खूपच सुंदर काम केलं आहे कौशलने..! मानना पडेगा बॉस! :)
जियो..!
तूर्तास इतकंच..
काहीही उत्तम, उदात्त, उन्नत ऐकलं की मनमोकळी दाद दिल्याशिवाय राहू नकोस अशी आम्हाला प्रत्यक्ष भाईकाकांनीच आज्ञा करून ठेवली आहे त्यामुळे या सुंदर गाण्याबद्दल, वाद्यवृंद संयोजनाबद्दल सवडीने मिपाच्या मुखपृष्ठावरच मला चार शब्द लिहावे लागतील, दाद द्यावी लागेल...!
अशी आज्ञा पुलंकडून प्रत्यक्ष मिळण्याइतके माझे भाग्य नाही. पण त्यांच्या साहित्यातून, विचारातून हे नक्कीच लक्षात राहिले आहे आणि पटलेही आहे की चांगले काही बघितले, ऐकले वाचले तर दाद ही दिलीच पाहिजे.
अगदी उत्तम समूहगीत. गीत, संगीत स्वर अगदी आदर्श वाटावेसे. पुन्हापुन्हा ऐकावेसे वाटते. मराठी भाषेचे बाकी काही असो पण मराठी संगीताला चांगले दिवस येऊ घातले आहेत. इतक्या संख्येने इतके गुणी कलावंत मराठी गाणी गात आहेत ही एक आनंदाची गोष्ट आहे.
जाम कंटाळा आला हे मराठी अस्मितेचं तुणतुणं ऐकून. ज्याला पाहावं तो हल्ली प्रतिशिवाजी बनू पाहातो आहे. एखाद्याला वाटेलं की काय बॉ आता जणू शिवशाहीचं अवतरणार ?
शिळ्या कढीला ऊत, दुसरं काय ?
बाकी गाण्याच्या चांगल्या किंवा वाईट दर्जाबद्दल (म्हणजे ते अमुक सप्तक आणि तमुक षड्ज आणि काय न काय. पण चाल बरी वाटली) आम्ही अजाण माणसांनी न बोलणेच बरे. जाणकार मंडळी आहेतच.
ज्याला पाहावं तो हल्ली प्रतिशिवाजी बनू पाहातो आहे.
याचा अर्थ कळला नाही.. सदरच्या गाण्यात सुरेश भटांचे शब्द, कौशलचं संगीत आणि काही गुणी लोकांचं गाणं आहे.. यांपैकी कोण प्रतिशिवाजी बनू पाहात आहे असं आपल्याला वाटतं?
बाकी गाण्याच्या चांगल्या किंवा वाईट दर्जाबद्दल (म्हणजे ते अमुक सप्तक आणि तमुक षड्ज आणि काय न काय. पण चाल बरी वाटली) आम्ही अजाण माणसांनी न बोलणेच बरे.
- जबरदस्तीने ऐकावं लागतं. म्हणून मी रडरड करतोय. आज सकाळी डोंबिवलीत येऊन पाहायला हव होतंत.
याचा अर्थ कळला नाही.. सदरच्या गाण्यात सुरेश भटांचे शब्द, कौशलचं संगीत आणि काही गुणी लोकांचं गाणं आहे.. यांपैकी कोण प्रतिशिवाजी बनू पाहात आहे असं आपल्याला वाटतं?
- अर्थ कळला नाही हा माझा दोष नाही. सुरेश भट, कौशल ईनामदार आणि इतर गुणी लोकांबद्दल मी काहीएक म्हणालेलो नाही.
मराठी अस्मितेचं तुणतुणं हा संदर्भ 'मराठी अस्मितेच्या नावाने बोकाळलेला दंभ ('Hypocracy') या संदर्भात आहे.(म्हणजे काय ते विचारु नका. या संदर्भात एक विस्तृत लेख लिहावा असा विचार आहे. तेंव्हा कळेलच.) 'मराठी अभिमान गीत' या संदर्भात नाही. माझा आधीचा प्रतिसाद चालू विषयाला धरुन नाही असे म्हणाल तर तो आरोप मला मान्य आहे. तसे असेल तर तुम्ही तो उडवालंच.
चा कमालीचा निरागस आवाज त्या सगळ्या गाण्याचा "हायलाईट" वाटला. छान कल्पना आणि मांडणी. चाल तितकीशी नाही आवडली. पण भटांचे शब्दच इतके सुंदर आहेत की गाणं आवडूनच जातं.
