकांची गर्दी होऊ लागली. नाटकवाल्यांना अशी गर्दी किती महत्त्वाची असते! अर्थात गर्दी म्हणजे हजारो वगैरे नव्हे! पण आमचे 'सु-दर्शन रंगमंच' नावाचे समीप नाट्यगृह शंभरच्या आसपास प्रेक्षक आले, तरी भरून जाते! आणि अशा समांतर नाटकांना ही गर्दीच मानली जाते!
या परिस्थितीने लादलेल्या 'सेकंड रन'मध्ये मी आणखी एक गोष्ट करून पहायची ठरवली. या विषयासंदर्भात असलेले गैरसमज किती आहेत, ते माहीत असल्याने प्रत्येक प्रयोगानंतर प्रेक्षकांशी थेट संवाद साधायचे असे ठरवले. माझ्या नटांनीही याला होकार दिला, आणि अनुभवांचे एक वेगळेच दालन आम्हाला व प्रेक्षकांनाही खुले झाले.... पण तो मोठा विषय आहे.
मुळात हे नाटक लिहिले आणि बसवले तेव्हा आम्हा सर्वांच एकच हेतू होता.... एक छान नाटक करायचे! कोणत्याही 'कॉज'साठी, कोणत्याही विचारसरणीचा पुरस्कार करण्यासाठी वगैरे आम्ही नाटक करत नव्हतो. कोणताही झेंडा हातात घेऊन आम्हाला मोर्चे वगैरे काढायचे नव्हते. अर्थात नाटकाच्या विषयाबद्दल किंवा प्रामाणिकपणाबद्दल कोणी आक्षेप घेतला, तर आवश्यक तो लढा द्यायची तयारी अर्थातच होती - आहे. पण हा चर्चेचा उपक्रम सुरू केला आणि त्यानंतरच्या पाच-सहा प्रयोगातच जाणवायला लागले आहे की आपल्याला वाटत होते त्यापेक्षा काही वेगळे घडते आहे. अर्थात यालाही आमची तयारी आहेच.
माझे असे मत आहे की शास्त्रीय संगीत - आपले वा पाश्चात्य - किंवा पूर्ण अमूर्त चित्र-शिल्पकला असे काही अपवाद सोडले तर इतर सर्व कलाप्रकारांना, त्यातही विशेषत्त्वाने कथा, कविता, नाटक अशा शब्द हे अर्थवाही, भाववाही मूलद्रव्य वापरणार्या कलाप्रकारांना काही एक निश्चित सामाजिक संदर्भ असतोच असतो. अशा कलाप्रकारांनी आमची फक्त शुद्ध कला अशी भूमिका घेणे मला तरी चूक, किंबहुना दांभिक वाटते. भाषा आली, शब्द आले की त्यांना चिकटून सामाजिक संदर्भ येणारच. ते नाकारता कसे येतील. कदाचित तसा आपला हेतू नाही असे म्हणावे हवे तर, पण इतर कोणाला ते तसे दिसले वा सापडले तर त्याला आक्षेप घेणे चूकच.
न येतीच्या बाबतीत असेच काहीसे घडते आहे. आणि आम्ही तेही मान्य करत आहोत. आमचे अनुभवविश्व या सगळ्यामुळे समृद्ध होत आहे. नवे मित्र मिळत आहेत, आणि त्यांना व आम्हालाही खूप काही मिळत आहे.
मला वाटते एवढे प्रास्ताविक खूप झाले. पण जे घडते आहे, त्यासाठी ते आवश्यकही आहे. घडले ते असे.
अनुभव १ : एका रविवारी सकाळी ११ वाजता आमचा प्रयोग होता. सकाळ असल्याने कदाचित प्रेक्षक संख्या कमी होती. चर्चेमध्ये एका प्रेक्षकाने 'हे असल्या विषयाचे नाटक का लिहिले?' असा प्रश्न केलाच. त्यावर एक साधासा दिसणारा पोरगेलासा तरूण पुढे आला, आणि 'काय हरकत आहे ? मला अभिमान वाटतो या लोकांचा.... आणि मी काही एकटा नाही...' असे बरेच काही तावातावाने बोलला. पुढे इतरही अनेक मुद्दे निघाले.... चर्चा सुरू राहिली. गे असणे विषयी एकूणच किती अज्ञान आणि गैरसमज आहेत हे लक्षात येत होते, आणि लेखक दिग्दर्शक म्हणून मिळवलेल्या माहितीच्या जोरावर मी त्यांना उत्तरे देत होतो. काहींना पटत होते, काहींना नाही... पण कोणी वाद घालत नव्हते.
त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता प्रयोग होता. मी प्रेक्षागृहात पाऊल टाकले, आणि एक सावळा उंच तरूण पुढे आला आणि माझा हात हातात घेऊन म्हणाला."थँक यू" मला काही कळेना. विचारलं, "कशाबद्दल थँक यू?" तर तो बोलत सुटला. म्हणाला, "सकाळच्या प्रयोगाला आम्ही काही मित्र आलो होतो. आम्ही सगळे गे आहोत. एकमेकांना अर्थात हे माहीत आहे, घरी नाही. पण सकाळी माझ्या बरोबर मझी एक मैत्रीणही आली होती. ती माझ्या प्रेमात आहे. तिला कितीही समजावून सांगितले तरी हे सारे पटत नव्हते. लग्न करू म्हणजे मग सगळे ठीक होईल म्हणत असे. सकाळी प्रयोग पाहिल्यावर बाहेर पडलो आणि ती म्हणाली,"I'm sorry. मला आता समजलय सगळं. तुला खूप त्रस झाला असेल माझ्या वागण्याचा. पण आता आपण चांगले मित्र होऊ या." म्हणून थँक यू."
त्या नंतरच्या एका प्रयोगात चर्चा संपली. ज्या कोणाला आमच्याशी अधिक काही बोलायचे होते ते रंगमंचाजवळ आले. मी त्यांच्याशी बोलत असतानाच एक तिशीची स्त्री जवळ आली, हात पुढे केला. मी हात हातात देताच किती वेळ धरून उभी राहिली. म्हणाली ,"थेंक्स." हात सुटेना. आणि तिचे डोळे भरून आले. मी मोकळ्या हाताने तिच्या खांद्यावर थोपटले... आणि ती झटकन वळून रडत निघून गेली. कोण कुठली स्त्री. ओळ्ख ना पाळख. पुन्हा भेट होईल - नाही. तिच्या मनाच्या कोणत्या दुखर्या तारेवर नकळत आमचा हात पडला असेल? काय काय सोसले असेल तिने? हे बरं की वाईट? कुणाला असा त्रास द्यायचा काय अधिकार आहे आपल्याला ? आजही तिचे भरून आलेले डोळे आठवतात. वाटतं कधीतरी पुन्हा भेट व्हावी तिची. कळावं तिचं दु:ख.
एक जुना प्रसंग आठवतो. मी नेवाशाला गेलो होतो. तिथे पैसाच्या खांबाचे मंदीर आहे. या खांबाला टेकून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली. अगदी लहानसा गाभारा आहे. मध्यभागी तो खांब. त्याला हार, फुले वाहिलेली. भोवती अगदी एका माणसापुरता प्रदक्षिणा मार्ग. मी प्रदक्षिणा घालत असताना गाभार्याच्या बाहेरची घंटा वाजली, आणि पाठोपाठ "माउली..." अशी हाक. उभ्या जन्माचं सोसलेपण होतं त्या हाकेत. आजही त्या आवाजाच्या आठवणीने डोळ्यात पाणी येतं माझ्या. या दोन स्त्रियांची दु:खं वेगवेगळी असतील. पण त्यांची जातकुळी एकच असेल का ?
एक गंमत म्हणून सांगतो. नाटकाचा दुसरा खर्डा लिहून झाला आणि तो मी माझ्या एका गे मित्राला वाचायला दिला. दोन चार दिवसांनी आम्ही भेटलो. तो नाटकवालाच असल्याने त्याने काही सूचना आणि काही प्रश्नही विचारले. त्या अनुषंगाने आमची चर्चा झाली. काही नोंदी मी करून घेतल्या. आम्ही निघालो. मी माझी स्कूटर काढत असताना त्याने विचारले," एक विचारू ? तू हे नाटक का लिहिलस ?" मी क्षणभर थबकलो. नक्की अर्थ काय या प्रश्नाचा? जोर 'तू'वर की 'हे'वर? तो गे प्रश्नांशी निगडित असल्याने 'हे'वर जोर असणे शक्य नाही असे वाटले. पण म्हणजे 'तू'वर? हा प्रश्न अनेक अनोळखी वा ओळखीच्या लोकांच्या मनातही येणार की! आपल्याकडे याचे उत्तर हवे. विचार करायला हवा. त्या मित्राला मी म्हटले,"कारण तुम्ही लिहीत नाही. म्हणून." ही वेळ मारून नेण्याची चलाखी होती. पण आज खरे उत्तर मला माहीत आहे.Drop Box" width="8"" alt='broken image' alt='broken image' height="6"" alt='broken image' alt='broken image' alt="ek snap" />
From Drop Box
आज आता या नाटकाचे दहा प्रयोग झाले आहेत. मध्यंतरी मुंबईचे समांतर रंगभूमीवरील एक प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील शानबाग यांचे "ड्रीम्स ऑफ तालीम" हे सचिन कुंडलकर लिखित नवीन नाटक आणि ना येती उत्तरे यांचे संयुक्त प्रयोग सु-दर्शन रंगमंचावर आयोजित केले होते. या प्रयोगांमध्ये एक समान धागा म्हणजे दोन्हीच्या केंद्रभागी समलैंगिकता हा विषय आहे. "ड्रीम्स"चे एकूण तीन प्रयोग केले. ते तीनही प्रयोग आणि ना येतीचा एक असे चार प्रयोग तुडुंब गर्दीत सादर झाले. नंतरच्या चर्चेलाही गर्दी होती. मी हा चर्चा उपक्रम प्रत्येक प्रयोगानंतर करतोच, पण मुंबईच्या लोकांना हा नवा अनुभव होता. एवढा प्रतिसाद पाहूनच ते भांबावले होते. शिवाय त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नाटकांच्या 'नाटक' म्हणून असणार्या अंगांवर चर्चा केन्द्रित न होता त्यांच्या विषयांकडे सातत्याने झुकत होती. लैंगिकतेकडे. या कार्यक्रमात डॉ. भूषण शुक्ल हे मानसतज्ज्ञ, विद्याताई बाळ या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि समर नखाते हे ज्येष्ठ नाट्य अभ्यासक अशा तिघांचा मोलाचा सहभाग होता. प्रेक्षकांच्च्या अनेक प्रश्नांना या तिघांनी समर्पक उत्तरे दिली.
