उत्तर -दक्षीण

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
17 Mar 2010 - 9:43 am

आपण बरेचदा एखाद्या ठीकाणची माणसे आपल्या नजरेतून जोखत असतो.
आपली नजर म्हणजे अगदी आपला दृष्टीकोन...परस्पेक्टीव्ह्.....आणि त्यातूनच मग शेरे मारत असतो.
आणि मग आपण आपले ठरवतो अमूक भागातले लोक अमूक प्रकारचे असतात..... उदा :सरदारजी शूर असतात
बीहारी माठ असतात दिल्ली कडचे लोक फार बनेल असतात. पंजाबी गोडबोले असतात , मारवाडी लोक चिकट असतात , आगरी लोक विनोदी असतात वगैरे वगैरे
आणि त्यावरून मग त्या त्या भाषीक्/भौगोलीक लोकांशी कसे वागायचे ते ठरवतो. उदा पंजाबी सिंधी माणसावर अजिबात विश्वास ठेऊ नये
खरे तर प्रत्येक समाजात प्रत्येक प्रकारचे लोक असतात्...शूर ,भित्रे विश्वासू , लबाड ,चिकट, उधळे खरे वागणारे , दिलदार असे सगळ्या प्रकारचे लोक असतात. यात आपण मराठी लोकांबद्दल मात्र मौन पाळून असतो. पन त्यातही भौगोलीक प्रादेशीक जातीनिहाय बोलायला लागलो की एकदम खुलतो उदा: कोकणे मन लावून कष्ट करतील , विदर्भातील लोक आळशी , पश्चीम महाराष्ट्रीय लोक उद्योगी वगैरे वगैरे
हे अर्थात विदर्भातील लोक बोलायला लागले की ते म्हणणार वैदर्भीय एकदम दिलदार... तुम्ही लेको चिकट पुणेरी
आपल्या आपली संस्कृती सोडून इतर कोणत्याच संस्कृतीबद्दल फारसे माहीत नसते. त्याबद्दल आपण जाणुन घ्यायला उत्सुक नसतो. कारन एकदा एखाद्या संस्कृतीला लेबल चिकटवून मोकळे झालो की आपण त्याचे पुरावे जमा करायला लागतो आणि ते इतराना पटवून द्यायला लागतो
मी सध्या इकडे तमिळनाडूत आहे...... एका थोड्याशा लहान गावात आहे. तमिळनाडू म्हणजे आपल्याला मद्रास रामेश्वर उटी इतकेच माहीत असते.
दक्षीणी चित्रपटात दिसते तीच भदक बटबटीत इथली संस्कृती आहे असे आपल्याला वाटत असते.
इथल्या समाजाशी संपर्कात आलो आणि काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या
भारतात उत्तर आणि दक्षीण हे केवल भाषावार्/लिपीवार असलेले भौगोलीक वेगळे विभाग नाहीत
एकूणच त्यांच्या स्वभावात वागणूकीत फरक आहे.
हा फरक संस्कृतीक आहे.
उत्तरभारतीय पंजाबी माणूस एकदम मोकळाढाकळा वागतो. तो पटकन एखाद्याशी जवळीक साधतो. पटकन कोणाशीही चहा, खाना ,खिलाना वगैरे ची ओळख करून घेतो. थोड्याच वेळात एकदम फार जुनी दोस्ती असल्याप्रमाणे सलगी दाखवायला लागतो
मद्रासी लोक एकदम या विरुद्ध.. पटकन मोकळे होत नाहीत. कोणी एकदम चहाला बोलावले तर त्याना एकदम हा माणूस इतका का सलगी दाखवतोय या विचाराने काहीतरी कारण दाखवून यायचे टाळतील
जेवणखाणात भौगोलीक हवामानानुसार फरक असतोच पण मुख्य फरक जाणवला तो म्हणजे उत्तरेकडे गरीब आणि श्रीमंत यांच्य आहारात बरीच तफावत आढळते. श्रीमंत पनीर मलाइ कोफ्ता वगैरे खाईल तर गरीब दाल चावल वर भागवेल . दक्षीणेत हा भेदाभेद फा॑रसा आढळत नाही. श्रीमंत आणी गरीब दोघांच्याही आहारात दोसे इडली संबार पोंगल असेल्...फारझाले तर इडीअप्पम वगैरेपुरताच फरक आढळेल.
