मित्रांनो हे माझे पहिलेच लेखन आहे..काही त्रुटी राहिल्या असल्यास क्षमस्व...
२००७ च्या पावसाळ्यात आम्ही चार जण माथेरानला हुंदडायला गेलो होतो..त्यातील काही फोटो आणि त्याचे वर्णन येथे देत आहे...
जेव्हा आम्ही तिथे गेलो त्यावेळी ढगफुटी झाल्यासारखा पाउस कोसळत होता..आणि माथेरनची टॉय ट्रेन जून ते नोव्हेंबर बंद असते..
हा पहिला फोटो सह्याद्री एक्सप्रेस मधून खंडाळ्याच्या स्टेशन जवळ काढला आहे...
आणि हा फोटो नेरळ स्टेशन जवळचा..!!
माथेरानला जाण्यासाठी नेरळला उतरावे लागते..टॉय ट्रेन चालू असताना नेरळ ते माथेरान ट्रेनने जाण्याची मजा घेतलीच पाहिजे...जेव्हा ट्रेन बंद असते तेव्हा नेरळ ते माथेरान शेअर टॅक्सी मिळतात...
या ठिकाणा पर्यंत टॅक्सीने जाता येते..
येथून पुढे साधारण ४ कि.मी. मस्त चालत जायचे..चालत जाताना असा निसर्ग कायम आपल्या सोबत असतो...
ट्रेनच्या रूळांवरूनच चालत जावे लागते...
असा मनमोहक निसर्ग आपल्या बरोबर असल्यामुळे आपण ४ कि.मी.कधी चालत गेलो हे आपल्यालाही कळत नाही..
हे त्या टॉय ट्रेनचे ईंजिन आहे..
आणि हे माथेरान स्टेशन..!!
जरी माथेरान मध्ये १२८ पॉईंट असले तरी त्यातले प्रसिद्ध पॉईंट हे आहेत..
हा आहे एको पॉईंट...याच्याविषयी फारसे काही सांगावे लागणार नाही...!! :>
हा आहे लुईझ्झा पॉईंट...येथे खूप ऊंच कडा आहे..आणि त्याला तिन्ही बाजूंनी दरी आहे..त्यातून प्रचंड वारा असतो,त्यामुळे एकदम थ्रिलिंग असा अनुभव आहे हा पॉईंट म्हणजे..
हा मलंग पॉईंट..येथे फोटोमध्ये दिसत नाहिये,पण एक मस्त धबधबा आहे..जो कधी-कधी जोरदार वारे असल्यामुळे ऊलटा वरती येत असतो..
असे धबधबे आपल्याला खूप ठिकाणी दिसतात...!!!
आणि जंगल सुध्दा अजूनही 'जंगली' आहे... =D>
त्याच जंगलात एक जांभळाचे झाड पावसामुळे पडले होते..
ब्रिटिश काळातील कोण्या एका डॉक्टरचा हा बंगला..आता हा 'भूत'बंगला वाटतोय..पण अजूनही शानदार दिसतोय...
जावेसे वाटत नव्हते,पण जाताना काढलेला हा शेवटचा फोटो...
प्रतिक्रिया
24 Mar 2010 - 8:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर फोटो आणि वर्णनही
-दिलीप बिरुटे
24 Mar 2010 - 11:19 pm | कैलास२४३
धन्यवाद....!!! 8>
25 Mar 2010 - 6:08 am | बेसनलाडू
(वाचक)बेसनलाडू
24 Mar 2010 - 9:37 pm | शुचि
मस्त छायाचित्रं
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
24 Mar 2010 - 11:18 pm | कैलास२४३
धन्यवाद....!!! 8>
24 Mar 2010 - 11:34 pm | विसोबा खेचर
सुंदर रे!
25 Mar 2010 - 2:06 am | रेवती
सगळे फोटो भन्नाट आलेत!
तो भूतबंगल्याचा फोटो भारी!
रेवती
25 Mar 2010 - 2:58 am | पिंगू
अतिशय नयनरम्य फोटो आहेत!!!!!!!!
25 Mar 2010 - 6:06 am | राजेश घासकडवी
सुंदर आलेली आहे... काही मोजके सेपिया टोनमध्ये केलेले फोटोदेखील छान आहेत.
राजेश
25 Mar 2010 - 11:19 am | समंजस
माथेरान खुपच सुंदर आहे!!
भारतातील एकमेव हिलस्टेशन जिथे गाड्यांना(मोटारींना) बंदी आहे. घोड्यांना मात्र नाही :) (माझ्या माहिती प्रमाणे).
त्यामुळे इथला अनुभव वेगळाच वाटतो.
वरील सर्व छायाचित्रे सुंदर आली आहेत :)
26 Mar 2010 - 3:55 pm | कैलास२४३
नावाप्रमाणेच तू समंजस असावास..!! तिथे फक्त घोडे चालतात..गाड्या नाही...
प्रतिक्रिये बद्द्ल धन्यवाद....
---कैलास..
25 Mar 2010 - 12:10 pm | झकासराव
फोटो मस्त आहेत. :)
पण फारच छोटे आहेत.
जरा मोठ्या आकारात असते तर बर झाल असत.
26 Mar 2010 - 3:51 pm | कैलास२४३
झकासराव,मला अजून नीट कळाले नाहीये फोटो कसे चिकटवायचे ते..तू काही tips दिल्यास तर पुढच्या वेळी मोठे फोटो टाकेन..!!
26 Mar 2010 - 1:38 pm | मी-सौरभ
:?
-----
सौरभ :)
27 Mar 2010 - 9:34 am | अमोल केळकर
मस्तच आहेत फोटो.
नुकताच मी देखील गेलो होतो. ही पहा माथेरानची झुकझुक गाडी
-------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
27 Mar 2010 - 2:39 pm | चक्रमकैलास
छान आलेत ट्रेन चे फोटो..तू फोटोचा साईझ कसा काय मोठा केला आहेस..?? मला पण मोठे फोटो टाकायचे होते,पण नाही जमले...
नसूनही असलेला चक्रम कैलास...!!