करुण रस म्हटलं आहे, पण तो फारच पाणचट तर्रीसारखा वाटतो. हे काव्य बरोबर साधण्यासाठी उद्विग्नता, विमनस्कता, थकवा, हातबल्य असे अनेक रस मला माझ्या आत्म्यातून पिळून काढून त्यात घालावे लागले. (गदिमांच्या प्रतिभेला वंदन करून. त्यांच्या ताजमहालाला वीट लावण्याचं धार्ष्ट्य केवळ नाडीकथांचा वीट आल्यामुळेच झालं. मूळ कविता खाली दिलेली आहे)
नाडि वाचुनी अति मी दमले, थकले रे शशिकांता! || ध्रु ||
निलाजरेपण कटी नेसुनी, निसुगपणाचा शेला
महर्षिस्तुतीचे कुंडल कानी, स्थितप्रज्ञा भालाला
नाडीजय-शतधाग्यांचा मज, कंठी फास लावीता || १ ||
अर्धांगाचा शाप कुणाला, प्रभुदर्शन दासनला
पूजाविधिची ऐकुन पथ्ये, पुत्रप्राप्ती कोणाला
नाडी पॅकेट ठो ठो करुनी, नक्षलांस पळवीता || २ ||
श्रद्धेच्या तू घेता गिरक्या, अंधपणा की आला
तर्काचा तुज तोल कळेना, कान बंद तू केला
संस्थाळांच्या इंद्रायणि तू, ओकशी नाडीगाथा || ३ ||
षष्ठाब्जांच्या जिवनक्रमाचा, इतिहास लिहिलेला
खरडता या ताडपत्रिला, हात कुणाचा दुखला?
किति मोठा हा ज्ञानकोष जो जालाला नमवीता? || ४ ||
उत्तर देऊनि 'बिका'ट प्रश्नी, मुख्य प्रश्न नुत्तरला
विज्ञानाचा 'प्रकाश' का घ्या, जर 'तात्या' पाठीला
'तुका म्हणे' मी हात टेकले, 'राघव'शरणही येता || ५ ||
मूळ कविता
नाच नाचुनी अति मी दमले थकले रे नंदलाला ! || ध्रु ||
निलाजरेपण कटिस नेसले, निसुगपणाचा शेला
आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला
उपभोगांच्या शतकमलांची, कंठि घातली माला || १ ||
विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला
अनय अनीती नूपुर पायी, कुसंगती करताला
लोभ प्रलोभन नाणी फेकी, मजवर आला-गेला || २ ||
स्वतःभोवती घेता गिरक्या, अंधपणा की आला
तालाचा मज तोल कळेना, सादहि गोठुन गेला
अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला || ३ ||
प्रतिक्रिया
15 Mar 2010 - 8:05 pm | विसोबा खेचर
=))
संपलो रे राजेश..! धन्य आहेस.. :)
(ओकसाहेबांचा पाठराखा) तात्या. :)
15 Mar 2010 - 8:20 pm | श्रावण मोडक
हाहाहाहा... फारच करूण रसात झालं बॉ हे. दोन-चार दगडं मारायची ना राव. त्याशिवाय मजा नाही!!! शेवटच्या कडव्यात काढलेत ते चिमटे.
15 Mar 2010 - 9:04 pm | मुक्तसुनीत
>> फारच करूण रसात झालं बॉ हे
पुढील कामांकरता घासकडवींकरता काही क्लूज :
शृंगार : ग बाई माझ्या चड्डीची नाडी तुटली , बाई ग , बाई ग !
हास्य : सखिशेजारणी तू हसत रहा, नाडिची गाठ ही सुटत अहा !
रौद्र : सोहमहर डमरू बाजे , तुटती नाडी नि काजे !
कारुण्य : वर पहावे
बीभत्स : अचकट्ट विचकट्ट, बसली ना नाडी घट्ट
शांत : जो जे वांच्छिल तो ते बांधो, नाडिजात
अद्भुत : बांधता बांधता चमत्कार झाला , नाडीचा गुंता सुटोनि गेला !
वीर : वेडात नाडीच्या गाठी मारिल्या सात !
15 Mar 2010 - 9:12 pm | प्रकाश घाटपांडे
मुसु ने दिलेले नाड्य क्लू लईच भारी!
आता सर्वांना नाड्य संगीत रसात भिजायला मिळणार असे आमचे भाकित
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
15 Mar 2010 - 9:20 pm | मिसळभोक्ता
वा मुसुशेठ वा !!!!
आम्ही नेहमी "लय भारी" एवढा एकच ठेवणीचा प्रतिसाद देतो.
