आज सकाळपासून एक ढकलपत्र जालावर फिरतेय. (माझ्या ८ मित्रांनी पाठवलंय मला आजच्या दिवसात).
सचिनची कुणीतरी आरती लिहिलीये. कोणी लिहिलंय ठाऊक नाही.
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता आनंदाची!
अविस्मरणीय खेळी तुझी द्विशतकाची!
सर्वांगी सुंदर उधळण चौकारांची!
आकाशी झळके माळ उत्तुंग षटकारांची!
जय देव जय देव जय तेंडुलकरा!
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा! जय देव जय देव..
१४७ चेंडू खेळपट्टीवरी उभा!
सर्व गोलंदाजांची दिसे दिव्य शोभा!
मदतीला कार्तिक पठाण धोनी आलेगा!
धावांचा डोंगर उभा राहिला बघा! जय देव जय देव..
दुमदुमले मैदान झाला जल्लोष!
थरथरला गोलंदाज मानिला खेद!
कडाडली बॅट चेन्डुचा शिरच्छेद!
असामान्य अद्भुत शक्तिचा शोध! जय देव जय देव..
चांगलं लिहिलंय.. पण इतकं खास वाटत नाही.. म्हणजे शब्द उगाच घुसवून भरल्यासारखे वाटतात.. आणि सर्वस्वी सचिनच्या २०० धावांवरच लक्ष दिलंय.. सचिन हा असा विषय आहे की लिहायला घेतलं तर शब्द अपुरे पडतात.. त्याची आरती म्हणजे त्याचं गुणगान हवं .. केवळ त्याच्या एकाच खेळीच गुणगान करून कसं चालेल? म्हणून मला प्रेरणा मिळाली.. आणि मीच एक आरती लिहूया म्हटलं ..
कृपया याकडे एका मर्त्य मानवाची केलेली अवास्तव भक्ती या दृष्टिने पाहू नका.. 'सचिनला विनाकारण दिलेलं देवपण' या विषयावर चर्चा रंगवू नका.. भावना समजून घ्या..
जय देव जय देव जय सचिनदेवा,
संकटसमयी करिती, कठिण समयी करिती, सर्व तुझा धावा.. जय देव जय देव..
धावांचा शतकांचा विक्रमादित्य,
अब्जो हृदयांचा राजा तू नित्य,
दु:खे विसरूनि तुजला पाहती जन,
आनंदाला येई त्यांच्या उधाण.. जय देव जय देव..
बॅटच तुझी देते प्रश्नां उत्तर,
बोलकि तोंडे बंद करिशी सत्वर,
खेळ तुझा पाहुनी धन्य जीवन,
रवि'दास' आजन्म चरणाशी लीन.. जय देव जय देव!
आरत्यांचे वृत्त मला ठाऊक नाही कुणास ठाऊक असल्यास जरूर सांगावे..
प्रतिक्रिया
5 Mar 2010 - 4:35 am | राजेश घासकडवी
तुम्ही म्हटल्याप्रमाणे पहिली आरती एका युद्धाची आहे तर दुसरी योद्ध्याच्या वर्णनाची आहे. मला तुमची आरती त्यामुळे जास्त आवडली.
शिवाय पहिलीत उगाच शब्द टाकले आहेत - ते चालीवर गायचे म्हणजे वाइड बॉलसारखे तालाच्या बाहेर जातात. तुमची छान गुड लेंग्थ, ऑफ स्टंपच्या थोडी बाहेरची लाईन पडलेली आहे.
मर्त्य मानवाची भक्ती करण्याबाबत बचावात्मक फॉरवर्ड डिफेन्सिव्ह खेळी मात्र आवडली नाही. सरळ क्रीजच्या बाहेर येऊन षटकार मारावा. काही अनुष्काची, मधुबालाची भक्ती करतात काही सचिनची. अशी भक्तीस्थानं नसणारे लोक बाराव्या खेळाडूप्रमाणे मैदानाबाहेर जगतात असं वाटतं.
जाता जाता - 'धावा' वर श्लेष इथे शोभून दिसेल असं वाटतं.
राजेश
5 Mar 2010 - 6:51 pm | मेघवेडा
धन्यवाद राजेशजी..
मर्त्य मानवाची भक्ती करण्याबाबत बचावात्मक फॉरवर्ड डिफेन्सिव्ह खेळी मात्र आवडली नाही.
