माझे बाबा...........

मंगेशपावसकर's picture
मंगेशपावसकर in जे न देखे रवी...
2 Mar 2010 - 11:15 am

माझे बाबा...........

आज जरी हे लिहिताना इथे नसलात तरी

नेहमीच माझ्या भोवती आहात

वडील म्हणून माझ्यासाठी

माझे मित्र बनून सोबती आहात

तुमच्या समोर तुम्हाला कधी सांगू शकत नाही

माझ्यासाठी तुम्ही काय काय केले त्याचा पाढा वाचू शकत नाही

भाग्य लागत अश्या वडिलाचा मुलगा बनायला

खांद्या वर हात टाकून मित्रासारखे चालायला

तुमच्याच रक्तातला स्वाभिमान

भरभरुन आहे माझ्या नसानसात

म्हणुनच मान ताठ ठेवूनच

वावरतो मी कुठेही जगात

नसेल दिला कदाचित लहानपणी

भरपूर खाऊ आणि रासभर खेळणी

पण तेव्हा तुम्ही शिकवलेलं थोड्यातलं समाधान

पुरुन उरेल जन्मभर तुमची तीच गोड वाणी

तुम्ही पुरुष म्हणून कदाचित

जमलं नसेल आईसारख कुशीत घ्यायला

तरीही तुमच्या मूक प्रेमाची

नेहमी जाणीव नक्कीच असते मला

स्वतःहून कधीही न घडवता

आम्हाला नजरेवर घडू दिलंत

धाकाच्या पिंज-यात कधी न कोंडता

मोकळ्या हवेत मला स्वच्छंद ऊडू दिलंत

जितका अभिमान तुम्हाला वाटतो

हा माझा मुलगा आहे असं सांगतांना

त्याही पेक्षाहि जास्त मला आहे

तुम्हाला माझे बाबा म्हणताना

तुमच्या गुण दोषांसहित

तुम्ही मला प्रिय आहात

लहानपणापासून तुम्ही म्हणून माझ्यासाठी

तोच कहाणीतील जंगलातील राजा सिंह आहात

मंगेश कुश पावसकर

mgccmangeshpaw@gmail.com

कवितामुक्तक