आमच्या प्रत्येक प्रयोगानंतरच्या चर्चा हाही एक नाटकाचा महत्त्वाचा भाग बनत आहे. खरोखर या प्रश्नाबाबत घनघोर अज्ञान आहे हे प्रश्नोप्रश्नी जाणवते. गे म्हणजेच तृतीयपंथी का, गेंना मुले होणे शक्य आहे का, भिन्नलिंगी, उभयलिंगी म्हणजे काय अशा अनेक शंका आणि गेंच्या जगण्याबाबत अनेक प्रश्न विचारले जातात. (याची एक झलक याच लेखाला आलेल्या उपाशी बोका यांच्या प्रतिक्रियेत पहायला मिळते.) काम करणारे दोघेही नट गे आहेत का असे वैयक्तिक पातळीवरचे प्रश्नही विचारले गेले. जॉनी वॉकर यांनी आयुष्यात दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नव्हता हे कदाचित लोकांना माहीत नसावे.
अनेक गे मुलांचे पालकही प्रयोगांना येतात. चर्चेला थांबतात. सहभागी होतात. त्यांपैकी कित्येकांनी आपापल्या मुलांची लैंगिकता मान्य केलेली असते, पण त्यांना काळजी असते त्या मुलांच्या भविष्याची. गे मुलेतर भेटतात. म्हणतात नाटक पहाताना आम्हाला आम्हीच दिसत होतो रंगमंचावर. आमचे खरे प्रश्न मांडले आहेत नाटकात. आम्हाला तुम्हा सगळ्यांशी बोलायला आवडेल सविस्तर. आम्ही सगळे जवळपास त्याच वयाचे आहोत. पण आणखी दहा-पंधरा वर्षांनी आमची, आमच्या आज जमलेल्या नात्यांची परिस्थिती काय असेल हे आम्हीही सांगू नाही शकत. हे सगळेही नाटकातून यावे असे वाटते. मी त्यंना सांगतो मग त्यासाठी वेगळे नाटक लिहावे लागेल. आशुतोष अणि रणजीतचेच दहा-पंधरा वर्षांनंतरचे नाटक. त्यांना भेडसावणारे तेव्हाचे प्रश्न, इतक्या वर्षांनंतर आलेली प्रगल्भता, आणि कदाचित तेव्हा बदललेली सामाजिक, कौटुंबिक परिस्थिती यांचे नाटक. पण त्यासाठी पुन्हा अभ्यास, भेटीगाठी आणि चर्चा आल्याच. तेव्हा थोडा वेळ द्या. तुम्हा सगळ्यांच्या सहभागाने, सहकार्याने तेही करू आपण!
तर ही आमच्या नाटकाची कहाणी. यापुढेही प्रयोग सुरू राहतीलच. पुणे सोडून इतर ठिकाणी प्रयोग करायला आम्ही आतूर आहोत. पण त्याचे आर्थिक गणित जमले पाहिजे. वाचकांपैकी कोणाची याबाबत काही सूचना, मदत होणार असेल तर हवीच आहे. यापुढेही काही वेगळे अनुभव आले तर शेअर करेनच. तोवर नमस्कार.
आता काही नवे अनुभव : आमची महाराष्ट्र कल्चरल सेंटर ही संस्था सातत्याने नवनवीन नाटकांची निर्मिती करत असते. न येती उत्तरेच्याच आगेमागे आमची काटकोन त्रिकोण आणि खिडक्या ही दोन अप्रतीम नाटके रंगभूमीवर आली. अशा उपक्रमशीलतेमुळे नेहमीचबाहेरगावाहून आम्हाला विविध महोत्सवात इ.नाटके सादर करण्यसाठी निमंत्रित केले जाते. नुकतेच असे एक निमंत्रण नागपूरहून आले. काटकोन त्रिकोण आणि खिडक्या ही दोनही नाटके कलाकारांच्या अडचणीमुळे सादर करणे शक्य नसल्याने मी त्यांना न येतीची माहिती, विविध वर्तमानपत्रांतून आलेली परीक्षणे, लेख इ. सर्व काही मेल केले. गंमत म्हणजे संयोजकांनी कळवले की नाटक म्हणून आम्हाला तुमचा प्रस्ताव आवडला, पण "नागपूर सारख्या" ठिकाणी अशा विसयावरचे नाटक करणे म्हणजे..... तुमच्याकडे काही वेगळे, हलके फुलके असेल तर कळवा.....
आता नागपूरसारख्या महानगरात अशी परिस्थिती असेल तर काय करावे !
दुसरा अनुभव बंगलोरचा. तेथील महाराष्ट्र मंडळाला एक नाट्यप्रयोग हवा होता. मी पुन्हा उत्साहाने सगळी माहिती पाठवली माझ्याशी संपर्क साधणारी व्यक्ती तरूण होती. मिळालेले उत्तर असे : आमच्या एज ग्रुपच्या लोकांना हे नाटक पहायला नक्की आवडेल, पण मंडळाचे बहुसंख्य मेंबर्स वरिष्ठ वयाचे असल्याने नाइलाज आहे. शिवाय अशा गंभीर विषयावरचे नाटक आमच्या समारंभातही फिट होणार नाही, तेव्हा काही विनोदी आहे का ?
आता आम्ही आमचे "नेव्हर माइंड" हे हलके फुलके नाटक तेथे सादर करणार आहोत.
बाकी न येती चे प्रयोग सुरूच आहेत. एका प्रयोगानंतर दोन दिवसांनी एक फोन आला. एका तरुणाचा फोन होता. म्हणाला, "माझ्या गे असण्याची जाणीव मला अनेक वर्षे आहे. पण तुमचे नाटक बघितले आणि मला धाडस आले. मी कालच आईला सर्व खरे काय ते सांगून टाकले. नाऊ आय हॅव कम आउट..."
खरे तर आम्हाला मुंबई आणि इतर काही शहरात हे नाटक घेऊन जाण्याची खूप इच्छा आहे. काय, आहे का कुणी मदतीचा हात देणारा ?????
प्रतिक्रिया
26 Mar 2010 - 12:05 am | शुचि
जरा जास्त मोठा लेख लिहीला तर फार बरं होइल हो. या विषयाबद्दल विशेषतः भारताच्या पार्श्वभूमीवर, खूप उत्सुकता आहे.
मुंबईला आमच्या कॉलनीत एक समलिंगी पुरुष रहात होता. त्याला अ म्हणू. अचं त्याच्या आई-अडीलांनी मारून मुटकून लग्न लावलं. लगेच काही काळात घटस्फोट झाला.
माझे जे पुरुष सहकारी आणि बॉस मी पाहीले अमेरीकेत जे "गे" होते ते मला चक्क १०१% स्त्री-द्वेष्टे = जेलस वाटले. या लोकांचं जग त्यांच्या सेक्शुअल आयडेंटिटी भोवतीच फिरताना मला दिसलं. त्यांना दुसरं जग नव्हतं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
26 Mar 2010 - 12:21 am | अक्षय पुर्णपात्रे
हे अतिशय चुकीचे व पूर्वग्रहदुषित विधान आहे.
26 Mar 2010 - 12:22 am | शुचि
आहेच मुळी पूर्वग्रहदूषीत. तसेच अनुभव आलेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
26 Mar 2010 - 12:32 am | अक्षय पुर्णपात्रे
शुचितै, तुम्ही एकूण किती समलिंगी पुरूषांना पाहीले आहे?
26 Mar 2010 - 12:34 am | शुचि
एकूण ४ जण माहीत होते 'गे" आहेत. २ जवळून. कारण - १ बॉस आणि १ सहकारी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
26 Mar 2010 - 12:45 am | शेखर
त्यांना जेलसी वाटणे साहजिकच आहे म्हणा.. कारण त्यांच्या वाट्याला येऊ शकणार्या पुरुषांना स्त्रिया पळवतात ;)
26 Mar 2010 - 12:53 am | अक्षय पुर्णपात्रे
एका अंदाजानुसार अमेरिकेत एकूण ८८ लक्ष लोक समलिंगी आहेत. ढोबळमानाने त्यातील ५०% समलिंगी पुरूष मानू. म्हणजे ४४ लक्ष लोकांपैकी तुम्ही ४ लोकांना पाहीले आणि त्यावर आपले मत बनवून टाकले. मी त्यापेक्षा जास्त (कमीत कमी पाच-सहा) समलिंगी पुरूष कमी-अधिक जवळून (म्हणजे त्यांची स्त्रियांविषयी वागणूक व लैंगिक ओळखीभोवतीची घुटमळ एवढे ठरवता येईल इतपत) पाहीले आहेत. एकही आपण म्हणता त्याप्रमाणे आढळला नाही. जवळजवळ सर्वच कुठल्यातरी विषयात संशोधक आहेत. म्हणजे सगळे समलिंगी पुरुष संशोधक असतात असे म्हणावे का?
