सदर लेख संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे.
-शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक.
नुकताच सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात कृष्ण-राधा यांचा संदर्भ देऊन एकप्रकारे भारतीय कायद्यांना नवीन दृष्टिकोनातून पाहायला सुरवात केली. या गोष्टीची स्तुती करावी तितकी थोडीच. ज्या देशाचे सरकार राम अस्तित्वातच नव्हता, त्याच देशाचे न्यायालय कृष्णाचा आधार घेते, ह्यातच खूप मौज सामावली आहे.
असो. ह्याने काही नवीन प्रश्न सामोरे येण्याची शक्यता आली आहे. न्यायालयाने हिंदूंच्या देवाचा दाखला दिला, ह्यामुळे, सरकारच्या अधर्मी( म्हणजे धर्मरहीत) प्रतिमेला तडा गेला असेल काय? पुढच्यावेळी न्यायालय इतर धर्मातील पुराण कथांचा आधार घेणार काय? आता न्यायाधीश होण्यासाठी पुराणकथा माहिती असणे आवश्यक आहे का? असो.
ह्या धाग्याचा उद्देश, आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच की सर्वोच्च न्यायालयावर किती कामाचे ओझे आहे. आपण ह्या देशाचे नागरिक म्हणून आपण त्यांना मदत करायला हवी. ह्या धाग्यात भारतातील चुकीच्या कायद्याबद्दल लिहिले जाईल, त्याला पुराणातील संदर्भ दिला जाईल. आणि पुराणाच्या आधारावर काही नवीन कायदे करण्याबद्दल विनंती केली जाईल.
धाग्यात बरेचसे संदर्भ आले की पंतप्रधान, राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाला हा धागा अग्रेषित केला जाईल.
-मला आठवत असलेले काही संदर्भ टाकत आहे.
१. द्विभार्याप्रतिबंधक कायदा: कृष्ण आणि त्याच्या एका पेक्षा जास्त बायका
२. द्विपती-प्रतिबंधक कायदा: द्रौपदी आणि पांडव
३. विवाहाआधीच संतती: कुंती आणि सूर्य : कर्ण प्रकरण
४. जुगारात बायको आणि भाऊ पणाला: युधिष्ठिर द्यूत प्रकरण
५. भगिनीला तुरुंग: कंस
६. सामूहिक आस्वाद घ्यायचे नृत्य : मेनका, अप्सरा नृत्य, इंद्र दरबार
७. सामूहिक वस्त्रहरणः द्रौपदी - दु:शासन
मला आठवेल तशी मी भर घालेनच, तुम्हीही घाला.
टीप: हा धागा मौजमजेसाठी आहे.
प्रतिक्रिया
25 Mar 2010 - 8:49 am | प्रमोद देव
मस्त आहे धागा.
आता एकेक पुराणातले दाखले वाचतांना मजा येईल.
येऊ द्या लोकहो.
श्रीकृष्णाने केल्या त्या ’लीला’...आता कुणी केल्या तर ’चाळे.’ ;)
25 Mar 2010 - 8:58 am | युयुत्सु
रामायण हे आदर्शवादी काव्य तर आहे महाभारत हा इतिहास आहे असं विद्वानांचे मत आहे.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
26 Mar 2010 - 9:02 am | विशाल कुलकर्णी
रामायण हे आदर्शवादी काव्य तर आहे महाभारत हा इतिहास आहे असं विद्वानांचे मत आहे.>>>>
जर कृष्ण होता हे मानले तर तसे म्हणणे म्हणजे राम होता या मताला पुष्टी दिल्यासारखेच आहे. कारण पुराण राम आणि कृष्ण हे दोन्ही विष्णुचे अवतार आहेत असेच सांगते. .....हरे राम :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
25 Mar 2010 - 10:57 pm | नितिन थत्ते
प्रतिसादासाठी जागा राखून ठेवत आहे.
धागा विरंगुळा/मौजमजा म्हणून आहे त्यामुळे प्रतिसाद कॅन्सल.
नितिन थत्ते
25 Mar 2010 - 9:21 am | प्रचेतस
राधा हे पात्र हरदासी प्रतिभेचा अविष्कार आहे. मूळ महाभारतात व हरिवंशात राधेचा कुठेही उल्लेख नाही. न्यायालय अश्या काल्पनिक पात्राचा आधार घेते हे पाहून सखेद आश्च्रर्य वाटले.