उत्तरेकडे गोड पदार्थांची रेलचेल आढळेल. लाडू पेढे जिलेबी पेठा इमृती बर्फी वगैरेंचे शेकडो प्रकार आढळतील.
दक्षीणेत पायसमचे चारपाच प्रकार, शकरी पोंगल यापुढे गाडी जात नाही
खाताना देखील चमचे वाट्या वगैरेचे चोचले नसतात. अगदी उत्तमोत्तम हाटेलातदेखील केळीच्या स्वच्छ पानावर वाढतील. चटणी सांबार रस्सम एकाच पानावर घेतील आनि सांबाराच एओघळ पानाबाहेर जायच्या आत संपवून ही टाकतील
जे आहाराचे आपल्याला ते थोडे अवघडच जाते.
मी एका तेलगु मित्राला भात खातान बोटांसहीत संपूर्ण तळहात रस्सम मध्ये ओला कशासाठी करतो म्हणून विचारले. तो म्हणाला " मला माहीत आहे की ते फारसे चांगले दिसत नाही पण आम्हाला तशी लहानपणापासून सवय लावली जाते. तळहात भिजला नाही याचा अर्थ तु भात नीट खात नाहीस. अन्नाला टाळतो आहेस असा विचार करून घरातली मोठी माणसे रागवतात."
अन्नाचा स्पर्ष आपली भूक जागॄत करतो .
हे मी नव्यानेच ऐकत होतो.
मी कोणाशी तरी बोलताना तो मला म्हणाला की तुम्ही नॉर्थ इंडीयन्स एकदम अ‍ॅग्रेसीव्ह असता.
मला अगोदर त्याने मला नोर्थ इंडीयन म्हंटले म्हणून थोडा रागच आला. मी त्याला म्हणालो की मी मराठी आहे. उत्तर भारतीय नव्हे. त्यावर त्याचे म्हणणे की कर्नाटकच्या वरचे सगळेच उत्तर भारतीय. तुम्ही वागायला एकदम अ‍ॅग्रीसीव्ह असता.
म्हणजे?
हे बघ ना कधी ही फा॑रशी ओळख देख नसताना सुद्धा अचानक घरी चहाला बोलावता/ पार्टीला बोलावता.
मद्रासी माणसाला याची सवय नसते. तो स्वतःच्या कोशात असतो. आपला समाज सोडून तो फारस कोणात मिसळत नाही. मिसळला तरी पटकन हसून वागेल , विनोद करेल, टाळ्या देईल याची शक्यता कमी.
पुरुषसुद्धा एरव्ही भरतनाट्याम करतील पण आनंदाच्या क्षणी हवेत हात उंचावून नाचणार नाहीत.
सार्वजानीक ठीकाणी आनंदाचे प्रदर्शन करणार नाहीत. पण मयतीला ढोल ताशे बॅन्ड वाजवतील...... मृत्यू हा आत्म्याच्या मुक्तीचा आनदोत्सव म्हणत अंतयात्रेच्या पुढे नाचतील.
आपल्या थोडे वेगळेच वाटते.
राष्ट्रभाषा वगैरे हिंदी भाषीकांच्या आगाव वल्गनाना त्यानी व्यवस्थीत केराची टोपली दाखवलेली असते. याना हिंदी येत नाही याचे आपल्याला आश्चर्य वाटते. ते मुद्दम असे करतात असेदेखील आपल्याला वाटते. पण वस्तुस्थिती अशी आहे की हिंदी वगैरे शब्दांची मराठीचे नाते आहे तसे इथल्या कुठल्याच भाषेशी हिंदीचे नाते दुरूनसुद्धा नाही. लिपी वेगळी आहे शब्द वेगळे असणे सोडा काही अक्षरांचे उच्चार सुद्धाअ वेगळे आहेत. उदा तमीळ भषेत " ह" हे मूळाक्षर नाही. महाराष्ट्र हा शब्द येथे मगाराष्ट्रा असा केला जातो. द चा उच्चर त च्या जवळ पास जातो.श हा उच्चर नाही महेश हा शब्द मगेस असा लिहिला आणि बोलला जातो . वैदेही चा उच्चार वैतगी असा होतो. शा चा उच्चार स असा होतो. मुरुगेशन. शिवाजी हे शब्द सिवाजी मुरुगेसन असे लिहिले जातात.
क ख ग साठी वेगळे उच्चर नाहीत ..खाना खाया आणि गाना गाया हे एकच होते.
