पाउस
असा पाउस पडावा
सुक्या मातीस ओलावा
धरीत्रीत निजलेल्या
बिजा अंकुर फुटावा
असा पाउस पडावा
पिके जोमाने वाढावी
दोन्ही वेळा चुलीवर
पुन्हा भाकर शिजावी
असा पाउस पडावा
त्याचा पैसा झाला खोटा
नंदीबैल यावा दारी
सांगे 'सुट्टी आज शाळा'
असा पाउस पडावा
मोरपिसारा फुलावा
घरी दारी अंगणात
राग मल्हार घुमावा
असा पाउस पडावा
झिम्मा खेळतील सरी
बळीराजा ही खेळेल
हिरव्या रंगाची पंचमी
असा पाउस पडावा
झरे तुडुंब वाहती
घेती दरीतून उड्या
त्यांची धिटाई केवढी
असा पाउस पडावा
पुर यमुनेस यावा
कुणी गोपिका बावरी
सखा कृष्ण कुणी व्हावा
असा पाउस पडावा
सारे चिंब चिंब व्हावे
मेघ धरेस भेटता
त्यात मीही विरघळावे
सुरेश नायर
http://sites.google.com/site/surmalhar/
प्रतिक्रिया
22 Feb 2010 - 12:08 am | शुचि
आणि प्रतिक्रिया कुठे द्यायच्या? :W
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
22 Feb 2010 - 12:11 am | sur_nair
वेब साईट वर दिल्या तर उत्तम नाहीतर इथे द्या
22 Feb 2010 - 12:15 am | शुचि
(१) इथे द्यायच्या असतील तर फोकसड अशी एक कविता लागेल जिचं सगळे रसग्रहण करतील अन्यथा मजा नाही राव.
(२) तुमच्या वेब साईट द्यायचं झालं तर तिथे लॉग इन आइ डी काढावा लागेल का?
*********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
22 Feb 2010 - 12:29 am | sur_nair
तुमचा मान राखून एक कविता इथे दिली आहे. ती वाचा मग ठरवा. सुचेनेबद्दल धन्यवाद.
22 Feb 2010 - 12:53 am | शुचि
खूप सुंदर कविता आहे. विविध चित्रे पावसाची रंगवलेली आहेत.
अर्थात मी आपल्या ब्लॉग वर जाइनच.
माझ्या म्हणण्याचा उद्देश एवढाच होता की - जर इथे एखादी कविता टाकत राहीलात तर खूप थोर थोर डोकी आहेत जी रसास्वाद घेऊन प्रतिक्रिया देऊ शकतील.
मला आवडलेले कडवे -
असा पाउस पडावा
झरे तुडुंब वाहती
घेती दरीतून उड्या
त्यांची धिटाई केवढी
*********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
22 Feb 2010 - 1:36 am | अरुण मनोहर
>>> असा पाउस पडावा
झिम्मा खेळतील सरी
बळीराजा ही खेळेल
हिरव्या रंगाची पंचमी <<<
ह्या ओळी खुप आवडल्या. कविता नादबद्ध आणि सरळ सोप्या भाषेत आहे. वाचायला मजा येते.
22 Feb 2010 - 7:17 am | पक्या
सुंदर कविता.
आपल्या पुढील कविता येथेच टाकाव्यात ही विनंती. इथे जास्त प्रतिसाद मिळतील.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
22 Feb 2010 - 12:16 pm | पाषाणभेद
लय भारी कविता हाय रं सुरेस!
आन इठं एक एक कविता येवू दे ना मंग. काळजी कशाला करतूस.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
22 Feb 2010 - 8:33 pm | sur_nair
इथे बरीच सुपीक मंडळी आहेत हे ध्यानात आले. उत्तम प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद. या पुढच्या कविता मी इथे टाकत जाईन पण आतापर्यंतच्या लिहिलेल्या ज्या माझ्या website वर आहेत त्यावर तिथेच प्रतिक्रिया दिल्या तर चांगले वाटेल. स्वतःच्या site चा फायदा हाच की हवी तशी मांडणी करता येते.
22 Feb 2010 - 11:43 pm | मीनल
`पंख` कविता आवडली.
मीनल.