26 Mar 2010 - 12:53 am | बिपिन कार्यकर्ते
फार माहिती नाही... पण श्री. पुर्णपात्रे यांच्याशी सहमती वाटते आहे.
शुचिताईंचाच नियम लावायचा तर मला एकच समलिंगी पुरूष माहिती आहे आणि माझ्या तरी माहितीप्रमाणे त्याचे वागणे लैंगिकतेभोवती घुटमळणारे नाहीये. तस्मात, माझ्यापुरते मी असे म्हणतो की सगळेच समलिंगी पुरूष लैंगिकतेभोवती घुटमळणारे नसतात. उलट ती व्यक्ती एवढी चतुरस्त्र आणि म्हणूनच आदरणिय आहे की बोलायची सोय नाही. त्यामुळे सगळेच समलिंगी पुरूषही नक्कीच तसेच चतुरस्त्र असणार. त्यामुळे मला मी समलैंगिक नाही याचा खेद वाटू शकतो.
बिपिन कार्यकर्ते
26 Mar 2010 - 12:55 am | शुचि
अहो पण हा धागा स्वानुभावाशी निष्ठा राखाण्याचा प्रयत्न आहे असं मला तरी वाटलं होतं. मी म्हणून माझा अनुभव सांगीतला.
पण स्वतःच्या सेक्शुअल आयडेंटिटीबद्दल पॅशनेट मत असणं यात गैर काहीच नाही, मी तर म्हणेन छानच. मी फक्त मत मांडलं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
26 Mar 2010 - 1:00 am | बिपिन कार्यकर्ते
शुचि, आक्षेप मत मांडण्याला नाहीये... शीतावरून भाताची परिक्षा करण्याला आहे.
बिपिन कार्यकर्ते
26 Mar 2010 - 1:01 am | अक्षय पुर्णपात्रे
शुचितै, स्वत:च्या सेक्शुअल आयडेंटिटीबद्दल पॅशनेट मत असणं यात काहीही गैर नाही. दुसर्यांच्या सेक्शुअल आयडेंटिटीवरून त्यांच्याबद्दल पूर्वग्रह बाळगणे मात्र गैर असावे.
26 Mar 2010 - 1:13 am | शुचि
माझ्या नाही म्हणते .... गे लोकां नी स्वतःच्या जेंडर आयडेंटीटी बद्दल पॅशनेट असणं यात काही गैर नाही पण त्याची चर्चा कुठे करावी याचा ताळतंत्र ते २ पुरुष ठेवत नव्हते. That gay boss was literaly veering around work harrassment with me. Anyways ..... I have bad experience with gay people & that's about it.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
26 Mar 2010 - 3:19 am | गोगोल
defensive mode हा :)
26 Mar 2010 - 3:40 am | शुचि
तुम्ही आता चावी मारू नका. जरा शांत झालय . शांत राहू द्या. : )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
हंसः श्वेतो बकःश्वेतो को भेदो बकहंसयो:|
नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः||
26 Mar 2010 - 12:30 pm | कानडाऊ योगेशु
म्हणजे सगळे समलिंगी पुरुष संशोधक असतात असे म्हणावे का?
बाप रे.मी उलटा विचार केला.त्यानुसार सगळे संशोधक गे असु शकतात. :O
(सुलटा) योगेशु.
टार्झनं प्रथमं वंदे खेचरं तदनंतरं | लत्ता प्रहारं पूर्वे मुष्टीप्रहारमं यथा||
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
26 Mar 2010 - 12:19 am | मुक्तसुनीत
या लोकांचं जग त्यांच्या सेक्शुअल आयडेंटिटी भोवतीच फिरताना मला दिसलं. त्यांना दुसरं जग नव्हतं.
रोचक विधान :-)
26 Mar 2010 - 1:10 am | बिपिन कार्यकर्ते
श्री. काळे, पुढे वाचायला उत्सुक आहे.
बिपिन कार्यकर्ते
26 Mar 2010 - 3:47 am | अक्षय पुर्णपात्रे
श्री काळे, पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे. जनमानसात समलिंगी संबंधांविषयी अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्याचे काम हाती घेतल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा.
26 Mar 2010 - 4:33 am | समीर गोखले
Dear Pramod,
First congrats on handling this sensitive topic. I am a gay maharashtrian person and would love to provide you with any info. you need. It's a shame that our society still has so many stereotypes against gays. People need to realize we are just like everyone else except our sexual, emotional and psychological attraction for same sex. Let's first try to understand gay people before making a judgement on their community.
समीर
26 Mar 2010 - 5:26 am | समीर गोखले
http://www.youtube.com/watch?v=ICijm8VpsTE
नुकताच एक छान कार्याक्रम झआला ह्या विशयावर ...अवश्य पहा...खुप छान गप्पा मारल्या आहेत रेणुका शहाने ने...
समीर
26 Mar 2010 - 6:05 am | शुचि
कार्यक्रम छानच आहे. वादच नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
हंसः श्वेतो बकःश्वेतो को भेदो बकहंसयो:|
नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः||
26 Mar 2010 - 6:40 am | समीर गोखले
शुचि, तुम्हाला काहिहि शन्का असतिल तर मला अगदी नक्कि विचारा. शेवटी आपण बोलल्या शिवाय आपल्य्याला नवीन गोष्टी कळनार नाही. माझे गे असणे हा माझ्ह्या व्यक्तिमत्वाचा फच्त एक भाग आहे. आपली सेक्शुअलीटी म्हनजे आपले पूर्ण व्यक्तिमत्व थोडेच असते. तुमच्याशि बोलायला नक्किच आवडेल.
समीर
26 Mar 2010 - 6:47 am | शुचि
धन्यवाद गोखलेसाहेब. माझं तसं नव्हतं हो म्हणणं. मला खूप वाईट वाटलं जेव्हा हे सर्व गैरसमज झाले. अहो माझा बॉस एक तर कॅनेडीअन रेशीस्ट माणूस होता शिवाय त्याचा ध्यास होता की जो येईल समोर त्याला "प्रो-गे" करून सोडायचा.
पण त्याचा अर्थ सर्व गे लोक तसे असतात असं नाही. एक लेस्बिअन प्रेमळ बाई सुद्धा होती जी माझी मैत्रीण होती.
इन फॅक्ट तुम्हा लोकांनी बरेच लोखंडाचे घण सोसलेले असतात which makes a good spiritual progress on your part . I do admire your choice & individuality.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
हंसः श्वेतो बकःश्वेतो को भेदो बकहंसयो:|
नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः||
26 Mar 2010 - 6:53 am | समीर गोखले
Good to hear that Shuchi. Yes, things have not been easy at all for us but with more and more open minded people like you I am sure one day things will change for good. Working in US definitely gave me my identity,self esteem and confidence to live life happily. For last 6 years I am in a loving relationship with another guy (he is maharashtrian as well) and we are planning to have commitment ceremony this year sometime.
Let's keep in touch..I am loving this site (especially all the recipes and "sahitya" section)
Sameer
27 Mar 2010 - 1:17 pm | वाहीदा
Let's keep in touch..I am loving this site (especially all the recipes and "sahitya" section
हे बाकी आवडले !!
!!!! शुभं भवतू !!!! :-)
~ वाहीदा
10 Apr 2010 - 1:54 am | टारझन
For last 6 years I am in a loving relationship with another guy
हे बाकी आवडले !!
!!!! तथास्तु !!!!
~ मिल्कशेक
26 Mar 2010 - 8:28 am | अप्पा जोगळेकर
अहो गोखले, मराठी भाषेत लिहा की. संपादक, हे असंच जर चालणार असेल तर मी माझे इंग्रजी लेख जसेच्या तसे मिपावर टाकतो. ते उडवू नका. ( मला कारण नसताना त्याचे दुवे द्यावे लागतात. ) नाहीतर इथे इंग्रजीत लिहिणार्यांना समज तरी द्या.
गोखले,
तुम्ही असं लिहिलं आहे की -
I am a gay maharashtrian person.
Working in US definitely gave me my identity,self esteem and confidence to live life happily.
- तसं जर असेल तर तुम्ही स्वतःला महाराष्ट्रीय म्हणू नका. या वाक्याचा पुर्वार्ध तुम्ही लिहिला आहे. पण उत्तरार्ध तुमच्या मनात आहे आणि तो असा आहे की
Working in India definitely won't give me my identity,self esteem and confidence to live life happily.
27 Mar 2010 - 1:13 pm | वाहीदा
तसं जर असेल तर तुम्ही स्वतःला महाराष्ट्रीय म्हणू नका
अप्पा ,
गे लोकांना अजूनही भारतात सामाजिक वागणूक हास्यास्पद च मिळते हे निर्विवाद सत्य आहे . त्यांची आएडेंटीटी, आत्मविश्वास हा अन सेल्फ ईस्टीम आपल्या चारचौघांसारखा नसतो त्याला आपली सामाजिक कारणे जबाबदार नाहीत का??
