मित्रानो एक सगळेमिळून एक प्रयोग करु यात
नेहमी एखाद्या काव्य प्रकारातून विडंबनाचा जन्म होतो.
आपण उलटे करू या
अगोदर विडंबन लिहुया आणि त्यावरून नन्तर त्याचे सुडंबन करुया
तुझ्या रेशमी केसांनी जीव माझा ढापला
जाता जाता सहजच कलीजा माझा कापला
का आता गमजा करू फुका आपला
भेटीत पहिल्याच तू खीसा पाचशेला कापला
सोड हा नाद झेपणार नाही तुजला
प्रेमात तुझ्या ऐसा आवाज आतला दबला
मी खुळा होतो खुळा आहे हे ठाऊक होते मजला
जादूत तुझ्या करवीयला मी माझाच खुळखुळा आपला
कळाले तरी जाहला उशीर फार हे उमजायला मजला
जेंव्ह्या तुझ्या त्या प्रीयकराने धरुनी मज बहूत चोपला.
...............विजुभाऊ
या पुढच्या ओळी तुमच्यावर सोपवतोय.....
प्रतिक्रिया
14 Mar 2010 - 9:46 am | विसोबा खेचर
विडंबनातून सुडंबन. हम्म.. कल्पनेची आयडिया चांगली आहे.. शुभेच्छा! :)
14 Mar 2010 - 9:55 am | टारझन
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
हो ! कधी कधी रोजच्या ट्रॅडिशनल रुटीन मधुन एखादं एक्सेप्शन म्हणुन उलटं ट्राय करणे अंमळ मजेशीर आहे :)
- उल्टेभाऊ
14 Mar 2010 - 3:43 pm | विजुभाऊ
राजेश ने छान सुडंबन केले आहे http://misalpav.com/node/11437
14 Mar 2010 - 7:50 pm | तुका म्हणे
विजूभाऊ, माझा प्रयत्न इथे :
http://www.misalpav.com/node/11441