मी संपादक झालो तर ?

टारझन's picture
टारझन in जनातलं, मनातलं
20 Feb 2010 - 11:29 pm

णमस्कार्स लोक्स ,

मी लेखकर्मी, आज मी दहावीच्या मराठीच्या पेपरची तयारी करतोय. तसा मी भरपुर संस्थळांवर लिहीतो आणि सगळीकडे भरपुर प्रसिद्ध आहे, ह्याचे कारण माझे "विकली हिणकस " मधे बर्‍याचदा छापुन येणारे लेख. असो बदलीन.
तो विषय येथे नाही , पण तरीही रहावले नाही म्हणून सांगतो , "कॅफेटाईम्स" मधे सुद्धा माझ्या वाचनिय अशा प्रतिक्रीया छापुन येतात ! तर असा मी .. असामी लेखकर्मी .

आता २१ अपेक्षित उघडलन् ! प्रश्न पडला कोणत्या विषयावर निबंध गाळू ? तसे ऑप्शन्स बरेच होते, जसे
१. संकेतस्थळमालकांच्या दुष्काळी व्यथा
२. हिणकसकुमार , संकेतस्थळासाठी शाप की वरदान ?
३. मी संपादक झालो तर ?
४. बांग्लादेशी लेखकांचे मनोगत
५. वातुळ बटाट्यांना कसे आवरावे ?

परंतु सगळंच ह्या आधी कोणी ना कोणी उष्ट करून ठेवल्याने मी त्यातल्या त्यात एका विषयाला हात घालतो.
तर चला , निबंधाला सुरूवात करतो ! काही संवाद म्हणजे स्वतःशीच केलेली उद्बोधक चर्चा :)

मी संपादक झालो तर ?

मित्रांनो , आपल्या प्रत्येकामधे एक सुप्त इच्छा नेहमीच ठरलेली असते. आपण फलाना फलाना झालो तर ? आपल्याला फलाना फलाना सुपरपॉवर्स मिळाल्या तर ? नुसत्या कल्पनांनी मन कसं भ्रंम्हाडी सफरीचा लुफ्त (घो त्या "त्फ" चा ) लुटू लागतं, नाही ? मला सुद्धा असंच काहीसं वाटे . तसे सुपरपॉवर असणे म्हणजे एक युनिकनेस असतो . पत्त्यांमधे जशी "हुकमाचे पत्ते" असतात आणि ते बाकी प्रकारच्या पत्त्यांवर भारी असतात त्याच प्रमाणे संपादकपॉवर आहे असे मला प्रांजळपणे वाटते . पुन्हा इथे ही एक्का एकंच .. मग येतात राजा-राणी-गोट्या वगैरे ..
हो ... पण ह्या आतल्या गोटातल्या गोष्टी . बाहेरू मात्र हुकमाचं पान म्हणजे हुकमाचं पान :) !

मी जर संपादक झालो तर आधी माझे नाव बदलून कात्रीकर्मी ठेवुन घेईन , काय म्हणता ? णॉट रेकमेंडेड आय.डी ? सगळेच आपल्याला फाट्यावर मारून आपल्या फाट्याचं भजं करतील ? मग "का.त्र्या. मारुदे" ते ही घेतल्या गेला आहे ? ह्या अरेरे .. मग "कापुरंग" ? काय ? नाही घेता येणार ? का ? दोन तारांवर पाय ठेऊन कसरत करावी लागेल ? नको .. आपली ती कुवत नाही ... आता काय घेऊ ? "(सर्वकापी) कात्रु" घेऊ? नको .. नाजुक पण डेंजर ? नको बॉ .. एवढं बहुआयामी व्यक्तिमत्व आपलं नाही .. पण छ्या .. इथे ही फेल्ड् .. थांबा "कापिन कात्रीसार्खे" घेतो .. फेल्ड् अगेन.. मुस्तस्द्दीपणा हा मँडेटरी आहे ? तो कोणा लेकाच्यान आहे ? सोडा नाद ! .. लेम्मी कीप ट्रायिंग .. "कात्रा" ... नाही? .. ह्या आय.डी.चाही विकास झालाय वाटतं ऑलरेडी ... एखादं ६० वर्षापुर्वीचं नाव ट्राय करतो .. ते शक्यतो कोणी घेतलं नसेल .. "कापुन ठेव" .. फेल्ड .. आय.डी. एग्झिस्ट सिन्स जिजस बॉर्न ? च्यामारी हा आय.डी आपल्या बारश्यालाही घेणं शक्य नव्हतं ! च्यायला ... सुपरपॉवर व्हायची स्वप्न पहातोय खुशाल .. पण असं ठोस , भरीव आणि वजनदार का बरं लागत नाहीये ? "कात्रोबा टर्टर " .. "डोन्च्यू डेयर टू थिंक ऑफ धिस आय.डी. यू वान्ना लिव्ह ऑर यू वान्ट पॅरागॉन ?" असा काहीसा मेसेज आला .. शिवधनुष्यापेक्षाही जड नाव घेतल्यावर काय होणार ? .. आहे त्याच नावाने संपादक व्हावे काय ? नाही .. असं कसं .. असं कसं ? सुपरहिरो ला नेहमी एक आभासी नाव असलंच पाहिजे .. पण नाही ना सुचत .. अर्रे पण मी होतो ना "अपवाद पारा " ! आपण आहे ह्याच नावाने "संपादक - द सुपर कापर" बनुया !

