नेत्यांची प्रतिज्ञा ...........
खुर्ची माझा देव आहे.
सगळे श्रीमंत माझे बांधव आहेत.
माझ्या पैश्यावर माझे प्रेम आहे.
माझ्या खिशातल्या डेबिट आणि
स्विस बँकेतल्या खजिन्याचा मला अभिमान आहे.
त्या पैशाचा दूरूपयोग करण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
मी माझ्या हायकमांड , पक्षश्रेष्ठी
आणि संपतीधार्या माणसांचा मान ठेवीन
आणि पैसेवाल्यांशी सौजन्याने वागेन.
माझे वरिष्ठ आणि माझे पद
यांच्याशी सदैव निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
माझ्या सात पिढ्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यातच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हाय कमांड ........
- मंगेश पावसकर
प्रतिक्रिया
21 Feb 2010 - 1:04 pm | विसोबा खेचर
मस्तच! :)
21 Feb 2010 - 7:48 pm | शुचि
सही!!
*********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
22 Feb 2010 - 9:24 am | मीनल
+१
मीनल.
23 Feb 2010 - 11:36 am | मंगेशपावसकर
+१ means
22 Feb 2010 - 11:23 pm | प्राजु
+२
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/
23 Feb 2010 - 11:39 am | मंगेशपावसकर
+२ means what??
22 Feb 2010 - 11:59 pm | रेवती
आहे खरी अशी परीस्थिती!
अशा लोकांनी जमवलेल्या संपत्तीची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही.
रेवती
23 Feb 2010 - 11:44 am | मंगेशपावसकर
अर्थातच
23 Feb 2010 - 12:14 am | मी-सौरभ
जय हाय कमांड, जय पैसा , जय भ्रष्टाचार.........
हे जास्त संयुक्तिक ना ????????
-----
सौरभ :)
23 Feb 2010 - 11:46 am | मंगेशपावसकर
बरोबर
23 Feb 2010 - 12:28 am | टारझन
आज मला चान्स भेटला तरी मी पैसा खाणारच आहे ;) त्यामुळे पैसे खाणार्या नेत्याच्या कर्माला नावे ठेवण्याचा मला नैतिक अधिकार नाही !
ते म्हणतात ना .. जाऊ दे .. अंमळ अश्लिल म्हण आहे .. व्यनि करा हवी असेल तर :)
23 Feb 2010 - 6:24 am | मदनबाण
झकास...
(फोटु जालावरुन घेतले आहेत)
मदनबाण.....
तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...
23 Feb 2010 - 11:47 am | मंगेशपावसकर
thats right