चित्रपटांची व सिरियल्सची गमतीदार शिर्षके!!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
17 Mar 2010 - 3:11 pm

(यात कुणालाही, कशालाही दुखावण्याचा हेतू नाही. फक्त मनोरंजन आणि विनोदनिर्मितीसाठी मी हे लिहिले आहे.)

आपल्या मराठी चित्रपटांचे पूर्वी सासू-सून-नणंद-भावजय-कुंकू याप्रकारचेच कथानक असायचे. नावेही तशीच असायची. मला तशी काही नावे सुचत आहेत. आणि जर हिंदी चित्रपटांप्रमाणे काही नावांच्या पुढे अर्थदर्शक शब्द किंवा वाक्य टाकले तर कशी गंमत येईल ते मी खाली देत आहे.

तुम्हीही सुचवू शकता प्रतिक्रियेद्वारे अशी काही गमतीदार नावे:

  • थरारक सासू - दी अल्टीमेट टॉर्चर
  • बावरलेला नवरा - नवरा अंडर फायर
  • माहेरचं मांजर- कॅटवूमन गेम
  • मांजरीचं माहेर
  • आहेर फेकला बाहेर
  • बाहेरचा आहेर- एका अयशस्वी आहेराची कथा
  • माहेरचा तवा- द "फ्राय" स्टोरी
  • लेक चालली सासरला (वर्षातून एकदा)
  • जाऊबाईच्या नणंदेची सासू- द अल्टीमेट रिलेशन्शीप
  • खवळलेली सासू- चवताळलेली सून - एक जगजाहिर जुगलबंदी
  • चतुर कावळा - भोळी मैना- एका पक्षीप्रेमीची कथा
  • एका मामे-सासूची गोष्ट
  • नणंद बनवी भडंग- चविष्ट कथा
  • सासूचा थयथयाट - एका नृत्यप्रिय खाष्ट सासूची कर्मकहाणी
  • डोंबिवलीच्या सासूबाई खाष्ट - (डोंबिवली फास्ट चे सासू व्हर्जन)
  • माझी लेक- तुझी सून
  • माझ्या सूनेचा सासरा
  • थांब सुने केस ओढते! (द्वंद्व कथा)
  • सासऱ्याच्या सासूचं माहेर
  • सासूच्या सासऱ्याच्या माहेरचा कचरा- गंभीर होत चाललेल्या कचराप्रश्नावर जळजळीत भाष्य
  • माहेरची गाडी
  • माहेरची फ्लॉपी - करूया कॉपी
  • माहेरची हार्ड डिस्क-एक रिस्क
  • ९ गिगा बाईट चा आहेर
  • डीजीटल आहेर
  • काका-नाना-मामा-दादा....
  • स्टीलचा गॅस
  • हळद झाली पिवळी
  • हळद पुसली- कुंकू धुतलं
  • सासू ऍट द रेट आदळापट डॉट संताप-फिमेल्सची इमेल कथा
  • धाकटा बोका
  • शाब्बास सूनबाईची सासू!
  • सासरा पळाला सासरी
  • भावजयीचा भाचा- नणंदेचा नाना
  • भावाची भाभी
  • भुताचा भाचा
  • सासवेची आसवं...

आणि एकता कपूरच्या क छाप सिरियल्स -

  • क्यों की कुत्ता भी कभी काटता था
  • कुसूम के काकी के कौवे की कसम
  • कौन किसको काटे?
  • क्या करू कमला?
  • कमला करे काम
  • कैसी कैसी कहानी!!
  • कब कैसे कौन कौन कही कही
  • कहानी कामचोर की
  • कुसूम के काकी के काका की कागज की कश्ती की कहानी
  • कसौटी कुसुम के कैची की ( एका लेडीज टेलर ची कथा )
  • कसलेली सासू - कच्ची सून
  • कुसूमच्या माहेरची कच्ची कैरी
  • कैरी झाली आंबा

आजकालच्या मालिकांची मजेशीर 'विवाहबाह्य' नावे!
(एकता कपूर च्या मालीकांमध्ये अगदी प्रमाणाबाहेर, अजीर्ण होईल ईतके विवाहबाह्य संबंध दाखवले जातात. त्यामुळे तो काळ आता दूर नाही की मालिकांची नावे खालील प्रमाणे असतील)