आवडलं 16 Mar 2010 - 10:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडलं गाणं......! दुवा इथं डकवल्याबद्दल II विकास II यांचे आभार...!
मराठी अभिमान गीत या धाग्यात आपला प्रतिसाद पूर्णत: असंबद्धच होता..
तात्या, आपल्या(माझ्या) प्रतिक्रियेचा त्या धाग्याशी फार गुप्त व खोल अर्थ असलेला संबध असतो.........दुस-याला समजायला फार कठीण...
नजर बघ काय सांगतेय...हां........ :* (हा त्यातला एक)
_____________चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........
ज्यांना याची मूळ तबकडी मिळाली असेल त्यांनी कृपया ही गाणी कोणत्याही प्रकारे इतरांना मोफत वितरीत करू नयेत. हि विनंती
___________________________
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा
मला अजूनही 17 Mar 2010 - 3:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मला अजूनही याचा अर्थ समजला नाही आहे:
"लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी ..."
सुरेश भटांचे शब्द जितके जोशपूर्ण आहेत तितकी गाण्याची चाल आवेशपूर्ण वाटली नाही. "जिंकू किंवा मरू" किंवा "हे राष्ट्र देवतांचे" ह्या गाण्यांच्या चालीत जो एक जोर आहे तो ह्या गाण्याच्या चालीत मला तरी आढळला नाही.
अवांतर - "शूर अम्ही सरदार" हे गाणे ऐकतानादेखिल काहीसे असेच वाटते. शब्द जोरकस पण चाल काहीशी मंद.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- पुण्यात किती तारखेस वितरण चालू होईल ?
- पुण्यात सीडी हवी असल्यास कोणत्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा ?
- दूरध्वनी केल्यावर किती दिवसांत सीडी घरपोच मिळेल ?
प्रतिक्रिया
16 Mar 2010 - 10:12 am | II विकास II
सध्या फक्त मुंबईत वितरण चालु आहे. पुढील आठवड्यापासुन पुण्यात चालु होईल.
16 Mar 2010 - 10:30 am | विसोबा खेचर
खूपच सुंदर काम केलं आहे कौशलने..! मानना पडेगा बॉस! :)
जियो..!
तूर्तास इतकंच..
काहीही उत्तम, उदात्त, उन्नत ऐकलं की मनमोकळी दाद दिल्याशिवाय राहू नकोस अशी आम्हाला प्रत्यक्ष भाईकाकांनीच आज्ञा करून ठेवली आहे त्यामुळे या सुंदर गाण्याबद्दल, वाद्यवृंद संयोजनाबद्दल सवडीने मिपाच्या मुखपृष्ठावरच मला चार शब्द लिहावे लागतील, दाद द्यावी लागेल...!
आपला,
(मराठी) तात्या.
18 Mar 2010 - 4:56 am | हुप्प्या
अशी आज्ञा पुलंकडून प्रत्यक्ष मिळण्याइतके माझे भाग्य नाही. पण त्यांच्या साहित्यातून, विचारातून हे नक्कीच लक्षात राहिले आहे आणि पटलेही आहे की चांगले काही बघितले, ऐकले वाचले तर दाद ही दिलीच पाहिजे.
अगदी उत्तम समूहगीत. गीत, संगीत स्वर अगदी आदर्श वाटावेसे. पुन्हापुन्हा ऐकावेसे वाटते. मराठी भाषेचे बाकी काही असो पण मराठी संगीताला चांगले दिवस येऊ घातले आहेत. इतक्या संख्येने इतके गुणी कलावंत मराठी गाणी गात आहेत ही एक आनंदाची गोष्ट आहे.
18 Mar 2010 - 11:22 am | शाहरुख
मानना पडेगा बॉस!
16 Mar 2010 - 10:37 am | II विकास II
किमंत: ३०० रु.
एक सीडी आणि एक पुस्तक
9 May 2010 - 5:34 pm | बद्दु
मला तुमची डाउनलोड करण्याची लिन्क मिळेल काय? मी क्रेडिट कार्ड पेमेन्ट करेन. खुप अर्जन्ट आहे आणि सध्या वास्तव्य देशाबाहेर्...शक्य असेल तर बघा..