मी संपादक झालो तर !!!! वा वा वा !!! काय सुरेख आणि तरल विचार आहे ! नुसत्या कल्पनेनेच माझी बोटं कशी शिवशिवायला लागली ! योग्य जागी ह्यांचा तसाही हल्ली उपयोग होत नाही ... घ्या अवघे अंतरजालंची माझे घर म्हणा ! आणि दाखवा बोटांची जादू जगाला :) साला कोण नडतो पहातोच मला ! एकतर संपादक झाल्यावर सर्वेसर्वा आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो ! मग काय ? पुर्ण राण मोकळं आहे आपल्याला ! कापा कुठेही आणि कसेही .... आणि लावा आग जंगलाला :) कोणी बोंबललाच .. तर म्हणायचं .. अरे हल्ली उण्ह फार तापतात .. वणवा पेटला असेल .. आम्ही नाही .. आम्ही नाही केलं हो काही .. हॅहॅहॅ .. आम्ही तर वेगळ्याच संस्थळांवर / ब्लॉग्ज वर काड्या करण्यात मश्गुल होतो .. असं करून हलकेच कॉलरवरची (नसलेली) धुळ झटकावी. नाही तरी अशी वेळ येते फार कमी ... कारण सर्वेसर्वा कसा रोखठोक आहे .. जसा युद्धावर जाणार्‍या सोल्जरच्या अंगावर बॉंब्ज , मॅग्झिन्स , चाकूज, गन्स इत्यादी सामान लोड केलेला असतो तसा आपला सर्वेसर्वा आंगभर चपला लटकवून असतो सगळ्या साईझच्या. आहे काय नाय काय !! सरळ पीन मारावी ... हे पहा मालक .. हे बेणं आपल्याविरूद्ध ( स्वत:विरुद्धचे हल्ली हे "आपल्या" विरुद्ध केल्यावर एखादा वेगळा इफेक्ट येतो ) लै बडबड करतं हल्ली .. ह्याला धडा शिकवलाच पाहिजे. ह्याची लेखणी हल्ली आपल्याविरुद्ध फार चालते . आपल्याच संस्थळावर येऊन आपली तासतो म्हणजे काय ? कापला त्याला ! मग मालकंही डोक्यावर कौतुकाने हात फिरवून "व्वा रे माझ्या संपादका ~! कसा बाणेदार संपादक वाटतोस :) म्हणतील आणि एक पाठीला चोळण्याचा साबण बक्षिस म्हणून देतील .. की लग्गेच आपले ढोरास रोड ला पळावे .. तीकडे म्हणे भरपुर म्हशी डूंबत असतात ;) आपण मात्र साबणाबरोबर डर्मीकुलही न्यावे . :) आणि आपली आवडती म्हैस पाहुन काळ्या पाठी पांढर्‍या करण्याचे निष्फळ प्रयत्न करावे :) होत नाही पाहुन तात्पुरता उपाय म्हणून बरोबर आणलेलं डर्मिकुल फासावं :) म्हैसही खुष .. आपण ही खुष ..
पण असं सुपरहिरो ने आपल्या हेतु पासुन अवांतर होऊन असं चालेल ? गप गुमान कितीही (आणि काहीही) वाटलं तरी कम ब्याक टू दं ड्युटी ! इट्स आवर वावर शेवटी .. नाही का ? :)

