खिंड

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
22 Feb 2010 - 2:30 pm

"अय्या,सर तुम्ही. बर झाले तुम्ही भेटलात "
बॅकेत गर्दी होती. पैसे मिळायला कमीत कमी अर्धा तास लागणार होता. आता खिंड लढवणे भाग होते.
"पोरीने नशिब काढले हो"
लग्न ठरले का"?
"इश्श, काही तरीच काय. एवढ्यात कुठे लग्न"
ह्या मातेच्या मुलीला मी पंधरा दिवसापुर्वी एका गोरटेल्या मुलाबरोबर अपुर्ण स्काय वॉक वर 'टेकान घेवा' स्थितीत बघितलेले होते. त्यामुळे एक नैसर्गिक प्रश्न होता तो.
"माझ्या वेळी खुपच त्रास झाला होता हो. धड पंखे पण नव्हते"
आता हीच्या पहिल्या डीलिवरी ला मॅटरनिटी होम मधे लेबर रुममधे पंखा नसल्याने जे हाल झाले त्या बद्दल तर बोलत नसावी. पण हे माझ्या कडे का बरे बोलावे ? मी आपला हैराण. काहीतरी बोलुन तोंड घशी पडण्यापेक्षा मी आपला नेहेमीचा उपाय वापरला.
हम्म
"आताच सेंटर ला जाउन आले"
कसले सेंटर?
मला काहीच कळेना.
"अहो सर, असे काय करताय? उद्यापासुन बारावीची परिक्षा सुरु होतेय ना"?
हां हां. तुम्ही नशिबाबद्दल काही तरी म्हणत होतात त्या मुळे मी गोंधळलो.
"माझ्या वेळी तर बाक पण हलत होता. बाकात ढेकुण सुद्ध्हा होते. त्या मुळे माझी मेरीट गेली"
हम्म.
" सेंटर अगदी छान आहे. भरपुर वेंटीलेशन आहे. उजेड आहे. सहा सहा पंखे सुद्धा आहेत."
चालु आहेत ना?
" हो, हो. त्याची पण खात्री करुन घेतली"
खरेच नशिबवान हो तुमचे कन्या रत्न.
"आमच्या ह्यांनी गेले ३ आठवडे ऑफिस ला सुट्टी घेतली आहे."
वा वा वा.
" सांगायचे म्हटले तर ह्यांनी पण खुपच मेहेनत घेतली हो"
म्हणजे?
" ह्यांचे म्हटले तर एकदम 'सायंटीफीक काम' हो.
मी दचकलो. आजुबाजुला कुणी श्रवण कुमार नसल्याची खात्री करुन घेतली.
म्हणजे काय?
"आता तुम्हा डॉक्टर आणि समुपदेशक मंडळी ना आम्ही काय सांगणार"?
मी तुम्ही म्हणता तसा काहीही नाही हो. पण एक पालक म्हणून काय असेल तर सांगा तुमच्या ह्यांच्या सायंटीफिक कामाबद्दल.
"ही तुमची विनम्रता आहे. पण आता विचारताहात तर सांगते. ३ आठवड्या पुर्वी ह्यांनी गजबजलेल्या रस्त्यावरच्या ध्वनी प्रदुषणाचे रेकॉर्डींग केले.
इतर क्लासेस चे पेपर झेरॉक्स केले. एक हलणारा बाक आणला. हे सर्व पेपर त्यानी मुली कडुन बाकावर बसुन सोडवुन घेतले. पार्श्वभुमीवर टेप रेकॉर्ड लावला होता. ए पर्फेक्ट सिम्युलेशन एक्सरसाइज."
काय सांगताय? एकदम चंद्रावरची स्वारी इतकी तयारी म्हणा की.
" हो आपण सर्व प्रकारांना तयार असायला पाहीजे असे ह्यांचे म्हणणे"
हो का? बर बर. एकदा भेटायला पाहिजे बाबाना.(भेटल्यावर ह्याच्या भुमीवर लाथ घालायला मिळाली तर उत्तम)
" शेवटच्या दिवशी अभ्यासाची काही टीप द्या हो."
परिक्षेच्या आयचा घो म्हणत मुलीला शांत झोपु द्या.
इतक्यात टोकन ची बेल वाजली आणि माझी खिंडीतुन सुटका झाली.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

22 Feb 2010 - 2:46 pm | चिरोटा

=)) एकदम खल्लास.

इतर क्लासेस चे पेपर झेरॉक्स केले. एक हलणारा बाक आणला. हे सर्व पेपर त्यानी मुली कडुन बाकावर बसुन सोडवुन घेतले. पार्श्वभुमीवर टेप रेकॉर्ड लावला होता. ए पर्फेक्ट सिम्युलेशन एक्सरसाइज

मागे पुढे आजुबाजुची मुले नुसती बसवायला पाहिजे होती. म्हणजे पर्फेक्ट सिम्युलेशन झाले असते.
भेंडी
P = NP

कानडाऊ योगेशु's picture

22 Feb 2010 - 3:42 pm | कानडाऊ योगेशु

"माझ्या वेळी खुपच त्रास झाला होता हो. धड पंखे पण नव्हते"
आता हीच्या पहिल्या डीलिवरी ला मॅटरनिटी होम मधे लेबर रुममधे पंखा नसल्याने जे हाल झाले त्या बद्दल तर बोलत नसावी.

