प्रस्तावना: आपण सकाळी सकाळी जेंव्हा घाई घाई मध्ये कामासाठी चाललो असताना, आपण ट्राफिक सिग्नल तोडतो आणि मग पोलीसवाला मामा आपल्याला थांबवतो आणि मग आपल्याकडून पैसे लुटतो.. तो सगळा प्रसंग सांगण्याचा प्रयत्न ह्या कवितेतून केला आहे...
आमची प्रेरणा: संदीप खरे ह्यांची 'नसतेस घरी तू जेंव्हा' ही कविता
रस्त्यात मामा आडवा येतो जेंव्हा...
रस्त्यात मामा आडवा येतो जेंव्हा...
जीव तुटका तुटका होतो...
फिरण्याचे विरती धागे
मूड फटका होतो...
रस्त्यात मामा आडवा येतो जेंव्हा...
नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो..
हि धारा दिशाहीन होते...
अन driving licence परका होतो...
रस्त्यात मामा आडवा येतो जेंव्हा...
येतात अपशब्द तोंडाशी
हिरमसून जाती मागे..
गप्प ऐकून सारा अपमान
तव मंन उदास होतो...
रस्त्यात मामा आडवा येतो जेंव्हा...
सांगा तुम्हीच मज काय
मी सांगू ह्या मामा...
त्याच्या खिसा वखवखलेला
मात्र हा आमचा लुटतो..
रस्त्यात मामा आडवा येतो जेंव्हा...
--संदीप
** कोणाच्याही भावना दुखावल्या आसतील तर क्षमस्व !!!
प्रतिक्रिया
11 Mar 2010 - 9:58 pm | पाषाणभेद
चांगला प्रयत्न आहे. अजूनही लिहीत चला.
तुमचा आय डी संदिप आहे की Navigator?
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
12 Mar 2010 - 1:59 pm | राजेश घासकडवी
संदीप खरेंच्या कवितांचं विडंबन होतं तेव्हा आमच्या भावना सुखावतात.
चांगला प्रयत्न आहे. विडंबनात कवितेतल्या उच्च कल्पनेच्या जागी कुठचीतरी सामान्य विनोदी घटना ठेवण्याची भट्टी जमली आहे. फक्त एक सूचना - मूळ कवितेतली गेयता तशीच ठेवता आली तर जास्त परिणामकारक होईल.
राजेश