अ आ इ वगैरे आहे पण ए साठी सर्रास ये असे म्हंटले जाते. ये फार अ‍ॅपल असेच सर्वत्र होते.
एच ऐवजी हेच. उदा एच ए एल असे म्हणायच्या ऐवजी हेच ये येल म्हनतात. शाळेत असेच शिकवले जाते.
आपण एच असे म्हंटले तर बरेचजणाना ते समजत नाही.
मल्याळीचा तर वेगळाच प्रकार.
त्या भाषेत ल अक्षराचे तीन वेगवेगळे उच्चल आहेत. ल ळ आणि ळ्य. ळ्य चे स्पेलिंग zh असे केले जाते. द्रवीड मुन्नेत्र कझगम हे त्यापैकीच.
ट च्या उच्चारासाठी T तर त च्या उचारासाठी TH वापरला जातो. त्यामुळे स्वाती चे स्पेलिंग स्वाथी असे होते. मारुती मोटर्स चे मारुथी मोटर्स असे होते. नमिता चे स्पेलिंग नमिथा होते. हे बाळकडू शाळेतच मिलालेले असते.
अजून एक राम चे स्पेलिंग शेवटच्या व्यंजनाचा उचार स्वराने पूर्ण केला जातो त्यामुळे Rama असे होते.
प ब आणि ट ड यांची सरमिसल होते. हे वेण्ड डू द डेम्बळ अँड रँग द बेळ्... हे वाक्य ही वेन्ट टू द टेंपल अँड रँङ द बेल असे आहे हे समजून घ्यावे लागते. पेरीबरळ्स या शब्दाचे स्पेलिंग पेरीफेरल्स असे होते हे नव्याने कळते
पॉर्ट नंबर म्हणजे पार्ट नंबर.
दक्षीण भारतीयाने कधी हिंदी बोलायचा प्रयत्न केला तर त्याची यथास्थीत टिंगल केली जाते. तो हिंदी बोलायच अप्रयत्न करतोय हे लक्षातच घेतले जात नाही.
अगोदरच अवघड परकी भाषा आणि त्यात अशी हेटाळणी सहाजीक्च भाषेबद्दल प्रेम वगैरे वाटणे जरा कमीच होत जाते.
बंगलोर हैद्राबाद वगैरे शहरे सोडली किंवा उटी वगैरे प्रवासी गावे सोडली तर हिंदी कुणालाच येत नाही. येवढेच काय अमिताभ बच्चन सोडता फारसे हिंदी कलाकर कोणाला ठाऊक नसतात. अगदी चांगले गाजलेले हिंदी चित्रपट कोणी पाहिलेलेच नसतात. हां बहुतेक चित्रपटात काम करणार्‍या हिरॉईन्स मात्र पंजाबी वगैरे असतात. सध्या दक्षीणीतली हीरॉईन अभावानेच आढळते.
आपल्या इथे मराठी चॅनेल वरसुद्धा हिंदी जहिराती असतात. त्याचे आपल्याला नवल वाटत नाही. पण इकदे त्या सर्व जहिराती स्थानीक भाषेत असतात. प्रियांका चोप्रा सुद्धा शाम्पूची जहिरात कुडगुड कुडगुड बोलत करत असते.
माझ्या सध्याच्या प्रोजेक्ट मध्ये ग्लोबल टीम आणि स्थानीक टीम अशा दोन्ही लोकानी मिळुन बनलेली आहे.
ग्लोबल टीम मध्ये एक चिनी वंशाची ब्रीटीश , इटालीयन, ब्राझीलीय्न, स्पॅनीश, पोलीश , जर्मन अशा लोकांची आहे तर स्थानीक टीम मध्ये तमीळ ,तेलगु, मल्याळी आण इकन्नड असे लोक आहेत्. त्यामुळे एक वेगळीच धमाल येते.
ग्लोबल टीम शी बोलताना १३३९ हा क्रमांक वन्न दीर दीर नायन अस ऐकावा लागतो.
वाईड एरीया नेटवर्क हा शब्द वायदेरीयानेतउर्क असा ऐकावा लागतो.
त्रॅन्स्फोर म्हणजे ट्रान्सफर... कोनेक्सीअन म्हणजे कनेक्षन झेरो झेरो तू हंद्रेद ,ओलसो वगैरे नव्या शब्दांची माहीत असलेली जुनी रूपे समजून घ्यावी लागतात
ह्यापेक्षाही मजा येते ती ग्लोबल टीम आणि स्थानीक टीम यांच्या मध्ये अक्षरशः दुभाषा बनून रहावे लागते
बाकी गोष्टींबद्दल पुन्हा कधीतरी....

