आज पुन्हा गपचूप घरी येऊन गप्प बसलो .............

मंगेशपावसकर's picture
मंगेशपावसकर in जे न देखे रवी...
27 Feb 2010 - 10:23 am

आज पुन्हा गपचूप घरी येऊन गप्प बसलो ...........

आज पुन्हा गपचूप घरी येऊन गप्प बसलो
कुणाला सांगू कि नको या धर्मसंकटामध्ये अडकून बसलो

आता बोललो तर ती काय म्हणेल
नाही बोललो तर मित्र काय म्हणतील
म्हणून आज कॉलेज मधून मान खाली घालून घरी कटलो............

आज पुन्हा गपचूप घरी येऊन गप्प बसलो
कुणाला सांगू कि नको या धर्मसंकटामध्ये अडकून बसलो

तिच्या मैत्रिणीशी ओळख काढायला गेलो
तिच्या आवडी बद्दल काही जाणायला गेलो
पण तिच्या मैत्रिणीच्याच आवडी निवडी ऐकून आलो.................

आज पुन्हा गपचूप घरी येऊन गप्प बसलो
कुणाला सांगू कि नको या धर्मसंकटामध्ये अडकून बसलो

आज मनाशी एक प्रण केले होते
काही झाले तरी बोलायचेच हे ठरवले होते
तिच्या साठी माझी बाईक विकून एक गिफ्ट घेतले होते

मग आज पुन्हा शेवटचेच गपचूप घरी येऊन गप्प बसलो
कुणाला सांगू कि नको या धर्मसंकटामध्ये अडकून बसलो....

आज निघालो तडक तिला भेटलो
तिला तुझ्या वर प्रेम आहे म्हणालो
"मुस्काटात खाल्ली जोरात", हातातले गिफ्ट खाली कोसळले
बॉय फ्रेंड आहे तिला समजताच रडू आवरले.....

मग नंतर काय झाले तुम्हाला माहीतच आहे

आज पुन्हा गपचूप घरी येऊन गप्प बसलो
कुणाला सांगू कि नको या धर्मसंकटामध्ये अडकून बसलो

मंगेश पावसकर

mgccmangeshpaw@gmail.com

हास्यमांडणी

प्रतिक्रिया

sur_nair's picture

28 Feb 2010 - 11:24 pm | sur_nair

स्वतःचे कॉलेजचे दिवस आठवले. थोडे editing वर लक्ष द्या. एक कडवं repeat आहे असे वाटले. 'मान' ऐवजी 'मन' पाहिजे का?

मंगेशपावसकर's picture

1 Mar 2010 - 3:09 pm | मंगेशपावसकर

आपल्या प्रतिक्रिया व मार्गदर्शनासाठी आपले मनापासून धन्यवाद. याच प्रकारे नेहमीच मला माझे साहित्य अधिक उत्तम करण्यास सहाय्य कराल अशी आशा बाळगतो

पाषाणभेद's picture

1 Mar 2010 - 1:08 am | पाषाणभेद

काही हरकत नाहीए. तिच्या मैत्रीणीशी सुत जमवा एकदाचे.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

टारझन's picture

1 Mar 2010 - 2:13 am | टारझन

वा वा वा !! कानफाटात खाणारा प्रेमविर (आणि कानफाटात देणारी ) बर्‍याच वर्षांनी पाहिले. हल्ली हे लोकं लुप्त होत चाललेत.
पुढील कानफाटासाठी शुभेच्छा :)

-(ज्याचा गालांपर्यंत पोरींचे हात पोचु शकत नाही तो) टारझन बच्चन

शुचि's picture

1 Mar 2010 - 6:46 am | शुचि

मस्त!!!
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

पक्या's picture

2 Mar 2010 - 5:13 am | पक्या

अहो पण बाइक का विकली? एका गिफ्ट साठी? बाइक विकण्याची वेळ यावी? एवढे कसले महागडे गिफ्ट घेतले? ते कडवे पचले नाही.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

मंगेशपावसकर's picture

11 Mar 2010 - 10:46 am | मंगेशपावसकर

धन्यवाद