आमची काही चित्रे

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in कलादालन
20 Mar 2010 - 11:53 am
कलासंस्कृती

प्रतिक्रिया

डावखुरा's picture

20 Mar 2010 - 11:59 am | डावखुरा

चित्र आहेत कुठे?
"राजे!"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Mar 2010 - 12:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चित्रं आवडली.

तुमचं नाव चित्रगुप्त घेतलं आहेत म्हणून चित्रं गायब झाली आहेत का? ;)

अदिती

चित्रगुप्त's picture

20 Mar 2010 - 12:02 pm | चित्रगुप्त

http://www.flickr.com/photos/30722169@N00/

चित्रे येथे आहेत, परन्तु मिपावर का येत नहीत, कळले नाही...

टारझन's picture

20 Mar 2010 - 12:06 pm | टारझन

मालक .. ३ स्टेप मधे चित्र लावा

१. चित्र ब्राऊझर मधे ओपन करा
२. चित्रावर राईट क्लिक करुन कॉपी इमेज लोकेशन सिलेक्ट करा.
३. ह्या रिच टेक्स्ट बॉक्स वर असलेल्या बटन्स पैकी उजवीकडुन ७वे बटन सिलेक्ट करुन त्यात पेस्ट करा.

झाले. :)

टारझन's picture

20 Mar 2010 - 12:03 pm | टारझन

सगळीच छायाचित्रे उत्तम ! सुरेख ...
अप्रतिम आहेत . अजुन येऊ द्या साहेब :)

- गुप्तचित्र

चित्रगुप्त's picture

20 Mar 2010 - 12:08 pm | चित्रगुप्त

ही सर्व चित्रे आम्ही वेळोवेळी प्रसवलेली तैल चित्रे आहेत....

वेताळ's picture

20 Mar 2010 - 12:22 pm | वेताळ

अंजठा वेरुळची वाटत आहेत.
वेताळ

चित्रगुप्त's picture

20 Mar 2010 - 12:42 pm | चित्रगुप्त

ही चित्रे अमुक एका ठिकाणची अशी नाहीत, काल्पनीक, पण वेळोवेळी निरनिराळ्या ठिकाणी बसून केलेल्या चित्र-साधनेचा परिपाक वगैरे आहेत.....

समंजस's picture

20 Mar 2010 - 1:15 pm | समंजस

सुंदर आहेत चित्रे!!!

राजेश घासकडवी's picture

20 Mar 2010 - 5:45 pm | राजेश घासकडवी

खूप चित्रं अतिशय आवडली. जीएंच्या शापित शहरांप्रमाणे ती गूढ, चमत्कृतीपूर्ण वाटतात.

या चित्रांपैकी एका विशिष्ट चित्राचा असा अर्थ लावणं जमलं नाही. पण अनेक प्रतीकं वारंवार येताना दिसली. घरं, पूल वगैरेसारख्या उघड नागर रचना - पण आकारांवरून त्या ऐतिहासिक कालीन वाटल्या. त्यामध्ये विखुरलेल्या गणेश, बुद्ध सारख्या दैवी प्रतिमा दिसल्या. तसंच झाडांची ओबडधोबड मुळं पारंब्यांसारखे आकार दिसले. ते काही वेळा प्रवाह वाटतात, काही वेळा त्यात शोक करणारे मनुष्याकार दिसतात. एकंदरीत तुम्ही भारतीय संस्कृतीचं चित्रण करता आहात असं वाटलं. पण त्यापलिकडे काही कळलं नाही.

तुमच्या चित्रांविषयी थोडं सांगा.

राजेश

चित्रगुप्त's picture

20 Mar 2010 - 6:28 pm | चित्रगुप्त

चित्रांविषयी शब्दात लिहिणे कठीणच. तरी आम्ही आमच्या चित्राविषयी खरडलेला आन्ग्ल भाषेतील मजकूर येथे देत आहोत.....हा प्रयत्न देखील अपुराच....आणी आपल्याला जे सान्गायचे आहे, ते शब्दात शक्य असेल, तर चित्र काढायची गरजच काय?....
My recent paintings depicting ancient Indian architecture evoke a sense of nostalgia for the days gone by. They bear a close relationship with my personal life experiences including numerous visits to ancient places witnessing a long sequence of human and natural history. In my dreams, I view myself wandering in and around the ancient castles, temples, havelis, rocks and old banyan trees. I feel a strong bond with all these. Thus the element of time, mingled with mystery and the spiritual quest inspires me to paint. I paint with a mood of joy and wonder, with my own ideas about Art. My present style and technique is evolved from my past work, which was both realistic and abstract. I would like viewers to conceive my art in their own way, rather than imposing any thought, issue or an ideology on them. That is why most of my paintings are untitled.

राजेश घासकडवी's picture

20 Mar 2010 - 6:56 pm | राजेश घासकडवी

आणी आपल्याला जे सान्गायचे आहे, ते शब्दात शक्य असेल, तर चित्र काढायची गरजच काय?....

कलावंताची अभिव्यक्तीची भाषा आणि समीक्षकाची निरूपणाची भाषा दोन वेगवेगळ्या असू शकतात. मला वाटतं मिपावर येणारे वाचक/लेखक शब्दांशी जास्त परिचित असतात, चित्रांच्या भाषेशी कमी. त्यामुळे जाणकाराने थोडे प्रयत्न केले तर सामान्यांना बारकावे समजायला अधिक मदत होते. तात्या संगीताविषयी शब्दांतच लिहितात ना, तसंच.

राजेश

चित्रगुप्त's picture

20 Mar 2010 - 7:30 pm | चित्रगुप्त

बरोबर........अर्थात तसाही प्रयत्न करायला हवाच...
अरेच्या.....तुम्ही सान फ्रान्सिस्को कर काय, आम्ही आमची दोन चित्रप्रदर्श ने तेथील सोमार गालरी मध्ये केली आहेत, तेंव्हा कल्पना नव्हती......

नरेश_'s picture

20 Mar 2010 - 7:50 pm | नरेश_

आवडली...
येऊ द्यात अजून.

शब्द जपून वापरा, नंतर कदाचित कमी पडतील. ;)