:''( मिसळपाव बंद होणार----
मग काय करणार ?
स्वयंपाक वेळीच होणार,
मुलांचा अभ्यास होणार
वेळेवर सारे झोपणार,
अन् वेळेवर उठणार,
रिकामे रिकामे वाटणार,
वेळच वेळ उरणार,
आता बाजारात जाणार,
भाजीपाला आणणार,
पिसीची सात सुटणार,
अभ्यास चांगला होणार,
सुयश पुन्हा मिळणार,
आई नाही बोलणार,
कुणी नाही टोकणार,
हे सारे खरे पण ----
नवे मित्र नाही मिळणार,
कविता कुठे टाकणार ?
व्यासपीटाला मुकणार,
दिवस मोठा वाटणार,
रात्र खायला उठणार,
मन रिते रिते होणार,
आनंदाला मुकणार,
कुठे कुठेसे जाणार !
गादया किती तुडविणार !
मग ठाण्याला गर्दी होणार,
तिथे ही रांग लागणार,
मग डाकटर संप करणार,
मोर्चे ते काढणार,
गुगल गुडघे टेकणार,
नि मिसळपाव सुरू होणार .
(आधार ======ओर्कुट )
प्रतिक्रिया
5 Mar 2010 - 4:15 pm | नाद्खुळा
छान छान
5 Mar 2010 - 4:34 pm | विसोबा खेचर
बंद व्हायचीच वेळ आली आहे.. मी आणि आमचा तांत्रिक प्रमूख नीलकांत ते कसंबसं चालवत आहोत.. धंदा डाऊन आहे, त्यामुळे कडकी आहे! :(
असो,
कविता मात्र छान.. :)
तात्या.
5 Mar 2010 - 6:14 pm | चित्रा
कविता छानच आहे.
फक्त मिसळपाव बंद होणार, अशी कविता इथे आल्यानंतर पाचच दिवसांत कशी टंकू शकता याचे आश्चर्य वाटले, पण कवितेतील भावनांशी समरस :)
बंद व्हायचीच वेळ आली आहे.. मी आणि आमचा तांत्रिक प्रमूख नीलकांत ते कसंबसं चालवत आहोत.. धंदा डाऊन आहे, त्यामुळे कडकी आहे!
बाकी मिसळपाव बंद पडायची वेळ आली आहे हे तात्यांनी एका कवितेला दिलेल्या एका प्रतिसादातून कळवणे हे पटले नाही. मिसळपावामागे तात्यांची आणि नीलकांतची मेहनत आहेच, पण लोकांनी स्थळ डोक्यावरही घेतले आहे. त्यामुळे पैशाची नव्हे, पण जेव्हा लोकांच्या आशीर्वादाची कडकी होईल, तेव्हा मात्र मिपा काय कुठचेही स्थळ बंदच पडेल. ती वेळ येऊ नये असे वाटते.
आणि मिसळपावाला मदत लागली तर सांगालच, असा तुमची मैत्रिण म्हणून विश्वास (अजूनही कुठेतरी) वाटतो.
5 Mar 2010 - 7:14 pm | साईली
प्रथम मिपाकराची माफी मागते.
मिसळपाव हे लाईफ टाईम चालणार आहे.
हे खर आहे मला पाच च दिवस झाले मिसळपाव सदस्य होवुन पण मला
मिपाच्या दुनियेत येण तस सोप आहे पण इकदा का इथ काहि बाहि लिहायची चटक लागली तर मात्र यातुन सुटका नाहि बर का. खर तर इथ लिहायला घेतल ,
काहि पसत पड्ल काहि उगाच लिहिल अस वाटल.
तात्या तुमच्या टिम ला माझ्या मनपुर्वक लाख शुभेच्छा.
' साईली सद्स्य बंद होणार , मिसळपाव कधीच नाही.
नकळत कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असेल तर या वेड्या कोकराला माफ करा......
5 Mar 2010 - 7:29 pm | शुचि
अगं वेडे तू तर लिहीलं आहेस की मिपा चालू होणार .... कसली माफी मागतेस?
तुझा कल्पनाविलास हा आहे की - मिपाशिवाय जगणं कस दुर्लभ आहे / दुष्वार आहे.
तू कुठे विरोधी लिहीलयस?
मला तुझ्या भावना कळल्या आणि माझ्यासारखे अनेक असतील.
अ-ने-क!!!
चीअर अप : )
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
5 Mar 2010 - 7:33 pm | चित्रा
कोकरांनी कशाला माफी मागायची?
साईली सदस्य कशाला बंद होणार? नको, तुम्ही इथेच रहा, लिहा, आणि फुला.
फक्त आश्चर्य वाटले ते तुम्ही असे लिहीण्याचे आणि तात्यांनी मिपा बंद करण्याचीच वेळ आली आहे असे जाहीर करण्याचे याची एकच गाठ पडावी याचे. पण त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही हो. तुमचे काव्य आणि लिखाण मनसोक्त चालू द्या. मिपा तुमचेच आहे. ते वाढवा, म्हणजे झाले.
5 Mar 2010 - 4:52 pm | प्रमोद देव
घटनायें महाजालके इतिहासमें होती रहती है. ;)
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
5 Mar 2010 - 5:58 pm | शुचि
मस्त!! कल्पनाविलास
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
5 Mar 2010 - 7:01 pm | नितिन थत्ते
>>मस्त!! कल्पनाविलास
मस्त शब्दावर तीव्र आक्षेप. सायलीच्या ~!@#$%^&*~!@#$%^&
नितिन थत्ते
5 Mar 2010 - 7:34 pm | पाषाणभेद
मिपा सारखी सगळी मराठी संस्थळे बंद कशी काय होवू शकतात?
कवितेचे शिर्षक "मिसळपाव बंद होणार" च्या ऐवजी "संस्थळे बंद होणार??" असे कर ना मग. वर जे लिहीलेले आहे ते सर्व (भाषेतील) संस्थळांना व एकूणच आंतरजालालाच लागू होत नाही का?
अन "गादया किती तुडविणार !" हे काही समजले नाही.
निट समजून सांग बरं.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
5 Mar 2010 - 8:35 pm | धिन्गाना
खरच कि काय? मग आमच कस होनार?