-----------
वल्ली
25 Mar 2010 - 9:34 am | चित्रगुप्त
उत्तम....
हा धागा मौज-मजेसाठी असला, तरी फार महत्वाचा आहे, यातून प्राचीन चाली-रीतीं बद्दल मोलाची माहिती संग्रहित होउ शकेल.
विवाह हे अनेक प्रकारचे असत, गान्धर्व विवाह, राक्षस विवाह, वगैरे....
हे एकूण किती प्रकारचे होते, त्यात काय काय फरक/साम्य होते, वगैरे माहिती कुणाला आहे का? तसेच बीज-क्षेत्र न्याय, अनुलोम व प्रतिलोम विवाह असे बरेच काही वाचले होते....
इतिहासाचार्य वैद्य यांच्या महाभारताच्या अनेक खंडांपैकी एक मोठा खंड या विषयाला वाहिलेला आहे, पण ते वाचून फार वर्षे झाली.... ते ग्रंथ आता दुर्मिळ असावेत....
आंतरजालावर हे सर्व एके ठिकाणी कुठे वाचायला मिळेल?
रामच्या धनुर्भंगाचे एक चित्रः
विश्वामित्र - मेनका (रविवर्मा) :
25 Mar 2010 - 9:52 am | प्रकाश घाटपांडे
थोडी माहिती यंदा कर्तव्य आहे? इथे मिळेल
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
25 Mar 2010 - 10:45 am | अरुंधती
हिंदू विवाह ८ प्रकार : http://en.wikipedia.org/wiki/Marriage_in_Hinduism#EIGHT_TYPE_MARRIAGES
अनुलोम विवाह : पुरुष उच्चवर्णी, स्त्री नीचवर्णी
प्रतिलोम विवाह : स्त्री उच्चवर्णी, पुरुष नीचवर्णी.
अनुलोम विवाहास कुरकुरत परवानगी दिली असली तरी प्रतिलोम विवाह निषिध्द समजला जात असे.
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
29 Mar 2010 - 11:34 am | पंगा
अच्छा मतलब ते मैल सुपीरियर-फ़ीमेल सुपीरियर कर के ते लोग बोलून राहिले कुछ कुछ, काय ते याचे बाबत मधून आहे?
हाँ, ते ऐकून तो राहिले होते कि ते फ़ीमेल सुपीरियर चे बाबत मधून कुछ कुछ लोग ला ऐटिट्यूड़ प्राब्लम असते कर के. आता ते दुनिया चे अंदर हर तरह चे लोग असणार, कैसे कैसे लोग चे ख़यालात, ते काय बोलून राहिले... हाँ, विचारसरणी... ते कैसी कैसी राहणार, ते आपण काय बोलून राहणार? दुनिया ची पुरानी रीत आहे, गुरु... परवानगी मागून राहणार तो ऐसे ही होणार, दुनिया टाँग अड़वणार. आपण छोड़ देणार और आपण ला जे पसंद आहे बस वही करून घालणार तो दुनिया सीधी पेश येणार. और इस में परवानगी काय होऊन मागून राहणार? मैल सुपीरियर तो मैल सुपीरियर, फ़ीमैल सुपीरियर तो फ़ीमैल सुपीरियर, जो कुछ आहे ते सीधा करून घालणार, बस... बताना क्या और पूछना काहे को? ते काय आहे ना अंग्रेज़ी मधून बोलून राहिले ते, "डौन्ट आस्क, डौन्ट टैल"!
- पंडित गागाभट्ट
25 Mar 2010 - 10:55 am | अरुंधती
महाभारतातील नियोग पध्दतीने संतती?
रामायणात राम विवाहित पुरुष आहे हे जाणूनही शूर्पणखेने त्याला प्रपोझ करणे?
लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापणे?
सीता राजा जनकाची दत्तक पुत्री? की रावणाची संतती?
रावणाने सीतेचे, परस्त्रीचे केलेले अपहरण?
लक्ष्मणाने ज्येष्ठ बंधूखातर स्वस्त्रीपासून १४ वर्षे दूर राहणे???
रामाने सीतेचा केलेला अव्हेर??
रामाचा सिंहासनावरचा हक्क डावलून त्याठिकाणी भरताची नियुक्ती?