असो , संपादक झालो तर अवांतरपणा किंवा कल्ला करण्याची काही विषेश शक्ति नष्ट होतात :) अर्थात त्या करायच्या असल्यास आपली "अय्यार" शक्ती वापरून आपला क्लोन तयार करून तो जंगलात सोडावा ! ह्याच्या तारा आपल्या हातात नाहीत हे लपवण्याचे कौशल्य मात्र आपल्यात हवे ! ह्या "अय्यारी क्लोन्स" चा अजुन एक उपयुक्त उपयोग असतो :) ह्याला काही तरी वाकडे-तिकडे लिहीण्यास लावावे , मग आपण (अचानक) प्रकट होऊन भर चौकात हाणावे , ह्यामुळे आपला दरारा कसा तरारून वाढतो.

संपादक झाल्यावर अजुन एक गोष्ट करायची ! ते म्हणजे सपक किंवा आळणी लिहायला लागायचे :) काय ? अरे पण आपल्याला कल्ला किंवा राडा नसलेली प्रत्येक गोष्ट सपक आळणीच लागते , असं जनरलाईझ करून कसं चालेल ? आणि किती अवघड हे आव्हान ? सगळी थेरं आपण स्वतःच्या नावाने करूच शकणार नाही ? हे म्हणजे "अल् कायदा" ने आतंकवादी हमले करून गुप्तता पाळायला लागली तर त्या "अल् कायदा" च्या जेवढं जिवावर येईल त्यासारखं होईल राव ! मग ? संपादकपणा म्हणजे काय पोरखेळ वाटला ? आपल्याला कर्मी वगैरे बिरुदं लावली की लगेच महाण होतो का कोणी ? लक्षात ठेव ! संपादक ही पॉवर आहे मोठी वेगळी पॉवर ...
वाटतं सोपं पण नाहीये तसं .. वारंवार कासर्‍याचे घाव पडून पडून रहाटाचं चाक जसं गुळगुळीत होतं तसं एका क्षणात करणं सोप्पं आहे की काय ? तेवढे घट्टे आणि घाव सोसावे लागतात तेवढा वेळ द्यावा लागतो .. तेवढी परिपक्वता यायला हवी .. कोणीही आल्ल्याबल्ल्या संपादक होऊन चालेल का? निसर्ग ते कधीही मान्य करणार नाही !

त्यामुळे तु आहे तसाच लेखकर्मी रहा बाबा ! नसत्या सुपरपॉवर्स ची स्वप्न पाहु नकोस ! :) तुझं वय आहे आवडत्या नट्यांची स्वप्न पहाण्याचं .. ती पहा :) उपयोगात तरी येतील किमान .. (कुठाय तो आयेशाचा फोटू ? )
ह्या सगळ्या गोष्टींच्या पलिकडे गेलास .. की मग पहा संपादकपणाची स्वप्न !

टिप : पेपर लिहून भरपूर टाईम उरला तर बाकी विषयांवरचे निबंध लिहीन :)

नृत्यशुभेच्छा

प्रतिक्रिया

प्रभो's picture

20 Feb 2010 - 11:39 pm | प्रभो

ठ्यॉ....ठ्यॉ....ठ्यॉ....ठ्यॉ....ठ्यॉ....ठ्यॉ....ठ्यॉ....

हिण आणी हिणकसतेचा कहर.....मुळा-मुठेच्या (मुठीला नाही) पुराप्रमाणे.....

भयताडा, तुझा लेख येई पर्यंत जेवायचा थांबलो होतो....सार्थक झालं... :)

(पहिले प्रतिसादकर्ते) प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

शेखर's picture

20 Feb 2010 - 11:41 pm | शेखर

माताय टार्‍या.....

अंमळ तुझा शेपटावर पाय दिलेला दिसतोय कोणीतरी..... :)

बाय द वे, खास टार्‍या टच लेख.... टिकलातर कायमच वाचत राहीन....

शेखर

प्रभो's picture

20 Feb 2010 - 11:44 pm | प्रभो

"टिकलातर" बोल्ड करायचं राहिलं का रे शेखर्‍या???

या लेखात मलातरी काही उडवण्यासारखं वाटत नाही.... (सौजन्य...आपण समजला असालच..) आणी उडाला तरी वाचून प्रतिक्रिया देउन झालेली आहेच...