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

17 Mar 2010 - 10:18 am | मदनबाण

विचार प्रकटन आवडले,असेच वेगवेगळे अनुभव वाचायला नक्कीच आवडेल... :)

(तात्याने हा धागा अजुन वाचला कसा नाही ? तसा साउथ त्यांचा जिव्हाळ्याचा विषय !!! ;) )
मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com

चिरोटा's picture

17 Mar 2010 - 10:24 am | चिरोटा

तामिळ भाषा/संस्कृती अनुभव मजेशीर.इतर सर्व राज्यांच्या तुलनेत मला तामिळ माणसे वागण्यात्/बोलण्यात जास्त प्रामाणिक वाटतात.अर्थात हे generalization झाले पण बर्‍याच लोकांचा अनुभव तसा असतो.उत्तरेतले लोक overall चालूच असतात.!!

पण वस्तुस्थिती अशी आहे की हिंदी वगैरे शब्दांची मराठीचे नाते आहे तसे इथल्या कुठल्याच भाषेशी हिंदीचे नाते दुरूनसुद्धा नाही

खरे आहे.उत्तर भारतिय भाषांची जननी संस्कृत आहे.दक्षिण भारतिय भाषांची जननी संस्कृत नाही.
भेंडी
P = NP

शानबा५१२'s picture

17 Mar 2010 - 10:28 am | शानबा५१२

बाहेरच्या राज्यांचे/परदेशाचे नेहमी आकर्षण वाटत आलय.
तिथं परप्रातियांचे आक्रमण झालंय का?
तेथली स्थीती काय आहे हे वाचायला आवडेल.

*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

राजेश घासकडवी's picture

17 Mar 2010 - 11:14 am | राजेश घासकडवी

एकदा एखाद्या संस्कृतीला लेबल चिकटवून मोकळे झालो की आपण त्याचे पुरावे जमा करायला लागतो आणि ते इतराना पटवून द्यायला लागतो

लेबलं न लावता तमिळ संस्कृती जाणून घेताना आलेले गमतीदार अनुभव छान वाटले...

समंजस's picture

17 Mar 2010 - 11:30 am | समंजस

छान लिहीलयं विजूभाउ!!
तुमचा अनुभव चांगलाच मनोरंजक आणि माहिती देणारा आहे!

Dhananjay Borgaonkar's picture

17 Mar 2010 - 12:29 pm | Dhananjay Borgaonkar

खुप छान लेख लिहिला आहे.

नील_गंधार's picture

17 Mar 2010 - 1:16 pm | नील_गंधार

प्रकटन छानच.

नील.

अवांतरः दक्षिणेला गेल्या पासुन विजुभाऊंचे मराठी शुध्दलेखन फारच गडबडलेले दिसतेय.

अन्या दातार's picture

17 Mar 2010 - 1:38 pm | अन्या दातार

मस्त लेख.
तमिळपेक्षा आंध्र संस्कृती मला जास्त आवडते.

(तेलगु गीतांचा चाहता) अनिरुद्ध

अरुंधती's picture

17 Mar 2010 - 2:31 pm | अरुंधती

व्वा! वेगळी व मनोरंजक माहिती दिलीत तुम्ही! हे भाषावैविध्य मजेशीर आहे, त्याचा सार्थ अभिमानही आहे, पण आमचीच भाषा लै भारी, लै श्रेष्ठ अशा काटेरी बाण्याचा कंटाळाही आला आहे. त्या त्या प्रांतात ती ती भाषा श्रेष्ठच...तिथून बाहेर पडलात की कोण विचारतो?!!! इतर भाषांचा आदर ठेवला तर ती भाषा शिकायला सोपी जाते. तुम्ही तो प्रयत्न केलेला दिसतोय म्हणून तुमचं अभिनन्दन!
आणि एक विनंती : कदाचित तुमच्या विचारांच्या वेगापुढे कळफलकाचा वेग कमी पडत असेल....पण जरा शुध्दलेखनाकडे लक्ष द्याल का प्लीज? आमच्या डोळ्यांसाठी हो! :-)

सस्नेह

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

गणपा's picture

17 Mar 2010 - 3:03 pm | गणपा

मस्त लेख विजुभौ.