" ह्यांचे म्हटले तर एकदम 'सायंटीफीक काम' हो.
मी दचकलो. आजुबाजुला कुणी श्रवण कुमार नसल्याची खात्री करुन घेतली.

=))
हे असे काही वाचले कि साध्या साध्या वाक्यातुन सुध्दा वेगळा अर्थ सूचित होतो.भलतेच शब्द दिसु लागतात.

"माझ्या वेळी तर बाक पण हलत होता. बाकात ढेकुण सुद्ध्हा होते. त्या मुळे माझी मेरीट गेली"

मेरीट च्या जागी एकदम मॅटर्निटी हाच शब्द असल्याचा भास झाला.

मास्तुरे फुर्र....

(बॅकबेंचर)योगेश

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

शुचि's picture

22 Feb 2010 - 4:41 pm | शुचि

मस्त मजा आली. =))
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

चतुरंग's picture

22 Feb 2010 - 6:06 pm | चतुरंग

बाक हलतो, ट्रॅफिक आहे ....छान चांगली सिम्यूलेशनं चालू आहेत!

(मागे एकदा कोणी बंधू-भगिनी बोर्डात आले होते त्यांच्या घरच्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं म्हणे. ते मी वाचलं नाहीये पण त्यात संपूर्ण वर्षभर घरात कुकरच्या शिट्या केल्या नाहीत, बेडरुमपासून संडासपर्यंत सगळीकडे भिंतीवर फॉर्म्यूले चिकटवून ठेवले होते, घरात अख्खी केमिस्ट्री लॅब केली होती म्हणे प्रयोग करुन बघायला. असलं काय काय ऐकलं होतं! म्हणलं कमाल आहे. इतकं सफरचंदी आणि कुशन्ड आयुष्य असतं का? असल्या वातावरणात वाढून बाहेर पडल्यावर त्या मुलांचे हाल कुत्रा खाणार नाही.)

चतुरंग

त्यांनी लिहिलेल्या निबंधाच पुस्तक प्रकाशित केलं होतं..पुस्तक वाचून डायबेटीस झाला असता. आमच्या वर्गातल्या १ ते १० नं नी पुस्तक पाठ केलं होतं. सगळ्यांचा आवडता ऋतू "वसंत" आणि सुरवात "कुहू कुहू" ने.

पण लेखात लिहिलेला बाप खरच अस्तित्वात असेल तर परिस्थीती खरच अवघड आहे..

-(आवडता ऋतू "उन्हाळा" लिहिलेला) एक

चतुरंग's picture

23 Feb 2010 - 6:52 am | चतुरंग

चांगलंच लक्षात राहिलंय की तुमच्या! :)

(गोग्गोड निबंधांची अ‍ॅलर्जी असलेला)चतुरंग

रेवती's picture

22 Feb 2010 - 6:41 pm | रेवती

बापरे! किती ही तयारी!
मनोरंजक लेखन!

रेवती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Feb 2010 - 7:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर, त्या पालकाला भेटल्यावर आमचा नमस्कार सांगा.:) तुम्ही म्हणता तसं विद्यार्थ्यांना रिलॅक्स ठेवलं पाहिजे. असो, उत्तरार्ध उद्यापासून सुरु होईल.

सर, विद्यार्थ्यांची यावर सुटका होत नाही. प्राध्यापकांना विनंती करुन [विनंती नाकारली तरी] परीक्षा हॉलमधे घुसून मुलगा / मुलगी व्यवस्थित सीट नंबरवर बसला/बसली की नाही. बेंच हलत असेल तर बेंचला वटकन लावणारे पालक.[प्रसंगी भांडणारे पालक]

सर, सेंटरभोवती अस्वस्थपणे फिरणार्‍या पालकांचा फोटू टाकतोच...! :)

असो, सर परीक्षांचा हंगाम सुरू झालाय. अजून किस्से येऊ द्या. [मीही प्रतिसादात किस्से लिहीन.]

-दिलीप बिरुटे

रेवती's picture

22 Feb 2010 - 7:30 pm | रेवती

तुमचे किस्सेही वाचायला आवडतील.
येऊ द्या!
रेवती

चतुरंग's picture

23 Feb 2010 - 7:02 am | चतुरंग

पालक इतके अस्वस्थ असतात की काही विचारु नका.
डोक्यावर छत्री धरुन मुलांना सोडायला येतात. बरोबर लिंबू सरबत, उकळून गार केलेले पाणी, सात्विक खाऊ असले काय काय घेऊन येतात! त्या पोरांच्या पेन्सिलींना टोक करणे, पेनात शाई भरणे सगळी पुस्तके वह्या ह्यांचे ओझे स्वतः वाहणे, मूल अभ्यास करुन थकले की त्याला/तिला वाचून दाखवणे असले भयावह प्रकार चालतात.
स्वतःच आत येऊन पेपर लिहायचा तेवढा बाकी राहतो! :)
(आम्ही दहावीच्या सगळ्या पेपर्सना पेपर संपल्यावर सायकलींची मस्त पाडापाडी वगैरे खेळत घरी गेलेलो. सीरिअसली अभ्यास केला पण कधीच एवढं टेन्शन घेऊन नाही.)