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

टारझन's picture

20 Feb 2010 - 11:47 pm | टारझन

गपा की रे ए चोच्याहो !! कशाला "उडणार ..." "नाही उडणार" चा उहापोह करताय ? च्यामारी ह्यामुळं उडायचा नसला तरी उडेल लेख .. :)

-- आ.धी. ब्याकप घेऊदे

प्रभो's picture

20 Feb 2010 - 11:57 pm | प्रभो

घ्या ...घ्या
ब्याकप घ्या...

(ब्याकप) प्रभोरंग
-----------------------------------------------------------------------
मी या संस्थळावर आणी सगळीकडेच लाईन न लावता फिरतो...त्यामुळे माझी लाईन क्लीअर आहे अशी समजावी.

हर्षद आनंदी's picture

20 Feb 2010 - 11:52 pm | हर्षद आनंदी

बाकी शेखरशी सहमत,,, टिकला तर कायम स्मरणात राहील :)

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

कुंदन's picture

21 Feb 2010 - 12:18 am | कुंदन

नक्की बोर्डात येणार हे कार्ट...

"उडणार" , "नाही उडणार" .......काऴजी नको रे....
ब्याकप घिऊण ठेव , ऊडालाच तर लिंकाळ्याला सांगु ब्लॉग वर प्रकाशित कर म्हणुन.

मी-सौरभ's picture

21 Feb 2010 - 12:39 am | मी-सौरभ

नविन नावं सहीच्च.....

-----
सौरभ =)) =)) =)) =)) =))

शुचि's picture

21 Feb 2010 - 4:43 am | शुचि

फक्त १२????? 8| :? >:P [( /:) वा रे वा!!!!! परीक्षकांचा जाहीर आणि जहाल णिषेध
*********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मी-सौरभ's picture

21 Feb 2010 - 11:09 pm | मी-सौरभ

१० गुण पण मिळण कठीण म्हणून ह्याला १२ दिलेत...

टारझन: पटतय ना बाबा तुला ????????

-----
सौरभ :)

शुचि's picture

21 Feb 2010 - 3:57 am | शुचि

>>अरे पण आपल्याला कल्ला किंवा राडा नसलेली प्रत्येक गोष्ट सपक आळणीच लागते>>>
=)) =)) =))
सही है!!!! माना गुरु
वाक्या वाक्याला हशा ..... काय मस्त लिहीलाय !!! आई शप्पत!!!
_______/\________
*********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

टारझन's picture

21 Feb 2010 - 4:20 am | टारझन

शुचि जी ,
आपल्या मौल्यवाण प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद . आपल्या सारख्या प्रख्यात सिद्धहस्त लेखिकेच्या प्रतिक्रीयेने लेख वजनदार होईल आणि मग उडणार नाही :)

- शेव्चि (भाजी)

अरुण मनोहर's picture

21 Feb 2010 - 3:15 am | अरुण मनोहर

भावी संपादकाचे अभिणंडण

सजेशण- "कात्रट टार्ट" णाव चालेल कां ?

रेवती's picture

21 Feb 2010 - 3:26 am | रेवती

टार्‍या,
तू धन्य आहेस रे बाबा!
नसत्या उचापती करायला सांगितलय का कोणी?
मालक चिडतात ते उगीच नाही!:)
एक मात्र आहे, तू लवकरच संपादक पदाला पोहोचणारेस!
हल्ली कोणी उठाव करण्याच्या बेतात दिसलं रे दिसलं कि मालक त्या सदस्याला संपादक करून टाकतात. मग हुल्लडबाजी न करता आपोआपच हातात टाळ घेऊन भजनं म्हणायची वेळ येते. संपादकपद हे भूषण न राहता भिषण होऊन जातं!;)
आता तूच ठरव हा लेख उडवून टाकण्याची विनंती करून दंगा करायचाय कि संपादकपद भूषवून गंभीर व्हायचय? मला कळव, आजकाल मी गंभीर क्यॅटॅगरीमध्ये आहे.
अवांतर: कतरीना कैफ या नावाबद्दल काय वाट्टय?

रेवती

टारझन's picture

21 Feb 2010 - 3:34 am | टारझन

चुकीचा मेसेज जातोय का ? मालकांशी अथवा कोणत्याही संपादकांशी ह्या लेखाचं काहीएक घेणंदेणं नाहीये , असलंच तर फक्त नाममात्र :)

बाकी लेख केवळ आणि केवळ मज्जा म्हणून टाकला ! हे असले खुलाशे टाकणे म्हणजे आपलाच जोग न समजल्यामुळे आपणंच समजावुन सांगण्यासारखे आहे.