कोर्टाने निर्णय दिला तरीही गे लोकांना आनंदी रहाण्यासारखे आपल्या देशाचे मानसिक वातावरण नाही हे वाटत नाही तुम्हाला ?
~ वाहीदा
28 Mar 2010 - 9:26 am | समीर गोखले
वाहीदा, धन्यवाद. निदान थोडे तरी लोक असे आहेत ज्यान्ना गे लोकान्ची सद्य परीस्थिती माहित आहे. अप्पा, मी अगदी पक्का महाराष्त्रिअन आहे, परन्तु मला किव्वा माझ्ह्या जोडीदाराला समजणारा आणि स्विकार्णारा आप्ला समाज नाहिये हो. आम्हि २-३ आठवड्यासठि पुण्याला येतो आणि आम्हाला त्या काळात आमच्या अगदी जवळच्या लोकान्कडुन काय काय आइकायला मिळते हे मी तुम्हाला सान्गु पण शकत नाहि. आपल्या भारतातिल अशा वातावरणामुळे मी ९ -१० वर्षापूवी आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता. अशा वातावरणात कसा तुमचा आत्मविश्वास आणि सेल्फ एस्टीम राहणार? आज मी अमेरीकेत खुल्या मनाने आणि खुल्या दिलाने माझ्या जोडीदाराबरोबर रहातो आणि अतिशय आनन्दाने आयुष्य जगत आहे. मला सान्गा असे आपल्या भारतात कधि शक्य होइल? माझ्यात भारतिय, महाराष्ट्रीय सन्स्कार आणि शिकवण अगदि ठासुन भरली आहे, पण जिथे मला आणि माझ्या अस्मितेला काहिच किन्म्त नाहि, तिथे मी कसा आत्मविश्वासाने आनि सन्मानाने राहु शकेन? आणि अशा वातावरणात मी कसा यशस्वी होइल? तुमच्या मतान्चा मी आदर करतो, परन्तु तुम्ही मला समजुन घेउ
शकाल अशी आशा आहे. पत्रोतर अवश्य द्यावे.
समीर
28 Mar 2010 - 9:53 am | प्रकाश घाटपांडे
समीर उत्तम मांडणी.
अप्पांना वाक्याचा मनात असलेला उत्तरार्ध आता तपासुन पहावा. सुरवातीला इंग्रजीत लिहिणारे नवीन सदस्य लिहितील मराठीत हळू हळू.
त्यांच्या उत्साहावर पाणी पडू देउ नये. मराठीत लिहिण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. सहकार्य करावे. जास्तीत जास्त लोकांनी मराठीत लिहुन जालावरील मराठीतील मजकुर वाढवावा.
वाहिदा, योग्य हस्तक्षेप केल्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
28 Mar 2010 - 12:38 pm | अप्पा जोगळेकर
तुम्ही गे असा अथवा नसा. माझा आक्षेप त्या गोष्टीला नाही. माझे म्हणणे असे की भारतात जर गे लोकांना वाईट वागणूक मिळते तर ती परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही स्वतः काय प्रयत्न केले? त्याऐवजी तुम्ही अमेरिकेत जाऊन स्थायिक होणे हा पलायनवाद स्वीकारला.
आज मी अमेरीकेत खुल्या मनाने आणि खुल्या दिलाने माझ्या जोडीदाराबरोबर रहातो आणि अतिशय आनन्दाने आयुष्य जगत आहे. मला सान्गा असे आपल्या भारतात कधि शक्य होइल? माझ्यात भारतिय, महाराष्ट्रीय सन्स्कार आणि शिकवण अगदि ठासुन भरली आहे
असं जर का असेल तर तुम्ही अमेरिकेशीसुद्धा एकनिष्ट नाही. अहो, तुम्ही अमेरिकेत राहता तिथे तुम्हाला तुमचं अस्तित्व सापडलं असं म्हणता तर मग पूर्णपणे अमेरिकेशी एकनिष्ठ राहा. स्वतःला भारतीय, महाराष्ट्रीय म्हणवू नका. तुम्ही अमेरिकेशीदेखील गद्दारी करता आहात. तुम्ही तिथलं जीवनमान, चालीरिती पूर्णपणे स्वीकारलं पाहिजे.
आज मी भारतात राहतो, नोकरी करतो. पण माझ्या आजूबाजूची परिस्थिती बदलण्यासाठी काहीएक प्रयत्न करत नाही. फारतर मिपावर लेख टाकत असतो. यासाठी मला कुणी नालायक म्हणू शकेल पण माझ्या भारतीयत्वावर कुणी शंका घेऊ शकणार नाही. पण तुमचे तसे नाही तुम्ही अमेरिकनसुद्धा नाही आणि भारतीयसुद्धा नाही. विचार करुन पहा.
मी नेहमी असंच कोरडंठाक, निर्मम लिखाण करतो.
28 Mar 2010 - 9:39 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री जोहळेकर, तुलनेने स्वत:स जेथे शांततेने आणि मानाने जगता येईल अशा ठिकाणी स्थायिक होणे म्हणजे पलायनवाद नव्हे. तुमच्या-माझ्या पूर्वजांनी अनेक वेळा असे निर्णय घेतलेले आहेत - जड अंत:करणाने, नाइलाजाने किंवा स्वखुशीने. तो त्यांचा पलायनवाद होता काय? तुमचा निकष वापरल्यास जगात सर्वच लोक पलायनवादी झालेले दाखवता येईल.
आता श्री गोखले यांच्या बाबतीत काय पलायनवाद असू शकला असता याबद्दल माझे मत सांगतो. जर श्री गोखले यांनी आपल्या समलिंगी आकर्षणास लपवून कुटूंबियांच्या/ समाजाच्या दबावास बळी पडून एखाद्या स्त्रीशी विवाह केला असता तर ती पलायनवादी वर्तणुक ठरू शकली असती. याउलट त्यांनी अत्यंत धैर्याने व नेटाने आपल्या प्रश्नास सोडवले असे मला वाटते. त्यांचे वागणे अतिशय कौतुकस्पद आहे.
अमेरिकन कायद्यानुसार जोपर्यंत कायदा न मोडता स्वत:च्या संस्कृतीस (मग ती कुठली का असेना) धरून वागणे यास मान्यता आहे. मॉलमध्ये साडी किंवा धोतर घालून गेल्यास तुम्हाला कोणीही हटकणार नाही. श्री गोखले यांना आपल्या संस्कृतीशी नाळ टिकवून ठेवण्याची पुरेपूर मुभा आहे.
प्रत्येक व्यक्तिने समाजात राहूनच समाज सुधारण्याचा प्रयत्न करावा हा अट्टाहास अवास्तव आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात बाहेरच्या समाजात वावरतांना भारतीय समाजास प्रगल्भ बनवणार्या प्रयत्नांची अनेक उदाहरणे सापडतील. अमेरिकेत राहून श्री गोखले समलिंगी लोकांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी प्रयत्नशील असू शकतील. मिपावरील त्यांचे प्रतिसाद या प्रयत्नांचाच एक भाग समजून त्यास उत्तेजन द्यावे. अनाठायी निर्ममत्व दाखवून अशा सत्कार्यास अडचणी आणू नयेत.
28 Mar 2010 - 9:44 pm | प्रकाश घाटपांडे
पुर्णतः सहमत.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
29 Mar 2010 - 12:11 am | बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद श्री. पुर्णपात्रे, आपण माझे टंकनकष्ट वाचवले.
बिपिन कार्यकर्ते
29 Mar 2010 - 9:12 am | अप्पा जोगळेकर
गोखले,
मी ही टीका कोणत्याही आकसापोटी करत नाही इतकेच नमूद करतो.
अक्षय पूर्णपात्रे,
तुलनेने स्वत:स जेथे शांततेने आणि मानाने जगता येईल अशा ठिकाणी स्थायिक होणे म्हणजे पलायनवाद नव्हे. तुमच्या-माझ्या पूर्वजांनी अनेक वेळा असे निर्णय घेतलेले आहेत - जड अंत:करणाने, नाइलाजाने किंवा स्वखुशीने. तो त्यांचा पलायनवाद होता काय? तुमचा निकष वापरल्यास जगात सर्वच लोक पलायनवादी झालेले दाखवता येईल. -
मी ज्या गोष्टीस पलायनवाद असे म्हणालो तीच गोष्ट एखाद्या माणसाला स्वतःची प्रगती करुन घेण्यासाठी उचललेले धडाडीचे पाऊल (वगैरे वगैरे) वाटू शकेल. जे पूर्वजांनी केले ते योग्यच असते किंवा अयोग्यच असते असे मानणे अतार्किक आहे. त्यापेक्षा तुम्ही एखाद्या पुर्वजाने केलेल्या योग्य अथवा अयोग्य कृत्याचा दाखला दिला असता तर बरे झाले असते.
- I am a gay maharashtrian person असा स्पष्ट उल्लेख केला आहे. ते जर अजूनही भारतीय नागरिक असतील तर मी माझे शब्द मागे घेतो. त्यांची माफी मागतो.
ते जर अमेरिकन नागरिक असतील आणि भारतातली यासंदर्भातली परिस्थिती सुधारावी यासाठी प्रयत्न करत असतील तरीदेखील मी माझे शब्द मागे घेतो. त्यांची माफी मागतो. आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगेन अशीही खात्री देतो.
