दुतोंडी पाकिस्तानी नेते

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
10 Mar 2010 - 2:03 pm

दुतोंडी पाकिस्तानी नेते
हा लेख दि. ९ मार्च २०१० रोजी 'सकाळ'च्या वेब एडिशनवर प्रसिद्ध झाला असून अद्यापही खाली दिलेल्या दुव्यावर वाचता येईल.

http://72.78.249.124/esakal/20100309/5306183452989196847.htm

----------------------------------------------------------------------------------------------

नुकतीच एक बातमी मी वाचली व मी थक्क झालो! तसा मी मुशर्रफला नेहमीच 'सरडा' म्हणतो व इथेही त्याचा रंग बदलायचा गुण दिसून आला. http://www.zeenews.com/News607311.html

काश्मीरमधल्या अतिरेकी कारवायांचा जनक पाकिस्तानच आहे, तिची सुरुवातही १९८९ मध्ये झाली व बंडखोरीला हवा देण्याचे काम आजही चालू आहे हे पाकिस्तानचे भूतपूर्व हुकुमशहा व राष्ट्राध्यक्ष ज. मुशर्रफ यांनी मान्य केले. ते 'हाऊस ऑफ लॉर्डस्'च्या एका खोलीत (chamber) 'हाऊस ऑफ लॉर्डस्'च्या कांहीं मुस्लिम सभासदांसमोर 'Leadership' या विषयावर बोलत होते. काश्मिरी मुजाहिदीन टोळ्या २० वर्षांपूर्वी जेव्हा अस्तित्वात आल्या तेव्हापासून आजपर्यंत त्यांना पाकिस्तानमध्ये खूप समर्थन मिळत आहे, काश्मीर हेच भारत व पाकिस्तान यांच्यातील तेढीचे मूळ कारण आहे व हा प्रश्न सुटणार नाहीं तोपर्यंत या भागात शांती व वैभव नांदणार नाहीं असे बरेच तारे त्यांनी तोडले. मुशर्रफ सध्या लंडनमध्ये 'अघोषित (गुपचुप) निर्वासित' आहेत.

पण सत्य परिस्थिती ही आहे कीं सैन्यात ते ब्रिगेडियर/मेजरजनरलसारख्या हुद्द्यावर असताना काश्मीरमधील अतिरेक्यांच्या प्रशिक्षणाची केंद्रे उभारून त्याला चालना देणारे प्रमुख नेता होते.

स्वात खोर्‍यात तालीबानची मजबूत पकड बसली होती तिथे अलीकडे पाक सैन्याने लष्करी कारवाई केली. आपले सैन्य काश्मीरमध्ये करते ते जर 'अत्याचार', तर मग यांनी काय केले? 'लाल मस्जिद'वरील हल्ला करणारे आपल्या तत्सम हल्ल्यावर कुठल्या तोंडाने टीका करतात? वजीरिस्तानमधले रोज एक बॉम्बस्फोट करणारे अतिरेकी स्वातंत्र्यसैनिक आहेत का?

९/११ नंतर या बोटावरची थुंकी त्या बोटावर करून तालीबानला हवेवर सोडून दिल्याचे नाटक मुशर्रफ यांनी जरूर केले पण आतून त्यांना ते सामीलच होते असे अनेक वेळा दिसून आले आहे. आजही ओसामा बिन लादेन पाकिस्तानच्या संरक्षणाखाली पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या भुसभुशीत सीमेवर आश्रयाला आहे असा अनेकांचा अंदाज आहे.
खरे नाहीं वाटत? मग हा दुवा उघडा! http://tinyurl.com/ygnmc2h

इथे तर नवाज शरीफसारखा नेता पाच वेळा ओसामा बिन लादेनला भेटल्याचे वृत्त खालिद ख्वाजा या ISI च्या एका अधिकार्‍याने ARY News या पाकिस्तानी चित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. नवाज शरीफ यांनी लागलीच या वृत्ताचा इन्कार केला त्याला आव्हान म्हणून या अधिकार्‍याने म्हटले आहे, “या वृत्ताचा इन्कार करणार्‍यांना मी आव्हान देतो कीं मी अशा बैठकींबद्दल भक्कम पुरावा सादर करू शकतो व नवाज शरीफ याबाबतीत खोटे बोलणार नाहींत अशी आशा करतो." (ख्वाजा स्वतः ओसामा बिन लादेनला १०० पेक्षा जास्त वेळा भेटले आहेत असेही ते म्हणाले.)