काही दाक्षिणात्य मित्रांसोबत जेवताना त्यांना संपुर्ण तळहात वापरुन भात मळताना पाहुन माझ्या पोटात मळमळायच.
ते तस का करतात हे आज उमगल :)

रेवती's picture

17 Mar 2010 - 7:13 pm | रेवती

चांगले लेखन,"अगदी वाक्यावाक्याशी सहमत" असे म्हणते.
सौधिंडियनांमध्येही तमिळ लोकांचे स्वभाव इतर सौधिंडियनांपेक्षा जास्त कडक असतात असे वाटते. आमची मित्र फॅमिली दर दोन वर्षांनीच चहाला बोलावते. त्यांना मी एकदा सहज म्हटले कि आपण बरेच दिवसांनी भेटलो. तर स्पष्टपणे म्हणाले कि सारखं भेटून तरी काय करायचय? आणि आपल्यालाही ते नॉर्थ इंडियन म्हणतात्....हा अनुभव पुष्कळवेळा आलाय. वेळ पाळण्याच्या बाबतीत तमिळ हे तेलुगुंपेक्षा बरे असतात. मी एकदा दोनेक मिनिटेच ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त थांबले तर तेवढ्या वेळात मैत्रिण शंभरवेळा तरी ,"जा बरं तू, साडेतीनला निघणार होतीस ना?" असं म्हणत होती तेही अगदी कोरड्या आवाजात. आपली जात वगैरे अगदी सहजपणे विचारतात.
अनेक तेलुगु लोक्स (टार्‍याकडून शब्द उधार)तर ठरलेल्या वेळेच्या एकेक तास उशीरा येउन चेहरे निर्विकार असतात्.....आपल्यालाच लाज वाटते.

रेवती

मीनल's picture

17 Mar 2010 - 7:15 pm | मीनल

निरिक्षण/ श्रवणातून दिसलेल्या बारकाव्यांचे लेखन आवडले.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

कानडाऊ योगेशु's picture

17 Mar 2010 - 7:29 pm | कानडाऊ योगेशु

वाचनीय लेख.

इंग्लिशमध्ये भारतीय भाषेपरत्वे होणारे बदल पाहणे हे फार मजेशीर आहे.
कन्नडिगाही T आणि Th हा घोळ घालतात.
इलेव्हन ला लेव्हन म्हणतात आणि तुम्ही जर इलेव्हन म्हणायला गेलात तर Its levan not elevan असेही म्हणतात.
H हे अक्षर "ह" साठी वापरत असल्याने एच म्हणण्याऐवजी हेच्च म्हणणे हे बहुदा त्यांचे mnemonics असावे.
स्ट्रेट ला स्ट्रेयैट..
आय.एस.डी ला ऐ.एस.डी
बँक ला ब्यांक..इ.इ.
माझा अनंत नावाचा मराठी सहकारी त्याच्या नावाचे "Ananth" असे बारसे केल्यामुळे जाम खवळला होता.त्याने जेव्हा त्याच्या नावातुन शेवटचा "h" काढायला सांगितले तेव्हा Admin मधला कन्नडिगा म्हणाला की तुझे नाव अनंट आहे का अनंत.?

---------------------------------------------------
टार्झनं प्रथमं वंदे तात्यां तदनन्तरं |महादेवस्य दर्शनं पूर्व नंदीं दर्शनं यथा||

वाटाड्या...'s picture

17 Mar 2010 - 8:21 pm | वाटाड्या...

एकदा एक पंजाबी सरदारजी तमिळनाडुमधे जातो कामानिमीत्त..त्याला बघुन तमिळी एकदम कुठला प्राणी आलाय चुकुन इकडे अश्या नजरेने त्याच्याकडे बघत असतात. तो ज्याम वैतागलेला असतो.

त्याला घंटा काय वाचता येत नसते..म्हणुन तो कसे बसे दिवस ढकलत असतो.
एकदा एक तमिळी माणुस धीर करुन त्याच्याशी बोलायला येतो. त्यांचा संवाद..