ते जर अमेरिकन नागरिक असतील आणि भारतातली परिस्थिती सुधारावी यासाठी प्रयत्न करत नसतील तरीदेखील मला त्यांचा राग येणार नाही. पण मग त्यांनी भारत असा आहे किंवा तसा आहे याबाबत उपदेश करु नये. माझा आक्षेप या संदर्भात आहे. आणि हा आक्षेप फक्त गोखल्यांबाबत नाही. Analogus Situation जिथे जिथे लागू होईल त्या सगळ्या व्यक्तींबाबत आहे.
(हॅ हॅ हॅ. मी आक्षेप घेतला काय किंवा न घेतला काय काहीच फरक पडत नाही हे मला माहीती आहे.)
(आम्ही वाजंत्री.कृतीपेक्षा तोंड वाजवणे अधिक योग्य समजतो.)
29 Mar 2010 - 1:45 pm | वाहीदा
हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छोडा करते ,
वक़्त की शाख से लम्हें नहीं तोडा करते ...
जिस की आवाज़ में सिल्वट हो निगाहों में शिकन ,
ऐसी तस्वीर के टुकड़े नही जोडा करते ...
शहद जीने का मिला करता है थोडा थोडा ,
जाने वालों के दिल नहीं तोडा करते ...
लग के साहिल से जो बहता है उसे बहने दो ,
ऐसी दरिया का कभी रुख्ह नहीं मोडा करते ...
अप्पा,
प्रश्न माफी चा नाही आहे... आपल्याच लोकांना समजून घेण्याचा आहे :-) असो !
~ वाहीदा
29 Mar 2010 - 1:58 pm | अप्पा जोगळेकर
प्रश्न माफी चा नाही आहे... आपल्याच लोकांना समजून घेण्याचा आहे असो !
अर्थातच. मला भारतीय माणसांबद्दल आपलेपणा वाटतोच. भारतीय नाहीत अशा माणसांबद्दल आपलेपणा वाटण्याची मला गरज वाटत नाही.(भारतीय मूळ असणे आणि भारतीय असणे यात फरक आहे.) आपलेपणा न वाटणे याचा अर्थ वैर असणे असा काढू नये. म्हणूनच तर मी कंडिशनल माफी मागितली आहे.
30 Mar 2010 - 8:45 am | समीर गोखले
अप्पा आणि सर्व,
मी थोड्या निवान्त्पणे उत्तर लिहीन, परन्तु मला तुम्हाला येवढेच सान्गायचे होते कि मी सगळे प्रतिसाद वाचत आहे आणि तुम्हा सगळ्यान्नी खुप छान लिहिले आहे. एक महाराष्त्रिअन, एक भारतीय, एक माणुस, एक जागतिक नागरिक, एक सन्वेदनाशील मन, एक मुलगा, एक प्रियकर, एक मित्र,एक भाऊ - अशी अनेक नाती आपण सगळे एकाच्वेळी बाळगत असतो, आणि ह्यातले काही वेगळे करायचे म्हणले तर ते कसे शक्य होइल? मी आज कैरीची डाळ केली आणि खाल्ली, माझ्या जोडीदाराला त्याच्या वाढ्दिवसानिमि त्त नविन कपडे आणले, भारतात आई - बाबान्ना फोन केला आणि खुशाली विचारली, माझ्या सहकार्याच्या मुलीला इस्टर चे गिफ्ट आणले, गे-मराठी ह्या याहु ग्रुप ची काहि ई-मेल तपासली, उद्या san-fransisco ला जाणार आहे त्याची bag भरली, सकाळी एका global telecon वर ७ वेगवेगळ्या देशाती ल माझ्या सहकार्याना guide केले. आजच्या जगातिल आजच्या विचारान्चा मी नागरीक आहे असे मला वाटते. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनाचा अविभाज्य अन्ग आहेत आणि मी त्यातच समाधानी आहे असे मला वाटते.
समीर
30 Mar 2010 - 8:55 am | अप्पा जोगळेकर
कुराणामध्ये सूरे काफरून नावाचा एक सूर आहे ज्याबद्दल नुकतीच माहिती वाचली. 'लकूम दिनुकम वलीये दिन' म्हणजे तुझे विचार मला पटणार नाहीत. माझे विचार तुला पटणार नाहीत. पण म्हणून काय झाले ? तुझा धर्म तुला असो. माझा धर्म मला असो.
30 Mar 2010 - 12:00 pm | वाहीदा
लकूम दिनुकुम वलिये दीन (Your religion is yours, mine is mine)
ला एकरा फि-दीन (No compulsion in religion).
- सुरे अल - काफिरून
समीर,
ईतरांना त्रास न देता तु सुखी अन समाधानी आहेस हे महत्वाचे !! :-)
~ वाहीदा
26 Mar 2010 - 8:59 am | प्रकाश घाटपांडे
प्रमोदजी मिपावर आपले स्वागत! एक चांगला विषय हाताळल्याबद्दल धन्यवाद. मी न येती उत्तरे ची ओळख सर्वसामान्य प्रेक्षकाच्या भुमिकेतुन करुन दिली होती. आता प्रत्यक्ष लेखक दिग्दर्शकच इथे आल्यामुळे मिपाकरांना थेट संपर्क साधता येईल,
नवीन वाचकांसाठी धनंजयचा कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे हा अप्रतिम लेख वाचावा. मिपावर उत्तम उत्तम धागे प्रचंड वेगाने काळाच्या पडद्या आड जातात म्हणुन हे जाणीवपुर्वक उत्खनन.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
26 Mar 2010 - 7:16 pm | संदीप चित्रे
सर,
प्रकाशकाकांनी तुमच्या नाटकाची एक प्रेक्षक म्हणून ओळख करून दिली होतीच.
त्यावर मी अभिप्रायही दिला होता.
नाटकासंदर्भातील आणि एकूणच गेल्या कित्येक वर्षांतील तुमचे नाट्य-लेखन, दिग्दर्शन इ. अनुभव वाचायला नक्की आवडेल.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
27 Mar 2010 - 12:50 pm | अस्मी
कार्यक्रम स्थळ आणि दिनांक:
रविवार दि. 28 मार्च, सायंकाळी 7 वाजता सु-दर्शन रंगमंच, अहिल्यादेवी प्रशालेजवळ, शनिवार पेठ, पुणे.
- अस्मिता
28 Mar 2010 - 10:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काळे साहेब, नाटकाविषयी आपले अजून काही अनुभव वाचायला आवडतील.
मिपावर आपले स्वागत आहे...!!!
-दिलीप बिरुटे
31 Mar 2010 - 12:52 am | प्रमोद काळे
१/१०एकदशांश लेखही लिहून नाही झाला तर एवढी चर्चा! क्या बात है! मला खूप थोड वेळ मिळतो, म्हणून हप्त्या हप्त्याने लिहायचे ठरवले होते. पण आता वेग वाढवायला हवा असे दिसते....
आणि खरे म्हणजे हा एकदा लिहून संपणारा लेख नाही. आता कुठे आठ प्रयोग झालेत माझ्या नाटकाचे.... जसजसे प्रयोग होतील तसतसे अनुभव आणि हा लेख वाढत जाईल. इथे लेखनाच्या लांबीवर काही बंधन आहे का हो ? मी नवीन आहे म्हणून एक शंका. आज पुढे लिहीत आहे......
मझी विनंती आहे की आपण सर्वांनी, अर्थात पुण्यात असाल तर, प्रयोगाला जरूर या. पुढचे प्रयोग ४ एप्रिल सकाळी ११ वाजता, १४ व १८ एप्रिल सायंकाळी ७ वाजता असे सादर होतील. स्थळ अर्थातच सु-दर्शन रंगमंच, अहिल्यादेवी प्रशालेजवळ, शनिवार पेठ.
30 Mar 2010 - 10:55 pm | धनंजय
नाटकाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. लेखाच्या पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहे. (लेखाचा प्रत्येक भाग थोडा लांब लिहावा अशी विनंती.)
30 Mar 2010 - 11:44 pm | मुक्तसुनीत
श्री. काळे ,
उशीराच प्रतिसाद देतो आहे. इथे आल्याबद्दल आणि तुमच्या या नाटकाबद्दल आवर्जून लिहिल्याबद्दल एक सामान्य सभासद म्हणून आभारी आहे.
श्री. काळे स्वतः तसा उल्लेख कधी करणार नाहीत, परंतु मला हे नमूद करावेसे वाटते की श्री. काळे यांनी गेली अनेक वर्षे चालवलेली "सुदर्शन रंगमंच" ही संस्था म्हणजे तरुण नाटककार , नट, दिग्दर्शक यांच्याकरता नवनवीन प्रयोगांची संधी उपलब्ध करून देणारे पुण्यातले एक उत्तम व्यासपीठ आहे. गेल्या काही वर्षांत गाजलेली अनेक नाटके , नव्याने पुढे आलेले नाटककार-रंगकर्मी यांना सुदर्शनची पार्श्वभूमी आहे.
पुन्हा एकदा , आभार.
31 Mar 2010 - 12:57 am | प्रमोद काळे
हो. मी सु-दर्शनशी संबंधित आहेच. अगदी ही कल्पना जन्माला आल्यापासून. पण मी एकटा नाही. आम्ही अनेकजण आहोत, त्यामुळेच एक छोटेसे समीप नाट्यगृह चळवळ म्हणून पुढे येऊ शकले. आम्हा सगळ्यांनाच याचा खूप अभिमान आहे, आणि आनंदही. धन्यवाद.