असो :) कतरिना कैफ म्हणजे आहाहा ! :)

ही आमची कतरिणा कैफ .. हीच्यावरही आमचा भारी जीव :)

रेवती's picture

21 Feb 2010 - 3:38 am | रेवती

काह्ही चूकिचा वगैरे मेसेज जात नाहीये. लेखात बरीच कातराकातरीची नावं वाचली आणि एकदम कतरीनाचं नाव आठवलं.

रेवती

मेघवेडा's picture

21 Feb 2010 - 5:14 am | मेघवेडा

अफलातूण रे टार्‍या! एकदम जबर्‍या!! फुल्लॉन आवडेश!!

साष्टांग दंडवत बाबा तुला!

--मेघवेडा.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

प्रमोद देव's picture

21 Feb 2010 - 8:06 am | प्रमोद देव

टारुशेठ, तू आजपासून संपादक झालास. ;)
संपादकपदाची ’अंगवस्त्रे’ पाठवून देत आहे. संपादकपदासाठीचा तुझा आयडी असेल ’कातरण’.... :D
तेव्हा होऊन जाऊ दे काम सुरु! B)

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

टारझन's picture

21 Feb 2010 - 9:17 am | टारझन

कातरण ?!!!?!!!
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

कतरिणा च्या कित्ती जवळ आल्यासारखं वाटलं म्हणून सांगु :)

आणि ती संपादकांची "**वस्त्रे" संपादकांना लखलाभ :) हॅहॅहॅ .. संपादकांच्या वस्त्रांचं क्वास्च्युम डिझायनिंग कोणी केलं ? असा एक हलकाच प्रश्नतरंग उमटला !

श्रद्धा.'s picture

21 Feb 2010 - 9:28 am | श्रद्धा.

लय भारी बुवा हे पोरगं, नक्की संपादक व्हणार....

विसोबा खेचर's picture

21 Feb 2010 - 10:44 am | विसोबा खेचर

चालू द्या! :)

तात्या.

विनायक प्रभू's picture

21 Feb 2010 - 10:57 am | विनायक प्रभू

अगदी टार्गट लेख

ऋषिकेश's picture

21 Feb 2010 - 11:31 am | ऋषिकेश

:)

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

जयवी's picture

21 Feb 2010 - 12:27 pm | जयवी

झकास :)

स्वाती दिनेश's picture

21 Feb 2010 - 12:33 pm | स्वाती दिनेश

टारोबा... काय लिवलयस रे :)
स्वाती

चतुरंग's picture

21 Feb 2010 - 2:42 pm | चतुरंग

मिसळ-तर्री चापून आमच्याच धोतराला हात आन त्वांड पुसतंय!! ~X(
लेख आवडेश रे (संपादक असलो तरी तसा मी मोठ्या मनाचा आहे हो! ;) )

चतुरंग

प्रकाश घाटपांडे's picture

21 Feb 2010 - 4:02 pm | प्रकाश घाटपांडे

भ्रमणमंडळ मधील कोचरेकर मास्तरांच्या धोतरावर रस्सा सांडतो.
हळुच चाटला बिटलात कि काय?
छे हो चाटतोय कुठला? झोंबतोय ना मांडीला
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

टारझन's picture

21 Feb 2010 - 10:11 pm | टारझन

(संपादक असलो तरी तसा मी मोठ्या मनाचा आहे हो! :) )

अगदी !!! आपलं केवळ मनच मोठं नाही तर स्वभावही अंमळ छाण आहे हो ;)

चला .. दोन संपादक एका मालकाची प्रतिक्रीया .. उत्तम प्रतिसाद लाभला :)
उद्या कोणी असं नको म्हणायला की कोणी संपादकही फिरकला नाही इकडं :)

- प्रो. केळफा

वेताळ's picture

21 Feb 2010 - 4:20 pm | वेताळ

=))
तु आहेस तसाच ठिक आहेस. संपादक झालास तर काय हाल करशील ह्याचा नेम नाही.
=))
एकदम झक्कास लिव्हलयस भावा.....
वेताळ

शानबा५१२'s picture

21 Feb 2010 - 6:52 pm | शानबा५१२

णमस्कार्स लोक्स......... :)) जेवढया वेळा वाचलं तेवढयावेळा हसलो.

संपादक संपादक का चालु आहे,अशा गैरसमजाचे कारण?
इथं वाईस नवा हाय म्या!