पण आपली प्रतिभा (तीही सोमवारी सकाळी?) पाहून आम्ही आज आपल्याला "लयच भारी" हा प्रतिसाद देऊ इच्छितो. पार्टी करा. (मटार उसळ, शिक्रण इत्यादि)
एक शिंपल सजेश्चन आहे: प्रत्येक ओळीत नाडी न टाकता, नाडीचा भास झाला, तरी चालेल.
उदा.
बीभत्सः आज अचानक गाठ पडे, भलत्या वेळी भलतीच कडे
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
15 Mar 2010 - 9:31 pm | श्रावण मोडक
लयच भारी.
>>प्रत्येक ओळीत नाडी न टाकता, नाडीचा भास झाला, तरी चालेल.
हेही लयच भारी.
16 Mar 2010 - 2:44 am | Nile
वरच्या तीनही प्रतिसांदांना अनुमोदन. हहपुवा.
(पट्टा घट्ट बांधणारा)
17 Apr 2011 - 5:31 pm | पाषाणभेद
जबरा तर्कशात्र आहे बुवा
15 Mar 2010 - 9:34 pm | चतुरंग
काल संध्याकाळीच 'पाडवा साजरा' झाल्याने गुढी अजून हवेतच दिसते आहे!! ;)
(कडुलिंब)चतुरंग
15 Mar 2010 - 9:36 pm | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
15 Mar 2010 - 11:07 pm | विसोबा खेचर
आयला, आमचा मुक्तराव पण एकदम फार्मात दिसतोय! अरे तुला विंदा गेल्याचं काही दु:ख आहे की नाही?! :)
तात्या.
15 Mar 2010 - 11:51 pm | मिसळभोक्ता
अरे तात्या,
मुसुशेठच्या नाडीत अख्खा अगस्ति ऋषी "ओक"लाय, की त्याला अशाचवेळी प्रतिभेचे धुमारे फुटणार म्हणून. वाटल्यास आपल्या शशिषेठ ला विचार. (षेठ.. कसले जबरा वाटते उच्चारायला. आज बाबूजी हवे होते.)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
15 Mar 2010 - 11:57 pm | विसोबा खेचर
=)) =))
आपला,
(बाबूजीभक्त) तात्या.
16 Mar 2010 - 12:02 am | चतुरंग
खल्लास!! मेलो मेलो !!!
आज हसून हसून मेलो!!! =)) =)) =))
(षेठ)चतुरंग
16 Mar 2010 - 12:01 am | आळश्यांचा राजा
सगळेच रस मस्त!
आळश्यांचा राजा
16 Mar 2010 - 12:22 am | राघव
मुसुशेठ,
=)) =)) =)) मेलोSSSSSSS
सगळे सुटलेत अगदी!
राजेशशेठ, शेवटचे कडवे झक्कास!! ह.ह.पु.वा. =))
राघव
16 Mar 2010 - 4:06 am | संदीप चित्रे
हो गुरूदेव :)
16 Mar 2010 - 4:50 am | शुचि
अहो मुसु ते शृंगार रसात चड्डीच्या जागी चोळी घाला हो. तो शृंगार रस न राहता पार अश्लील/उत्तान्/अनवृत्त रस झालाया त्या चड्डी शब्दामुळे. =))
***********************************
we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.
16 Mar 2010 - 11:02 am | श्रावण मोडक
अगायायाया... ;)
च्यायला, 'सहमत'ही म्हणता येत नाही आणि 'अ-सहमत'ही म्हणता येत नाही. :(
16 Mar 2010 - 11:06 am | बिपिन कार्यकर्ते
तो शृंगार रस न राहता पार अश्लील/उत्तान्/अनवृत्त रस झालाया त्या चड्डी शब्दामुळे
मग चोळी घातल्यावर आय मीन चोळी शब्द घातल्यावर काय वेगळे होईल?
बिपिन कार्यकर्ते
15 Mar 2010 - 8:44 pm | प्रकाश घाटपांडे
=)) =)) =))
आता राजेशा जीवनाडीचा कोप होईल तुजवरी. नाडीग्रंथातील मजकुर आपोआप बदलतो हे आम्हास पचले नव्हते. पण नाडीमुळे शब्द आपोआप स्फुरतात हे आता पटले ब्वॉ!
अवांतर- या प्रतिभेसाठी कुठले आसव प्राशन करावे
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
15 Mar 2010 - 8:55 pm | मिसळभोक्ता
मी आधीच म्हटलं होतं, की हा ग्रासस्टांझाज एक नंबरचा वायझेड आहे, म्हणून.