31 Mar 2010 - 11:19 am | वाहीदा
हि तर झाली आता.. अजब मिपा की गजब कहानी ;-)
तुम्ही सु-दर्शनश संबधित आहात हे वाचून आनंद झाला..
आम्ही या संस्थे संबधीत खुप काही ऐकून आहोत
आता छान काही त्या बाबतित वाचायला ही मिळणार
(खुद के संग बाता : अरे व्वा व्व्वा .... अरे व्वा व्व्वा :-)
~वाहीदा
31 Mar 2010 - 9:56 am | प्रमोद देव
आणि त्याची कहाणी छान उलगडून सांगितलेय.
5 Apr 2010 - 8:01 pm | समीर गोखले
प्रमोद,
एक छान नाटक बसवल्याबद्दल आणि अनेक अडचणीन्ना तोन्ड देउन एक नवीन विषय हाताळल्याबद्दल आपले अभिनन्दन !! एक गे मनुष्य म्हणुन, एक कलाकार म्हणुन, एक वेगळ्या गोष्टीची आवड असणारा चाहता म्हणुन मला हे नाटक पहायला खुप आवडेल. पण मी अमेरीकेत असल्याने माझी ती इछा पूर्न होउ शकणार नाही. परन्तु मी माझ्या पुण्यात असलेल्या आई-बाबा ना आणि इतर मित्रान्ना नक्की पहायाला सान्गेन. मला तुम्हाला एक विचारायचे आहे की नाटकाचा शेवट काय आहे? गे असणे, स्वताला स्वीकारणे, समाजाची ह्या सगळ्यात असलेली भुमिका हे सगळे प्रश्न आहेतच, परन्तु मला जाणुन घ्यायचे आहे कि नाटकाचा शेवट हा positive note वर सम्पतो का? कारण तसे जर नसेल आणि नाटक फक्त ह्या विषयाचि ओळख करुन देणारे असेल आणी गे लोकान्चे आयुष्य म्हणजे कशी कसरत आणि अनेक अनुत्तरीत प्रश्न असे सान्गणारे असेल, तर मात्र मी आई-बाबान्ना सान्गणार नाही ह्या नाटकाबद्दल. एक गे मुलगा म्हणुन मला तरी असे वाटते की आम्हाला अशा कलाक्रुती पहायाला आवडतील ज्या आम्ही जसे आहोत तशा आम्हाला स्वीकारायला मदत करतील आणी तसेच आमच्या आई-वडिलान्ना, मित्रान्ना, नातेवाइकान्ना आणी समाजाला विचार करायला शिकवतील. तुमच्या नाटकाच्या नावावरुन मला positive note न येता थोडेसे dark side ला कल असणारे नाटक वाटले. We want some positive reinforcing forms of art where being gay is accepted, embraced and celebrated - because that's what we are doing and telling our parents to do. तुमचे नाटक असेच असेल अशी मी आशा करतो. अर्थात, तुम्ही ह्या विषयावर नाटक करायचे ठरवले ह्यातच तुमचा ह्या विषयाकडे बघण्याचा प्रगल्भ द्रुष्टिकोन दिसुन येतो, त्याबद्दल तुमचे अभिनन्दन. तुमचा अभिप्रायाची वाट पहात आहे.
समीर
5 Apr 2010 - 11:38 pm | प्रमोद काळे
समीर,
तू अमेरिकेत किती वर्षे आहेस मला माहीत नाही, पण साधारण १९७० नंतर (नक्की सांगायचे तर स्टोन वॉल नंतर) आजपर्यंत हा विषय अमेरिकेत आणि कॅनडात तसेच काही युरोपियन देशात खूपच समजूतीने घेतला जात आहे. त्यासाठी लढाही द्यावा लागला आहे, पण आज बुश वगैरेंची मते दुर्लक्षित करून हे वास्तव लोकांनी स्वीकारले आहे.
इथे परिस्थिती खूपच वेगळी आहे. मला प्रत्येक शोनंतर तरूण गे मुले (लेस्बियन्स नाहीत!) भेटतात. त्यांचे खूप सामाजिक, नैतिक आणि वैयक्तिक प्रश्न सांगतात. त्यांना आपले बोलणे कोणीतरी कंपॅशनेटली ऐकून घेत आहे, हेच खूप महत्त्वाचे वाटते. त्यांना खरोखर त्यांना पडत असलेले प्रश्न नाटकात भेटतात. ते स्वतःला माझ्या दोन्ही कॅरेक्टर्सशी आयडेंटिफाय करू शकतात. कारण प्रश्न खरच खूप आहेत. त्यांना सोपी, रोझी उत्तरं नाहीत. ती लढ्यातून कदाचित मिळवावी लागतील, पण जगण्याचे इतर प्रश्न इथे इतके मूलभूत आहेत की समाजाच्या दृष्टीने या सेक्चुअल मायनॉरिटीच्या प्रश्नांना काही किंमत नाही.
माझ्या नाटकाच्या शेवटी एक मुलगा स्वतःची काहीही खूण मागे न ठेवता मरून जाण्याच्या कल्पनेने डेस्परेट झाल्याने एका मुलीबरोबर सेक्सचा प्रयत्न करतो, आणि अयशस्वी होतो. हे जेव्हा त्याच्या पार्टनरला कळते, तेव्हा आधी तो अर्थातच चिडतो, पण त्या मागचे कारण आणि पार्टनरची एका कॉलगर्लने केलेली अवहेलना कळाल्यावर शांत होतो, आणि विचारतो," आपण आपापले भूतकाळ विसरून इथपर्यंत आलो आहोत. आज मी आहे, तू आहेस, आपण आहोत. पण रणजीत, can we also forget our future?"
यानंतर दोघेही एकमेकांना जवळ घेतात, आणि नाटक संपते.
भूतकाळ विसरणे जितके कठीण, तितकेच भविष्यकाळ विसरणेही कठीण असे मला वाटते. 'आज', 'या क्षणात' जगणे ही गोष्ट खूप अवघड आहे. पण आजतरी त्या दोघांना ते करावे लागणार आहे...... प्रश्न संपत नाहीत....
तर असा विचार आहे या मागे.
प्रत्येक प्रयोगानंतर आम्ही प्रेक्षकांशी खुली चर्चा करतो. एका अशा चर्चेत नाव नकारात्मक आहे असे एकजण म्हणाला, पण त्याला एका प्रेक्षकानेच "पण ते खरे आहे.' असे उत्तर दिले.
लिहिल्याबद्दल धन्यवाद.
तू कधी इकडे आलास, किंवा आम्हाला तिकडे येता आले (!?!) तर ये नाटकाला.
तोवर असे बोलू.
-प्रमोद.
7 Apr 2010 - 8:26 pm | समीर गोखले
प्रमोद,
मी गेले १० वर्ष आहे अमेरिकेत. भारतात असताना मला गे हा शब्द पण माहित नव्हता, जरी त्या भावना अगदी वयाच्या १३-१४ व्या वर्षापासुन परिचीत होत्या तरी. तेव्हा internet चा येव्हडा प्रसार नसल्याने आणी ही एक phase आहे आणी आपण ह्यामधुन बाहेर येउ अशी भावना असल्याने मी पण फार स्वताच्या sexual orientation बद्दल विचार केला नाही. तसेही तेव्हा करिअर, नोकरी हेच विचार डोक्यात जास्त असतात. आता भारतात ह्या विषयावर निदान चर्चा तरी होत आहे, हे सुद्धा नसे थोडके. मी ५ वर्षापुर्वी माझ्या आई-बाबान्ना सान्गितले. सान्गणे सोपे नव्हतेच, परन्तु आवश्यक होते, नाहितर आज त्यान्च्या आणी समाजाच्या दबावाला बळी पडुन एका मुलिचे आयुष्य बरबाद करण्याचे पाप मला लागले असते. आता बाबान्ना माझे आयुष्य, माझा जोडिदार, माझी विचारसरणी हे हळुहळु पटत आहे. आई ला मात्र हे स्वीकारायला खुप त्रास होत आहे. Pshychologists झाले, साधु-बाबा, देव्-देव सगळे तिने करुन पाहिले. काही Pshychologists ने तिला योग्य सल्ला दिला पण काहिन्नी मात्र shock treatment सारखी अघोरी उपाय सुचवला. अर्थात आई ला माझ्यावर तेव्हढा विश्वास असल्याने मला त्या सगळ्या प्रकारातुन नाही जावे लागले. परन्तु ह्या सगळ्या प्रकारातुन जाताना एक जाणवले की आपल्या समाजात खुप awareness ची गरज आहे ह्या विषयावर योग्य, शास्त्रीय आणी मनमोकळेपणे माहीती देण्याची. तुमचे नाटक, काहि मराठी पुस्तके, काहि gay friendly psychologists हे तर resources आहेतच, परन्तु असे अजुन खुप काही व्हायला पाहीजे. तसेच ह्या सगळ्यातुन एक positive lifestyle चा सुर बाहेर येणे खुप आवश्यक आहे. गे असणे म्हणजे तुमचे जीवन अन्धारमय, खुप गुन्तागुन्तिचे असेच काहि नाही. प्रश्न तर सगळ्यान्नच असतात पण आपण ते कसे सोडवतो ते महत्त्वाचे. मी आणी माझा जोडीदार खुप आनन्दाने आमचे आयुष्य जगत आहोत, आमच्या career मधे यशस्वी होत आहोत, जग अनुभवत आहोत, जमेल तशी दुसर्याना मदत करत आहोत, आमच्या आई-वडिलान्ना शक्य तेव्हढ्या प्रकारे मानसीक, भावनीक आधार देत आहोत, एक जबाबदार नागरीक म्हणुन आमची सामाजीक कर्तव्ये पार पाडत आहोत - ह्या पेक्षा अजुन वेगळे काय असते आयुष्य म्हणजे, नाही का?
anyway, आपली चर्चा चालुच ठेवु. मराठी मधे ह्या विषयावर एव्हढी मनमोकळी चर्चा होत आहे हे पाहुन खुप छान वाटते.