अजुन कच्चाच आहे's picture

21 Feb 2010 - 8:10 pm | अजुन कच्चाच आहे

कठीण आहेस बॉ....
......धारदार सुध्दा.
बरेच दिवसांनी आलो मिपावर नी लगेच जबरदस्त झणझणीत मेजवानी...
क्या बातै.
.................
अजून कच्चाच आहे.
जगातील ९७% मराठी माणसे पाण्याला 'पानी' म्हणत असतील तर 'पानी' अशुध्द कसे ?

II विकास II's picture

21 Feb 2010 - 8:21 pm | II विकास II

लेख उत्तम जमला आहे.
देवकाकांशी लेखकाबद्दल चर्चा केली होती. लेखकाच्या बुद्धीमत्तेबद्दल वादच नाही.
असो..

अनामिक's picture

21 Feb 2010 - 9:11 pm | अनामिक

हा हा हा... ज ह ब ह र्‍या!

-अनामिक

प्राजु's picture

21 Feb 2010 - 10:31 pm | प्राजु

आता काय घेऊ ? "(सर्वकापी) कात्रु" घेऊ? नको .. नाजुक पण डेंजर ? नको बॉ .. एवढं बहुआयामी व्यक्तिमत्व आपलं नाही ..

अस्सं काय??? टार्झटा!! बघते थांब तुला.
:)
लेख पूर्ण वाचून झाल्यावर सविस्तर प्रतिक्रिया देइन.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Feb 2010 - 11:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निबंधाची गुणविभागणी खालीलप्रमाणे.

प्रास्ताविकाला पाच पैकी तीन गुण
कोथळा उर्फ मथळ्याला पाच पैकी चार गुण
समारोपाला पाच पैकी दोन गुण
अशुद्धलेखनाला पाच पैकी पाच दिले.

टारझन होतोस का संपादक. माझ्याच युजरनेमने यायचे.
पासवर्ड पाठवतो. फक्त माझे व्य.नी वाचायचे नाहीस. :)

-दिलीप बिरुटे
[वर्ग दहावी तुकडी 'ढ'चा टार्‍याचा मास्तर]

टारझन's picture

21 Feb 2010 - 11:18 pm | टारझन

हॅहॅहॅ :) प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद सर :) आणि भर्पुर मार्क दिल्याबद्दलही :)

बाकी दहावी "ढ" =))

टारझन होतोस का संपादक. माझ्याच युजरनेमने यायचे.

हाहाहा =)) =)) =)) आमची भुतावळ आलरेडी पळाली बा ;) आता केवळ गोतावळा उरलाय :) कशाला त्येंन्ला बी पळवताय ? =))

पासवर्ड पाठवतो. फक्त माझे व्य.नी वाचायचे नाहीस

ह्याह्याह्या ! का ? व्यनि मधे काय तो आणि ती चे संवाद आहेत की काय? =))

काही खरं नाही बा :) बिरुटेसर हा हिमनग जेवढा पाण्यावर दिसतो त्याच्या ९० पट पाण्याखाली असणार बाबा ;) हँड्स अप !!

प्राजु's picture

21 Feb 2010 - 11:29 pm | प्राजु

हाहाहा..
मस्त !!
बरेच चौकार , षट्कार लगावले आहेत.
लेख उत्तम.
( हा लेख होळी विशेषांकासाठी पाठवायला हवा.. टार्‍या भाय!)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

टारझन's picture

21 Feb 2010 - 11:42 pm | टारझन

धन्यवाद प्राजु तै :)
आणि ते करड्या शाईतलं तर एकदमंच क्लिक झालं बघ :) आता देवाची आज्ञा/अनुमती असेल तर जाऊ देत लेख हिवाळी अंकावर ... :) आमचं पण जरा च्यार संस्थळांवर णाव व्हईल :) अन्यथा मिपासोडल्यावर "कोण टारझन ?" असं होतं =))

इंटरनेटस्नेही's picture

9 May 2010 - 3:13 am | इंटरनेटस्नेही

मनापासुन हसवणारा एक लेख....! टारझन, जबरदस्त विनोदबुद्धी आहे तुमच्याकडे!

--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

sur_nair's picture

9 May 2010 - 9:44 am | sur_nair

~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X(
~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X(
~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X(

टारझन's picture

9 May 2010 - 10:23 am | टारझन

हाहाहा ... :)
केसं उपटुन का होईना , आमचा जुणा धागा वर आणल्याबद्दल धणुर्वात :)