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
25 Mar 2010 - 11:02 am | समंजस
कोर्टाच्या या दाखल्यामुळे आश्चर्य वाटले आणि दु:ख सुद्धा झाले :(
कोर्ट सुद्धा आता राजनेत्यां प्रमाणे दुट्टपी धोरण ठेवून वागायला लागले तर :|
(आता पुराणकालीन न्यायपद्धत सुरु करावी का :? )
25 Mar 2010 - 11:04 am | II विकास II
>>(आता पुराणकालीन न्यायपद्धत सुरु करावी का Thinking )
शरीयतपण का?
25 Mar 2010 - 11:27 am | समंजस
शरीयतपण का?
आता हा वादाचा मुद्दा होउ शकतो :D
25 Mar 2010 - 11:10 am | युयुत्सु
मागे एकदा एका हायकोर्टाच्या न्यायाधीशाने भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणुन जाहिर केले होते तेव्हा फारसा कोणी आक्षेप घेतल्याचे ठाउक नाही.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
25 Mar 2010 - 10:01 pm | II विकास II
>>मागे एकदा एका हायकोर्टाच्या न्यायाधीशाने भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणुन जाहिर केले होते तेव्हा फारसा कोणी आक्षेप घेतल्याचे ठाउक नाही.
अजुन काही माहीती आहे का तुमच्या कडे?
26 Mar 2010 - 8:52 am | युयुत्सु
» 09/12/2007 14:08
INDIA
Judge rules Hindu epic poem ‘Bhagavad Gita’ a national religious doctrine
by Nirmala Carvalho
For S. N. Srivastava, of the Allahabad High Court in Uttar Pradesh, the state must recognise the Bhagavad Gita (a Hindu epic poem) as the national religious doctrine and impose it on members of other religions. Minority group leaders react angrily.
Allahabad (AsiaNews) – S. N. Srivastava, of the Allahabad High Court in Uttar Pradesh, has ruled that the state has a duty to recognise the Bhagavad Gita as rashtriya dharma shastra or national religious doctrine. According to the judge, the Bhagavad Gita, the most popular and best loved Hindu epic poems, must be taught to members of other religions.
http://www.asianews.it/news-en/Judge-rules-Hindu-epic-poem-%E2%80%98Bhag...
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
26 Mar 2010 - 8:59 am | II विकास II
माहीतीबद्दल धन्यवाद,
>>Minority group leaders react angrily.
मला हे अपेक्षित होते.
फारसे काही वादळ उडालेले दिसत नाही. तसा पाहीला तर हा बराच संवेदनशील विषय होउ शकतो.
26 Mar 2010 - 12:02 am | अक्षय पुर्णपात्रे
कुणी निकालाची प्रत वाचली आहे का? सुप्रीम कोर्टाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहे पण शोधण्यास जावे तर काही घडत नाही. शक्य असल्यास निकालाच्या प्रतीचा दुवा द्यावा, जेणेकरून नेमक्या कुठल्या संदर्भात राधा-कृष्णाचा उल्लेख आला आहे, हे कळू शकेल.
26 Mar 2010 - 3:38 am | प्रियाली
राधा आणि कृष्णाचा दाखला सुप्रीम कोर्टाने लिव-इन-रिलेशनशिपबाबत दिल्याचे खरेच असेल तर सुप्रीम कोर्टाचे टाळके फिरले असावे.
राधा आणि कृष्ण हे राधा-कृष्णाची मंदिरे सोडून कधीही एकत्र नांदल्याचे आठवत नाही.
असो. धागा मजेशीर आहे. सुप्रीम कोर्टाने लवकरच
१. द्रौपदीप्रमाणे पाच पती ठेवण्यास हरकत नसावी.
२. कंसाप्रमाणे बापाची इस्टेट बळकवण्यास हरकत नसावी.
३. कृष्ण-अर्जुनाप्रमाणे हवी असलेली जागा बळकवण्यास हिंसेचा वापर करावा. (खांडवदाह - फावलेच सर्व बिल्डरांचे)
४. आपल्या सुनांना पुत्र नसेल तर त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना इतरांशी संग करण्यास लावावे. (उदा. व्यास - अंबिका, अंबालिका)
वगैरे उदाहरणे पुढे केली नाहीत म्हणजे मिळवली.
26 Mar 2010 - 9:03 am | युयुत्सु
This is contempt of the court! याचे भान असू द्या...
युयुत्सु
------------------------------------यअचं
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.