उगाच या विषयाने निरर्थक चर्चेला तोंड फुटू नये असं मला वाटलं. अशा चर्चांचा चावून चावून चोथा झालय अगदी. मला आलेल्या ढकलपत्रात ही आरती वाचली आणि काहीतरी चुकतंय असं वाटल्याने उस्फूर्तपणे मी ही आरती लिहिली. म्हणून म्हटलं भावना समजून घ्या. या रचनेकडे एक सर्वसामान्य रचना म्हणून बघा. बाकी सचिनच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही नेहमीच षटकार मारतो.. नाहीतर इतक्या उस्फूर्तपणे ही आरती लिहिली गेली नसती!
-- मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
5 Mar 2010 - 5:53 am | प्रभो
मस्त रे
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
5 Mar 2010 - 10:16 am | Manish Mohile
छान आरती.
तुमच्या मुद्द्यात तथ्य आहे. जालावर फिरणारी आरती ही सचिनच्या २०० धावान्च्या खेळीवरच केन्द्रीत झालेली आहे. तुमची आरती मात्र केवळ दोनच कडव्यान्मध्ये सचिन तेन्डुल्करच्या कारकीर्दीचा आढावा घेते (धावान्चा, शतकान्चा विक्रमादित्य) आणि सचिनने अब्जावधी लोकान्च्या वर जी मोहेनी घातलेली आहे त्याची पण जाणीव करून देते. ( अब्जो हृदयांचा राजा तू नित्य, दु:खे विसरूनि तुजला पाहती जन, आनंदाला येई त्यांच्या उधाण).
त्याच बरोबर आजच्या काळातला हा कदाचित एकमेव क्रिकेट खेळाडू जो फक्त क्रिकेटवरच पूर्ण लक्ष केन्द्रीत केलेला दिसतो. रॅम्प वॉक, नट्यान्बरोबर लफडी या एक्सट्रा करीक्युलर अॅक्टीवीटिज मध्ये दिसत नाही. आज सतत वीस वर्षे प्रचन्ण्ड अपेक्षान्चे ओझे लीलया वागवत आन्तरराष्ट्रीय पातळीवरचे क्रिकेट खेळणारा एकमेव महान खेळाडू.
As someone has rightly said, "If cricket is religion, Sachin is God.".
पुन्हा एकदा तुमचे मनःपूर्वक अभिनन्दन छान समर्पक आरती लिहील्याबद्दल.
6 Mar 2010 - 12:03 am | विसोबा खेचर
मस्त आरती! :)
(किरमाणी प्रेमी) तात्या.
6 Mar 2010 - 8:52 am | सायबा
मेघवेडा-भाऊ,
तुम्ही लिहिलेली आरती मस्त आहे व तिची रचना सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालणार्या आरतीपेक्षा जास्त चांगली आहे.
क्रिकेटविक्रमाखेरीजचे सचिनचे गुण टाकून आणखी कडवी रचावीत ही विनंती.
सायबा
6 Mar 2010 - 10:18 am | वेताळ
पण त्याची आरती रचने,पुजा करणे म्हणजे रमेश बागणेनी राहुल गांधीचे जोडे उचलण्यासारखे हिणकस आहे.
वेताळ
6 Mar 2010 - 10:31 am | II विकास II
>>पण त्याची आरती रचने,पुजा करणे म्हणजे रमेश बागणेनी राहुल गांधीचे जोडे उचलण्यासारखे हिणकस आहे.
तद्दन मुर्खपणा आहे.
इतक्या सहजसहजी देव होता येथे हे पाहुन अंमळ मौज वाटली.
----
२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!
6 Mar 2010 - 10:21 am | अमोल खरे
कौस्तुभ सोमण म्हणुन कोणीतरी आहे. त्याचा ब्लॉग आहे... त्याने ही कविता केलेय. त्याची लिंक खालीलप्रमाणे.
http://kaustyachablog.blogspot.com/2010/02/blog-post.html
6 Mar 2010 - 11:07 am | टारझन
मस्त आरती! :)
(किरणमोरे प्रेमी) टार्या.
6 Mar 2010 - 6:51 pm | मेघवेडा
माकडउड्या आठवतात का?
-- (मियांदाद प्रेमी) मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
6 Mar 2010 - 8:22 pm | चिरोटा
मस्त आरती!
(हॉकी प्रेमी) भेंडी
P = NP
7 Mar 2010 - 7:58 am | नंदू
त्या ढकलपत्रातील आरतीचा जनक
http://72.78.249.125/esakal/20100301/5176533400099723434.htm