आठव

आमोद's picture
आमोद in जे न देखे रवी...
9 Mar 2010 - 9:44 pm

वारा भन्नाट भन्नाट,
फांदी फांदी धुमशान्,
सखी तुझीया केशांचा,
येई आठव बेभान .

थेंब थेंब सुईगत,
अंग अंग शहारत,
सय तुझिया स्प्रशाची,
माझ्या मनी उफाळत.

गती वाढत वाढत
तना मनात भीनते,
तुझ्या सवेच्या दीसांतच,
मन का हे डोकावते?

चिंब ओलेत्या ढगांची,
इथं गळाभेट होते,
तुझिया मिठीची ओढ,
मात्र फोफावत जाते.

ह्या अचाट पाण्यात,
दंगा माझिया मनात,
फुफाटत वेडा खुळा,
अग्निलोळाचा प्रपात.

शृंगारप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

प्राजु's picture

9 Mar 2010 - 10:02 pm | प्राजु

ह्या अचाट पाण्यात,
दंगा माझिया मनात,
फुफाटत वेडा खुळा,
अग्निलोळाचा प्रपात.

गुड वन!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/

शुचि's picture

9 Mar 2010 - 10:04 pm | शुचि

सही
***********************************
“The war between the sexes is the only one in which both sides regularly sleep with the enemy”

मदनबाण's picture

9 Mar 2010 - 10:03 pm | मदनबाण

"त्या" ताई माईंची आठवण आली...

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com

sur_nair's picture

12 Mar 2010 - 6:25 am | sur_nair

'येई बेभान आठव' ऐवजी 'येई आठव बेभान' घुमशानशी बरे जुळले असते. एकून सुंदर शब्दचित्र रंगवलंय .

आमोद's picture

12 Mar 2010 - 10:56 am | आमोद

माझ्या मिपावरील पहिल्या प्रकाशनास प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!! कवीतेत सुचवलेला बदल केला आहे.- आमोद (किंचीत कवी)