बाकी, नाडीबद्दल बोलाल, तर ओकायचा हक्क शशिकांतशेठकडे आडनावामुळे आहेच.
आजकाल, (म्हणजे कंपू हद्दपार झाल्यापासून) मिपावर आमचे मनोरंजन नाडीमुळे होते, हे नक्कीच.
प्रकाशकाका, प्रतिभेचा एकाच आसवाशी संबंध आहे. अधिक माहितीसाठी देवकाकांना भेटा, आणि आत्मशोध करा.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
15 Mar 2010 - 8:46 pm | सुनील
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
15 Mar 2010 - 8:49 pm | चतुरंग
गदिमांच्या कवनाला हात घालण्याचे धारिष्ट्य तुझ्यात उत्पन्न व्हावे, काय हा नाडीचा चमत्कार!! :D
ग्रासस्टांझाज*, खल्लास विडंबन झाले आहे!!
'नाडि वाचुनी' ह्या शब्दांतला श्लेष तुफ्फ्फ्फान!!! =)) =)) =))
(थकलेला, नाडलेला)चतुरंग
(*शब्दश्रेय -मिभोकाका)
15 Mar 2010 - 9:00 pm | तुका म्हणे
तुझ्या पुढे देखिल हात टेकले रे बाबा! सगळ्या भावना "ओक"ल्यास :)
तु म्हटले तसे : "उद्विग्नता, विमनस्कता, थकवा, हातबल्य" हे सग़ळे भाव कवितेच फक्त नाव वाचुनच चपखल पोचले. :-)
- तुक्या
15 Mar 2010 - 9:07 pm | प्रकाश घाटपांडे
औद्विगन्य, वैमनस्क्य,थैकव्य व हातबल्य हे भाव औनाड्यातुन येत नसुन नाड्यातुन येतात असे अनुमान आम्ही काढले आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
15 Mar 2010 - 9:34 pm | बिपिन कार्यकर्ते
मास्तर, मास्तर.... नमन.
=)) =)) =)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
15 Mar 2010 - 9:34 pm | प्राजु
उत्तर देऊनि 'बिका'ट प्रश्नी, मुख्य प्रश्न नुत्तरला
विज्ञानाचा 'प्रकाश' का घ्या, जर 'तात्या' पाठीला
'तुका म्हणे' मी हात टेकले, 'राघव'शरणही येता || ५ ||
ठ्यॉ ठ्ठ्यॉ!!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
15 Mar 2010 - 9:35 pm | jaypal
नाडी नही ये मेरा दिल है/
देखो देखो टुटेना/
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
15 Mar 2010 - 9:39 pm | अविनाशकुलकर्णी
ह.ह.पु.वा..मस्त....
16 Mar 2010 - 12:58 am | सुमीत भातखंडे
=)) =)) =)) =))
16 Mar 2010 - 2:45 am | विकास
"समझने वाले समझ गये है,
ना समझे वो "अनाडी" है"
असे म्हणले गेले असावे.... ;)
(बाकी नाडी म्हणले की, वो सात दिन मधील निळू फुलेंचे नाडा आठवल्याशिवाय राहत नाही!)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
16 Mar 2010 - 5:30 am | चित्रा
ओकसाहेब जेव्हा नाडी हा विषय सोडून (वगळता) जे काही लिहीतात ते वाचण्यासारखे असते.
नाडीवरून विडंबन आले तरी पुढील नाडीग्रंथ येणारच नाही याची ग्यारंटी देता येईल असे वाटत नाही :)
17 Apr 2011 - 10:08 pm | शहराजाद
असंच म्हणते.
चित्रतैचा अंदाज खरा ठरला. :(
ओकसाहेब, नाडीचर्हाटाचा कंटाळा आला हो.
16 Mar 2010 - 11:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त लगे रहो.....!!! :)
-दिलीप बिरुटे
17 Mar 2010 - 1:10 pm | समंजस
:)
17 Mar 2010 - 2:42 pm | डावखुरा
ओक साहेबान्चे नाडीरसायन काही अजबच आहे बुवा......
ज्यामुळे घासकडविन्च्या विङ्म्बन प्रज्ञेला धुमारे फुट्ले.....
विड्म्बन तर उत्तमच झाले आहे परन्तु त्यावरील चर्चा एकुन.........
हहपुवा$$$=)) =)) =))
"राजे!"
17 Mar 2010 - 9:42 pm | शशिकांत ओक
राजेश जी,
आपल्या विडंबनाने बहार आणली.
नाडी ग्रंथांवरील आधारित माझे काही थोडेसे लिखाण वाचून - दमायला - थकायला झाले - काही शरण आले काहींनी हात टेकले. यात नवे काही नाही हो.
