नगरला लहानपणी वाड्या मधे कासार यायचा..पाठीवर पेटारा असायचा... आत रंगी बेरंगी बांगड्या..आला कि मजेदार आरोळी द्यायचा...बांगड्या घ्या बांगड्या ..बायकाना विकत..पुरुषाना फुकट..असे एकले की आम्ही मुले हसायचो...आज आठवले कि त्याच्या त्या स्लोगन च्या कल्पकतेची मजा वाटते.
प्रतिक्रिया
28 Feb 2010 - 6:57 pm | शुचि
जुनी आठवण जागी केलीत. डबे - बाटलीवला यायचा. गरीब मणूस होता बिचारा. एकदा तो समोरून येत होता त्याची हातगाडी घेऊन आणि मी असेन ५वीत मी येत होते रस्त्याच्या २र्या बाजूने. मला २ रुपयाची नोट सापडली. केवळ २ क्षणाने त्याला ती मिळाली नाही. पण त्याचा चेहेरा इतका पडला.
मला अजूनही फार वाईट वाटतं की ती त्याला न मिळता मला मिळाली याचं. इतकी लहान होते की "प्रोअॅक्टिव्हली" जाऊन त्याला द्यावी हे लक्षात आलं नाही.
२ रुपये त्या हातावर पोट असलेल्या माणसाकरता खूप होते.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
1 Mar 2010 - 9:38 am | तिमा
मोठेपणी तुम्हाला असे वाटते म्हणजे तुम्ही अजून 'शुचिर्भूत' आहात.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|