16 Mar 2010 - 1:02 pm | अप्पा जोगळेकर
जाम कंटाळा आला हे मराठी अस्मितेचं तुणतुणं ऐकून. ज्याला पाहावं तो हल्ली प्रतिशिवाजी बनू पाहातो आहे. एखाद्याला वाटेलं की काय बॉ आता जणू शिवशाहीचं अवतरणार ?
शिळ्या कढीला ऊत, दुसरं काय ?
बाकी गाण्याच्या चांगल्या किंवा वाईट दर्जाबद्दल (म्हणजे ते अमुक सप्तक आणि तमुक षड्ज आणि काय न काय. पण चाल बरी वाटली) आम्ही अजाण माणसांनी न बोलणेच बरे. जाणकार मंडळी आहेतच.
16 Mar 2010 - 1:16 pm | विसोबा खेचर
ऐकायची सक्ती नाही..
याचा अर्थ कळला नाही.. सदरच्या गाण्यात सुरेश भटांचे शब्द, कौशलचं संगीत आणि काही गुणी लोकांचं गाणं आहे.. यांपैकी कोण प्रतिशिवाजी बनू पाहात आहे असं आपल्याला वाटतं?
सहमत आहे!
तात्या.
16 Mar 2010 - 1:35 pm | अप्पा जोगळेकर
ऐकायची सक्ती नाही....
- जबरदस्तीने ऐकावं लागतं. म्हणून मी रडरड करतोय. आज सकाळी डोंबिवलीत येऊन पाहायला हव होतंत.
याचा अर्थ कळला नाही.. सदरच्या गाण्यात सुरेश भटांचे शब्द, कौशलचं संगीत आणि काही गुणी लोकांचं गाणं आहे.. यांपैकी कोण प्रतिशिवाजी बनू पाहात आहे असं आपल्याला वाटतं?
- अर्थ कळला नाही हा माझा दोष नाही. सुरेश भट, कौशल ईनामदार आणि इतर गुणी लोकांबद्दल मी काहीएक म्हणालेलो नाही.
मराठी अस्मितेचं तुणतुणं हा संदर्भ 'मराठी अस्मितेच्या नावाने बोकाळलेला दंभ ('Hypocracy') या संदर्भात आहे.(म्हणजे काय ते विचारु नका. या संदर्भात एक विस्तृत लेख लिहावा असा विचार आहे. तेंव्हा कळेलच.) 'मराठी अभिमान गीत' या संदर्भात नाही. माझा आधीचा प्रतिसाद चालू विषयाला धरुन नाही असे म्हणाल तर तो आरोप मला मान्य आहे. तसे असेल तर तुम्ही तो उडवालंच.
16 Mar 2010 - 1:47 pm | विसोबा खेचर
परंतु हा धागा तर याच मंडळींशी निगडीत आहे..
परंतु हा संदर्भ सदरच्या धाग्यात पूर्णत: अप्रस्तुत आहे, असंबद्ध आहे..
ठीक..!
मराठी अभिमान गीत या धाग्यात आपला प्रतिसाद पूर्णत: असंबद्धच होता..
तात्या.
16 Mar 2010 - 9:07 pm | शुचि
फार गोड संगीत आणि गीत. अंगावर गोड शहारा आला ऐकताना.
16 Mar 2010 - 9:18 pm | जे.पी.मॉर्गन
चा कमालीचा निरागस आवाज त्या सगळ्या गाण्याचा "हायलाईट" वाटला. छान कल्पना आणि मांडणी. चाल तितकीशी नाही आवडली. पण भटांचे शब्दच इतके सुंदर आहेत की गाणं आवडूनच जातं.
16 Mar 2010 - 10:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडलं गाणं......! दुवा इथं डकवल्याबद्दल II विकास II यांचे आभार...!
-दिलीप बिरुटे
16 Mar 2010 - 11:30 pm | अक्षय पुर्णपात्रे
हेच गाणे बिपिननेही चिकटवल्याचे आठवते. तरीही श्री II यांचे आभार.
17 Mar 2010 - 12:00 am | टारझन
=)) =)) =))
बिपीन आभारलाटु आहे म्हणे ? =))
असो!
16 Mar 2010 - 11:39 pm | शानबा५१२
मराठी अभिमान गीत या धाग्यात आपला प्रतिसाद पूर्णत: असंबद्धच होता..