मित्र हो, मला ही नाडीग्रंथांच्या विचारांच्या गूहेतून जाताना असाच थकवा आला. आपणाला त्रिमितीच्या जगाच्या भिंगातून, मानवीबुद्धीने सर्व शोधायची सवय झाली आहे. जग फक्त ३ मितीचेच आहे वा असावे असा विचार सोडला व मानवी इंद्रियांच्या शक्तीच्याशिवाय अन्य काही शक्ती ही या विश्वात आपला प्रभाव पाडू शकतात हे तत्वतः मानले तर.... या विचारातून जेंव्हा मी विनम्र होऊन महर्षींना वंदन केले. मग सारे चित्र बदलले.
आपणही प्रयोग करून पहा.
बिकाला व येथील सर्वांना उत्तरे रेडीमेड हवीत.
आपल्या बाजूने आधी चार पावले टाका मग मदतीचा हात मागा.
महर्षी नक्की काही करतात असा आपणाला अनुभव येईल मग जग जरी आपल्याला विरोधत गेले तरी आपणाला त्याचे काही वाटणार नाही. असा आत्मविश्वास येईल.
नाडी ग्रंथांतील भविष्यकथन नेहमीच सत्य होत नाही यात शंका नाही पण त्या मागे काही कारणे असू शकतात असे निदान जाणवेल.
आव्हानाच्या, तुच्छतेच्या, तिरकस वाक् बाणांनी मला मुर्ख ठरवून काही मिळणार नाही.
सुरवातीला थोडे ऑकवर्ड वाटेल मला ही तसे झाले होते. प्रेमाने, आदराने नाडी ग्रंथांच्याकडे पहायला लागा. स्वतःची नाडीपट्टी पहायला मिळाली नाहीत तरी इतरांचे अनुभव पाहून ऐकून आपल्या नवे गवसल्याचा आनंद होईल.
असो.
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
17 Mar 2010 - 10:28 pm | राजेश घासकडवी
ओकसाहेब,
सर्वप्रथम आपल्या खिलाडूवृत्तीबद्दल आभार. तुम्हाला प्रिय असणाऱ्या नाडीग्रंथाची व त्या विचारसरणीची खिल्ली उडवली तरी तुम्ही ती किती चांगल्या प्रकारे उडवली आहे याचं कौतुक करू शकता.
मला हे सांगावंसं वाटतं की तुमची व्यक्तीश: चेष्टा करण्याचा माझा हेतू नव्हता. तुम्ही मांडलेले विचार, ते मांडण्याची पद्धती, व विरोधानंतरही सतत मांडत राहाण्याची चिकाटी यांचीच ती गंमत होती.
दुर्दैवाने तुमची नाडीवर जितकी ठाम श्रद्धा आहे तितकाच माझा अविश्वास अवैज्ञानिक सत्यावर आहे. तेव्हा तुम्ही कितीही जेरीला आणलंत तरी मला पुरावा मिळाल्याशिवाय माझा विश्वास बसणार नाही.
राजेश
17 Mar 2010 - 11:44 pm | बिपिन कार्यकर्ते
माननिय विंग कमांडर (नि.) श्री. शशिकांत ओक,
मी हे नम्रपणे नमूद करू इच्छितो की आपण आपल्या प्रतिसादात
बिकाला व येथील सर्वांना उत्तरे रेडीमेड हवीत.
आपल्या बाजूने आधी चार पावले टाका मग मदतीचा हात मागा.
हे लिहिल्याबद्दल, मी माझा तीव्र निषेध व्यक्त करतो. आपण माझे नाव मुद्दाम घेतले म्हणून मी हे लिहित आहे. माझा नाडी प्रकरणावर विश्वास नाही पण मी प्रामाणिकपणे तो प्रकार एकदा अनुभवू इच्छित होतो. त्या अनुषंगाने मी तुम्हाला काही प्रश्न / मार्गदर्शनपर असे प्रश्न विचारले. त्याचे उत्तर देणे सोडून आपण काही इतर मुद्दे मांडले.
ठीक आहे, आपली इच्छा अशी असावी की प्रत्येकाने स्वतः धडपड करून हा अनुभव घ्यावा. मग हे प्रसार / प्रचार वगैरे उपद्व्याप कशाला? साधे सरळ नाडीकेंद्र सुचवायचे सोडून आपण दुसरेच काही सांगत आहात. शिवाय आजवर काही अगदी प्राथमिक प्रश्नांची उत्तरे आपण दिली नाहीयेत. बर्याच लोकांनी हे व्यक्त केले आहे. असो...
