गेली संक्रांत आली बाई होळी हो
नाही काही तुमचा पता
कुणासंग पंचीम रंगाची मी खेळू हो
सन भाग्याचा, आहे फार मोठा
घरला या धनी, राग आता सोडा
तुम्हांसाठी केली, पुरणाची पोळी हो
दिस उन्हाळी, सोसवेना उन
किती पुसावं, घामाघूम अंग
आग लावी राती, चंदनाची चोळी हो
तुमच्याविना शेज, सुनी सुनी लागे
विझली होळी अन, राख उरं मागे,
रोज खुणविते, चंद्रकोर भाळी हो
ही लावणी मीराबाईंच्या " केनो संग खेलू होरी, पिया त्यज गये है अकेली" या वरून स्फुरली. चाल स्वरचित पुरिया धनश्री वर आधारित.
प्रतिक्रिया
28 Feb 2010 - 10:20 pm | पाषाणभेद
शाहिर, मस्त हाय ह्ये कवन बरं का.

डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
2 Mar 2010 - 4:37 am | पक्या
छान बरंका
जय महाराष्ट्र , जय मराठी !
2 Mar 2010 - 4:48 am | शेखर
अप्रतिम लावणी....