तात्या, आपल्या(माझ्या) प्रतिक्रियेचा त्या धाग्याशी फार गुप्त व खोल अर्थ असलेला संबध असतो.........दुस-याला समजायला फार कठीण...
नजर बघ काय सांगतेय...हां........ :* (हा त्यातला एक)
_____________चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........
17 Mar 2010 - 1:40 pm | माझी दुनिया
ज्यांना याची मूळ तबकडी मिळाली असेल त्यांनी कृपया ही गाणी कोणत्याही प्रकारे इतरांना मोफत वितरीत करू नयेत. हि विनंती
___________________________
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा
17 Mar 2010 - 3:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मला अजूनही याचा अर्थ समजला नाही आहे:
"लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी ..."
गाणं आवडलं हेवेसांनल.
अदिती
17 Mar 2010 - 5:05 pm | परिकथेतील राजकुमार
उत्तम गाणे.
अवांतर :- अप्रिय अदिती,
अर्थ समजावुन घेण्यासाठी II बिकास II ह्यांच्याशी संपर्क साधावा.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
18 Mar 2010 - 3:55 am | सखी
अप्रतिम झाले आहे गाणे, माझ्या संपर्कातल्या सगळ्या मराठी लोकांना पाठवला या गाण्याचा दुवा पाठवला. इथे दुवा दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला आमचा दुवा :)
18 Mar 2010 - 4:29 am | रेवती
हा दुवा छान आहे हो विकासभौ !
आपल्याकडं खरच किती चांगले गायक गायिका आहेत.
संगितातलं ओ कि ठो कळत नाही तरीही गाणं आणि सगळच आवडलं.
रेवती
18 Mar 2010 - 9:31 am | सुनील
सुरेश भटांचे शब्द जितके जोशपूर्ण आहेत तितकी गाण्याची चाल आवेशपूर्ण वाटली नाही. "जिंकू किंवा मरू" किंवा "हे राष्ट्र देवतांचे" ह्या गाण्यांच्या चालीत जो एक जोर आहे तो ह्या गाण्याच्या चालीत मला तरी आढळला नाही.
अवांतर - "शूर अम्ही सरदार" हे गाणे ऐकतानादेखिल काहीसे असेच वाटते. शब्द जोरकस पण चाल काहीशी मंद.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
18 Mar 2010 - 1:44 pm | दिपोटी
॥विकास॥,
- पुण्यात किती तारखेस वितरण चालू होईल ?
- पुण्यात सीडी हवी असल्यास कोणत्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा ?
- दूरध्वनी केल्यावर किती दिवसांत सीडी घरपोच मिळेल ?
- दिपोटी
19 Mar 2010 - 7:11 am | सुमीत भातखंडे
अप्रतिम
19 Mar 2010 - 8:04 am | ईन्टरफेल
छान आहे ह प्रतिक्रिया (अ)न्यानात भर पडलि
19 Mar 2010 - 8:36 am | विंजिनेर
संकल्पना आणि त्याची निर्मिती छानच -थोडीशी जुन्या "मिले सुर मेरा तुम्हारा"च्या धर्तीवरची वाटली.असो.
एक आश्चर्याची बाब म्हणजे इतके सगळे गुणी/दिग्गज गायक मंडळी असताना मंगेशकर कुटुंबियांपैकी एकही व्यक्ती ह्याफितीत दिसली नाही. काय कारण असावं बरं?
19 Mar 2010 - 8:42 am | बिपिन कार्यकर्ते
डिल होऊ शकले नसेल हो.... ;)
असो, एक कलाकार या पातळीवरून त्यांना या फीतेमधे बघायला नक्कीच आवडले असते... लता, आशा आणि बाळासाहेब... बाकीचे नको...
(असूर) बिपिन कार्यकर्ते
19 Mar 2010 - 8:58 am | II विकास II
>>डिल होऊ शकले नसेल हो.... Wink
त्यांना विचारले गेले होते.
डिलबद्दल काही प्रतिक्रिया नाही,
7 Apr 2010 - 2:17 pm | डावखुरा
भीमसेन जोशींची पण कमतरता जाणवते....."राजे!"
9 May 2010 - 2:10 pm | इंटरनेटस्नेही
मराठी अभिमान गीत हे खरोखर मरठी असल्याचा अभिमान निर्माण करणारे आहे. कौशलचे कौतुक करावे तेवढे कमीच!
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.