दत्तकविधान-८

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
12 Mar 2010 - 7:15 pm

एकदा आपल्या फॅमिली डॉक्‍टरांकडे जाण्याची औपचारिकताच बाकी आहे, असा आमचा समज होता.
...पण प्रत्यक्षात तो खोटा आहे, हे कळायला पुढचे चार दिवस जावे लागले.
बाळाला डॉक्‍टरांकडे घेऊन जाण्यासाठी मी
संस्थेत गेलो, तेव्हा तर मोठी धमालच झाली! बाळाला न्यायचं, त्याला
पहिल्यांदाच छातीशी धरायचं, उन्हातान्हाचा त्रास नको, म्हणून मारे कार
घेऊन गेलो होतो. सोबत सासूबाई होत्या. त्याला पाहून त्या त्यांच्या
कामासाठी दापोडीला जाणार होत्या. गाडी पार्क करून उतरताना नेमका एका
कुठल्याशा पीआरचा फोन आला. त्याला त्याचं कसलंतरी "दुकान' छापून आणायचं
होतं. फोनवर बोलता बोलता मी गाडीतून उतरलो आणि अगदी आठवणीनं दार लॉक करून
टाकलं. पलीकडून सासूबाई उतरल्या. मी फोनवर असतानाच पलीकडे जाऊन
सुरक्षिततेचा उपाय म्हणून पलीकडचं दारही लॉक करून टाकलं! फोन बंद
झाल्यावर सहज म्हणून खिसा चाचपला, तर किल्ली कुठे होती? ती सुरक्षितपणे
गाडीच्या बंद काचांआडून मला वाकुल्या दाखवत होती.
मी त्या पीआरवर जळफळायचा तेवढा जळफळलो. पण थयथयाट करून उपयोग नव्हता.
स्वतःच पायावर धोंडा पाडून घेतला होता. उत्साहानं कार घेऊन येण्याची
आयडिया स्वतःच्याच अतिशहाणपणामुळे बारगळली होती. सासूबाईंची महत्त्वाच्या
कागदपत्रांची पिशवी आत गाडीत अडकल्यानं त्यांनाही जाणं शक्‍य नव्हतं.
त्याही माझ्यावर (मनातल्या मनात) जळफळल्या.
तिथून संस्थेत गेलो. माझी अडचण सांगितली. एका नर्सने बाळाला घेतलं आणि आमची वरात अखेर रिक्षाने डॉक्‍टरांच्या क्‍लिनिककडे
निघाली. दरम्यानच्या काळात मी हर्षदाला फोन करून ठेवला होता. ती ऑफिसात
होती. "घरी जाऊन डुप्लिकेट किल्ली घेऊन डॉक्‍टरांच्या क्‍लिनिकपाशी येशील
का,' असा विनंतीवजा आदेश तिला दिला. तीही माझ्यावर जळफळली. एकूण आजचा
दिवस या सर्व आप्तेष्टांच्या जळफळाटाने भस्मसात होण्याचा होता!
क्‍लिनिकमध्ये आम्हाला तुलनेनं लवकर नंबर मिळाला. त्याचं नाव
डॉक्‍टरांकडे नोंदवणं, फॉर्म भरून देण्याचे सोपस्कार पार पाडावे लागले.
हर्षदाही अनायासे आली असल्यानं ती तिथे थांबली होती.
डॉक्‍टरांनी हिरवा कंदील दिला आणि नंतर बाळाचा आमच्या घरी
येण्याचा मार्ग मोकळा झाला...प्रत्यक्ष ताब्यात घेण्याआधी आम्हाला हवं
असलेलं त्याचं नाव सुचवायचं होतं. "प्रेषित' हे नाव आधीपासून डोक्‍यात
होतं, पण गृह मंत्रालयानं त्यावर काट मारली. मग ज्याच्या आगमनासाठी आम्ही
क्षण न्‌ क्षण मोजला होता, त्याचं तेच नाव द्यायचं ठरवलं..."निमिष!'

(क्रमश:)
दत्तकविधान-७

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2010 - 7:24 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त!!!!

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

12 Mar 2010 - 7:39 pm | श्रावण मोडक

सलाम रे तुला!

श्रामोंप्रमाणेच म्हणतो..सलाम रे तुला...

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

स्वाती दिनेश's picture

12 Mar 2010 - 8:05 pm | स्वाती दिनेश

निमिषचा फोटो क्यूट आहे, चि. निमिषला अ. आ. आणि तुम्हा दोघांना हॅट्स ऑफ ,
स्वाती

रेवती's picture

12 Mar 2010 - 8:07 pm | रेवती

कालपासून वाचते आहे. मस्तच!!
पटकन लिही रे!!
निमिषचा फोटो पाहून फार आनंद झाला. बाळ गोड आहे.

रेवती

शुचि's picture

12 Mar 2010 - 9:07 pm | शुचि

केवढं गोड आहे बाळ.
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर

चतुरंग's picture

12 Mar 2010 - 9:15 pm | चतुरंग

फक्त अपार आनंद!!! :)

(डोळे पाणावलेला)चतुरंग

प्रकाश घाटपांडे's picture

12 Mar 2010 - 9:19 pm | प्रकाश घाटपांडे

आता मित्रांनो कळाले असेल की अभिजित आपला का आहे?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

नावातकायआहे's picture

12 Mar 2010 - 10:38 pm | नावातकायआहे

__/\__

मेघवेडा's picture

12 Mar 2010 - 10:34 pm | मेघवेडा

-- (नि:शब्द) मेघवेडा

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेड्याचे वेडे विचार!!

सुमीत भातखंडे's picture

12 Mar 2010 - 10:44 pm | सुमीत भातखंडे

आत्ताच सगळे भाग वाचून काढले.
पुढचा भाग टाका लवकर.