समीर
5 Apr 2010 - 8:28 pm | श्रावण मोडक
लेख आणि चर्चा वाचतो आहे!
5 Apr 2010 - 8:33 pm | अनामिक
वाचतोय... पुढला भाग लवकर येऊ द्या!
-अनामिक
7 Apr 2010 - 9:00 pm | सुधीर१३७
मला लेख वाचायला मिळाला नाही. फक्त प्रतिक्रिया दिसतात. असे का होते ? मूळ लेख गायब कसा झाला ?
काही समजेल का ?
9 Apr 2010 - 11:20 pm | प्रमोद काळे
मिपाच्या काही तांत्रिक कारणांमुळे लेख गायब झाला होता. आता तो परत आला आहे. वाचून प्रतिक्रिया जरूर कळवा.
-प्रमोद काळे.
10 Apr 2010 - 3:38 am | उपाशी बोका
मी हा लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचल्या.
मला पडलेले काही प्रश्न:
१. समलैंगिक लोकांचा हा लढा/चळवळ/खटपट (नक्की काय ते मला माहीत नाही) म्हणजे काळे विरुद्ध गोरे अश्या प्रकारचा संघर्ष आहे काय? काळ्या लोकांना बसमध्ये वेगळे बसावे लागायचे, हॉटेलात मज्जाव होता अशी तर काही परिस्थिती नाही ना, मग मूळ मुद्दा काय आहे?
२. समलैंगिक लोकांना नेमके काय पाहिजे आहे? समाजात मान्यता म्हणजे नेमके काय? की आम्ही किती आणि कसे वेगळे आहोत अथवा आम्ही वेगळे असूनही सर्वसामान्य लोकांसारखे आहोत ते सांगायचा अट्टाहास आहे? उ.दा. मी १ बोका असूनही एक माणूस पाळला आहे (त्याचे नाव "बंडया") अशी काही परिस्थिती आहे काय?
३. समलैंगिक लोकांना कायदेशीररित्या लग्नाची सोय हवी आहे का, पार्टनरच्या प्रोपर्टीमध्ये हिस्सा हवा आहे का, डायवोर्सची सोय हवी आहे का, डायवोर्स झाला की पोटगी हवी आहे का?
४. व्यक्तिचे लैंगिक आकर्षण हा खासगी प्रश्न नाही का? एखादी व्यक्ती समलैंगिक आहे की नाही याने काय फरक पडतो? त्यासाठी समलैंगिक लोकांनी टाहो फोडण्याची गरज काय? Do you think that "Don't ask-Don't tell" is not good enough?
5. समलैंगिक लोकांना समाजात आता जगणेही अशक्य झाले आहे का? की हा मुद्दा काढण्यामागे राजकारण आहे? लहान मुलांबद्दल आकर्षण वाटते असं कोणी म्हणाले तर child pornography कायदेशीर करावी का? उद्या जर एखाद्या "माणसाने" म्हटले की माझे माझ्या कुत्र्यावर आणि माझ्या कुत्र्याचे माझ्यावर अतोनात प्रेम आहे, आणि आम्हाला दोघांना लग्न करायचे आहे, तर त्याला समाजात मान्यता मिळावी की नाही?
कदाचित माझे विचार आधुनिक नसतील, म्हणून दुसरी बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न.
-- उपाशी बोका
10 Apr 2010 - 2:11 pm | प्रमोद काळे
मा. उपाशी बोका,
आपल्या सर्व शंका वाचल्या. या लोकांना नक्की काय हवे अहे ?
समाज मान्यता हवी आहे. मी गे आहे असे मोकळेपणाने सांगता यायला हवे आहे.
केवळ लैंगिकता भिन्न आहे म्हणून दिवाभितासारखे किंवा वाळीत टाकल्यासारखे आयुष्य नको आहे.
आपण म्हटल्याप्रमाणे हा संपूर्णपणे खाजगी मामला असायला हवा आहे.
या मुद्द्याचा लहान मुलांविषयी आकर्षणाशी काहीही संबंध नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरेच काय फरक पडतो? पण आज असे दिसते की फरक पडतो.
उघडपणे समलैंगिकता मान्यच करता येत नाही, कारण तसे केल्यास घरी दारी मानसिक कोंडमारा होतो.
मुळात हा रोग नाही, हे एक नैसर्गिक वास्तव अहे. त्याच्यावर उपचार नाहीत. हे मान्य व्हायला हवे आहे.
३७७ कलमानुसार समलैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहआधीएकशेसाठ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी केलेला हा कायदा आहे. आज ब्रिटनमध्येही हा कायदा अस्तित्त्वात नाही, पण आपल्याकडे आहे. हा बदलल्याशिवाय पुढील लग्नाचे हक्क,वगैरे प्रश्नच आजतरी उद्भवत नाहीत. पण हो. समलैंगिकांना ते सर्व हक्क हवे आहेत.
आणि हे सगळे घडायला आधुनिक (म्हणजे नक्की काय?) असायची गरज नाही. थोडे सहृदय असण्याची आणि शास्त्रीय विचारसरणी मान्य करायची गरज आहे.
इतक्या निरुपद्रवी वेबसाइटवरही लोक आपल्या खर्या नावाने सामोरे येत नाहीत, तर अशा लैंगिक अल्पसंख्यांकांनी काय करावे हे कोणी कोणाला सांगावे!!!
13 Apr 2010 - 2:20 am | उपाशी बोका
श्री. प्रमोद काळे,
आपल्या खुलाश्याबद्दल आभारी आहे.
>> आधुनिक (म्हणजे नक्की काय?)
मला liberal हा शब्द वापरायचा होता, पण योग्य शब्द सुचला नाही. त्याबद्दल क्षमस्व. (कोणी योग्य मराठी शब्द सांगू शकेल का?)
>> इतक्या निरुपद्रवी वेबसाइटवरही लोक आपल्या खर्या नावाने सामोरे येत नाहीत, तर अशा लैंगिक अल्पसंख्यांकांनी काय करावे हे कोणी कोणाला सांगावे.
आपण माझा सदस्य क्रमांक (७) बघितला तर आपल्याला कळेल की मी जुना सभासद आहे आणि मी नेहमी या नावाने लिखाण केले आहे. त्यात लपवण्यासारखे काही नाही.
>> समाज मान्यता हवी आहे. मी गे आहे असे मोकळेपणाने सांगता यायला हवे आहे.
आपल्या प्रतिसादावरून तरी असे वाटले नाही की समलैंगिक लोकांचा कोणी तिरस्कार करतो, जसा हिजडे, वेश्या यांचा होतो. मग समाज मान्यता म्हणजे नक्की काय? "गर्व से कहो हम गे है" असं म्हणत प्रभातफेरी काढायची आहे की "I am gay. Are you?" असं लिहिलेले टी-शर्ट घालून हिंडायचं आहे? लैंगिकता हा प्रत्येक व्यक्तीचा खाजगी प्रश्न नाही का? मी वाचलेल्या माहितीनुसार समलैंगिक हे इतर सर्वसामान्य लोकांसारखेच दिसतात, वागतात, जगतात. मग जर अशी परिस्थिती असेल तर स्वतःहून स्वतःच्या लैंगिक preference बद्दल अशी का जाहिरात करायची ते मला कळले नाही.
-- उपाशी बोका
13 Apr 2010 - 11:10 am | चिंतातुर जंतू
उदारमतवादी हा शब्द या अर्थाने मराठीत वापरला जातो.
कळण्यासाठी थोडे मागच्या काळात जाऊन थोडे वेगळे संदर्भ लावून पाहू. एकेकाळी समाजात बायकांचे स्थान दुय्यम होते. म्हणजे काय? तर बाई म्हणून जन्माला आल्यास सारखे मन मारून जगावे लागे. लहान वयात आवड न विचारता लग्न होई. उभा जन्म स्वयंपाकघरात, सासरच्या माण्सांची उस्तवार करत, मुलांना जन्म देण्यात आणि त्यांची काळजी घेण्यात जाई. नवरा आधी मेला तर मग पाहायलाच नको. सतीच जावे लागे, नाहीतर केशवपन करून सर्व वासना मारून उरलेले आयुष्य कंठावे लागे. थोडक्यात काय, तर उभा जन्म नरकात. आणि हे नॉर्मल जिणे बरं का! यात कुठेही देवदासी, बलात्कारित, परित्यक्ता वगैरे नाहीत.
त्या काळातल्या बहुसंख्य पुरुषांना 'यात काय विशेष?' असेच वाटे. आपले वरील प्रश्न आता त्या काळातल्या स्त्रियांविषयीच्या त्याच काळातल्या पुरुषांच्या मतांशी ताडून पाहू.
असे वाटले नाही की घरंदाज स्त्रियांचा कुणी तिरस्कार करतो, जसा देवदासी, वेश्या यांचा होतो.
मग समाजमान्यता म्हणजे नक्की काय? 'गर्व से कहो हम स्त्री है' असं म्हणत प्रभातफेरी काढायची आहे की 'मी स्त्री आहे. तुझं काय?' असं विचारत रस्त्यातून हिंडायचं आहे?
