आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार...

कुल's picture
कुल in जे न देखे रवी...
23 Feb 2010 - 9:14 pm

आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार...

आमची प्रेरणा - संदीप खरे यांची 'आता पुन्हा पाउस येणार' ही कविता

आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार , घरादाराच्या चिंधड्या होणार,
सरकार किती परदेशी गेले ते शोधणार, रिक्षावाले गेले याचा विसर पडलेला असणार ,
अमेरिका संध्याकाळी निषेध करणार , सकाळीच त्यांनी 'पाक' ला शस्त्रे विकलेली असणार ,
इकडे पाटील कपडे बदलणार, देशमुख चित्रपट काढणार ,
'बाबा' रात्रभर पार्टीत नाचणार, बाहेर जोड्यांसाठी मंत्री उभे असणार ,
पद्मभूषण मात्र शाहरुख च ठरणार , काय रे देवा !

आता पुन्हा दुष्काळ पडणार, विदर्भ मराठवाडा होरपळून निघणार,
आबा रडायला लागणार, शिंदे हसतच राहणार ,
चव्हाण-ठाकरे दिल्लीला जाऊन निर्णय घेणार ,
'हे' वाघावर तर 'ते' इंजिनावर स्वार होणार ,
आमटे , बंग वेड्यागत अनवाणीच धावणार ,
जाणते साहेब मात्र लवासात स्विमिंग पूल उभारणार , काय रे देवा !

आता पुन्हा निवडणुका होणार, काळा पैसा सगळा बाहेर पडणार,
यांना जिजाऊ तर त्यांना दादोजी आठवणार ,
मातोश्री गरजणार, कृष्णकुंज आदेश देणार,
बाई 'झंझावाती' रोड शो करणार, उनाड च्यानेल्स बोकाळणार ,
अण्णा उपोषण करणार, कुणा कुणाचा 'स्वाभिमान' जागा होणार,
निवडणुकीची सुट्टी म्हणून आम्ही मात्र खंडाळ्याला जाणार, काय रे देवा !

आता पुन्हा अप्रेझल होणार , जो तो बॉस ला शिव्या देणार
बॉस त्याच्या बॉस च्या नावाने खडे फोडत असणार
कंपनी मात्र कागदावर तोटाच दाखवत राहणार
किती टक्के हाच महत्वाचा प्रश्न होऊन राहणार
पंधरा नाही तर दहा तरी द्या असे लाचार स्वर निघणार
'थाळात' मात्र एक टन उस ९० लाच तुटणार, काय रे देवा !
- सुभाष डिके (कुल)

तळटीपा :
१. 'थाळ' - ऊस तोडणीचे स्थळ
२. तोडणी मजुराला ९० रुपये टन हा अगदी अलीकडचा खरा भाव आहे
३. घटना व पात्रे खरे आहेत - योगायोग नाही

हास्यकरुणविडंबन

प्रतिक्रिया

भिडू's picture

23 Feb 2010 - 9:22 pm | भिडू

छान

प्राजु's picture

23 Feb 2010 - 9:28 pm | प्राजु

व्वा!
मस्त!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/

विसोबा खेचर's picture

23 Feb 2010 - 10:12 pm | विसोबा खेचर

एकदम ब्येस वास्तववादी कविता...!

तात्या.

टारझन's picture

23 Feb 2010 - 10:28 pm | टारझन

खल्लास प्रतिक्रीया !

- सुटसुटित

नितिन थत्ते's picture

23 Feb 2010 - 10:33 pm | नितिन थत्ते

चांगली कविता.

नितिन थत्ते

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Feb 2010 - 11:35 pm | बिपिन कार्यकर्ते

हेच म्हणतो.

बिपिन कार्यकर्ते

रेवती's picture

24 Feb 2010 - 5:04 am | रेवती

हम्म!
वास्तव सांगितलं आहे आपण!
उसाच्या एका टनाला ९० रुपये म्हणजे..... :(

रेवती

II विकास II's picture

24 Feb 2010 - 9:12 am | II विकास II

>>उसाच्या एका टनाला ९० रुपये म्हणजे..... Sad
काही ठिकाणी दर ह्यापेक्षा जास्त आहे. आणि हा दर इतकाही वाईट नाही.
सर्वसाधारणपणे एक जोडपे दिवसाला २ टन उस तोडु शकते. त्यांना उस मालकांकडुन वाढे बांधण्याचे पैसे वेगळे मिळतात. त्यात त्याच्या घरखर्च आरामात चालतो. सरपण व इतर छोट्या गोष्टी सुद्धा उसमालकाकडुन भेटतात.
इतर कामासाठी शेतमजुराला सध्या ९० ते १५० पर्यंत प्रतिदिन मजुरी मिळते.

शेवटी मागणी आणि पुरवठा...
---
२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!

कुल's picture

24 Feb 2010 - 3:26 pm | कुल

काही ठिकाणी दर ह्यापेक्षा जास्त आहे. आणि हा दर इतकाही वाईट नाही.

आपला मताचा आदर आहे.. पण 'ती' ओळ लिहिण्यामागचे खरे कारण म्हणजे - आपण ३६५ दिवस खरच किती (आणि काय !) काम करतो याचा जराही विचार न करता अमुक एवढे लाख पगार वाढवून मिळण्याची अपेक्षा करणारे लोक आजुबाजूला बघतो आणि प्रश्न पडतो की खरच यातील किती लोकांना इतरांच्या कष्टाची ओळख (आणि जाणिव ) आहे .. इथे कोणी अनुभव घेतला असल्यास माहीती नाही, पण उसाच्या शेतात एका बाजूने शिरुन दुसर्‍या बाजूने बाहेर पडल्यास ज्या प्रकारे हात पाय साळून निघालेले असतात, ते अनुभवल्यावर टनाचा दर किती कमी आहे हे कळून चुकते...

असो, प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद
सदर कविता ई-सकाळ वर http://72.78.249.107/esakal/20100223/5640162903973897816.htm वाचावयास मिळेल

मदनबाण's picture

24 Feb 2010 - 5:18 am | मदनबाण

वास्तव दर्शवणारी कविता... :(

मदनबाण.....

तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...

वास्तववादी कविता...मस्तच लिहता भाउ

वेताळ

मि माझी's picture

24 Feb 2010 - 12:55 pm | मि माझी

मस्त..मस्त...मस्त .....
मी माझी..

निशा कुलकर्णी's picture

24 Feb 2010 - 1:45 pm | निशा कुलकर्णी

मस्त.....

अनामिका's picture

24 Feb 2010 - 3:44 pm | अनामिका

दाहक वास्तव दर्शवणारी!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

Navigator's picture

25 Feb 2010 - 12:53 pm | Navigator

वाह रे बेंड्या....

तु इथे पण का??

मस्त, अप्रतिम कविता....

जयवी's picture

25 Feb 2010 - 6:13 pm | जयवी

वास्तव दाखवणारी कविता.....मस्तच :)

विनायक रानडे's picture

25 Feb 2010 - 11:18 pm | विनायक रानडे

मला कधितरी कविता समजते
मग अर्थ उमजतो
मग मनापासून प्रतिसाद द्यावासा वाटतो
पण शब्द सापडत नाही, काय हे देवा!

शुचि's picture

25 Feb 2010 - 11:26 pm | शुचि

काही वेगळीच ..... हट के!!!! नाना पाटेकर चा अभिनय आठवला समहाऊ..... चर्र करणारा
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)