जास्त काही बोलत नाही / लिहित नाही. आपले इप्सित कार्य चालू द्या. सहसा शुभेच्छा देतात पण या कार्यासाठी मी ते ही नाही करू शकत.
जाता जाता, वैयक्तिकरित्या न घेणे. आपण काही मत मांडले मी माझे म्हणणे मांडले. आपले नाडी सकट सगळेच लिखाण वाचत असतो. तुमचे इतर लेखन चांगलेच आहे. त्या करता मात्र जरूर शुभेच्छा.
आपण आपल्या वरील प्रतिसादात योग्य तो बदल कराल ही अपेक्षा.
बिपिन कार्यकर्ते
17 Mar 2010 - 9:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
गुरूदेव, महान आहात!
अदिती
17 Apr 2011 - 1:17 pm | प्रकाश घाटपांडे
थकलो बुवा खरचं!
17 Apr 2011 - 2:58 pm | नरेशकुमार
कविता वाचुनच ईतका दम लागला. काय सांगु ?
कविता बनवनार्याला त्याने वाचलेलं (नाडी का काय ते) कीती कष्ट झाले असतील, गॉड नोज !
17 Apr 2011 - 4:44 pm | पैसा
विडंबन आणि त्यावरचे एकेक प्रतिसाद १०० नंबरी!
17 Apr 2011 - 5:53 pm | रमताराम
झक्कास. सध्या इतर नव्या दमाच्या खेळाडूंमुळे आणि 'भू'मितीय' (अवतरणचिन्हे चुकलेली अथवा विसरलेली नाहीत!) धाग्यांमुळे नाडीचा टीआरपी कमी झाला होता . हा धागा वर आल्याने तो अंमळ सुधारेल अशी आशा आहे.
17 Apr 2011 - 9:22 pm | शशिकांत ओक
नाडीची सेनसेक्स शी छेडछाड!
काल-परवापर्यंत घसरणाऱ्या बाजारभावाला इतके उधाण कसे यावर मिपाच्या लोकसभेत हंगामा ....
मी मी म्हणणाऱ्या मराठी वरही नाडीने वात आणला असल्याची जोरदार बातमी...
भ्रष्टाचाराच्या गाडीचा क्रम डावलून उपरस्त्यावर टाकायसाठी मोहीम हाती घेतलेल्यांनी केलेल्या विलक्षण उपोषणानंतर...
नाडी नाडी । हाय हाय ।। असा कंठशोष करून आपला रिता वेळ सत्कारणी लागला असे वाटत असतानाच....
नाडीच्या चटकदार मिसळीला पुन्हा राजेशाही फोडणीने नाडी ग्रंथांच्या टी आर पी ने उसळ खाल्ली...
प्रतिसादांच्या बाजारात नाडीची घोडदौड पुढे पुढे होत राहणार यावर... सट्टा बाजार गरम... सेनसेक्स भयभीत...
17 Apr 2011 - 10:04 pm | प्रीत-मोहर
=)) घासु गुर्जी व मुसु काका धन्य आहात ..
मस्त कविता आणि एकसे एक प्रतिसाद!!!
आमचा दंडवत घ्यावा __/\__
18 Apr 2011 - 5:57 pm | चतुरंग
धाग्यावरुन स्फूर्ती घेऊन ओळींमध्ये कुठेही नाडी शब्द न आणता आम्ही केलेले एक विडंबन आठवले! ;)
-रंगनाडी
18 Apr 2011 - 10:50 pm | गणेशा
अप्रतिम .. हसुन हसुन पुरे वाट ...
रिप्लाय पण मस्तच
4 Jul 2011 - 5:24 pm | प्रकाश घाटपांडे
आज का बरे या कवनाची आठवण यावी?
मी तर आता शरण आलो आहे.
शरण तुला शशिकांता मी रेऽ
शरण तुला शशिकांता मी रेऽ
शरण तुला शशिकांता मी रेऽ
थकलो बुवा!
4 Jul 2011 - 6:15 pm | शशिकांत ओक
मित्रा,
शरण यायला चढाई कोणी केली होती?
काल-परवापर्यंत घसरणाऱ्या बाजारभावाला इतके उधाण कसे यावर मिपाच्या लोकसभेत हंगामा ...
4 Jul 2011 - 6:45 pm | अजातशत्रु
एक 'नाडि' बाकि सब अनाडि..!
विडंबन आवडले =)
31 Oct 2013 - 7:27 pm | अत्रुप्त आत्मा
=)) अफाट! =))
1 Nov 2013 - 2:13 pm | उद्दाम
:)