हिशेब पाप-पुण्ण्याचा ! ! !
हिशेब पाप-पुण्ण्याचा
चित्रगुप्त दरबारी चालला,
धाडती स्वर्गात अन नर्कासी सकलां
देऊनी पाप-पुण्ण्याचा दाखला ! !..
वेळ मजवर आली जवां
नरकात मजला लोटले,
शेजारच्या सुन्दरीस मात्र त्याने
स्व- शयनगृहे धाडिले ! !.
निरंजन वहालेकर
प्रतिक्रिया
25 Mar 2010 - 3:53 pm | बज्जु
चित्रगुप्त तुमच्यावर अब्रु-नुकसानीचा दावा ठोकणार भाऊ 8}
बज्जु
26 Mar 2010 - 7:13 am | शुचि
यावरनं एक जोक आठवला - नरकात एका माणसानी मर्लीन मन्रो ला गांधीजींच्या मांडीवर बसलेली पाहीली. तो म्हणाला "हा कसला शिंचा नरक? इथे गांधीजी तर मजा मारतायत." देव म्हणाला "ती मर्लीन मन्रो ला शिक्षा आहे." =))
~~~~~~~~~~~~~~~~~~~
हंसः श्वेतो बकःश्वेतो को भेदो बकहंसयो:|
नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः||
26 Mar 2010 - 8:38 am | चित्रगुप्त
हिशेब पाप-पुण्ण्याचा
चित्रगुप्त दरबारी चालला,
धाडती स्वर्गात अन नर्कासी सकलां
देऊनी पाप-पुण्ण्याचा दाखला ! !..
अहो, याविषयीचीच अगदी प्रारंभापासूनची सर्व कहाणी आम्ही "चित्रगुप्ताची कैफियत" या नावाने द्यायला सुरुवात केलेली आहे....
चित्रगुप्त.