  • पहले पती की पहली शादी
  • मेरे चौथे पती के सातवे लडके की तिसरी गर्लफ्रेंड
  • अगली करवाचौथ नया पती
  • कौनसा पती?
  • दो नंबरी पती
  • पॉचवे पीया का घर
  • पहले पती का पता
  • तेरा तिसरा पती सिर्फ मेरे पहली पत्नी का है
  • हमारा पती
  • मरी गर्लफ्रेंड के पती का बॉयफ्रेंड
  • कौन किसका पती?
  • मेरे पेहले पती का दुसरा पाप

एकता कपूर प्रायोजीत परीक्षा:

प्रश्न १ : योग्य पती निवडा व योग्य पत्नी शी जोड्या लावा

प्रश्न २ : खाली दिलेल्या नायिकांची दुसरी लग्ने कधी झाली, कशी व का मोडली ते एका वाक्यात स्पष्ट करा.

प्रश्न ३ : एका जन्मात सात लग्ने, तर एकूण फेऱ्यांची संख्या किती?

प्रश्न ४ : एका वर्षाच्या आत दोन लग्न केलेल्या नायिका किती ?

--- निमिष सोनार, पुणे

माझ्या कार्टून्स च्या ब्लॉग ला जरूर भेट द्या:
http://cartoonimish.blogspot.com
इतर ब्लॉग्ज-
http://nimish-marathi.blogspot.com
http://nimish-english.blogspot.com

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

17 Mar 2010 - 3:23 pm | विसोबा खेचर

मस्त! :)

बाकी प्रतिसाद सवडीने..

तात्या.

झुळूक's picture

17 Mar 2010 - 5:10 pm | झुळूक

मेरी गर्लफ्रेंड के पती का बॉयफ्रेंड
पती का बॉयफ्रेंड
अशा संबंधावरतीही सिरियल्स निघतीलच म्हणा!

टारझन's picture

17 Mar 2010 - 7:43 pm | टारझन

सगळेच फोटू सुरेख ... कोणता क्यामेरा वापरला ? :)

- मेणाचा मेण्बत्ती

निमिष सोनार's picture

17 Mar 2010 - 9:17 pm | निमिष सोनार

माझे दृश्य नाव आहे - क्षणाचा सोबती
माझे नांव- निमिष सोनार.
निमिष म्हणजे "क्षण".
मग मी ठरवले की क्षण किंवा क्षण या शब्दाशी संबंधीत काहीतरी घ्यायचे.
मग्-अनेक नावे सूचली-
जसे- क्षणार्ध, क्षणभंगूर, क्षणीक वगैरे
मग शेवटी क्षणाचा सोबती हे नाव मिसळपाव वर घ्यायचे पक्के ठरवले.
.....त्यावरून अनेकांना गमतीदार नावे सूचतात...
अन सगळयांची करमणूकही होते.
उदा टारझन यांना सूचले-"मेणाचा मेणबत्ती"
तसेच मलाच आता यावरून प्रेरणा घेवून या नावाशी साधर्म्य असलेली नावे सूचताहेत-
(ही नावे वापरायची असल्यास मिसळपाव वर टोपण नाव म्हणून वापरू शकतात)

  • कुणाचा सोबती?
  • अण्णांचा सोबती
  • तेलाचा दिवा
  • शेणाची गोवरी
  • वाळूचा बाळू
  • मेथीची जूडी
  • बटाट्याचा पराठा
  • वांग्याचं भरीत
  • काकडीची कोशींबीर
  • मिरचीचा ठेचा...

पुष्कळ नावे बनवता येतील.
असो.
टारझन साहेबांचे धन्यवाद.

पक्या's picture

17 Mar 2010 - 9:23 pm | पक्या

गमतीदार शिर्षके.
काही क्षण छान करमणूक झाली.

जय महाराष्ट्र , जय मराठी !

नावातकायआहे's picture

17 Mar 2010 - 9:53 pm | नावातकायआहे

नाही टारझन साहेब,

वाडगा भर हळद सर्वात शेवटी ....

निमिष सोनार's picture

18 Mar 2010 - 12:31 pm | निमिष सोनार

प्रतिसादाचा नीट अर्थ कळला नाही.
आपल्या प्रतिसादात/ प्रतिसादाचा नेमका अर्थ काय आहे?