तमिळी: तमिळ्ल तिरीम्मा? (तिरीम्मा - येतं का? या अर्थी)
सरदारजी: (गप्प..फक्त एक लुक..)
तमिळी: तमिळ्ल तिरीम्मा?
सरदारजी: (गप्प..फक्त एक तिरसट लुक..)
तमिळी: तमिळ्ल तिरीम्मा?
सरदारजी: (गप्प..फक्त एक रागिट लुक..)
तमिळी: तमिळ्ल तिरीम्मा?
सरदारजी: ओय...तमिळ तेरी माँ तो पंजाब तेरा बाप !!!!

विजुभाऊ... दक्षिण भारतातील असे काही किस्से असतील जरा आम्हालाही सांगा...जरा करमणुक होईल...माझ्या वैयक्तिक मते..दक्षिण भारतातील एकच जमात मला आवडत नाही (किंवा मी स्वतः लांब रहातो) ती म्हणजे गुलटी....

- वा

पक्या's picture

17 Mar 2010 - 10:32 pm | पक्या

ह्म्म, भाषेचा चांगला आढावा घेतलाय.
गुजराथी लोकांचं पण इग्लीश समजून घ्यावं लागत.
आमच्या घराजवळ रहाणारी एक बेन परवा माझ्याशी बोलत असताना म्हणाली "दॅट मेन वोज आस्कींग अबाऊट आवर लोन"
क्षणभर काही संदर्भच लागेना. मग कळले की ती वेड्या वाकड्या वाढलेल्या 'लॉन' बद्दल सांगत होती.
अ‍ॅ चा उच्चार ते ए आणि ऑ चा ओ करतात. स्मोल, होल , देन (दॅन ), टोल, मोल, असे कितीतरी.

जय महाराष्ट्र , जय मराठी !

Pain's picture

18 Mar 2010 - 12:09 am | Pain

@ वाटाड्या...
खर आहे. हरामखोर असतात X(

@ लेखक
हा दृष्टीकोन नसुन ३५०+ गुलटीन्बरोबर राहिल्यामुळे आलेला अनुभव आहे.

अक्षय पुर्णपात्रे's picture

18 Mar 2010 - 1:33 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री विजुभाऊ, लेख वाचनीय झाला आहे पण लेबले लावणे तुम्हीही सोडलेले नाही.

मग आपण आपले ठरवतो अमूक भागातले लोक अमूक प्रकारचे असतात

त्यानंतर मात्र

उत्तरभारतीय पंजाबी माणूस एकदम मोकळाढाकळा वागतो. तो पटकन एखाद्याशी जवळीक साधतो. पटकन कोणाशीही चहा, खाना ,खिलाना वगैरे ची ओळख करून घेतो. थोड्याच वेळात एकदम फार जुनी दोस्ती असल्याप्रमाणे सलगी दाखवायला लागतो
मद्रासी लोक एकदम या विरुद्ध.. पटकन मोकळे होत नाहीत.

कारन एकदा एखाद्या संस्कृतीला लेबल चिकटवून मोकळे झालो की आपण त्याचे पुरावे जमा करायला लागतो आणि ते इतराना पटवून द्यायला लागतो

तुम्ही काही लोकांना पाहून तुमचे मत ठरवून टाकले आणि आता आम्हाला सांगून त्याचा प्रचार सुरू केला आहे. शेवटी तुम्ही लेबले लावण्याच्या वृत्तीस बळी पडलेले दिसत आहात.

चतुरंग's picture

18 Mar 2010 - 1:45 am | चतुरंग

चुरचुरीत डोशासारखे लिखाण!

('वोम' म्हणणारा हा'वेअर इंज्नर)चतुरंग

शुचि's picture

18 Mar 2010 - 4:02 am | शुचि

लेख आवडला.

अल्टीरीअर मोटीव्ह ला इन्टीरीअर मोटीव्ह म्हटलं चुकून. नशीब फक्त नवर्‍यापुढे ते झालं. मग नवरा चिडवायचा सारखा [(

मग एके दिवशी नवरोबांची ही अशीच मराठीत चूक झाली. तो फोनवर म्हणाला आज होळी पोर्णिमा आहे उद्या "रंगपंचमी" ....... ही ही ही आम्ही लगेच खदखदून हसून घेतलं आणि वाभाडे काढले.

मग फिट्टमफाट परत नो चिडवाचिडवी B)

पाषाणभेद's picture

18 Mar 2010 - 7:43 am | पाषाणभेद

दक्षिणेचे मिशीप्रेम यावरही लिहा ना विजुभौ.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३