चतुरंग

Nile's picture

23 Feb 2010 - 7:09 am | Nile

>>सीरिअसली अभ्यास केला

खरंच की काय काका? आम्ही तुम्हाला 'नॉर्मल' समजत होतो! :(

पण एकूणच तो वेळ कमी असायचा हे नक्की! ;)

(नॉर्मली अ‍ॅबनॉर्मल)चतुरंग

चिरोटा's picture

22 Feb 2010 - 7:36 pm | चिरोटा

परी़क्षेत कितीही उणिवा असल्या तरे दहावीच्या परीक्षेची सर इतर परीक्षांना येत नाही.शनिवारी भौतिकशास्त्राचा पेपर सोपा गेला म्हणून कडक उन्हात आम्ही मित्र प्रत्येकी ३ ग्लास लस्सी प्यायलो होतो. नंतर आडवे झालो. सुदैवाने दुसर्‍या दिवशी सुट्टी असल्याने वाचलो. नाहीतर पुढचा पेपर बुडल्यात जमा होता.
भेंडी(B094932)
P = NP

टारझन's picture

22 Feb 2010 - 8:55 pm | टारझन

=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =))
=))

मास्तर साला भलताच चावट आहे =)) लेबर रूमचा विचार ? तो ही ब्यांकेत =))

- (खिंडलढवय्ये) भाजीप्रभु

संदीप चित्रे's picture

23 Feb 2010 - 2:49 am | संदीप चित्रे

जरा जगू द्या की नीट !
मास्तर -- मुलांपेक्षा तुम्ही पालकांचंच जास्त समुपदेशन करायची गरज आहे :)

मदनबाण's picture

23 Feb 2010 - 7:18 am | मदनबाण

३ आठवड्या पुर्वी ह्यांनी गजबजलेल्या रस्त्यावरच्या ध्वनी प्रदुषणाचे रेकॉर्डींग केले.
मुलीच्या बापाने नक्कीच कमल हसनचा पुष्पक चित्रपट पाहिला असणार !!! ;)

ए पर्फेक्ट सिम्युलेशन एक्सरसाइज."
खी.खी.खी.... ;)

जाता जाता :--- वर्गात पंखे बंद असतील तर पेपर लिहताना त्रास होऊ नये म्हणुन काही पालकांनी अनेक महिने मुले घरी अभ्यास करताना पंखे बंदच ठेवले होते !!! असं कुठेतरी वाचल्याच आठवतय...

मदनबाण.....

तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...

चतुरंग's picture

23 Feb 2010 - 7:38 am | चतुरंग

जाता जाता :--- वर्गात पंखे बंद असतील तर पेपर लिहताना त्रास होऊ नये म्हणुन काही पालकांनी अनेक महिने मुले घरी अभ्यास करताना पंखे बंदच ठेवले होते !!! असं कुठेतरी वाचल्याच आठवतय...

आणि नंतर मुलांना ऐन परीक्षेच्या वेळी घामोळी आली म्हणून डर्मिकूल वापरले असेही ऐकले होते! ;)

(कूल)चतुरंग

टारझन's picture

23 Feb 2010 - 9:22 am | टारझन

आणि नंतर मुलांना ऐन परीक्षेच्या वेळी घामोळी आली म्हणून डर्मिकूल वापरले असेही ऐकले होते!

आगायाअयाअयायायायाअया
=)) =))) =)) =)) =)) ह्यांना आवरा रे कोणी तरी .. काल पासनं काही तरी "चायनिज" पदार्थ खाण्यात आल्या सारखे करतायत =))

समंजस's picture

23 Feb 2010 - 10:25 am | समंजस

छान!!!
:D

अभिषेक पटवर्धन's picture

23 Feb 2010 - 10:23 pm | अभिषेक पटवर्धन

पुस्तकाचं नाव अक्षरशिल्पे असं काहीसं होतं नाही का? नुसतं हे पुस्तकच नाही, अजुन एक पुस्तक असायचं, त्यात बोर्डात आलेल्या मुलान्नी लिहिलेले (त्यांच्याच हस्ताक्षरातले) पेपर्स असायचे. बोर्डात येण्याची शक्यता असलेल्यांकडुन परीक्षा झाल्यावर असे पेपर लिहुन घ्यायचे बाहुतेक. :) काय दिवस होते ते. आणि हे तरी माझ्या वेळचं म्हणजे साधारण १० वर्षापुर्वी... आता काय झालं असेल याची कल्पनाच केलेली बरी..