उत्तरः नको त्या पुरुषाच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या खस्ता खात जन्म वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या मर्जीनुसार लग्न करण्याचा (किंवा न करण्याचा) हक्क मिळण्यासाठी स्त्रियांना मोर्चे काढून जर मदत होणार असेल, तर का नको? अन्यायाला वाचा फोडण्याचा तो एक अहिंसक, लोकशाही मार्ग आहे.
स्त्रीत्व हा प्रत्येक स्त्रीचा व्यक्तिगत प्रश्न नाही का?
स्त्रिया या सर्वसामान्यांसारख्याच जगतात. मग त्यांनी स्वतःच्या स्त्रीत्वाची अशी जाहिरात करून त्याचं भांडवल का करायचं ते मला कळलं नाही.
उत्तरः स्त्रीत्व हा प्रत्येक स्त्रीचा व्यक्तिगत प्रश्न अर्थात आहे. पण तो तसाच राहावा, यासाठी प्रथम तिला हवे तसे जगण्याची मोकळीक मिळू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. जोपर्यंत ती होत नाही, तोपर्यंत स्त्रिया आपल्या स्त्रीत्वापोटी आपल्याला काय सहन करावं लागतं, हे इतरांपर्यंत पोचवण्यासाठी आपली 'स्त्री' ही ओळख जगाला ओरडून सांगणारच. आधी तिला माणूस म्हणून जगण्याचा हक्क द्या, मग ती स्वतःस 'माणूस' म्हणेल आणि स्वतःचं स्त्रीत्व व्यक्तिगत ठेवेल.
आता आपणास काही प्रश्नांची उत्तरे मिळणे सोपे जाईल, असे वाटते. नाहीतर स्त्रियांऐवजी 'दलित' घालून पाहा (आणि अर्थात दीडशे वर्षे मागे जाऊन स्वतःस एक ब्राह्मण पुरुष कल्पा).
समलिंगी लोकांची आजची परिस्थिती कशी आहे, आणि त्यांना मन मारून कसं आणि का जगावं लागतं याचा अंदाज येण्यासाठी आजची ही बातमीही वाचा. एक मध्यमवयीन, उच्चशिक्षित प्राध्यापक जर अशा गोष्टींना सामोरा जाऊ शकत नाही, तर मग सर्वसामान्यांचे काय?
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
17 Apr 2010 - 10:33 pm | प्रमोद काळे
मा. चिंतातूर जंतू,
माझ्या वतीने उत्तर लिहिल्याबद्दल धन्यवाद.
आपण दिलेले दाखले अत्यंत चपखल आहेत.
अशा व्यक्तिंचे वैयक्तिक जीवन खरोखर तोंड दाबून बुक्क्यांचा मार असे होते.
त्यांना खुलेपणाने मोकळा श्वास घेता यावा यासाठी कायद्यातच मूलभूत बदल व्हायला हवा.
आणि यासाठी सर्वप्रथम एकूण सामाजिक मानसिकता बदलणे आवश्यक आहे.
नाटक लिहिताना, बसवताना हे सग़ळे मनात नव्हते हे खरे, पण आज जे प्रत्येक प्रयोगानंतर घडते आहे ते पाहता खूप काही कळू लागले आहे.
शिक्षण कधीच संपत नाही हेच खरे.
-प्रमोद काळे.
11 Apr 2010 - 3:12 am | शुचि
>> लहान मुलांबद्दल आकर्षण वाटते असं कोणी म्हणाले तर child pornography कायदेशीर करावी का? >>
जेथे दोन्ही पार्टीज इच्छुक आहेत तेथेच "निरोगी" लैंगीक संबंध होऊ शकतात. त्यामुळे लहान मुलांचा मुद्दा मोडीत निघतो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
10 Apr 2010 - 8:22 am | सुधीर काळे
लेखाबद्दल थोडे प्रतिसाद आले. त्यात एका 'गे'चा प्रतिसाद खूपच सांगून गेला.
पण बरेचसे प्रतिसाद वाद-विवादातच गेले. हे इथे बर्याचदा झालेले पाहिले आहे व (लेखनस्वातंत्र्याची असले तरी व त्याचा सन्मान राखूनच) शक्यतो टाळावे असेही वाटते.
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
10 Apr 2010 - 10:42 am | अमोल केळकर
नाटकाबद्दल सुंदर माहिती दिली आहे. चर्चा ही छान चालू आहे.
वाशीत हे नाटक लागले की नक्की पहायला जाईन
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
10 Apr 2010 - 2:05 pm | प्रमोद काळे
मा. अमोल,
धन्यवाद.
आम्ही व्यावसायिक नाटकवाले नाही. समांतरवाले आहोत. असे विविध गावी जाऊन प्रयोग करायला आम्हाला नक्की आवडेल. पण परवडत नाही हो.
आपल्यासारख्यांच्या शुभेच्छांमुळे तसे जमो हीच इच्छा.
10 Apr 2010 - 3:16 pm | जयंत कुलकर्णी
मी लिहले होते पण जरा शास्त्रीय अभ्यास केला पाहिजे. जेनेटीक्सच्या दृष्टीकोनातून. अर्थात हा फार वैयक्तीक प्रश्न आहे या बद्दल मी ठाम आहे.
जयंत कुलकर्णी.
11 Apr 2010 - 12:27 am | प्रमोद काळे
Drop Box" width="12cm" height="8cm" alt="na yetee uttare ek drushya" />
19 Apr 2010 - 2:15 pm | झुम्बर
हे सगळ जे मन्ड्लय ते सुन्दर आहे पन हे सर्व अनैसर्गिक नहि का? त्यल कहि शास्त्रिय आधार आहे का?
आणी यात स्त्री सन्ख्या किति?
कारण आत्तापर्यन्त या विशयवर जे पाहिल त्यात मुलन्चेच प्रश्न दिसले अर्थत फायर चा अपवाद ......
तेन्डूलकरन्चि एक कथहि वचल्यच आठवत आहे.....
गे असन हे केवल त्यन्च लैन्गिक द्रुश्त्य वेगल असन असत कि ते सर्वच बब्तित वेगले असतात?????
19 Apr 2010 - 3:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अतिशय उत्तम चर्चा!
झुंबर, माझ्या माहितीच्या काही मुली समलैंगिक आहेत. अर्थात निसर्गात सगळ्याच गोष्टीत सिमेट्री असते, याही बाबतीत असायला काहीच हरकत नाही.
अदिती
25 Apr 2010 - 11:19 am | प्रमोद काळे
व्यर्थ नव्हे का ओंजळ जेथे शरीर सारे म्हणते पाज!
झुम्बर,
हे अनैसर्गिक नाही. अर्थात पूर्वी ते तसे मानले जात असे. पण संशोधनान्ती मानसतज्ज्ञांनी आता या गोष्टीचा नैसर्गिकपणा मान्य केला आहे. हे जन्मतःच येते.कुणामुळे वा कशामुळे होते असे नाही. आपण सेक्सचा संबंध फक्त पुनरुत्पादनाशी लावतो, (हा भारतीय संस्कृतीतला अजून उरलेला दांभिकपणाचा नमुना आहे!) म्हणून हे कदाचित अनैसर्गिक वाटत असेल, कारण अशा संबंधांमध्ये पुनरुत्पादन शक्य नाही. पण म्हणजे वात्सल्याची भावना नसते असे मात्र नाही. अनेक गे किंवा लेस्बियन्स मुले दत्तक घेऊन ही वात्सल्याची भूक भागवतात. अर्थात आपल्याकडे एकट्या व्यक्तीला (अविवाहित) मूल दत्तक देण्यालाही आत्ता आत्ताच परवानगी मिळाली आहे. त्यामुळे त्यात अनेक अटी, नियम वगैरे आहेतच.
एकूण लोकसंख्येच्या साधारण ३.५% गे (मुले) आणि १.५% लेस्बियन्स (मुली), तसेच सुमारे ३०% बायसेक्चुअल्स (उभयलिंगी आकर्षण असलेले) असतात असा अंदाज आहे.
विजय तेंडुलकरांच्या 'मित्राची गोष्ट' या नाटकात लेस्बियन मुलगी नायिका आहे.
रोहिणी हत्तंगडींनी ते काम फार सुंदर केल्याचे मी पाहिले आहे.
पण एकूणच या बाबतीत कमी लिहिले, बोलले जाते कारण अशा मुला-मुलींना मोकळेपणाने समाजात ही गोष्ट सांगणे आजतरी शक्य नाही. पुढे काय होईल काय माहीत. पण आज तरी अशा नाटकांतून हा प्रश्न लोकांपुढे मांडता येतोय, आणि त्याला प्रतिसादही मिळतोय हे काय कमी आहे !
25 Apr 2010 - 1:49 pm | सुबक ठेंगणी
पुढचे लिखाण आणि चर्चा यांची वाट मीही बघते आहे.
समलैंगिकतेचा विषय निघाला की मला इस्मत चुगताईची १९४१ साली लिहिलेली लिहाफ नावाची गोष्ट इथे नमूद केल्याशिवाय रहावत नाही.
16 Jul 2012 - 6:30 pm | मन१
अनवट वाट.
16 Jul 2012 - 7:44 pm | एमी
हम्म्म...
चिँजं ची www.misalpav.com/node/11623#comment-187741 प्रतिक्रिया गुवाहाटी आणि बागपत किँवा अस्पृश्यता, आरक्षण आणि पुणे करार या धाग्यांवर चालुन जाईल...