अशा दुतोंडी पाकिस्तानी नेत्यांबरोबार काय डोंबल चर्चा करणार आपण? आपल्या सरकारला व परराष्ट्रमंत्री कृष्णा यांना कधी जाग येणार?

राजकारणप्रकटन

प्रतिक्रिया

सुधीर काळे's picture

10 Mar 2010 - 2:28 pm | सुधीर काळे

मी ARY News ला खालिद ख्वाजा यांच्या संपूर्ण मुलाखतीच्या इंग्रजी भाषेतील transcripts द्यायची विनंती १०-१२ दिवसांपूर्वीपासून केलेली आहे, पण अद्याप त्यांच्याकडून उत्तर व transcripts आलेल्या नाहींत.
------------------------
सुधीर काळे
राष्ट्रपतींना निरोप लिहा presidentofindia@rb.nic.in या ई-मेल पत्त्यावर, प्रधानमंत्र्यांना निरोप लिहा http://pmindia.nic.in/write.htm या दुव्यावर)

सुधीर काळे's picture

11 Mar 2010 - 12:34 pm | सुधीर काळे

'सकाळ'वरील या प्रतिक्रिया वाचल्यावर असे वाटले कीं 'मिपा'करांना बहुतेक पाकिस्तानचे अजीर्ण झाले असावे!
On 10/03/2010 23:28 बाळा नाडकर्णी said:
हे सगळ वरच्या लोकांना माहित असणार. वेड्याचं सोंग घेऊन पेडगावास जाणारे लोक आहेत ते.
On 3/10/2010 5:58 PM Vijay said:
काळे साहेब आपण जे म्हणता ते शंभर टक्के सत्य आहे , आणि जवळ जवळ सगळे वाचक तुमच्याशी सहमत आहेत ह्या बद्दल शंका नाही. पण इथे लिहून काय फायदा दिल्ली ला समजायला हवे पण सोनिया आणि मनमोहन अजूनही शांती अमान वगैरे बद्बद्डत असतात. अजून हि आपण त्यांच्याशी क्रिकेट खेळतो आणि अप्लाय देशात त्यांचे स्वागत करतो.
On 3/10/2010 4:32 PM Sagar said:
सर्वात पहिले म्हणजे हे आपणही काबुल केले पाहिजे कि जीनांची Direct Action हीच खरेतर अर्वाचीन काळातील पहिली दहशतवादी कृती होती .... एकदा हे लक्षात घेतले कि पुढील सर्व गोष्टींची तर्कसंगती आपोआपच लागते. रस्त्यावरच्या शेंबड्या पोराला जे कळते ते अमेरिकेला काळात नसेल का? पण आपले नेतेच कच (आणि डॉलर) खावून गप्प बसणार असतील तर दुसरे कोण आपल्याला वाचवायला येईल?
On 3/10/2010 2:36 PM trailblazer said:
काळे साहेब हा दुटप्पीपणा पाकिस्तानच्या परराष्ट्र कुत नीतीचा एक भाग आहे. भारताने चर्चा करावी किंवा करू नये याने त्यात काहीही बदल घडणार नाही. पकिस्तान हा उपद्रव मूल्य असलेला देश आहे आणि दुर्दैवाने तो आपला शेजारी देश आहे. अमेरिका आणि नाटो देशांचे चे दुटप्पी धोरण आपण कसे विसरता. काळे साहेब आपला मर्यादित युद्ध हा उपाय कदाचित इस्रेअल देशाच्या धोरणावरून असेल पण परिस्थिती वेगळी आहे. मर्यादित युद्ध हा पर्याय आपण आपल्या पुरता म्हणता ,पाकिस्तान तसे करेल असे कसे म्हणता येईल?
On 3/10/2010 2:33 PM प्रदीप said:
खूपच चांगल्या प्रतिक्रिया, प्रतिक्रिया कश्या असाव्यात याचे हे अत्यंत चांगले उदाहरण आहे. आणि आता काश्मीर बाबत, आता मला शंकाच वाटायला लागली आहे कि काश्मीर नक्की आपलाच आहे ना ? कि आपण पाकिस्तानच्या प्रदेशावर हक्क सांगतो आहे ?
On 3/10/2010 2:25 PM प्रदीप said:
खूपच चांगल्या प्रतिक्रिया, प्रतिक्रिया कश्या असाव्यात याचे हे अत्यंत चांगले उदाहरण आहे. आणि आता काश्मीर बाबत, आता मला शंकाच वाटायला लागली आहे कि काश्मीर नक्की आपलाच आहे ना ? कि आपण पाकिस्तानच्या प्रदेशावर हक्क सांगतो आहे ?
On 10/03/2010 11:49 सुधीर काळे (मूळ लेखक) said:
युद्ध करा किंवा करू नका, पण चर्चा तरी करू नका! (१) आपण काश्मीरवर उदक सोडायला तयार आहोत कां? (बहुतेक) नाहीं! (२) ’लाईन ऑफ कंट्रोल’ची तडजोड दोघे मान्य करतील कां? भारत कदाचित् मान्य करेल, पण पाकिस्तान मान्य करेल? बहुधा नाहीं. (३) काश्मीर दिल्यास पाकिस्तानची भूक भागेल का? नाहीं. हैदराबाद आहेच माझ्या मते (१) चर्चा करणे थांबवावे. (२) राजनैतिक संबंध तोडावेत (आपल्याला या संबंधांचा फारसा उपयोग नाहीं) (३) आपल्यावर अतिरेकी हल्ले झाल्यास आपण पाकव्याप्त काश्मीर मधील छावण्यावर हल्ले करून मर्यादित युद्ध करावे.
On 3/10/2010 11:10 AM BHALCHANDRA said:
ओबामाला वाचायला सांगितले पाहिजे .....
On 3/9/2010 10:52 PM Moloy said:
पाकिस्तानी नेते दुतोंडी आहेत हे वास्तव आहेच - पण मग काश्मीर प्रश्नावर उपाय काय ? भारताने हल्ला करायचा का ? पाकिस्तान सरकार तर याची कधीपासून वाट पाहते आहे - म्हणजे त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायापुढे रडायला रान मोकळे मिळेल. याचा परिणाम म्हणजे काश्मीर चा बाल्कन प्रदेश होईल. म्हणून चर्चा हाच एकमेव मार्ग आहे - अर्थात त्याच्या तपशीलाबाबत मतभेद असू शकतात.
On 3/9/2010 9:34 PM Karkhanis P. said:
दोन देश वेगळे झले म्हणून बर्याच भारतीयांना रडायला येते. परंतु ते लोक मुस्लीम देश बनला म्हणून आनंदी आहेत. तसेच आणखी बनावे ह्या प्रयत्नात आहेत म्हंजे सरळ स्वर्गात जाता येईल. धरमा पुढे काहीही मोठे नाही. अशा लोकांशी चर्चा करून काय डोंबल सोडवणार.
On 3/9/2010 8:01 PM ANIRUDHA, said:
जकार्ता या लेखात फार चांगली माहिती दिली आहे. भारत सरकारचे डोळे कधी उघडणार हे ईश्वरालाही ठावूक आहे का नाही ?? anirudha
On 3/9/2010 6:30 PM ptbm said:
is war with pak correct solution??
On 3/9/2010 3:57 PM BHALCHANDRA said:
चांगली माहिती! आपल्या डोक्यात प्रकाश कधी पडणार
On 3/9/2010 12:26 PM Prashant M said:
Informative Article
------------------------
सुधीर काळे
राष्ट्रपतींना निरोप लिहा presidentofindia@rb.nic.in या ई-मेल पत्त्यावर, प्रधानमंत्र्यांना निरोप लिहा pmosb@pmo.nic.in ई-मेल पत्त्यावर)